✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

क्रेडिट कार्ड वापरताना जरा सांभाळुन... (आमचा खुप वेगळा अनुभव)

ट
टुकुल यांनी
Fri, 09/26/2008 - 08:13  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13019 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

स
सखाराम_गटणे™ Fri, 09/26/2008 - 08:34 नवीन

हि विषय

हि विषय खरच महत्वाचा आहे. मी सुदधा क्रेडीट कार्ड मोठ्या प्रमाणात वापरतो. ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Fri, 09/26/2008 - 08:38 नवीन

आपन वापरत नाई

आमी वापरत नाई कारन आमाल कोनी देतच नाई. आमच्या कं पैशेच नसत्यात. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
श
शिवा जमदाडे Fri, 09/26/2008 - 08:58 नवीन

आम्ही पण....

क्रेडीट कार्ड मोठ्या प्रमाणात वापरतो... सहसा इंटरनेट वर वापरत नाही..... - (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Fri, 09/26/2008 - 09:48 नवीन

माझ्या मते

माझ्या मते इंटरनेट वर कार्ड वापरने हे त्या त्या साइट नुसार सुरक्शित/असुरक्शित ठरु शकते. काहि साइट या बाबतीत खुप चांगल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवा जमदाडे
श
शिवा जमदाडे Fri, 09/26/2008 - 13:41 नवीन

शिवाय

तुमच्या मशीन वर, spyware, key logger वगैरे आहे का? तुमचे इंटरनेट कनेक्शन ISP पर्यंत shared की dedicated, अशा अनेक गोष्टी आहेत.... बाकीही बर्‍याच आहेत, पण सगळ्या सर्वष्रुत आहेत त्यामुळे लिहीत नाही... - (कपाशी वरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल याचा विचार करणारा) शिवा जमदाडे भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल
स
सखाराम_गटणे™ Fri, 09/26/2008 - 09:22 नवीन

>>सहसा

>>सहसा इंटरनेट वर वापरत नाही..... मी वापरतो पण फक्त नावाजलेल्या कंपनीबरोबर. नाही तर पेपल आहेच. ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/26/2008 - 09:33 नवीन

क्रेडीट कार्ड

क्रेडीट कार्डावर दैनंदिन खर्चाची कमाल मर्यादा टाकता येते का? जसे दररोज रुपये १०००/- फक्त (जशी एटीएम् मशीन मध्ये सोय असते.) तर लक्षात आल्या बरोबर बॅकेत फोन करून कार्ड ब्लॉक करता येईल आणि गैरवापराला अंशतः आळा बसेल. माझे क्रेडीट कार्ड फक्त फोन आणि इलेक्ट्रिकची बिले भरण्यासाठी बॅंकच वापरते. मी शक्यतो डेबिट कार्ड वापरतो.
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/26/2008 - 09:37 नवीन

हो अशी

हो अशी सुविधा असते.. आयसीआयसीआय... कोटक... अबीएन अम्रो .... ह्या बँका ही सुविधा देतात ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/26/2008 - 09:53 नवीन

धन्यवाद..

मग अशा सुविधांचा वापर लवकरात लवकर केला पाहिजे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
द
देवदत्त Fri, 09/26/2008 - 22:00 नवीन

मर्यादा

अशा काहीचा मला अंदाज नव्हता. विचारून पाहतो :) एच डी एफ सी ने एक 'नेट सेफ' नावाची सोय चालू केली आहे. प्रिपेड कार्ड प्रमाणे ठराविक रकमेचा एक व्हर्चुअल क्रेडीट कार्ड मिळते. ते खर्‍या क्रेडीट/डेबिट कार्डप्रमाणे इंटरनेटवर वापरता येते. अधिक माहिती येथे मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
ट
टुकुल Fri, 09/26/2008 - 23:13 नवीन

हेच म्हणतो..

अशा काहीचा मलाहि आतापर्यंत काही अंदाज नव्हता...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Sat, 09/27/2008 - 10:31 नवीन

ह्याच

ह्याच पध्दतीचे कोटक कार्ड देतो कोटक महींन्द्रा.. मी तेच वापरतो नेहमी.. ९० % जास्त ऑनलाईन खरेदी करतो त्यामुळे हे कार्ड मला उपयोगी पडतं ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
अ
अवलिया Fri, 09/26/2008 - 09:55 नवीन

म्हणजे काय ?

क्रेडीट कार्ड म्हणजे काय हो? (रोकडा व्यवहार करणारा) नाना
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Fri, 09/26/2008 - 10:02 नवीन

(रोकड

=)) =)) (रोकड अमावस्या व पोर्णिमा सारखं कधी कधीच वापरनारा) टुकुल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
ग
गणा मास्तर Fri, 09/26/2008 - 10:57 नवीन

रोकडा व्यवहार

रोकडा व्यवहार किंवा डेबिट कार्ड उत्तम वॉरेन बॅफेच्या मुलाखतीत त्याने तरुणांना क्रेडिट कार्ड वापरु नका असा सल्ला दिल्याचे आठवते. वॉरेन बॅफेचा सल्ला इथे वाचा - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया
क
केवळ_विशेष Fri, 09/26/2008 - 10:39 नवीन

पुण्याच्या...

ल मेरेडिअन हॉटेल मधला प्रसंग आहे...त्या ठिकाणी काम करणारा वेटर अशी कामं करायचा, जो पकडला गेला...दै.सकाळ मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली होती...१-२ महिने किंवा कदाचित जास्त काळ लोटला असेल या गोष्टीला.
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Fri, 09/26/2008 - 12:23 नवीन

महत्वाची गोष्ट

अजून एक गोष्ट सांगावी वाटते. प्रथम क्रेडीट कार्डावरील पाठिमागे दिलेला cvc code नष्ट करा. अर्थात पहिल्यांदा कोठेतरी लिहूनच. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 09/26/2008 - 12:26 नवीन

+१

अगदी बरोबर ! -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
प
प्रभाकर पेठकर Fri, 09/26/2008 - 12:30 नवीन

हम्मम्म!

हम्मम्म! हे सगळ्यात ब्येस्ट. पण तो कोड मॅग्नेटीक स्ट्रीप मध्ये नसतो का? तसेच, स्वाईप करायच्या मशीन वर आवश्यक नसतो. म्हणजे कार्डावर तो नसला तरी वाटमारी होऊ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
च
चतुरंग Fri, 09/26/2008 - 18:16 नवीन

सीवीवी/सीवीसी

(कार्ड वेरिफिकेशन वॅल्यू कोड) मॅग्नेटिक स्ट्रिपवर असलेली माहिती ह्या कोडने क्रिप्टिक केलेली असते. इंटरनेट वरुन पैसे देताना कार्ड वापरणार्‍या माणसाकडे हातात कार्ड नसेल तर त्याला हा कोड माहीत नसतो त्यामुळे ट्रांझॅक्शन वॅलिडेट होत नाही. त्याही पुढे जाऊन वर म्हटल्याप्रमाणे कोड खोडून टाकला तर तो फक्त कार्ड ज्याचे आहे त्यालाच माहीत असतो/असावा. त्यामुळे जरी चोरीला गेले तरी कार्ड वापरता येणार नाही. फक्त स्वाइप करायच्या मशीनला चालत नाही हे बरोबर पण दरदिवसाची खर्चाची लिमिट असेल तर वाटमारी मोठी होणार नाही. त्यामुळे कोड खोडायची ही आयडिया चांगली आहे. (डेबिट कार्ड्/चेक/कॅश वापरण्यावर माझा भर असतो.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
स
सुनील Sat, 09/27/2008 - 06:49 नवीन

वेरिफिकेशन कोड

प्रथम क्रेडीट कार्डावरील पाठिमागे दिलेला cvc code नष्ट करा. हे विसा किंवा मास्टरकार्डाबाबत शक्य आहे कारण त्याचा तीन आकडी क्रमांक कार्डामागे असतो. अमेरीकन एक्सप्रेस कार्डांवर हा ४ आकडी क्रमांक कार्डाच्या पुढील भागातच असतो, जो खोडता येत नाही. तेव्हा काय करावे? (अमेक्स कार्डे वापरू नये / घेऊच नये, हा उपाय आहेच म्हणा!) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००
न
नाखु Fri, 09/26/2008 - 12:44 नवीन

कहर म्हणजे

माझ्या एका मित्राला कार्ड मिळण्यापुर्वीच (कंपनिकडुन) त्यावर व्यवहार झाला होता.. आणि कार्ड कंपनिने बर्याच कालवधिने (मित्र खमक्या व पाठ्पुरावा केल्याने) खर्चि रक्कम वर्ग केलि पण निर्ल्लजपणे सेवा रक्कम कंपनिने वसूल केली. नाद खुळा फक्त "डेबिट/एटिम" वापरणारा (अंथरुण पाहुन पाय पसरा)
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 09/26/2008 - 13:51 नवीन

ह्म्म

इंटरनेट पेक्षाही कार्ड वेटर किंवा पेट्रोल पंपावर देण्यात जास्त रिस्क आहे. क्रेडीट कार्डावरचा CCV (cvc नाही बहुतेक CCV म्हणायचे असावे) नंबर आणि क्रेडीट कार्ड नंबर हे दोन वापरून खरेदी करता येते, तुमचे कार्ड चोरायची गरज नाही. CCV कोड नष्ट करणे हे जास्त बरे! डेबिट कार्ड/एटीम पण तसे सेफ नाही - चोरून स्वाईप केले की सरळ बॅकेतले पैसे गायब, क्रेडीट कार्ड लिमीट पेक्षा बॅकेत बरेच जास्त पैसे असतात! :( खरे तर क्रेडीट कार्ड कंपन्यांनी जी माहिती कार्डवर उपलब्ध नाही ती ऑनलाईन खरेदीसाठी वापरली पाहिजे, पण ह्यासाठी त्यांच्यावर दवाब आणला पाहिजे आणि लोकांमधे जागृती! :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 09/26/2008 - 18:23 नवीन

कसे काय/

डेबिट कार्ड/एटीम पण तसे सेफ नाही - चोरून स्वाईप केले की सरळ बॅकेतले पैसे गायब, क्रेडीट कार्ड लिमीट पेक्षा बॅकेत बरेच जास्त पैसे असतात! ह्याला पिन लागतो तो टाकल्याशिवाय कसे मिळतील पैसे?? चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनिष Fri, 09/26/2008 - 18:56 नवीन

वस्तुंची

वस्तुंची खरेदी केली तर पिन लागत लागत नाही -- ए टी एम वरून पैसे काढले तर्च पीन लागतो. मी एच. डी. फ. सी आणि आय. सी. आय. सी. आय. कर्ड वापरली आहेत, त्यात तरी पिन लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
द
देवदत्त Fri, 09/26/2008 - 22:30 नवीन

बरोबर.

व्हीसा व मास्टरकार्ड कुटुंबातील कार्ड दुकानात खरेदीकरीता थेट वापरू शकतो. पण Cirrus/Maestro (SBI बँक देते ते)चे कार्ड खरेदीकरीता वापरतानाही पिन द्यावा लागतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
म
मनस्वी Fri, 09/26/2008 - 16:20 नवीन

लिहा!

तुम्हाला हवे असेल तर कळवा , पुढे पोलीसांकडे तक्रार... चोराला पकडणे... अनिलने पोलीस श्टेशन वर जावुन चोराची कानशिले गरम करने..क्रेडिट कार्ड कंपनी बरोबर तडजोड... लिहिन परत ...
लिहा! अनुभवकथनातून सावध केल्याबद्दल धन्यवाद! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 09/26/2008 - 17:10 नवीन

मी डेबिट

मी डेबिट कार्डच वापरतो. पण फारतर मोबाइल बील भरणे, कुठे काही मॉल वै मध्ये खरेदी केली तरच. ते तर समोरासमोर असत म्हणुन कधी अस होउ शकत हे लक्षातच आल नाही. हॉटेलात वापरताना विशेष लक्ष द्याव लागेल. धन्यवाद ही नवीन पद्धत लक्षात आणुन दिल्याबद्दल. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 09/26/2008 - 17:31 नवीन

गंभीर विषय आहे.

मी ही येथे डेबिट कार्ड वापरते. पुण्यात मात्र क्रेडिट वापरायचे. पण कार्डवरचे नाव मी जरूर पहाते आणी मगच पर्स मध्ये ठेवते. ही सुचना मला कार्ड हातात मिळाल्यावरच देण्यात आली होती. आणी नेट वरून ही चेक करतच असते.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sat, 09/27/2008 - 03:43 नवीन

एवढे बावरून जाउ नका

कार्डचे धोके कमी करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक ट्रांझॅक्शन केलं की तत्काळ एस.एम.एस. वर पुर्ण ट्रांझॅक्शन डिटेल्स येतात. इंटरनेट ट्रांझाक्शन करताना जरी ते कार्डलेस ट्रांझाक्शन असलं तरी वस्तु डिलेव्हरी साठी पत्ता द्यावा लागतो. ए.टी.एम. ट्रांझॅक्शन पीन सिक्युअर्ड आहेत, त्याची काळजी नसावी. कार्डला तुम्ही डेली लिमीट सेट करू शकता, जेने करून रिस्क कमीत कमी करता येइल... कुठच्याही अनोळखी ठिकानी नेहमी कार्ड आपल्या उपस्थितीच स्वाइप करू द्यावे. शायनिंग मारत दोन बोटात कार्ड पकडून वेटर ला स्वाइप करायला देऊ नये. कार्ड मिळाल्याबरोबर कार्ड मागे सही करावी , कार्ड मागची आणि कस्टमर रिसिप्ट वरची सही क्रॉसचेक करण्याचं काम मर्चंटचं असतं, तुम्हाला केलेलं ट्रांझाक्शन मान्य नसेल तर तुम्ही डेस्प्युट रेज करू शकता. ठराविक मर्यादेवर जर ट्रांझाशन असेल तर वॉइस ऑथोरायझेशन ची सोयही उपलब्ध असते. रिस्क तर सगळीकडेच आहे... पण रिस्क कमी करता येते. टारझन एलेक्ट्रा कार्ड सर्विसेस
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Sat, 09/27/2008 - 06:32 नवीन

वॉइस ऑथोरायझेशन ???

टारु, >>>>ठराविक मर्यादेवर जर ट्रांझाशन असेल तर वॉइस ऑथोरायझेशन ची सोयही उपलब्ध असते. हे काही ठाउक नव्हते मला..वॉइस ऑथोरायझेशन कस चालत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
म
मनिष Sat, 09/27/2008 - 08:21 नवीन

हे सगळे ठीक आहे...

पण क्रेडीट कार्ड कंपन्या अश डीस्प्यूट मधे फार सहकार्य करत नाही. एकदा अनुभव घेऊन बघा, म्हणजे कळेल की एरवी 'कार्ड वापरणे सुरक्षित' अशी जहिरात करणारे क्रेडीट कार्ड अशा वेळीस सुरक्षित अंतरवर राहतात. शिवाय प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी पोलीस आपला 'हिसका' दाखवतात ते वेगळाच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन Sat, 09/27/2008 - 11:52 नवीन

वॉईस

वॉईस ऑथोरायझेशन : जर तुम्ही १०,००० रुपयांवर लिमीट सेट केलं असेल , तर ते ट्रांझॅक्शन "रेफर टू इशुअर" म्हणून रिजेक्ट होतं, मग कार्ड ऍक्सेप्टर हा तुमच्या बँकेला फोन करतो , तुम्ही हे तुम्हीच आहात हे काही खाजगी प्रश्न विचारून कनफर्म केलं जातं, मगच तुमचं ट्रांझ्याक्शन ऍप्रुव्ह होतं. शिवाय प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारी पोलीस आपला 'हिसका' दाखवतात ते वेगळाच... मी याच डोमेन च्या सॉफ्टवेयर सर्विस क्षेत्रात काम करतो. खास डिस्प्युट मॅनेजमेंटच डिपार्टमेंट असतं, तिथे रोज भरपुर तक्रारी येतात आणि ते लोक त्यावर अंमल पण करतात, करावाच लागतो. तुमचा वैयक्तिक अनुभव असेल तर कल्पना नाही. पण हो, क्रेडिट कार्ड बँकेसाठी एक सावकारी धंदा आहे, पण जर आपण स्मार्ट युजर असाल तर बँकेचा पैसा ४५ दिवस अगदी फुक्क्ट वापरू शकता. मी १ वर्ष झालं क्रेडिट कार्ड वापरतोय, कधी एक रुपया पे केला नाहीय, आणि भरपुर शॉपिंग करून लॉयल्टीच्या गुणांचा पण फायदा करून घेतलेला आहे. टोटल ड्यु भरा आणि निश्चिंत रहा. कार्ड संभाळून वापरा, अनोळखी ठिकाणी काळजी घ्या. अजुन काही क्रेडीट / डेबिट / प्रिपेड / गिफ्ट कार्ड्ची माहीती हवी असेल तर आम्हाला खरडावे . योग्य माहिती काढून उत्तरे देउ . धन्यवाद -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
द
देवदत्त Mon, 09/29/2008 - 19:50 नवीन

आणखी एक..

तुम्हाला केलेलं ट्रांझाक्शन मान्य नसेल तर तुम्ही डेस्प्युट रेज करू शकता. हे ही करू शकतो. मी केले नाही पण तसा अनुभव सांगतो. मी बंगळुरू ला मित्रांसोबत एका हॉटेलात गेलो होतो. तिथे बिल झाले २९३ रू. मी आकडा पाहून त्याच्या पावतीवर सही केली. क्रेडीट कार्डचे बिल आले तेव्हा पाहिले तर ३०० रू लावले होते. मी क्रेडीट कार्ड कंपनीला फोन केला. ते म्हणाले, 'तुमची तक्रार आम्ही घेउ शकतो. त्याचा खर्च तुम्हाला २०० रू भरावा लागेल. जर तुमचे म्हणणे बरोबर असेल तर ते २०० रू व तुमचे अतिरिक्त रुपये आम्ही परत करू'. मी तेव्हाची पावती पाहीली. त्यात TIP च्या ठिकाणी व एकूण रू. मी रिकामे ठेवले होते. तेव्हा वाटले जर त्या वेटरने किंवा कोणी ७ रू लिहिले असतील तर उगाच मला आणखी भुर्दंड पडेल. म्हणून एक शिकवण घेतली. नेहमी एकूण रक्कम किती ते पडताळून पाहणे, टीप द्यायची/ न द्यायची असेल तर तसे लिहावे व खाली दोघांची बेरीज स्वत: लिहावी. मगच सही करावी. टारझन, मी ही गेली ४/५ वर्षे क्रेडीट कार्ड वापरत आहे पण त्यांना अतिरिक्त पैसा दिला नाही. एकदा त्यांनी लावला होता व्याज आकार. पण त्यांची चुकी दाखवून परत करावयास लावला. बाकी काही शंका असल्यास विचारेनच.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा