नमस्कार मिपाकर्स, नविन लेखन/लेखक असल्यामुळे काहि चुका झाल्यास सांभाळुन घ्या..
------------------------------------------------------------------------
वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे, माझी दुचाकी चोरीला गेल्याकारणाने मी आणि माझा मित्र अनिल जरा तणावात पुण्यातल्या आमच्या रुमवर होतो तेव्हा अनिल चा फोन वाजला, क्रेडिट कार्ड कस्ट्मर केअर "तुमच्या कार्डवरुन या १-२ दिवसांत जो वापर झाला आहे त्याच्या खात्री करिता हा फोन केला आहे" अनिल ने जवळच पडलेल पाकिट उघडुन कार्ड पाहिले आणि खात्री करुन टाकली , फोन बंद.
तो दिवस आणी दुसरा दिवस आम्ही माझ्या गाडीच्या कामात दंग होतो, दिवसभराचा शीण घालवण्यासाठी संध्याकाळी एका बार मधे बसलो, बिल आल्यावर अनिल ने त्याचे क्रेडिट कार्ड दिले तर थोड्यावेळाने वेटर परत आला, "साहेब, तुमचा कार्ड चालत नाही आहे". अनिल ने निरखुन पाहिले तर ते कार्ड त्याच्या कार्ड सारखे दिसायला होते, पण त्यावर नाव दुसर्याच कोणाचे तरी होते. मी बिल देइपर्यंत त्यानी कस्ट्मर केअर ला फोन लावला आणी कार्डची थकबाकी विचारली, कस्ट्मर केअर " ५५,००० रु. " तो दणकन उडालाच.
आम्ही विचारात पडलो कि हे कस काय झाल आणी तेंव्हा त्या कस्ट्मर केअरच्या फोन ची आठवण झाली, झालं मग आता काय करायचं, कार्ड तर आधीच पुर्ण वापरामुळे स्थगित केलेल होते, विचार आला कि कुठेतरी अनिलच्या कार्डची अदलाबदली झाली असेल, म्हणुन आंतरजालावर कार्ड वरील नावाची शोधाशोध केली तर काहि मोबाइल क्रमांक मिळाले. फोन केल्यावर एकाने सांगितले कि ते त्याचेच कार्ड आहे जे सहा महिन्यांपुर्वी चोरीला गेले होते.
अनिल विचार करु लागला कि त्याने सर्वात शेवटी कार्ड कुठे वापरले होते, तेव्हां त्याला आठवले...
५ दिवसांपुर्वी (भुतकाळ)
अनिल कंपनीतील मित्रांबरोबर एका चांगल्या ठिकाणी जेवायला गेला होता, जेवण झाल्यावर साहेबांनी दिले आपले कार्ड बिलासाठी, त्या वेटरनी बिलानंतर कार्ड परत करताना त्याच्या कार्ड सारखं दिसनारं पण दुसर्याच कोणाचे (जे आधी चोरी केले होते) तरी कार्ड दिले, ह्यानी आपल्या सगळ्यां सारखं स्वःताच नाव न बघता ते पाकीटात ठेवुन दिले.
आता त्या वेटर कडे अनिल चे कार्ड होते, मग काय, त्याने खरेदीचा सपाटाच लावला, ज्यामुळे कस्ट्मर केअरनी फोन केला होता.
(परत वर्तमानात)
आता काय करायचे म्हणुन अनिल कडे ज्याचे कार्ड होते त्याला सहज फोन केला तर त्यानी सांगीतले कि त्याच्या बरोबर सुध्दा राजवाडा मधे असेच झाले होते, पण कस्ट्मर केअरच्या फोनमुळे त्याच्य लक्षात हि गोष्ट लगेच आली, ज्यामुळे त्याला फक्त १०-१५,००० रु. चे नुकसान झाले होते.
तर मिपाकर्स जेव्हांकधी तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड वापराल तेंव्हा जरा सांभाळुन, (आता बघा बघु तुमच्या कार्डवर तुमचच नाव आहे का? :-))
तुम्हाला हवे असेल तर कळवा , पुढे पोलीसांकडे तक्रार... चोराला पकडणे... अनिलने पोलीस श्टेशन वर जावुन चोराची कानशिले गरम करने..क्रेडिट कार्ड कंपनी बरोबर तडजोड... लिहिन परत ...
वाचने
13043
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
हि विषय
आपन वापरत नाई
आम्ही पण....
माझ्या मते
In reply to आम्ही पण.... by शिवा जमदाडे
शिवाय
In reply to माझ्या मते by टुकुल
>>सहसा
क्रेडीट कार्ड
हो अशी
In reply to क्रेडीट कार्ड by प्रभाकर पेठकर
धन्यवाद..
In reply to हो अशी by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
मर्यादा
In reply to हो अशी by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
हेच म्हणतो..
In reply to मर्यादा by देवदत्त
ह्याच
In reply to मर्यादा by देवदत्त
म्हणजे काय ?
(रोकड
In reply to म्हणजे काय ? by अवलिया
रोकडा व्यवहार
In reply to म्हणजे काय ? by अवलिया
पुण्याच्या...
महत्वाची गोष्ट
+१
In reply to महत्वाची गोष्ट by योगी९००
हम्मम्म!
In reply to महत्वाची गोष्ट by योगी९००
सीवीवी/सीवीसी
In reply to हम्मम्म! by प्रभाकर पेठकर
वेरिफिकेशन कोड
In reply to महत्वाची गोष्ट by योगी९००
कहर म्हणजे
ह्म्म
कसे काय/
In reply to ह्म्म by मनिष
वस्तुंची
In reply to कसे काय/ by चतुरंग
बरोबर.
In reply to वस्तुंची by मनिष
लिहा!
मी डेबिट
गंभीर विषय आहे.
एवढे बावरून जाउ नका
वॉइस ऑथोरायझेशन ???
In reply to एवढे बावरून जाउ नका by टारझन
हे सगळे ठीक आहे...
In reply to एवढे बावरून जाउ नका by टारझन
वॉईस
In reply to हे सगळे ठीक आहे... by मनिष
आणखी एक..