क्रेडिट कार्ड वापरताना जरा सांभाळुन... (आमचा खुप वेगळा अनुभव)

Primary tabs

टुकुल's picture
टुकुल in जनातलं, मनातलं
26 Sep 2008 - 8:13 am

नमस्कार मिपाकर्स, नविन लेखन/लेखक असल्यामुळे काहि चुका झाल्यास सांभाळुन घ्या..
------------------------------------------------------------------------
वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे, माझी दुचाकी चोरीला गेल्याकारणाने मी आणि माझा मित्र अनिल जरा तणावात पुण्यातल्या आमच्या रुमवर होतो तेव्हा अनिल चा फोन वाजला, क्रेडिट कार्ड कस्ट्मर केअर "तुमच्या कार्डवरुन या १-२ दिवसांत जो वापर झाला आहे त्याच्या खात्री करिता हा फोन केला आहे" अनिल ने जवळच पडलेल पाकिट उघडुन कार्ड पाहिले आणि खात्री करुन टाकली , फोन बंद.
तो दिवस आणी दुसरा दिवस आम्ही माझ्या गाडीच्या कामात दंग होतो, दिवसभराचा शीण घालवण्यासाठी संध्याकाळी एका बार मधे बसलो, बिल आल्यावर अनिल ने त्याचे क्रेडिट कार्ड दिले तर थोड्यावेळाने वेटर परत आला, "साहेब, तुमचा कार्ड चालत नाही आहे". अनिल ने निरखुन पाहिले तर ते कार्ड त्याच्या कार्ड सारखे दिसायला होते, पण त्यावर नाव दुसर्‍याच कोणाचे तरी होते. मी बिल देइपर्यंत त्यानी कस्ट्मर केअर ला फोन लावला आणी कार्डची थकबाकी विचारली, कस्ट्मर केअर " ५५,००० रु. " तो दणकन उडालाच.
आम्ही विचारात पडलो कि हे कस काय झाल आणी तेंव्हा त्या कस्ट्मर केअरच्या फोन ची आठवण झाली, झालं मग आता काय करायचं, कार्ड तर आधीच पुर्ण वापरामुळे स्थगित केलेल होते, विचार आला कि कुठेतरी अनिलच्या कार्डची अदलाबदली झाली असेल, म्हणुन आंतरजालावर कार्ड वरील नावाची शोधाशोध केली तर काहि मोबाइल क्रमांक मिळाले. फोन केल्यावर एकाने सांगितले कि ते त्याचेच कार्ड आहे जे सहा महिन्यांपुर्वी चोरीला गेले होते.
अनिल विचार करु लागला कि त्याने सर्वात शेवटी कार्ड कुठे वापरले होते, तेव्हां त्याला आठवले...

५ दिवसांपुर्वी (भुतकाळ)
अनिल कंपनीतील मित्रांबरोबर एका चांगल्या ठिकाणी जेवायला गेला होता, जेवण झाल्यावर साहेबांनी दिले आपले कार्ड बिलासाठी, त्या वेटरनी बिलानंतर कार्ड परत करताना त्याच्या कार्ड सारखं दिसनारं पण दुसर्‍याच कोणाचे (जे आधी चोरी केले होते) तरी कार्ड दिले, ह्यानी आपल्या सगळ्यां सारखं स्वःताच नाव न बघता ते पाकीटात ठेवुन दिले.
आता त्या वेटर कडे अनिल चे कार्ड होते, मग काय, त्याने खरेदीचा सपाटाच लावला, ज्यामुळे कस्ट्मर केअरनी फोन केला होता.

(परत वर्तमानात)
आता काय करायचे म्हणुन अनिल कडे ज्याचे कार्ड होते त्याला सहज फोन केला तर त्यानी सांगीतले कि त्याच्या बरोबर सुध्दा राजवाडा मधे असेच झाले होते, पण कस्ट्मर केअरच्या फोनमुळे त्याच्य लक्षात हि गोष्ट लगेच आली, ज्यामुळे त्याला फक्त १०-१५,००० रु. चे नुकसान झाले होते.

तर मिपाकर्स जेव्हांकधी तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड वापराल तेंव्हा जरा सांभाळुन, (आता बघा बघु तुमच्या कार्डवर तुमचच नाव आहे का? :-))

तुम्हाला हवे असेल तर कळवा , पुढे पोलीसांकडे तक्रार... चोराला पकडणे... अनिलने पोलीस श्टेशन वर जावुन चोराची कानशिले गरम करने..क्रेडिट कार्ड कंपनी बरोबर तडजोड... लिहिन परत ...

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

26 Sep 2008 - 8:34 am | सखाराम_गटणे™

हि विषय खरच महत्वाचा आहे.
मी सुदधा क्रेडीट कार्ड मोठ्या प्रमाणात वापरतो.

-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

प्रकाश घाटपांडे's picture

26 Sep 2008 - 8:38 am | प्रकाश घाटपांडे

आमी वापरत नाई कारन आमाल कोनी देतच नाई. आमच्या कं पैशेच नसत्यात.
प्रकाश घाटपांडे

शिवा जमदाडे's picture

26 Sep 2008 - 8:58 am | शिवा जमदाडे

क्रेडीट कार्ड मोठ्या प्रमाणात वापरतो...
सहसा इंटरनेट वर वापरत नाही.....

- (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

टुकुल's picture

26 Sep 2008 - 9:48 am | टुकुल

माझ्या मते इंटरनेट वर कार्ड वापरने हे त्या त्या साइट नुसार सुरक्शित/असुरक्शित ठरु शकते.
काहि साइट या बाबतीत खुप चांगल्या आहेत.

शिवा जमदाडे's picture

26 Sep 2008 - 1:41 pm | शिवा जमदाडे

तुमच्या मशीन वर, spyware, key logger वगैरे आहे का? तुमचे इंटरनेट कनेक्शन ISP पर्यंत shared की dedicated, अशा अनेक गोष्टी आहेत.... बाकीही बर्‍याच आहेत, पण सगळ्या सर्वष्रुत आहेत त्यामुळे लिहीत नाही...

- (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे
भोकरवाडी (बुद्रुक)

सखाराम_गटणे™'s picture

26 Sep 2008 - 9:22 am | सखाराम_गटणे™

>>सहसा इंटरनेट वर वापरत नाही.....
मी वापरतो पण फक्त नावाजलेल्या कंपनीबरोबर.
नाही तर पेपल आहेच.

-----
नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2008 - 9:33 am | प्रभाकर पेठकर

क्रेडीट कार्डावर दैनंदिन खर्चाची कमाल मर्यादा टाकता येते का? जसे दररोज रुपये १०००/- फक्त (जशी एटीएम् मशीन मध्ये सोय असते.) तर लक्षात आल्या बरोबर बॅकेत फोन करून कार्ड ब्लॉक करता येईल आणि गैरवापराला अंशतः आळा बसेल.
माझे क्रेडीट कार्ड फक्त फोन आणि इलेक्ट्रिकची बिले भरण्यासाठी बॅंकच वापरते. मी शक्यतो डेबिट कार्ड वापरतो.

जैनाचं कार्ट's picture

26 Sep 2008 - 9:37 am | जैनाचं कार्ट (not verified)

हो अशी सुविधा असते..
आयसीआयसीआय... कोटक... अबीएन अम्रो .... ह्या बँका ही सुविधा देतात !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2008 - 9:53 am | प्रभाकर पेठकर

मग अशा सुविधांचा वापर लवकरात लवकर केला पाहिजे.

धन्यवाद.

देवदत्त's picture

26 Sep 2008 - 10:00 pm | देवदत्त

अशा काहीचा मला अंदाज नव्हता. विचारून पाहतो :)

एच डी एफ सी ने एक 'नेट सेफ' नावाची सोय चालू केली आहे. प्रिपेड कार्ड प्रमाणे ठराविक रकमेचा एक व्हर्चुअल क्रेडीट कार्ड मिळते. ते खर्‍या क्रेडीट/डेबिट कार्डप्रमाणे इंटरनेटवर वापरता येते. अधिक माहिती येथे मिळेल.

टुकुल's picture

26 Sep 2008 - 11:13 pm | टुकुल

अशा काहीचा मलाहि आतापर्यंत काही अंदाज नव्हता...

जैनाचं कार्ट's picture

27 Sep 2008 - 10:31 am | जैनाचं कार्ट (not verified)

ह्याच पध्दतीचे कोटक कार्ड देतो कोटक महींन्द्रा.. मी तेच वापरतो नेहमी..

९० % जास्त ऑनलाईन खरेदी करतो त्यामुळे हे कार्ड मला उपयोगी पडतं !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

अवलिया's picture

26 Sep 2008 - 9:55 am | अवलिया

क्रेडीट कार्ड म्हणजे काय हो?

(रोकडा व्यवहार करणारा) नाना

टुकुल's picture

26 Sep 2008 - 10:02 am | टुकुल

=)) =))
(रोकड अमावस्या व पोर्णिमा सारखं कधी कधीच वापरनारा)
टुकुल.

गणा मास्तर's picture

26 Sep 2008 - 10:57 am | गणा मास्तर

रोकडा व्यवहार किंवा डेबिट कार्ड उत्तम
वॉरेन बॅफेच्या मुलाखतीत त्याने तरुणांना क्रेडिट कार्ड वापरु नका असा सल्ला दिल्याचे आठवते.
वॉरेन बॅफेचा सल्ला इथे वाचा
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

केवळ_विशेष's picture

26 Sep 2008 - 10:39 am | केवळ_विशेष

ल मेरेडिअन हॉटेल मधला प्रसंग आहे...त्या ठिकाणी काम करणारा वेटर अशी कामं करायचा, जो पकडला गेला...दै.सकाळ मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली होती...१-२ महिने किंवा कदाचित जास्त काळ लोटला असेल या गोष्टीला.

योगी९००'s picture

26 Sep 2008 - 12:23 pm | योगी९००

अजून एक गोष्ट सांगावी वाटते.

प्रथम क्रेडीट कार्डावरील पाठिमागे दिलेला cvc code नष्ट करा. अर्थात पहिल्यांदा कोठेतरी लिहूनच.

खादाडमाऊ

सर्किट's picture

26 Sep 2008 - 12:26 pm | सर्किट (not verified)

अगदी बरोबर !

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2008 - 12:30 pm | प्रभाकर पेठकर

हम्मम्म! हे सगळ्यात ब्येस्ट.
पण तो कोड मॅग्नेटीक स्ट्रीप मध्ये नसतो का?
तसेच, स्वाईप करायच्या मशीन वर आवश्यक नसतो. म्हणजे कार्डावर तो नसला तरी वाटमारी होऊ शकते.

चतुरंग's picture

26 Sep 2008 - 6:16 pm | चतुरंग

(कार्ड वेरिफिकेशन वॅल्यू कोड)
मॅग्नेटिक स्ट्रिपवर असलेली माहिती ह्या कोडने क्रिप्टिक केलेली असते. इंटरनेट वरुन पैसे देताना कार्ड वापरणार्‍या माणसाकडे हातात कार्ड नसेल तर त्याला हा कोड माहीत नसतो त्यामुळे ट्रांझॅक्शन वॅलिडेट होत नाही. त्याही पुढे जाऊन वर म्हटल्याप्रमाणे कोड खोडून टाकला तर तो फक्त कार्ड ज्याचे आहे त्यालाच माहीत असतो/असावा. त्यामुळे जरी चोरीला गेले तरी कार्ड वापरता येणार नाही.
फक्त स्वाइप करायच्या मशीनला चालत नाही हे बरोबर पण दरदिवसाची खर्चाची लिमिट असेल तर वाटमारी मोठी होणार नाही.
त्यामुळे कोड खोडायची ही आयडिया चांगली आहे.
(डेबिट कार्ड्/चेक/कॅश वापरण्यावर माझा भर असतो.)

चतुरंग

सुनील's picture

27 Sep 2008 - 6:49 am | सुनील

प्रथम क्रेडीट कार्डावरील पाठिमागे दिलेला cvc code नष्ट करा.
हे विसा किंवा मास्टरकार्डाबाबत शक्य आहे कारण त्याचा तीन आकडी क्रमांक कार्डामागे असतो. अमेरीकन एक्सप्रेस कार्डांवर हा ४ आकडी क्रमांक कार्डाच्या पुढील भागातच असतो, जो खोडता येत नाही. तेव्हा काय करावे?

(अमेक्स कार्डे वापरू नये / घेऊच नये, हा उपाय आहेच म्हणा!)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

नाखु's picture

26 Sep 2008 - 12:44 pm | नाखु

माझ्या एका मित्राला कार्ड मिळण्यापुर्वीच (कंपनिकडुन) त्यावर व्यवहार झाला होता..
आणि कार्ड कंपनिने बर्याच कालवधिने (मित्र खमक्या व पाठ्पुरावा केल्याने) खर्चि रक्कम वर्ग केलि पण निर्ल्लजपणे सेवा रक्कम कंपनिने वसूल केली.

नाद खुळा
फक्त "डेबिट/एटिम" वापरणारा (अंथरुण पाहुन पाय पसरा)

मनिष's picture

26 Sep 2008 - 1:51 pm | मनिष

इंटरनेट पेक्षाही कार्ड वेटर किंवा पेट्रोल पंपावर देण्यात जास्त रिस्क आहे. क्रेडीट कार्डावरचा CCV (cvc नाही बहुतेक CCV म्हणायचे असावे) नंबर आणि क्रेडीट कार्ड नंबर हे दोन वापरून खरेदी करता येते, तुमचे कार्ड चोरायची गरज नाही. CCV कोड नष्ट करणे हे जास्त बरे!

डेबिट कार्ड/एटीम पण तसे सेफ नाही - चोरून स्वाईप केले की सरळ बॅकेतले पैसे गायब, क्रेडीट कार्ड लिमीट पेक्षा बॅकेत बरेच जास्त पैसे असतात! :(

खरे तर क्रेडीट कार्ड कंपन्यांनी जी माहिती कार्डवर उपलब्ध नाही ती ऑनलाईन खरेदीसाठी वापरली पाहिजे, पण ह्यासाठी त्यांच्यावर दवाब आणला पाहिजे आणि लोकांमधे जागृती! :)

चतुरंग's picture

26 Sep 2008 - 6:23 pm | चतुरंग

डेबिट कार्ड/एटीम पण तसे सेफ नाही - चोरून स्वाईप केले की सरळ बॅकेतले पैसे गायब, क्रेडीट कार्ड लिमीट पेक्षा बॅकेत बरेच जास्त पैसे असतात!
ह्याला पिन लागतो तो टाकल्याशिवाय कसे मिळतील पैसे??

चतुरंग

मनिष's picture

26 Sep 2008 - 6:56 pm | मनिष

वस्तुंची खरेदी केली तर पिन लागत लागत नाही -- ए टी एम वरून पैसे काढले तर्च पीन लागतो. मी एच. डी. फ. सी आणि आय. सी. आय. सी. आय. कर्ड वापरली आहेत, त्यात तरी पिन लागत नाही.

देवदत्त's picture

26 Sep 2008 - 10:30 pm | देवदत्त

व्हीसा व मास्टरकार्ड कुटुंबातील कार्ड दुकानात खरेदीकरीता थेट वापरू शकतो. पण Cirrus/Maestro (SBI बँक देते ते)चे कार्ड खरेदीकरीता वापरतानाही पिन द्यावा लागतो.

मनस्वी's picture

26 Sep 2008 - 4:20 pm | मनस्वी

तुम्हाला हवे असेल तर कळवा , पुढे पोलीसांकडे तक्रार... चोराला पकडणे... अनिलने पोलीस श्टेशन वर जावुन चोराची कानशिले गरम करने..क्रेडिट कार्ड कंपनी बरोबर तडजोड... लिहिन परत ...

लिहा!
अनुभवकथनातून सावध केल्याबद्दल धन्यवाद!

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

झकासराव's picture

26 Sep 2008 - 5:10 pm | झकासराव

मी डेबिट कार्डच वापरतो. पण फारतर मोबाइल बील भरणे, कुठे काही मॉल वै मध्ये खरेदी केली तरच.
ते तर समोरासमोर असत म्हणुन कधी अस होउ शकत हे लक्षातच आल नाही.
हॉटेलात वापरताना विशेष लक्ष द्याव लागेल.
धन्यवाद ही नवीन पद्धत लक्षात आणुन दिल्याबद्दल.

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

शितल's picture

26 Sep 2008 - 5:31 pm | शितल

मी ही येथे डेबिट कार्ड वापरते.
पुण्यात मात्र क्रेडिट वापरायचे.
पण कार्डवरचे नाव मी जरूर पहाते आणी मगच पर्स मध्ये ठेवते.
ही सुचना मला कार्ड हातात मिळाल्यावरच देण्यात आली होती.
आणी नेट वरून ही चेक करतच असते.

टारझन's picture

27 Sep 2008 - 3:43 am | टारझन

कार्डचे धोके कमी करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत.
प्रत्येक ट्रांझॅक्शन केलं की तत्काळ एस.एम.एस. वर पुर्ण ट्रांझॅक्शन डिटेल्स येतात.
इंटरनेट ट्रांझाक्शन करताना जरी ते कार्डलेस ट्रांझाक्शन असलं तरी वस्तु डिलेव्हरी साठी पत्ता द्यावा लागतो. ए.टी.एम. ट्रांझॅक्शन पीन सिक्युअर्ड आहेत, त्याची काळजी नसावी.
कार्डला तुम्ही डेली लिमीट सेट करू शकता, जेने करून रिस्क कमीत कमी करता येइल...
कुठच्याही अनोळखी ठिकानी नेहमी कार्ड आपल्या उपस्थितीच स्वाइप करू द्यावे.
शायनिंग मारत दोन बोटात कार्ड पकडून वेटर ला स्वाइप करायला देऊ नये.
कार्ड मिळाल्याबरोबर कार्ड मागे सही करावी , कार्ड मागची आणि कस्टमर रिसिप्ट वरची सही क्रॉसचेक करण्याचं काम मर्चंटचं असतं, तुम्हाला केलेलं ट्रांझाक्शन मान्य नसेल तर तुम्ही डेस्प्युट रेज करू शकता.
ठराविक मर्यादेवर जर ट्रांझाशन असेल तर वॉइस ऑथोरायझेशन ची सोयही उपलब्ध असते.
रिस्क तर सगळीकडेच आहे... पण रिस्क कमी करता येते.

टारझन
एलेक्ट्रा कार्ड सर्विसेस

टुकुल's picture

27 Sep 2008 - 6:32 am | टुकुल

टारु,
>>>>ठराविक मर्यादेवर जर ट्रांझाशन असेल तर वॉइस ऑथोरायझेशन ची सोयही उपलब्ध असते.
हे काही ठाउक नव्हते मला..वॉइस ऑथोरायझेशन कस चालत?

मनिष's picture

27 Sep 2008 - 8:21 am | मनिष

पण क्रेडीट कार्ड कंपन्या अश डीस्प्यूट मधे फार सहकार्य करत नाही. एकदा अनुभव घेऊन बघा, म्हणजे कळेल की एरवी 'कार्ड वापरणे सुरक्षित' अशी जहिरात करणारे क्रेडीट कार्ड अशा वेळीस सुरक्षित अंतरवर राहतात. शिवाय प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी पोलीस आपला 'हिसका' दाखवतात ते वेगळाच...

टारझन's picture

27 Sep 2008 - 11:52 am | टारझन

वॉईस ऑथोरायझेशन : जर तुम्ही १०,००० रुपयांवर लिमीट सेट केलं असेल , तर ते ट्रांझॅक्शन "रेफर टू इशुअर" म्हणून रिजेक्ट होतं, मग कार्ड ऍक्सेप्टर हा तुमच्या बँकेला फोन करतो , तुम्ही हे तुम्हीच आहात हे काही खाजगी प्रश्न विचारून कनफर्म केलं जातं, मगच तुमचं ट्रांझ्याक्शन ऍप्रुव्ह होतं.

शिवाय प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी पोलीस आपला 'हिसका' दाखवतात ते वेगळाच...
मी याच डोमेन च्या सॉफ्टवेयर सर्विस क्षेत्रात काम करतो. खास डिस्प्युट मॅनेजमेंटच डिपार्टमेंट असतं, तिथे रोज भरपुर तक्रारी येतात आणि ते लोक त्यावर अंमल पण करतात, करावाच लागतो. तुमचा वैयक्तिक अनुभव असेल तर कल्पना नाही.

पण हो, क्रेडिट कार्ड बँकेसाठी एक सावकारी धंदा आहे, पण जर आपण स्मार्ट युजर असाल तर बँकेचा पैसा ४५ दिवस अगदी फुक्क्ट वापरू शकता. मी १ वर्ष झालं क्रेडिट कार्ड वापरतोय, कधी एक रुपया पे केला नाहीय, आणि भरपुर शॉपिंग करून लॉयल्टीच्या गुणांचा पण फायदा करून घेतलेला आहे. टोटल ड्यु भरा आणि निश्चिंत रहा. कार्ड संभाळून वापरा, अनोळखी ठिकाणी काळजी घ्या.

अजुन काही क्रेडीट / डेबिट / प्रिपेड / गिफ्ट कार्ड्ची माहीती हवी असेल तर आम्हाला खरडावे . योग्य माहिती काढून उत्तरे देउ . धन्यवाद

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

देवदत्त's picture

29 Sep 2008 - 7:50 pm | देवदत्त

तुम्हाला केलेलं ट्रांझाक्शन मान्य नसेल तर तुम्ही डेस्प्युट रेज करू शकता.
हे ही करू शकतो. मी केले नाही पण तसा अनुभव सांगतो.
मी बंगळुरू ला मित्रांसोबत एका हॉटेलात गेलो होतो. तिथे बिल झाले २९३ रू. मी आकडा पाहून त्याच्या पावतीवर सही केली.
क्रेडीट कार्डचे बिल आले तेव्हा पाहिले तर ३०० रू लावले होते. मी क्रेडीट कार्ड कंपनीला फोन केला. ते म्हणाले, 'तुमची तक्रार आम्ही घेउ शकतो. त्याचा खर्च तुम्हाला २०० रू भरावा लागेल. जर तुमचे म्हणणे बरोबर असेल तर ते २०० रू व तुमचे अतिरिक्त रुपये आम्ही परत करू'. मी तेव्हाची पावती पाहीली. त्यात TIP च्या ठिकाणी व एकूण रू. मी रिकामे ठेवले होते. तेव्हा वाटले जर त्या वेटरने किंवा कोणी ७ रू लिहिले असतील तर उगाच मला आणखी भुर्दंड पडेल. म्हणून एक शिकवण घेतली. नेहमी एकूण रक्कम किती ते पडताळून पाहणे, टीप द्यायची/ न द्यायची असेल तर तसे लिहावे व खाली दोघांची बेरीज स्वत: लिहावी. मगच सही करावी.

टारझन, मी ही गेली ४/५ वर्षे क्रेडीट कार्ड वापरत आहे पण त्यांना अतिरिक्त पैसा दिला नाही. एकदा त्यांनी लावला होता व्याज आकार. पण त्यांची चुकी दाखवून परत करावयास लावला. बाकी काही शंका असल्यास विचारेनच.