फोटोग्राफी कशी करावी

उदय's picture
उदय in मिपा कलादालन
3 Oct 2016 - 4:14 am

मिपावर फोटोग्राफीच्या थियरीबद्दल स्वॅप्स यांनी खूप छान मालिका लिहिली आहे, ती नक्की वाचा. आपण DSLR कॅमेरा उत्साहाने घेऊन येतो, खूप छानछान फोटो काढावेसे वाटतात. थोडीफार थियरी पण माहीत असते, पण बर्‍याचदा होते काय की आपण ऑटो मोडमध्येच अडकून पडतो. अशा लोकांसाठी थोडी तोंडओळख म्हणून हा लेख लिहित आहे. मी काही फार दिग्गज फोटोग्राफर नाही, पण प्रत्यक्ष उदाहरण देऊन फोटोग्राफी शिकवणारे लेख मराठीत तरी मी पाहिले नाहीत, म्हणून घाबरत घाबरत हा एक प्रयत्न करत आहे, कृपया गोड मानून घ्यावा.

नवशिका/नवशिकी फोटोग्राफर साधारणतः असा फोटो काढतात.
 Learn Photography &emdash;
1/200 at f/7.1 लेन्स 35 mm प्राइम
हा छान फोटो आहे, मस्त हिरवळ आणि झाडी आहे, असे मित्र-मैत्रिणी म्हणतात. पण फोटोत ऑब्जेक्ट काय आहे, तेच कळत नाही. फोटोमध्ये कुठेतरी नजर खिळली पाहिजे, असा आपला उद्देश हवा. मग तो फोटो उत्तम होतो असं मला वाटतं.

आता पुढील फोटोमध्ये रंगीत भोपळे आहेत, पण सोबत १ मूलपण आहे. त्यामुळे फोटोमध्ये सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन येते.
 Learn Photography &emdash;
1/80 at f/4.5 लेन्स 35 mm प्राइम


1/200 at f/7.1 लेन्स 35 mm प्राइम

फोटो काढताना काँपोसिशनकडे नेहमी लक्ष द्यावे. त्यामुळे कुठल्याही कॅमेरावर चांगले फोटो येऊ शकतात.

थियरीतला महत्वाचा भाग असतो म्हणजे "डेप्थ ऑफ फिल्ड". कॅमेराचा डोळा जास्त उघडला की "डेप्थ ऑफ फिल्ड" कमी होते, म्हणजे मुख्य ऑब्जेक्ट शार्प राहाते आणि बाकीचा भाग धूसर राहातो. अ‍ॅपरचर कंट्रोल करून "डेप्थ ऑफ फिल्ड" बदलता येते. याच्यासाठी "अ‍ॅपरचर प्रायोरिटी" हा मोड वापरा. याच्यात आपण स्वतः अ‍ॅपरचर निवडायचे असते आणि कॅमेरा आपोआप योग्य तो शटर इंटरव्हल निवडतो.
"डेप्थ ऑफ फिल्ड" चे उदाहरण बघुया.

 Learn Photography &emdash;

 Learn Photography &emdash;

1/800 at f/1.8 लेन्स 35 mm प्राइम
1/800 at f/1.8 लेन्स 35 mm प्राइम

यात f/1.8 म्हणजे कॅमेराचा डोळा भरपूर उघडा ठेवला आहे. त्यामुळे "डेप्थ ऑफ फिल्ड" कमी आहे. त्यामुळे मागचा भाग धुसर दिसत आहे.
पहिल्या ३ फोटोत त्या मानाने कॅमेराचा डोळा कमी उघडा (f/7.1) आहे म्हणून पूर्ण फोटो इन-फोकस आणि शार्प वाटतो.
f स्टॉप नंबर जितका कमी असेल, तितका कॅमेराचा डोळा जास्त उघडा असतो. f स्टॉप नंबर मोठा म्हणजे डोळा मिटलेला, असे हे व्यस्त प्रमाण आहे.

कधी-कधी काय होतं की कॅमेराचा डोळा जास्त उघडला जातो, त्यामुळे फोटो "ओव्हर-एक्स्पोज" होतो आणि पांढरट दिसतो. म्हणजे खाली डावीकडे दिसतोय तसा. मग अशा वेळी काय करायचं? शटर स्पीड आधी इतकाच ठेऊन कॅमेराचा डोळा थोडा मिटायचा (म्हणजे f स्टॉप नंबर वाढवायचा).

 Learn Photography &emdash;

 Learn Photography &emdash;

1/200 at f/2.2 लेन्स 35 mm प्राइम
1/200 at f/5.6 लेन्स 35 mm प्राइम (f/5.6 म्हणजे f/2.2 पेक्षा कमी उघडलेला डोळा)

जर फोटो "अंडर-एक्स्पोज" झाला आणि अंधारा दिसला, तर उलट करायचं. शटर स्पीड आधी इतकाच ठेऊन कॅमेराचा डोळा जास्त उघडायचा (म्हणजे f स्टॉप नंबर कमी करायचा).

 Learn Photography &emdash;

 Learn Photography &emdash;

1/200 at f/14 लेन्स 35 mm प्राइम
1/200 at f/10 लेन्स 35 mm प्राइम (f/10 म्हणजे f/14 पेक्षा जास्त उघडलेला डोळा)

फोटो "ओव्हर-एक्स्पोज" झालाय की "अंडर-एक्स्पोज" झालाय ते कसं ओळखायचं? ते हिस्टोग्राम बघून ओळखता येते. त्यामुळे फोटो काढला की हिस्टोग्राम बघायची सवय करा.

आता तुम्ही विचार कराल मी जर "अ‍ॅपरचर प्रायोरिटी" हा मोड वापरतोय, म्हणजे मी फक्त "अ‍ॅपरचर" कंट्रोल करतोय आणि शटर स्पीड तर कॅमेरा निवडतोय, मग मी शटर स्पीड कसा काय तोच ठेऊ? ही शंका बरोबर आहे. मग अशा वेळी तुम्ही "शटर प्रायोरिटी" किंवा "मॅन्युअल" मोड वापरला पाहिजे. "शटर प्रायोरिटी" मध्ये आपण शटर स्पीड निवडतो आणि कॅमेरा अ‍ॅपरचर निवडतो. "मॅन्युअल" मोडमध्ये आपण दोन्ही, म्हणजे अ‍ॅपरचर (f स्टॉप) आणि शटर स्पीड निवडतो.

साधारणतः "डेप्थ ऑफ फिल्ड" कंट्रोल करायचे असेल तर "अ‍ॅपरचर प्रायोरिटी" हा मोड वापरायचा आणि स्पीड कंट्रोल करायचा असेल तर "शटर प्रायोरिटी" हा मोड वापरायचा. खालील उदाहरण "शटर प्रायोरिटी"चं आहे.

 Learn Photography &emdash;

 Learn Photography &emdash;

1/15 at f/14 लेन्स 35 mm प्राइम
1/10 at f/25 लेन्स 35 mm प्राइम

माझ्या अनुभवानुसार कॅमेरा हातात धरलेला असताना शटर इंटरव्हल फार तर 1/15 सेकंद करता येतो, नाही तर फोटो हललेला दिसतो. जर 1/15 सेकंदापेक्षा जास्त वेळ शटर उघडे ठेवायचे असेल, तर ट्रायपॉड वापरावा.

सूर्यप्रकाश कुठून येत आहे, ते पण लक्षात घ्यावे. म्हणजे कधी कधी इंटरेस्टिंग इफेक्ट मिळवता येतात.
उदा: खाली डावीकडचा फोटो ऑटो मोडमध्ये घेतला, जो मला खूपच फ्लॅट (मिळमिळीत?) वाटला, म्हणून मी उजवीकडील फोटो, थोडासा उजवीकडे सरकून (प्रकाशाची तिरीप पडेल असा) प्रोग्राम मोड मध्ये घेतला आहे. यात सूर्यप्रकाश डावीकडून येत आहे, त्यामुळे प्रकाश-सावली असा इफेक्ट आल्याने फोटो जरा त्रिमितिय (3D) वाटतो. असे प्रयोग करायला मजा येते.

 Learn Photography &emdash;

 Learn Photography &emdash;

1/200 at f/7.1 लेन्स 35 mm प्राइम (ऑटो मोड)
1/500 at f/5.6 लेन्स 35 mm प्राइम (प्रोग्राम मोड)

तुम्हाला हा लेख आवडेल अशी आशा आहे.

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

3 Oct 2016 - 7:06 am | तुषार काळभोर

शब्दांचे कृत्रिम मराठीकरण न करता सोदाहरण स्पष्टीकरण दिल्याने आवडले.

अजून अशाच तांत्रिक गोष्टी मराठीतून येऊ द्या, अर्थात छान छान फोटोंसहित.

नक्कीच~~शब्दांचे कृत्रिम मराठीकरण न करता सोदाहरण स्पष्टीकरण दिल्याने आवडले.~+1

भटकंती अनलिमिटेड's picture

3 Oct 2016 - 9:28 am | भटकंती अनलिमिटेड

वाचतोय.

महासंग्राम's picture

3 Oct 2016 - 11:21 am | महासंग्राम

फक्त वाचतोय, देवा कुठे फेडाल हि पापं... तुमच्याकडून फोटोग्राफीबद्दल भरपूर लेख अपेक्षित आहेत.

भटकंती अनलिमिटेड's picture

3 Oct 2016 - 11:40 am | भटकंती अनलिमिटेड

शिकतोय

महासंग्राम's picture

3 Oct 2016 - 1:41 pm | महासंग्राम

नाही ना देवा तुम्ही असं म्हणाल तर आम्हाला कॅमेरा माहीत नाही असंच म्हणावं लागेल.
तुमच्या ब्लॉगचे नियमित पारायणं सुरु असतात आमचे, तेव्हा तुम्ही तरी असं म्हणू नका सायबा ;)

चौकटराजा's picture

3 Oct 2016 - 9:41 am | चौकटराजा

लेख चांगला आहे. तुमचे आडनाव भोपळे आहे काय ? ह घ्या !

राजाभाउ's picture

3 Oct 2016 - 11:16 am | राजाभाउ

मस्त आहे. या विषयावर अजुन वाचायला आवडेल , वाखु साठवली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Oct 2016 - 11:43 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर, सोप्या शब्दांतला पण माहितीपूर्ण लेख !

झुमकुला's picture

3 Oct 2016 - 12:27 pm | झुमकुला

माहितीपूर्ण लेख,
स्वॅप्स यांनी लिहिलेल्या लेखमालेची लिंक द्याल का कृपया ?

महासंग्राम's picture

3 Oct 2016 - 1:43 pm | महासंग्राम
ज्याक ऑफ ऑल's picture

3 Oct 2016 - 12:37 pm | ज्याक ऑफ ऑल

आणखी येईल ... अशी वाट पाहून आहे ... !!

महासंग्राम's picture

3 Oct 2016 - 1:44 pm | महासंग्राम

सुंदर लेख तेव्हढा FX आणी DX मधला फरक समजावून सांगा राव लैच गोंधळ होतो.

एस's picture

3 Oct 2016 - 2:09 pm | एस

छान लेख.

सुधांशुनूलकर's picture

4 Oct 2016 - 3:36 pm | सुधांशुनूलकर

स्वॅप्सच्या लेखमालेला पूरक.
वाखूसा

वेल्लाभट's picture

4 Oct 2016 - 3:53 pm | वेल्लाभट

उत्तम समजवलंय. सुरेख.
एक मत... १/१५ हँडहेल्ड साठी खूप स्लो होतं. १/८० फार तर फार ठेवावं, माझ्या मते. त्याहून कमी स्पीडला शेक येतोच.

माम्लेदारचा पन्खा's picture

4 Oct 2016 - 8:16 pm | माम्लेदारचा पन्खा

दंडवत स्वीकारा...आणि एक पुस्तक लिहा....

सुबोध खरे's picture

5 Oct 2016 - 10:00 am | सुबोध खरे

+१०००

खूपच नवीन माहीती माझ्यासाठी. अजुन येउद्या अशीच माहीती.

पैसा's picture

4 Oct 2016 - 10:33 pm | पैसा

लेख आवडला. अतिशय सोप्या शब्दात लिहिता आहात.

फार पु्र्वी SLR वापरला आहे
तेंव्हा तर रीझल्ट कळायला खुपच वेळ लागायचाः
सगळा भरवसा नजरेच्या अंदांजावर असायचा

नीळा's picture

5 Oct 2016 - 9:47 am | नीळा

जस्ट जूने दीवस आढवले
बाकी लैख मस्त

श्रीरंग_जोशी's picture

5 Oct 2016 - 9:59 am | श्रीरंग_जोशी

अत्यंत उपयुक्त लेखन.
प्रत्यक्ष उदाहरणे देऊन सोप्या भाषेत थेट मार्गदर्शन दिले आहे. कृपया येथेच न थांबता अधिक विस्ताराने या विषयावर लिहित राहावे ही विनंती.

संत घोडेकर's picture

5 Oct 2016 - 10:24 am | संत घोडेकर

धन्यवाद,
उपयुक्त माहिती