‘तुला’

शंतनु _०३१'s picture
शंतनु _०३१ in जनातलं, मनातलं
26 Aug 2016 - 6:20 pm

‘तुला’
तुला मानण्यात काहीच अर्थ नाही, तू आहेस ही जाणिव मुळात नकोशी आहे. इथे तू हवाच कुणाला आहे.
तुझ्या आदर्शांचा न्याय जगात सर्वत्र लावता येत नाही. तूला स्मरायचे ते फक्त मन:शांती साठी ? मन:शांती ती फक्त योग्य निर्णयासाठी. आणि योग्य निर्णय तो फक्त आपल्या फायद्यासाठी ? पिडीत, उपेक्षित, अन्याय सहन करणारे अश्या ढाली घेवून जगणार्यां, समानतेची मागणी करणार्यांना तुझ्यावरच विश्वास नाही. तुझ्या तत्वांचे उपदेश देणार्यांमध्ये ‘मी’ पणाचा वास येतो. असे दोन्हीही सतत तुलना करत असतात. तुझ्या चांगल्या वाईटची. आस्तिक नास्तिकाच्या विचारांची. यश अपयश – चढ उतार सगळ्याचं पाहावे लागतात. मग यशस्वी झालो म्हणून तुझे गुणगान करायचे किवा अपयश आला तर तूला दगड ठरवायचं. तुझ्या तत्वाताला थोर पणा अथवा फोल पणा शोधायचा. असे परस्पर विरोधी विचार फक्त स्वताच्या फायद्या तोटया साठी करायचा ? फायद्याच विचार करताना मनाला तुझा अस्तित्व नको असत. म्हणूनच मग मनातल्या दोन टोकांच्या भावनांनी आस्तिक आणि नास्तिक या विचारांचे मापं टाकून आम्ही तुझी निरंतर ‘तुलना’ करत असतो. आणि करत राहाणार.
आस्तिक नास्तिक ही पारडी नेहमी खाली वर होत राहणार कारण .........

या तुलनेचा तराजू तुझ्याच हातात आहे. आणि हि ‘ तूला ‘ तु गमतीनं पहात आहेस ...

// श्रीकृष्णार्पणमस्तु //

वावरविचार

प्रतिक्रिया

पाटीलभाऊ's picture

26 Aug 2016 - 7:36 pm | पाटीलभाऊ

आपल्याला अभिप्रेत असलेली 'तुला' लेखाच्या शेवटी उमगली.

बाकी "या तुलनेचा तराजू तुझ्याच हातात आहे" या वाक्याशी मात्र असहमत.
'तुलना' आपण करत असताना 'तुला' त्याच्या हातही कशी?

जरा डोक्यावरून गेलं, पण असो।
पुलेशु।।।

विवेकपटाईत's picture

27 Aug 2016 - 9:18 am | विवेकपटाईत

मला हि असेच वाटले.