०१: ब्राम्हण सोसायटी -ठाणे
ब्राम्हण सोसायटी हा भाग गोखले रोड आणि महात्मा गांधी रोड ह्यांच्या कत्रीतला भाग .
ह्या भागाची आठवण म्हणजे माझी खेळ-शाळा, चिमणी पाखरे मंदिर
चिमणी-पाखरे हि बघायला गेला तर माझी पहिली शाळा. सकाळी ९ ते ११ .
एकाच वर्गखोली. एका बाजूला घसरगुंडी. म्हणजे वर्गातच.
दुसरे ठिकाण म्हणजे फडके बाईंचा चित्रकला क्लास. त्यावेळी आजच्या कर्वे हॉस्पिटल च्या बाजूला २ इमारती सोडून फडकेंचा वाडा होता त्या फडके बाई आमच्याच सरस्वती शाळेत बाळ वर्गाला शिकवायला होत्या त्या चित्रकला क्लास घ्यायच्या घरी . झोपडी , बगळा , होडी , आणि अशा इतर अनेक गोष्टी त्यांनी मला शिकवल्या आहेत. लहान असताना ह्या गोष्टींचा पण किती अप्रूप वाटती नाही ?
०२: तलाव-पाली -ठाणे
तलाव पाली म्हणजे सर्व ठाणेकरांचे हृदय. माझे पण. तलाव पाली ला लहान असतांना जायचो ते मुख्य म्हणजे हत्तीच्या गाडीत बसायला. आज जिथे स्टेशन वरून येणार उडाण पूल उतरतो तिथे पूर्वी एक चांगली बाग होती [ अजून पण आहे पण आता बागेचा बार झाला आहे] त्या बागेत हत्तीच्या आकाराची एक छोटी रेल्वे गाडी होती तीत बसायला मी जायचो . तसाच तलावपाळी ची बग्गी राऊंड , कोपऱ्यावरच्या विजय कुल्फी कडची पिस्ता कुल्फी , अशी खूप धमाल करायचो. अजून एक ठिकाण म्हणजे साई-कृपा हॉटेल, हे हॉटेल मला एकाच कारणामुळे आवडायचा तिथे सँडविच बरोबर भरपूर वेफर्स द्यायचे. बाकी मग तलाव पाली ला घेतलेले धनुष्य-बाण , गाडा दरवर्षी गणपती विसर्जन झाले कि घेतलेली मेणबत्ती वाली बोट , आदी अनेक गोष्टी आहेत
०३ : राजाजी रोड - डोंबिवली
४, समृद्धी सोसायटी हे माझे हक्काचे आजोळ. आई ची आई म्हणजे माझी आजी तिथे राहायची . दार शनिवारी आजोबा मला घ्यायला ठाण्याला यायचे. मग जलद लोकल पकडून डोंबिवली. आजी कडे पोचला कि मग कुरमुरे चिवडा आणि पार्ले जी अशी न्याहारी ठरलेली असायची. मग संध्याकाळी आई यायची. आजी कडे दोन धुणं वळत घालायच्या काठ्या होत्या त्या मी ट्रेन म्हणून खेळायला घ्यायचो. शनिवारी सांध्याकाळी पोलीस लाईन च्या मारुती चे दर्शन ठरलेले असायचे कधी कधी रेल्वे लाईन बाजूच्या गणपती मंदिरात पण जायचो. थानायला कशी हत्तीची गाडी तशी इथल्या बागेत मोराची गाडी होती . त्यावर पण राईड ठरलेली असायची.
मग रविवारी संध्याकाळी निघताना चणे- शेंगदाणे हि घ्यायचो . राजाजी रोड वर एक होता त्याचे च चणे शेंगदाणे मी खायचो . बाकी कुठलेच खायचो नाही. { एक टीप: बी-केबिन च्या इथे एक दाणेवाला बसतो त्याच्या कडचे शेंगदाणे फारच मस्त असतात }
बरेच दिवसात काही लिहिला नव्हता त्यामुळेच हा लेख लिहिला आहे. मिपा सदस्यांना विनंती आहे हि त्यांनी पण आपल्या आठवणी प्रतिक्रियांमध्ये नोंदवा.
यापुर्वी मी मिपावर प्रणवजोशी नावाने लेखन करत होतो.परंतू संकेताक्षर विसरलो.काही तांत्रिक कारणामुळे संकेताक्षर पुन्हा मिळवता येत नाहीये. त्यामुळे हा औरंगजेब आयडी घेतला आहे.
यापुढे सर्व लेखन याच आयडीवरुन होईल.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
16897
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
महाराज आपण मिपाचे धर्मराज आहात !
तुम्हाला कुर्निसात म्हणायचे
In reply to महाराज आपण मिपाचे धर्मराज आहात ! by माम्लेदारचा पन्खा
महाराजांना फक्त वंदन...
In reply to तुम्हाला कुर्निसात म्हणायचे by औरंगजेब
खरे आहे. का कोण जाणे पण
In reply to महाराजांना फक्त वंदन... by माम्लेदारचा पन्खा
असू दे हो...आवड आपली आपली....
In reply to खरे आहे. का कोण जाणे पण by औरंगजेब
हम्म, एखादाच अझरुद्दीन.
In reply to असू दे हो...आवड आपली आपली.... by माम्लेदारचा पन्खा
आहो कोणी कशाला मीच आहे
In reply to असू दे हो...आवड आपली आपली.... by माम्लेदारचा पन्खा
तुम्ही ह्युमरचे पण औरंगजेब
In reply to आहो कोणी कशाला मीच आहे by औरंगजेब
अभ्याशेट...विडा उचला...
In reply to तुम्ही ह्युमरचे पण औरंगजेब by अभ्या..
हेहेहेहेहे. होतय आपॉप.
In reply to अभ्याशेट...विडा उचला... by माम्लेदारचा पन्खा
प्रणव जोशि ऊर्फ औरंग्या
आभार
kaay aahe he
काही विशेष नाही असच आपल
In reply to kaay aahe he by सतीश कुडतरकर
काही विशेष नाही असच आपल
In reply to kaay aahe he by सतीश कुडतरकर
छान आठवणी आहेत.
माझ्या आठवणी ठाण्याच्याच
भानुशाली
In reply to माझ्या आठवणी ठाण्याच्याच by आप्पा
तलावपाळी च्या
In reply to भानुशाली by स्वाती दिनेश
छाया
ठाण्याशी निगडित अनेक आठवणी आहेत...
लहानपणीच्या आठवणि फार भारि
जुनं ठाणं .... !
ठाणे उणेपुराणे
धन्यवाद आणी मिपावर स्वागत आई.
In reply to ठाणे उणेपुराणे by अलका सुहास जोशी
खपली काढलीत राव. तुम्ही जी
आपली आठवण
छान धागा. राजाजी रोडला पूर्वी
aurangjeb saheb Lekh aawadala
नौपाडा, ब्राह्मण सोसायटी,
In reply to aurangjeb saheb Lekh aawadala by निश
वा !!!