✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फोटोग्राफी कशी करावी

उ
उदय यांनी
Mon, 10/03/2016 - 04:14  ·  लेख
लेख
मिपावर फोटोग्राफीच्या थियरीबद्दल स्वॅप्स यांनी खूप छान मालिका लिहिली आहे, ती नक्की वाचा. आपण DSLR कॅमेरा उत्साहाने घेऊन येतो, खूप छानछान फोटो काढावेसे वाटतात. थोडीफार थियरी पण माहीत असते, पण बर्‍याचदा होते काय की आपण ऑटो मोडमध्येच अडकून पडतो. अशा लोकांसाठी थोडी तोंडओळख म्हणून हा लेख लिहित आहे. मी काही फार दिग्गज फोटोग्राफर नाही, पण प्रत्यक्ष उदाहरण देऊन फोटोग्राफी शिकवणारे लेख मराठीत तरी मी पाहिले नाहीत, म्हणून घाबरत घाबरत हा एक प्रयत्न करत आहे, कृपया गोड मानून घ्यावा. नवशिका/नवशिकी फोटोग्राफर साधारणतः असा फोटो काढतात. Uday's Photos: Learn Photography &emdash; 1/200 at f/7.1 लेन्स 35 mm प्राइम हा छान फोटो आहे, मस्त हिरवळ आणि झाडी आहे, असे मित्र-मैत्रिणी म्हणतात. पण फोटोत ऑब्जेक्ट काय आहे, तेच कळत नाही. फोटोमध्ये कुठेतरी नजर खिळली पाहिजे, असा आपला उद्देश हवा. मग तो फोटो उत्तम होतो असं मला वाटतं. आता पुढील फोटोमध्ये रंगीत भोपळे आहेत, पण सोबत १ मूलपण आहे. त्यामुळे फोटोमध्ये सेंटर ऑफ अ‍ॅट्रॅक्शन येते. Uday's Photos: Learn Photography &emdash; 1/80 at f/4.5 लेन्स 35 mm प्राइम Uday's Photos: Learn Photography &emdash; />
1/200 at f/7.1 लेन्स 35 mm प्राइम

फोटो काढताना काँपोसिशनकडे नेहमी लक्ष द्यावे. त्यामुळे कुठल्याही कॅमेरावर चांगले फोटो येऊ शकतात.

थियरीतला महत्वाचा भाग असतो म्हणजे
Uday's Photos: Learn Photography &emdash; Uday's Photos: Learn Photography &emdash;
1/800 at f/1.8 लेन्स 35 mm प्राइम 1/800 at f/1.8 लेन्स 35 mm प्राइम
यात f/1.8 म्हणजे कॅमेराचा डोळा भरपूर उघडा ठेवला आहे. त्यामुळे "डेप्थ ऑफ फिल्ड" कमी आहे. त्यामुळे मागचा भाग धुसर दिसत आहे. पहिल्या ३ फोटोत त्या मानाने कॅमेराचा डोळा कमी उघडा (f/7.1) आहे म्हणून पूर्ण फोटो इन-फोकस आणि शार्प वाटतो. f स्टॉप नंबर जितका कमी असेल, तितका कॅमेराचा डोळा जास्त उघडा असतो. f स्टॉप नंबर मोठा म्हणजे डोळा मिटलेला, असे हे व्यस्त प्रमाण आहे. कधी-कधी काय होतं की कॅमेराचा डोळा जास्त उघडला जातो, त्यामुळे फोटो "ओव्हर-एक्स्पोज" होतो आणि पांढरट दिसतो. म्हणजे खाली डावीकडे दिसतोय तसा. मग अशा वेळी काय करायचं? शटर स्पीड आधी इतकाच ठेऊन कॅमेराचा डोळा थोडा मिटायचा (म्हणजे f स्टॉप नंबर वाढवायचा).
Uday's Photos: Learn Photography &emdash; Uday's Photos: Learn Photography &emdash;
1/200 at f/2.2 लेन्स 35 mm प्राइम 1/200 at f/5.6 लेन्स 35 mm प्राइम (f/5.6 म्हणजे f/2.2 पेक्षा कमी उघडलेला डोळा)
जर फोटो "अंडर-एक्स्पोज" झाला आणि अंधारा दिसला, तर उलट करायचं. शटर स्पीड आधी इतकाच ठेऊन कॅमेराचा डोळा जास्त उघडायचा (म्हणजे f स्टॉप नंबर कमी करायचा).
Uday's Photos: Learn Photography &emdash; Uday's Photos: Learn Photography &emdash;
1/200 at f/14 लेन्स 35 mm प्राइम 1/200 at f/10 लेन्स 35 mm प्राइम (f/10 म्हणजे f/14 पेक्षा जास्त उघडलेला डोळा)
फोटो "ओव्हर-एक्स्पोज" झालाय की "अंडर-एक्स्पोज" झालाय ते कसं ओळखायचं? ते हिस्टोग्राम बघून ओळखता येते. त्यामुळे फोटो काढला की हिस्टोग्राम बघायची सवय करा. आता तुम्ही विचार कराल मी जर "अ‍ॅपरचर प्रायोरिटी" हा मोड वापरतोय, म्हणजे मी फक्त "अ‍ॅपरचर" कंट्रोल करतोय आणि शटर स्पीड तर कॅमेरा निवडतोय, मग मी शटर स्पीड कसा काय तोच ठेऊ? ही शंका बरोबर आहे. मग अशा वेळी तुम्ही "शटर प्रायोरिटी" किंवा "मॅन्युअल" मोड वापरला पाहिजे. "शटर प्रायोरिटी" मध्ये आपण शटर स्पीड निवडतो आणि कॅमेरा अ‍ॅपरचर निवडतो. "मॅन्युअल" मोडमध्ये आपण दोन्ही, म्हणजे अ‍ॅपरचर (f स्टॉप) आणि शटर स्पीड निवडतो. साधारणतः "डेप्थ ऑफ फिल्ड" कंट्रोल करायचे असेल तर "अ‍ॅपरचर प्रायोरिटी" हा मोड वापरायचा आणि स्पीड कंट्रोल करायचा असेल तर "शटर प्रायोरिटी" हा मोड वापरायचा. खालील उदाहरण "शटर प्रायोरिटी"चं आहे.
Uday's Photos: Learn Photography &emdash; Uday's Photos: Learn Photography &emdash;
1/15 at f/14 लेन्स 35 mm प्राइम 1/10 at f/25 लेन्स 35 mm प्राइम
माझ्या अनुभवानुसार कॅमेरा हातात धरलेला असताना शटर इंटरव्हल फार तर 1/15 सेकंद करता येतो, नाही तर फोटो हललेला दिसतो. जर 1/15 सेकंदापेक्षा जास्त वेळ शटर उघडे ठेवायचे असेल, तर ट्रायपॉड वापरावा. सूर्यप्रकाश कुठून येत आहे, ते पण लक्षात घ्यावे. म्हणजे कधी कधी इंटरेस्टिंग इफेक्ट मिळवता येतात. उदा: खाली डावीकडचा फोटो ऑटो मोडमध्ये घेतला, जो मला खूपच फ्लॅट (मिळमिळीत?) वाटला, म्हणून मी उजवीकडील फोटो, थोडासा उजवीकडे सरकून (प्रकाशाची तिरीप पडेल असा) प्रोग्राम मोड मध्ये घेतला आहे. यात सूर्यप्रकाश डावीकडून येत आहे, त्यामुळे प्रकाश-सावली असा इफेक्ट आल्याने फोटो जरा त्रिमितिय (3D) वाटतो. असे प्रयोग करायला मजा येते.
Uday's Photos: Learn Photography &emdash; Uday's Photos: Learn Photography &emdash;
1/200 at f/7.1 लेन्स 35 mm प्राइम (ऑटो मोड) 1/500 at f/5.6 लेन्स 35 mm प्राइम (प्रोग्राम मोड)
तुम्हाला हा लेख आवडेल अशी आशा आहे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4574 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

आवडला

तुषार काळभोर
Mon, 10/03/2016 - 07:06 नवीन
शब्दांचे कृत्रिम मराठीकरण न करता सोदाहरण स्पष्टीकरण दिल्याने आवडले. अजून अशाच तांत्रिक गोष्टी मराठीतून येऊ द्या, अर्थात छान छान फोटोंसहित.
  • Log in or register to post comments

नक्कीच~~शब्दांचे कृत्रिम

कंजूस
Mon, 10/03/2016 - 07:47 नवीन
नक्कीच~~शब्दांचे कृत्रिम मराठीकरण न करता सोदाहरण स्पष्टीकरण दिल्याने आवडले.~+1
  • Log in or register to post comments

वाचतोय.

भटकंती अनलिमिटेड
Mon, 10/03/2016 - 09:28 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments

फक्त वाचतोय, देवा कुठे फेडाल

महासंग्राम
Mon, 10/03/2016 - 11:21 नवीन
फक्त वाचतोय, देवा कुठे फेडाल हि पापं... तुमच्याकडून फोटोग्राफीबद्दल भरपूर लेख अपेक्षित आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटकंती अनलिमिटेड

शिकतोय

भटकंती अनलिमिटेड
Mon, 10/03/2016 - 11:40 नवीन
शिकतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम

नाही ना देवा तुम्ही असं

महासंग्राम
Mon, 10/03/2016 - 13:41 नवीन
नाही ना देवा तुम्ही असं म्हणाल तर आम्हाला कॅमेरा माहीत नाही असंच म्हणावं लागेल. तुमच्या ब्लॉगचे नियमित पारायणं सुरु असतात आमचे, तेव्हा तुम्ही तरी असं म्हणू नका सायबा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भटकंती अनलिमिटेड

धन्यवाद

चौकटराजा
Mon, 10/03/2016 - 09:41 नवीन
लेख चांगला आहे. तुमचे आडनाव भोपळे आहे काय ? ह घ्या !
  • Log in or register to post comments

मस्त आहे. या विषयावर अजुन

राजाभाउ
Mon, 10/03/2016 - 11:16 नवीन
मस्त आहे. या विषयावर अजुन वाचायला आवडेल , वाखु साठवली आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर, सोप्या शब्दांत व

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/03/2016 - 11:43 नवीन
सुंदर, सोप्या शब्दांतला पण माहितीपूर्ण लेख !
  • Log in or register to post comments

माहितीपूर्ण लेख,

झुमकुला
Mon, 10/03/2016 - 12:27 नवीन
माहितीपूर्ण लेख, स्वॅप्स यांनी लिहिलेल्या लेखमालेची लिंक द्याल का कृपया ?
  • Log in or register to post comments

लिंक

महासंग्राम
Mon, 10/03/2016 - 13:43 नवीन
http://www.misalpav.com/node/29842
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झुमकुला

वाचतोय ....

ज्याक ऑफ ऑल
Mon, 10/03/2016 - 12:37 नवीन
आणखी येईल ... अशी वाट पाहून आहे ... !!
  • Log in or register to post comments

सुंदर लेख तेव्हढा FX आणी DX

महासंग्राम
Mon, 10/03/2016 - 13:44 नवीन
सुंदर लेख तेव्हढा FX आणी DX मधला फरक समजावून सांगा राव लैच गोंधळ होतो.
  • Log in or register to post comments

छान लेख.

एस
Mon, 10/03/2016 - 14:09 नवीन
छान लेख.
  • Log in or register to post comments

आवडला.

सुधांशुनूलकर
Tue, 10/04/2016 - 15:36 नवीन
स्वॅप्सच्या लेखमालेला पूरक. वाखूसा
  • Log in or register to post comments

उत्तम समजवलंय. सुरेख.

वेल्लाभट
Tue, 10/04/2016 - 15:53 नवीन
उत्तम समजवलंय. सुरेख. एक मत... १/१५ हँडहेल्ड साठी खूप स्लो होतं. १/८० फार तर फार ठेवावं, माझ्या मते. त्याहून कमी स्पीडला शेक येतोच.
  • Log in or register to post comments

गुरुदेव......___/\____

माम्लेदारचा पन्खा
Tue, 10/04/2016 - 20:16 नवीन
दंडवत स्वीकारा...आणि एक पुस्तक लिहा....
  • Log in or register to post comments

+१०००

सुबोध खरे
Wed, 10/05/2016 - 10:00 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा

खूपच नवीन माहीती माझ्यासाठी.

खटपट्या
Tue, 10/04/2016 - 21:39 नवीन
खूपच नवीन माहीती माझ्यासाठी. अजुन येउद्या अशीच माहीती.
  • Log in or register to post comments

लेख आवडला

पैसा
Tue, 10/04/2016 - 22:33 नवीन
लेख आवडला. अतिशय सोप्या शब्दात लिहिता आहात.
  • Log in or register to post comments

फार पु्र्वी SLR वापरला आहे

नीळा
Wed, 10/05/2016 - 09:44 नवीन
फार पु्र्वी SLR वापरला आहे तेंव्हा तर रीझल्ट कळायला खुपच वेळ लागायचाः सगळा भरवसा नजरेच्या अंदांजावर असायचा
  • Log in or register to post comments

जस्ट जूने दीवस आढवले

नीळा
Wed, 10/05/2016 - 09:47 नवीन
जस्ट जूने दीवस आढवले बाकी लैख मस्त
  • Log in or register to post comments

अत्यंत उपयुक्त

श्रीरंग_जोशी
Wed, 10/05/2016 - 09:59 नवीन
अत्यंत उपयुक्त लेखन. प्रत्यक्ष उदाहरणे देऊन सोप्या भाषेत थेट मार्गदर्शन दिले आहे. कृपया येथेच न थांबता अधिक विस्ताराने या विषयावर लिहित राहावे ही विनंती.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, उपयुक्त माहिती

संत घोडेकर
Wed, 10/05/2016 - 10:24 नवीन
धन्यवाद, उपयुक्त माहिती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा