Skip to main content

अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 25/08/2016 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
दिसलास तू, उमले यौवन हसलास तू, लाजले नयन. आवेग प्रीतीचा,तनूत मोहरे गंध पसरवे, यौवन वारे. रोम रोमात रे फुलतो फुलोरा देहात उसळे, बेभान वारा जाळते तन, धुंद चांदणे, घे मिठीत, हेच मागणे, अधरा वरती तू लिहिले ते गुपित आपले अधरी जपते मिठीत तुझ्या हि तनू विरघळते श्वासांत मिसळता श्वास, नयन मिटते, देहास आलिंगता ,मी एकरूप होते, अर्पिते मी तुला ,जे तुला हवे ते.
लेखनविषय:

वाचने 6005
प्रतिक्रिया 31

प्रतिक्रिया

In reply to by बोका-ए-आझम

फटू घासला! परत धार काढायला दिलाय, धार काढून कल्हई करून आणतो काही दिवसांत, आणला तरी काकाग्नी शांत होइलसे वाटत नाही, काका रॉक्स! काका कायम जितके गरम असतात त्यावरून काकासुद्धा ग्लोबल वॉर्मिंग मध्ये एक महत्वाचे घटक आहेत असे वाटते! अस्तु!. =))

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

टेम्पररी कुलदीप पवार किंवा राजशेखर लावावा काय? भाषा पण मराठी, आंबट पण मराठीच असलेला बरा.

In reply to by चतुरंग

की बोर्ड वर माहिती नाही पण डोसक्यात मात्र तांडव केले होते अगदी ते रुंडमाला तोडून केश मोकळे सोडून का काय म्हणतात तसले!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सरस्वती तांडव करत नाही, तो मक्ता भोलेसांबांचा परंतु हा काकाग्नी बघता तिने देखील कदाचित तांडव केले असेल! ;) -रंगा तांडेल

छान

लावणी म्हटले तर...ती यापेक्षा रोमँटिक असते.. हा प्रकार गलिच्छ वाटतो... प्रेमगीत म्हटले तर...त्यात प्रेम ना दिसता ..सगळे दिसत आहे... तेव्हा स्व:ताला आवरा...आणि भक्ती गीत लिहिता येते का बघा... ऍडमीन ने लक्ष घालायची वेळ आणू नये...

In reply to by स्वाती राजेश

पिवळे साहित्य फक्त गद्य असू नये तर ते पद्य प्रकारात सुद्धा उपलब्ध व्हावे(प्रसंगी नियमांची, शुद्धलेखनाची ऐशीतैशी करून), ह्या उदात्त हेतूने काका ह्या पिवळा रंग घातलेल्या जिलब्या पाडत असतात, निष्काम असते तशी ही सकाम किंबहुना सकाळ दुपार संध्याकाळ फक्त कामच अभिप्रेत असलेली साहित्य सेवा काका व्रतस्थपणे नेटाने चालवत असतात असे ह्या प्रसंगी सांगू इच्छितो! =)) =)) =))

In reply to by जव्हेरगंज

आज दिवटे सर असते तर याची "केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे"अशी गद्य रचना आणि ५०-६० प्रतिसाद नक्कीच आले असते.

In reply to by स्वाती राजेश

कुठेही तुलना करायची नाही पण ' मालवून टाक दीप ' आणि ही कविता यांमधले विचार सारखेच आहेत.

कवितेला (अ)विनाशी काकास्पर्ष झाला की संपलेच!! ;)

In reply to by उडन खटोला

डॉन्या, धम्या, विन्या वगैरे मंडळींना मेल्या वगैरे घरगुती संबोधने बिनधास्त चालायची ती आठवली. बाकी अनापशनाप काही मेंदूत आणू नकात लगेच.

कविता चांगली आहे. आवडली. पैजारबुवा,

ये आपका बढप्पन है! बोकाजी के अनुवाद और सोन्याबापुजी के सेनादल अनुभव के हम भी बहुत बड़े फॅन है.

गंध पसरवे, यौवन वारे. कुनीतरी हवाबाण हरडे खाल्लं असावं असा फील का येतोय इथे?