दिसलास तू, उमले यौवन
हसलास तू, लाजले नयन.
आवेग प्रीतीचा,तनूत मोहरे
गंध पसरवे, यौवन वारे.
रोम रोमात रे फुलतो फुलोरा
देहात उसळे, बेभान वारा
जाळते तन, धुंद चांदणे,
घे मिठीत, हेच मागणे,
अधरा वरती तू लिहिले ते
गुपित आपले अधरी जपते
मिठीत तुझ्या हि तनू विरघळते
श्वासांत मिसळता श्वास, नयन मिटते,
देहास आलिंगता ,मी एकरूप होते,
अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.
प्रतिक्रिया
25 Aug 2016 - 6:47 pm | बोका-ए-आझम
अकु पेटलेत इथे!
26 Aug 2016 - 5:31 pm | कैलासवासी सोन्याबापु
फटू घासला! परत धार काढायला दिलाय, धार काढून कल्हई करून आणतो काही दिवसांत, आणला तरी काकाग्नी शांत होइलसे वाटत नाही, काका रॉक्स! काका कायम जितके गरम असतात त्यावरून काकासुद्धा ग्लोबल वॉर्मिंग मध्ये एक महत्वाचे घटक आहेत असे वाटते! अस्तु!. =))
26 Aug 2016 - 7:44 pm | अभ्या..
टेम्पररी कुलदीप पवार किंवा राजशेखर लावावा काय? भाषा पण मराठी, आंबट पण मराठीच असलेला बरा.
27 Aug 2016 - 11:30 am | बोका-ए-आझम
फुटलो!मेलो! _/\_
27 Aug 2016 - 11:55 am | चतुरंग
ह्या प्रतिसादात बापूंच्या कीबोर्डावरती सरस्वतीने टायपिंग करवून घेतले आहे! ;)
27 Aug 2016 - 2:47 pm | कैलासवासी सोन्याबापु
की बोर्ड वर माहिती नाही पण डोसक्यात मात्र तांडव केले होते अगदी ते रुंडमाला तोडून केश मोकळे सोडून का काय म्हणतात तसले!
27 Aug 2016 - 2:50 pm | चतुरंग
सरस्वती तांडव करत नाही, तो मक्ता भोलेसांबांचा परंतु हा काकाग्नी बघता तिने देखील कदाचित तांडव केले असेल! ;)
-रंगा तांडेल
26 Aug 2016 - 12:07 am | ज्योति अळवणी
छान
26 Aug 2016 - 4:32 pm | अत्रुप्त आत्मा
जोरावर आलय काव्य!
26 Aug 2016 - 4:49 pm | अजया
आवरा!
26 Aug 2016 - 5:29 pm | स्वाती राजेश
लावणी म्हटले तर...ती यापेक्षा रोमँटिक असते..
हा प्रकार गलिच्छ वाटतो...
प्रेमगीत म्हटले तर...त्यात प्रेम ना दिसता ..सगळे दिसत आहे...
तेव्हा स्व:ताला आवरा...आणि भक्ती गीत लिहिता येते का बघा...
ऍडमीन ने लक्ष घालायची वेळ आणू नये...
26 Aug 2016 - 5:36 pm | कैलासवासी सोन्याबापु
पिवळे साहित्य फक्त गद्य असू नये तर ते पद्य प्रकारात सुद्धा उपलब्ध व्हावे(प्रसंगी नियमांची, शुद्धलेखनाची ऐशीतैशी करून), ह्या उदात्त हेतूने काका ह्या पिवळा रंग घातलेल्या जिलब्या पाडत असतात, निष्काम असते तशी ही सकाम किंबहुना सकाळ दुपार संध्याकाळ फक्त कामच अभिप्रेत असलेली साहित्य सेवा काका व्रतस्थपणे नेटाने चालवत असतात असे ह्या प्रसंगी सांगू इच्छितो!
=)) =)) =))
26 Aug 2016 - 8:18 pm | जव्हेरगंज
=)) =)) =))
27 Aug 2016 - 8:38 am | नाखु
आज दिवटे सर असते तर याची "केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे"अशी गद्य रचना आणि ५०-६० प्रतिसाद नक्कीच आले असते.
27 Aug 2016 - 11:31 am | बोका-ए-आझम
कुठेही तुलना करायची नाही पण ' मालवून टाक दीप ' आणि ही कविता यांमधले विचार सारखेच आहेत.
26 Aug 2016 - 11:08 pm | माम्लेदारचा पन्खा
अशो...आप्लं असो !
27 Aug 2016 - 8:47 am | उडन खटोला
अरे चांगली रशिक कविता लिहिलीय की. अकुंची म्हणून न वाचता एखाद्या कवयित्रीची म्हणून वाचा, आवडेल बघा!
27 Aug 2016 - 11:53 am | चतुरंग
कवितेला (अ)विनाशी काकास्पर्ष झाला की संपलेच!! ;)
27 Aug 2016 - 12:07 pm | अभ्या..
रंगाकाका, मी लिहिलेला प्रतिसाद डिलीट केलाय बरका. ;)
नको उगी..
27 Aug 2016 - 12:43 pm | चतुरंग
तू काय लिहिलं असशील ते! ;)
(आणि तेवढ्यात मलाही काका म्हणून घेतलंसच ना मेल्या!)
-(काकाकुवा)रंगा
27 Aug 2016 - 12:53 pm | अभ्या..
वा काका, जुने ०८-०९ चे मिपा आठवले एकदम.
27 Aug 2016 - 1:06 pm | उडन खटोला
कॉ आभ्यो कॉ ऑसॉ बॉलटॉय्?
27 Aug 2016 - 1:10 pm | अभ्या..
डॉन्या, धम्या, विन्या वगैरे मंडळींना मेल्या वगैरे घरगुती संबोधने बिनधास्त चालायची ती आठवली.
बाकी अनापशनाप काही मेंदूत आणू नकात लगेच.
27 Aug 2016 - 4:43 pm | सतिश गावडे
लुच्चा आणि लुच्ची शब्द नसल्यामुळे पास.
27 Aug 2016 - 5:04 pm | ज्ञानोबाचे पैजार
कविता चांगली आहे. आवडली.
पैजारबुवा,
27 Aug 2016 - 5:08 pm | अनुराग कश्यप
+१११.
छान कविता.
27 Aug 2016 - 5:34 pm | कैलासवासी सोन्याबापु
हॅलो सर आय एम अ बिग फ्यान ऑफ युवर्स!
27 Aug 2016 - 5:53 pm | बोका-ए-आझम
पण बाँबे व्हेल्वेट गंडलाय असं सपष्ट मत आहे.
27 Aug 2016 - 7:37 pm | उडन खटोला
आशेच् म्हंतो. काय सांगने का था तेच नै समझ्या. नंतर रामन राघव ने बौंस ब्याक केला म्हणा.
27 Aug 2016 - 9:42 pm | अनुराग कश्यप
ये आपका बढप्पन है!
बोकाजी के अनुवाद और सोन्याबापुजी के सेनादल अनुभव के हम भी बहुत बड़े फॅन है.
28 Aug 2016 - 6:33 am | भालचंद्र_पराडकर
गंध पसरवे, यौवन वारे.
कुनीतरी हवाबाण हरडे खाल्लं असावं असा फील का येतोय इथे?