फोटोग्राफी कशी करावी
मिपावर फोटोग्राफीच्या थियरीबद्दल स्वॅप्स यांनी खूप छान मालिका लिहिली आहे, ती नक्की वाचा. आपण DSLR कॅमेरा उत्साहाने घेऊन येतो, खूप छानछान फोटो काढावेसे वाटतात. थोडीफार थियरी पण माहीत असते, पण बर्याचदा होते काय की आपण ऑटो मोडमध्येच अडकून पडतो. अशा लोकांसाठी थोडी तोंडओळख म्हणून हा लेख लिहित आहे. मी काही फार दिग्गज फोटोग्राफर नाही, पण प्रत्यक्ष उदाहरण देऊन फोटोग्राफी शिकवणारे लेख मराठीत तरी मी पाहिले नाहीत, म्हणून घाबरत घाबरत हा एक प्रयत्न करत आहे, कृपया गोड मानून घ्यावा.
नवशिका/नवशिकी फोटोग्राफर साधारणतः असा फोटो काढतात.
1/200 at f/7.1 लेन्स 35 mm प्राइम
हा छान फोटो आहे, मस्त हिरवळ आणि झाडी आहे, असे मित्र-मैत्रिणी म्हणतात. पण फोटोत ऑब्जेक्ट काय आहे, तेच कळत नाही. फोटोमध्ये कुठेतरी नजर खिळली पाहिजे, असा आपला उद्देश हवा. मग तो फोटो उत्तम होतो असं मला वाटतं.
आता पुढील फोटोमध्ये रंगीत भोपळे आहेत, पण सोबत १ मूलपण आहे. त्यामुळे फोटोमध्ये सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन येते.
1/80 at f/4.5 लेन्स 35 mm प्राइम

यात f/1.8 म्हणजे कॅमेराचा डोळा भरपूर उघडा ठेवला आहे. त्यामुळे "डेप्थ ऑफ फिल्ड" कमी आहे. त्यामुळे मागचा भाग धुसर दिसत आहे.
पहिल्या ३ फोटोत त्या मानाने कॅमेराचा डोळा कमी उघडा (f/7.1) आहे म्हणून पूर्ण फोटो इन-फोकस आणि शार्प वाटतो.
f स्टॉप नंबर जितका कमी असेल, तितका कॅमेराचा डोळा जास्त उघडा असतो. f स्टॉप नंबर मोठा म्हणजे डोळा मिटलेला, असे हे व्यस्त प्रमाण आहे.
कधी-कधी काय होतं की कॅमेराचा डोळा जास्त उघडला जातो, त्यामुळे फोटो "ओव्हर-एक्स्पोज" होतो आणि पांढरट दिसतो. म्हणजे खाली डावीकडे दिसतोय तसा. मग अशा वेळी काय करायचं? शटर स्पीड आधी इतकाच ठेऊन कॅमेराचा डोळा थोडा मिटायचा (म्हणजे f स्टॉप नंबर वाढवायचा).
जर फोटो "अंडर-एक्स्पोज" झाला आणि अंधारा दिसला, तर उलट करायचं. शटर स्पीड आधी इतकाच ठेऊन कॅमेराचा डोळा जास्त उघडायचा (म्हणजे f स्टॉप नंबर कमी करायचा).
फोटो "ओव्हर-एक्स्पोज" झालाय की "अंडर-एक्स्पोज" झालाय ते कसं ओळखायचं? ते हिस्टोग्राम बघून ओळखता येते. त्यामुळे फोटो काढला की हिस्टोग्राम बघायची सवय करा.
आता तुम्ही विचार कराल मी जर "अॅपरचर प्रायोरिटी" हा मोड वापरतोय, म्हणजे मी फक्त "अॅपरचर" कंट्रोल करतोय आणि शटर स्पीड तर कॅमेरा निवडतोय, मग मी शटर स्पीड कसा काय तोच ठेऊ? ही शंका बरोबर आहे. मग अशा वेळी तुम्ही "शटर प्रायोरिटी" किंवा "मॅन्युअल" मोड वापरला पाहिजे. "शटर प्रायोरिटी" मध्ये आपण शटर स्पीड निवडतो आणि कॅमेरा अॅपरचर निवडतो. "मॅन्युअल" मोडमध्ये आपण दोन्ही, म्हणजे अॅपरचर (f स्टॉप) आणि शटर स्पीड निवडतो.
साधारणतः "डेप्थ ऑफ फिल्ड" कंट्रोल करायचे असेल तर "अॅपरचर प्रायोरिटी" हा मोड वापरायचा आणि स्पीड कंट्रोल करायचा असेल तर "शटर प्रायोरिटी" हा मोड वापरायचा. खालील उदाहरण "शटर प्रायोरिटी"चं आहे.
माझ्या अनुभवानुसार कॅमेरा हातात धरलेला असताना शटर इंटरव्हल फार तर 1/15 सेकंद करता येतो, नाही तर फोटो हललेला दिसतो. जर 1/15 सेकंदापेक्षा जास्त वेळ शटर उघडे ठेवायचे असेल, तर ट्रायपॉड वापरावा.
सूर्यप्रकाश कुठून येत आहे, ते पण लक्षात घ्यावे. म्हणजे कधी कधी इंटरेस्टिंग इफेक्ट मिळवता येतात.
उदा: खाली डावीकडचा फोटो ऑटो मोडमध्ये घेतला, जो मला खूपच फ्लॅट (मिळमिळीत?) वाटला, म्हणून मी उजवीकडील फोटो, थोडासा उजवीकडे सरकून (प्रकाशाची तिरीप पडेल असा) प्रोग्राम मोड मध्ये घेतला आहे. यात सूर्यप्रकाश डावीकडून येत आहे, त्यामुळे प्रकाश-सावली असा इफेक्ट आल्याने फोटो जरा त्रिमितिय (3D) वाटतो. असे प्रयोग करायला मजा येते.
तुम्हाला हा लेख आवडेल अशी आशा आहे.
1/200 at f/7.1 लेन्स 35 mm प्राइम
हा छान फोटो आहे, मस्त हिरवळ आणि झाडी आहे, असे मित्र-मैत्रिणी म्हणतात. पण फोटोत ऑब्जेक्ट काय आहे, तेच कळत नाही. फोटोमध्ये कुठेतरी नजर खिळली पाहिजे, असा आपला उद्देश हवा. मग तो फोटो उत्तम होतो असं मला वाटतं.
आता पुढील फोटोमध्ये रंगीत भोपळे आहेत, पण सोबत १ मूलपण आहे. त्यामुळे फोटोमध्ये सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन येते.
1/80 at f/4.5 लेन्स 35 mm प्राइम

|
|
|---|---|
| 1/800 at f/1.8 लेन्स 35 mm प्राइम | 1/800 at f/1.8 लेन्स 35 mm प्राइम |
|
|
|---|---|
| 1/200 at f/2.2 लेन्स 35 mm प्राइम | 1/200 at f/5.6 लेन्स 35 mm प्राइम (f/5.6 म्हणजे f/2.2 पेक्षा कमी उघडलेला डोळा) |
|
|
|---|---|
| 1/200 at f/14 लेन्स 35 mm प्राइम | 1/200 at f/10 लेन्स 35 mm प्राइम (f/10 म्हणजे f/14 पेक्षा जास्त उघडलेला डोळा) |
|
|
|---|---|
| 1/15 at f/14 लेन्स 35 mm प्राइम | 1/10 at f/25 लेन्स 35 mm प्राइम |
|
|
|---|---|
| 1/200 at f/7.1 लेन्स 35 mm प्राइम (ऑटो मोड) | 1/500 at f/5.6 लेन्स 35 mm प्राइम (प्रोग्राम मोड) |
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आवडला
नक्कीच~~शब्दांचे कृत्रिम
वाचतोय.
फक्त वाचतोय, देवा कुठे फेडाल
शिकतोय
नाही ना देवा तुम्ही असं
धन्यवाद
मस्त आहे. या विषयावर अजुन
सुंदर, सोप्या शब्दांत व
माहितीपूर्ण लेख,
लिंक
वाचतोय ....
सुंदर लेख तेव्हढा FX आणी DX
छान लेख.
आवडला.
उत्तम समजवलंय. सुरेख.
गुरुदेव......___/\____
+१०००
खूपच नवीन माहीती माझ्यासाठी.
लेख आवडला
फार पु्र्वी SLR वापरला आहे
जस्ट जूने दीवस आढवले
अत्यंत उपयुक्त
धन्यवाद, उपयुक्त माहिती