रुस्तुम
संरक्षण क्षेत्र त्यामधला भ्रष्टाचार. कुणी तरी एक त्याविरुद्ध लढतो. त्यामधे खूप काही सोसतोही. रंग दे बसंतीमधे याची उत्तम हाताळणी झालेली आहे.
तसंच काही असेल अशी आशा होती कारण तशी प्रसिद्धी झाली होती. पण सुरुवातीला प्रेमकथा, नंतर अपेक्षाभंग, त्यानंतर विश्वासाला तडा. देशासाठी लढणार्याने देशाकडे लक्ष द्यावे की घराकडे... वगैरे वगैरे.
ही कहाणी सुरुवातीला अर्धा भाग चांगली पकड घेते. चेहरेही बघणेबल आहेत.
बाय द वे
इतक्यात स्वातंत्र्य दिन पार पडला. वंदे मातरमचा जयघोष झाला. वंदे मातरम नावाचा एक मराठी सिनेमा होता. त्यात गाणे होते. अपराध मीच केला शिक्षा तूझ्या कपाळी. अर्थात अपराध मीच केला नावाचे नाटकही येऊन गेले अनेक वर्षापूर्वी. त्याचे नाव फक्त ऐकले होते. तेच या रुपात भेटेल अशी कल्पना नव्हती.
भारतात न्याय हा जनमतावर, जनमताच्या रेट्यावर अवलंबून असतो आणि जनमत हे मेडियाच्या लूडबूडीवर अवलंबून असते हे पहायला मिळते. पवन मल्होत्राचा पोलिस अधिकारी उत्तम आहे. आधी याच विषयावर एक धागा आलेला आहे पण त्यात अवांतर बरेच आहे. त्यामुळे हा नवा डाव.
कोर्ट केसेस सुनावणी आणि त्यातले लांबलचक संवादही आपल्याला नविन नाहीत. पण ते जर बोजड, न समजणारे असतील तर जरा डोक्यावरून जातात.
शेवटी शेवटी देश, देशभक्ती यांचा उल्लेख येतो काही वाक्यांपुरताच.
मात्र चित्रपट डोळ्याला सुखद वाटेल याची काळजी घेतली आहे हे नक्की.
प्रतिक्रिया
17 Aug 2016 - 8:37 am | चंपाबाई
जर आहुजाचे अक्षयच्या बायकोशी संबंध नसते जुळले तर त्याने त्याचा खून केला असता का?
खून नेमका का केला? बायकोला फशी पाडले म्हणून की देशद्रोह केला म्हणून ?
बाकी, आर्मीच्या बायकोला कुणी फशी पाडले तर त्याला सोल्जरनेच शिक्षा द्यायला हवी, अन्यथा देशाचा आर्मीवरला विश्वास उठेल, आर्मीवाले सतत फिरत असतात, कायद्याच्या मार्गाने गेले तर बिचार्याना न्याय कसा मिळेल ? असे भोंगळ युक्तीवाद जे मिसळपावावर काही दिवसांपुर्वीच वाचले होते, ते अगदी जसेच्या शिनेमात ऐकायला मिळाले, तेंव्हा आश्चर्य वाटले होते.
19 Aug 2016 - 11:09 pm | बोका-ए-आझम
म्हणजे भोंगळ युक्तिवाद ही आता तुमची monopoly राहिलेली नाही तर! शंका: तुम्हाला याचा आनंद झालाय की दुःख?
25 Aug 2016 - 10:27 am | नाखु
ते इतरेजनांना (मिपाकरांना) काय झाले याव्र अवलंबून असते.
ज्यात मिपाकरांना आनंद्,अभिमान त्यात यांना दु:ख आणि नैराश्य.
ज्यात मिपाकरांना खंत/अवघडलेपण त्यात यांना प्रचंड आनंदभरते आणि बुद्धीवादाची अनिवार्य उबळ येतेच.
नितवाचक नाखु
17 Aug 2016 - 9:57 am | आशु जोग
अगदी योग्य बोललात
त्याने केलेली कृती ही त्याच्यापुरतीच पहायला हवी
त्याचे जनरलायझेशन योग्य नाही
17 Aug 2016 - 11:11 am | मृत्युन्जय
रुस्तम चित्रपट प्रसिद्ध नानावटी केस वर आधारित आहे असे ऐकतो. तसे असल्यास चित्रपटाबद्दल न बोलणेच योग्य. नानावटी खटला आणि त्याचा अंतिम निकाल हा एक प्रचंड हास्यास्पद प्रकार आहे असे मला वाटते.
19 Aug 2016 - 6:48 pm | आशु जोग
का बुवा
17 Aug 2016 - 12:35 pm | मी-सौरभ
हे नक्की काय लिहीले आहे?
मुक्तक, चित्रपट परीक्शण का जमेल ते....
25 Aug 2016 - 2:32 am | आशु जोग
उमटलेले प्रतिबिंब