तुम्ही टी.व्ही. वर नक्की काय बघता?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
27 Jul 2016 - 11:29 am
गाभा: 

प्रिय मिपाकरांनो,

गेली १०-१२ वर्षे मी अजिबात टी.व्ही. वरील कार्यक्रम बघीतलेला नाही आणि ह्यामुळे माझे काही अडलेले पण नाही.

पुर्वी टी.व्ही. बघायचो ते नॅ.जि. आणि डिस्कवरी बघण्यासाठी, पण आजकाल यु-ट्युब वर नॅ.जि अणि डिस्कवरीचे बरेच भाग उपलब्ध आहेत, त्यामुळे गेली २ वर्षे आमच्याकडे टी.व्ही. बंदच आहे.

केबल नसणारे आणि टी.व्ही. असून पण तो चालू नसलेले, डोंबोलीत आमचे एकमेव घर असावे.

पण,

कधी कुणाकडे जायचा प्रसंग आला तर, त्या घरातील व्यक्ती बराच वेळ टी.व्ही. बघत असलेल्या दिसतात.

साधारण पणे अशा घरी, मी माझे काम झाले की लगेच निघतो.

कुणाकडे रात्र भर रहायचा प्रश्र्न आला की, एखादी खोली बघून, जवळ असलेले पुस्तक वाचत बसतो.

मध्यंतरी, म्हणजे ६-७ वर्षांपुर्वी, माझ्या सख्ख्या भावाकडे गेलो होतो,खूप दिवसांनी त्याच्याकडे गेलो असल्याने एक-दोन दिवस रहायचा बेत होता.संध्याकाळी ६ च्या सुमारास त्याच्याकडे गेलो.

चहा आणि अंघोळ होई पर्यंत, ७ वाजले.

आता म्हटले मस्त गप्पा मारू या.

तर तो म्हणाला थांब, आता ही फलाणा-ढेकणा मालिका सुरु आहे, ती बघतो, मग बोलू.

मालिका बघता-बघता जाहीराती लागल्या की त्या वेळांत तो इतर ठिकाणी काय-काय सुरु आहे, ते पण चाळणे चालू होतेच.

त्याचे हे खेळ चालू असतांना, माझे २ पेपर वाचून झाले आणि एक मासिक पण चाळून झाले.

साडे सात वाजता, त्याच्या बायकोने टी.व्ही.चा रिमोट आपल्या ताब्यात घेतला आणि मी माझ्या साडवाला फोन केला.त्याने घरी यायचे आमंत्रण दिले आणि मी भावाकडे जेवून त्याच्याकडे जायचे ठरवले.

साडे आठ पर्यंत जेवण झाले ते पण टी.व्ही. बघता बघता.

अध्ये-मध्ये भावाशी जुजबी बोलणे चालू होतेच.

नऊ वाजता साडू घ्यायला आला आणि मी सडवाकडे रहायला गेलो.

रात्री साडे नऊला आमची जी गप्पांची मैफिल (अपेय पान विरहित) जमली ती पहाटे पहाटे ४-५ च्या सुमारास संपली.मध्येच एकदा गाडीवर भुर्जी-पाव पण खाऊन झाला.

हे अनुभव बर्‍याच ठिकाणी आले, आमच्या साडू सारखी माणसे अपवादात्मक.

आता कुणाकडे रहायला जायचे असले की, आधी मी विचारतो,"तुम्ही मालिका बघता का?"

उत्तर होकारार्थी आले की, आम्ही सरळ हॉटेल शोधायला लागतो.

एखादी रूम बूक करून तिथेच नातेवाइकांना बोलावतो.निदान त्या हॉटेलमधील टी.व्ही. तरी आपल्याला बंद करता येतो.

व्यत्यय न येता, कामाची बोलणी होतात आणि त्यांना मालिका बघायची घाई असल्याने ते लगेच निघतात पण.

पुर्वी मी टी.व्ही. वर क्रिकेटचे सामने बघत असे.

मी मस्त पैकी पुस्तक वाचता-वाचता क्रिकेट बघत असायचो. एखादी विकेट पडते, मी पुस्तकातून डो़के काढतो, तर लगेच जाहीरात सुरु.हायलाईट दाखवे पर्यंत उगाच ३-४ जाहीराती बघायला लागायच्या.

मालिकेत तर दर २-३ मिनिटांनी एकमेकांची तोंडेच दाखवतात.

बातम्यां मध्ये मुळ बातमी सोडून फाफट्पसाराच जास्त असतो आणि त्या बातम्या दुसर्‍या दिवशी पेपर मध्ये वाचता येतातच की.

सिनेमे न बघता आपण जाहीराती बघता-बघता सिनेमा हुडकत असतो.

म्हणूनच मला हा एक प्रश्र्न पडला आहे की, आलेल्या पाहूण्यांना वेळ न देण्या इतपत तुम्ही टी.व्ही. वर नक्की काय कार्यक्रम बघता?

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

27 Jul 2016 - 11:52 am | सामान्य वाचक

म्हणून आम्ही कुणाच्या घरी जात नाही किंवा कुणाला घरी बोलावत नाही। ☺

विनोद सोडून द्या। पण खरीच अशी परिस्थिती आहे
मालिका पाहता पाहता च पाहुण्यांशी गप्पा होतात त्यापण सिरीयल बद्दल च

इतर टेलीविजन वर काय बघतात ते जाणून घेऊन तुमचा नक्की काय फायदा होणारे ते समजले तर बरे होईल ;)

मुक्त विहारि's picture

27 Jul 2016 - 12:01 pm | मुक्त विहारि

समान शीले समान व्यसने मैत्री होतेच होते, असा आमचा स्वानुभव आहे.

आमच्या सारखीच, त्या येड्या खोक्याच्या नादी न लागलेली, किती मानव अद्याप भुतलावर आहेत, त्यांना शोधत आहे.

तुझ्या त्या पोकिमॅनच्या धाग्यामुळे, पण तुला फयदा झाला असेलच की.

आम्ही त्या खेळाच्या नादी नाही, हे तर तुला नक्कीच समजले असेलच.

तुम्ही पोकेमोन खेळता का असे मी विचारले नव्हते त्या धाग्यात ;)

असो .

समान मित्र शोध मोहिमेला शुभेच्छा ;)

मुक्त विहारि's picture

27 Jul 2016 - 12:07 pm | मुक्त विहारि

धन्यवाद.

तुमच्या अशा शुभेच्छांचे, आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे.

प्रसाद गोडबोले's picture

29 Jul 2016 - 1:15 pm | प्रसाद गोडबोले

मिपावर येवुन हे असे प्रेमसंवाद वाचायला मला फार्फार आवडते :))))

मुक्त विहारि's picture

29 Jul 2016 - 1:41 pm | मुक्त विहारि

ते ठाकूर आळीतले तर आम्ही डोंब आळीतले, त्यामुळे ते आणि आम्ही सख्खे शेजारीच आहोत.

नळावरची भांडणे, आम्ही दोघेही जास्त मनावर घेत नाही.

टवाळ कार्टा's picture

29 Jul 2016 - 1:43 pm | टवाळ कार्टा

मिपा म्हणजे सार्वजनीक नळ?? =))

मुक्त विहारि's picture

29 Jul 2016 - 1:47 pm | मुक्त विहारि

कधी कधी झालंय असं.

कुणी जिलब्यांचा रतीब पण टाकत असतातच की.

कपिलमुनी's picture

29 Jul 2016 - 2:35 pm | कपिलमुनी

मिपा खासगी नळ आहे रे !
एकदा 'अणूबव' आलाय ना तुला =))

टवाळ कार्टा's picture

29 Jul 2016 - 3:04 pm | टवाळ कार्टा

शिव शिव शिव

आज नळावर भजनाचं पाणी वाहतंय बदाबदा. अंघोळ करुन घ्या...

आनन्दा's picture

27 Jul 2016 - 11:54 am | आनन्दा

मी पूर्वी टी व्ही वर बरेच पिक्चर बघायचो, मग तेच तेच रेपीट व्हायला लागल्यावर सोडून दिले.
बाकी, कोणतीही गोष्ट वाया जात नाही, दॄष्टी पाहिजे, त्या रटाळ डायलोग्समधून कधीकधी एखादा चांगला पंच मिळून जातो.
बाकी, चांगली पुस्तके असतील तर मला माणसांची पण गरज पडत नाही.

समी's picture

27 Jul 2016 - 11:56 am | समी

:)

+ १

आजकाल बरेच सिनेमे "यु-ट्युब" वर बघायला मिळतात आणि ते पण जाहीरातींशिवाय.

मंदार कात्रे's picture

27 Jul 2016 - 12:08 pm | मंदार कात्रे

निदान एपिक चॅनेल साठी तरी टीव्ही पाहणे मस्ट आहे

बाकी इतर फालतू चॅनेल वरचे अतिमहाफालतू कार्यक्रम न बघणे हा उत्तम पर्याय आहे

क्रिकेट मॅचेस बघतो अधून मधून , प्रो-कबड्डॅ पण मस्त

नो आयपीएल

पूर्वी बीबीसी / डिस्कव्हरी / नॅट्जियो / एन एच के / डोय्जे वेला वर खूप चांगले कार्यक्रम असायचे

अल-जझीरा च्या डॉक्युमेन्टरीज चांगल्या असतात

एन एच के / डोय्जे वेला / आर टी / एबीसी इत्यादि खूप चांगल्या वाहिन्या दूरदर्शन च्या फ्री डिश वर उपलब्ध आहेत , त्यामुळे वन टाइम २०००/- खर्च करून डी डी फ्री डिश बसवून घेणे हा तुलनेने सोपा व बिनखर्चाचा पर्याय आहे .

परन्तु एपिक चॅनेल आणि घरातल्याना हव्यात म्हणून मराठी मालिकांसाठी १४०/- रुपयांचा टाटा स्काय चा पॅक मारतो. त्यात श्री शन्करा टीव्ही आणि तिरुपति बालाजी चे दोन उत्क्रूष्ट चॅनेल फ्री मिळतात

बाकी युट्युब आणि टॉरेन्ट बाबा की जय हो!

समीरसूर's picture

27 Jul 2016 - 12:11 pm | समीरसूर

कुणी ही आमच्याकडे आलं (अगदी दूध बिल घ्यायला आलेले दादादेखील) आणि टीव्ही सुरु असला तर आम्ही टीव्ही बंदच करतो. कधी कधी येणारेच टीव्ही मध्ये इतके गुंतून पडतात की आम्हीच एकमेकांची तोंडे बघत बसतो. आमच्या घरी संध्याकाळी 8:30 ते रात्री 10:00 या दीड तासातच टीव्ही सुरु असतो. बाकी संपूर्ण वेळ बंदच असतो. शनिवारी - रविवारीदेखील आम्ही घरी असलो तरी दिवसभर टीव्ही सुरु केला जातच नाही. संध्याकाळी 8 ते 10:30 पर्यंत फक्त! बाकी इतर वेळ मी पुस्तक - पेपर वगैरे वाचतो किंवा घरातली कामे करतो. बाहेर असलो तर प्रश्नच येत नाही. मी कुणी माझ्याशी बोलत असेल तर मोबाईलमध्ये अजिबात डोकावत नाही. तसंही मी मोबाईल फक्त कॉल्स आणि इमेल्ससाठीच वापरतो. त्यामुळे मला एकदा चार्ज केल्यावर दोन दिवस बेटरी पुरते. व्हॉट्सएप वापरत नाही. इंस्टालच केलेले नाही.

पण मी आज-काल 'काहे दिया परदेस' बऱ्यापैकी नियमितपणे बघतो. 'खुलता कळी खुलेना' च्या पहिल्याच एपिसोडमध्ये नायकाला लग्नात सात फेरे घेताना नायिका गरोदर असल्याचं कळतं. मग हा सस्पेन्स बघावाच लागतो. :-)

व्हॉट्सएप नसल्याने खूप वेळ वाचतो असे निरीक्षण नोंदवतो.

मी पण "व्हॉट्सएप" वर जास्त वेळ वाया घालवत नाही.

दुपारी जेवण झाले की २०-२५ मिनिटे आणि संध्याकाळी १०-१५ मिनिटे पुरतात.

कधी-कधी तर २-३ दिवस पण स्मार्ट फोन ह्या कामासाठी वापरत नाही.

आमचे बाबा महाराज म्हणतात,"यंत्रे मानवासाठी असतात.मानव यंत्रात गुंतला की वेळेचा दुरुपयोग व्हायला सुरुवात होते."

....की आम्हीच एकमेकांची तोंडे बघत बसतो."

अशावेळी सरळ विचारायचे, "तुम्ही मला भेटायला आलात? की टी.व्ही. वरचे कार्यक्रम बघायला?"

रातराणी's picture

27 Jul 2016 - 12:16 pm | रातराणी

मी फ्रेंडस सुरू केलय परत रिपीट रिपीट :)

फक्त विनोदी मालिकाचं पाहते मोस्ट्ली. दॅट सेवन्टीज शो, साइनफिल्ड, द ऑफिस, फ्रेजर, एवरी बडी लवज रेमंड, चियर्स, मॉडर्न फॅमिली हेचं सुरू असत लूपमधे. हाउ आय मेट युअर मदर फक्त बार्न्यी स्टिंनसन असेल तेवढे सीन बघते.
ड्रामा मधे फक्त हाउस ऑफ कार्ड्स आणि वेस्ट विंग आवडलं आहे आता पर्यंत. डाउनटाउन एबी ओके ओके आहे.

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2016 - 1:06 pm | टवाळ कार्टा

two and a half men नाही????

अर्र्र ते राहून गेलं लिहायचं. चार्ली शीनच्या नखाची सुद्धा सर नाही आली एश्न्ट्न कुशरला आणि मग माझा इंटेरेस्ट संपला. :)

वपाडाव's picture

27 Jul 2016 - 1:48 pm | वपाडाव

टक्या, coupling too...!

हे नाही पाहिलं. बीबीसीवरचचं द आय टी क्राउड पण बर होतं. काही काही एपिसोड्स भारी होते.

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2016 - 6:22 pm | टवाळ कार्टा

अर्रे coupling तर भन्नाट =))

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2016 - 6:23 pm | टवाळ कार्टा

rules of engagement??

पद्मावति's picture

29 Jul 2016 - 2:50 pm | पद्मावति

रातराणी,
फ्रेंड्स, एवेरिबडी लव्स रेमंड मी कितीही वेळा रिपीट बघू शकते. एवरग्रीन.
ऑफीस आता नाही पहात. तेही आवडायचं. अजुन सुरू आहे का ते?
हाउस ऑफ कार्ड्स केवळ सुपर्ब!!
downton abey मला तरी आवडतं. कदाचीत पीरियड ड्रामा आवडत असल्यामुळे असेल पण मस्तं वाटतं. रिवेंज बघितली नसेल तर नक्की पहा. खूप छान आहे.

अमितदादा's picture

27 Jul 2016 - 12:50 pm | अमितदादा

मस्तच..तुमच्या सारखी माणसं दुर्मिळच. आम्ही लग्ना अगोदर फ्रेन्डस, प्रिझन ब्रेक, गेम ऑफ थ्रोन्स तसेच इंग्रजी चित्रपट पाहायचो...लग्नानंतर आम्ही श्री आणि जाणवी चे रामायण, आस संसार सुरेख बाई तसेच मराठी चित्रपट तल्लीन तेने पाहतो...मुल झाल्यानंतर कार्टून पाहत राहीन आस तरी सध्या दिसतंय...बाकी मिपा आणि माबो सारख्या स्थळानी मला बराच आधार दिला असेच म्हणेन.

यावरून महाभारत पण करतो.....मज्जा असते !

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

27 Jul 2016 - 1:24 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

Only "times now"

सतिश गावडे's picture

27 Jul 2016 - 1:27 pm | सतिश गावडे

मी टिव्हीवर माझा कॉम्प्यूटर पाहतो.

मी कॉम्प्युटर वर टिव्ही बघतो.

किसन शिंदे's picture

27 Jul 2016 - 5:33 pm | किसन शिंदे

मी स्मार्ट एलईडीवर कॉम्प्यूटर आणि टिव्ही दोन्ही बघतो

मी झी मराठीच्या शिर्यलांचा मोठ्ठा फॅन आहे.

रात्रीस खेळ चाले बघता काय..?

कसला खेळ चाल्तो त्यात अजून कळलेलं नैये.

बरेच प्रयत्न करूनही बूथ ना दिसल्याने मी तो नाद सोडला

मध्ये फीलर सारखे एपिसोड आले बरेच. पण आता काहीतरी चालूए...

एक खून, एक बेपत्ता आणि घरात आलेला एक पोलीस..एक दोन भागांपासून मजा येतीये जरा.

वपाडाव's picture

27 Jul 2016 - 2:03 pm | वपाडाव

लग्नाला ३.५ वर्षे झालेली आहेत. पण अजुन TV विकत घेतला नाही.
घरी लॅपटॉपवर GOT, POI, BURN NOTICE, ARROW वेग्रे पाहतो. नवा सिजन आला की पहिलेपासुन सर्व रिपिट.
पाहुणॅ आश्चर्याने विचारतात, "अय्या TV नाही का? बरा कंट्रोल आहे तुमचा."
मागचा महिनाभर घरी(माहेरी) होतो तेव्हा "काहे दिया परदेस" पाहायचो आज्जीमुळे. छान वाटली शिरेल.

खर म्हणजे हि यंत्र आणि सुविधा आपल्यासाठीच बनलेल्या आहेत त्यामुळे त्या किती आणि कशा वापराव्या हे आपल्याच हातात आहे. असो ..मी टीव्ही वर मराठी सिरिअल्स तर चूकुनही लावत नाही आणि आमच्या मातोश्री बघत असतील तर काहीतरी वाचणे किंवा कॉम्पुटर वर काहीतरी शोधात बसणे यात वेळ घालवतो...नेट जिओ, डिस्कव्हरी, डिस्कव्हरी सायन्स, हिस्टरी टीव्ही 18 (सर्वात आवडते), टी.एल.सी. ट्रॅव्हल अँड लिविंग, आणि सगळी इंग्लिश मुविंची चॅनेल यामुळे सध्या तरी टीव्ही बघावासा वाटतो.झी 24 तास आणि ए.बी.पी माझा वरचे शेतीविषयक कार्यक्रम सुद्धा बघतो...झी 24 तास वर सकाळी 11:30 वाजता सुवर्ण कोकण म्हणून एक कार्यक्रम लागतो त्यात कोकणात विविध प्रकारची शेती व व्यवसाय करून कशा प्रकारे पैसे मिळवता येतो ते दाखवतात.तुम्ही म्हणता तसे युट्युब वर भाग येतात पण त्याला वेळ लागतो. कधी कधी तर येतच नाहीत.डिस्कव्हरी वरचे Man Vs Wild , Dual Survival , हिस्टरी टीव्ही 18 वरचे Ancient Aliens , Pawn Stars , Baggage Battles , Hunting Hitler अशा एपिसोड्स मुळे सध्या तरी मी टीव्ही सहन करू शकतो ;)

त्यांची वेब साईट पण आहे.

http://suvarnakonkan.com

मित्रहो's picture

27 Jul 2016 - 5:21 pm | मित्रहो

गेली आठ वर्षे आमच्याकडे टिव्ही आहे पण केबल किंवा डीश वगेरे नाही असे आहे. मुल त्यांचे कार्टून यु ट्युब वर बघतात. मी क्रिकेटच्या मॅचेस ऑनलाइन बघतो. काही मिनिटे उशीरा असते पण ठीक आहे. आधीची यु ट्युब अॅप टिव्हीवर चालायची नवीन अॅप चालत नाही त्यामुळे लॅपटॉप जोडावा लागतो. बायको मालिका तिच्या फावल्या वेळात बघते. सर्वांना सारे बघता येते. मोबाइल, लॅपटॉप पासवर्ड असल्याने मुलांनी केंव्हा बघायचे ते ठरविता येते. तरीही समस्या येतात, कधी गोंधळ होतो, भांडणे होतात. परत केबल सुरु करायचा अजिबात विचार नाही. मराठी चित्रपटांच्या बाबतीत मात्र समस्या होते. बरेच चांगले मराठी चित्रपट ओरीजनल लिगल स्वरुपात ऑनलाइन उपलब्ध नाहीत.

चौकटराजा's picture

27 Jul 2016 - 6:01 pm | चौकटराजा

तुमच्या टी व्ही चा आवाज जरा कमी करा व प्रशन सलग विचारा......
मला संपविण्याचे हे राजकीय षडयंत्र आहे.....
अहो आता मला बोलू द्याना तुमच्या वेळी मी गप्प होतो ना,,,,?
रॉबर्ट माल आनेकी खबर किसने दी पुलीसको..... ?
मी सगळे सेंद्रीय खत वापरले .. म्हणताना यकरी दोन क्विण्टल पीक गीउन आहे.
याड लागलं याड लागलं
ख्यान आय खिस यू डालिंग....
फार्मा सेक्टरमे पिछले चार महिनेमे गिरावट लगातार देखी है......
अ‍ॅन्ड दिस इज ऑल अबोउट क्यापटन कूल..... ही इज द बेस्ट फिनिशर.....
थट्टी फोट्टी अ‍ॅडवानटेज विनस ...

मृत्युन्जय's picture

27 Jul 2016 - 6:18 pm | मृत्युन्जय

गेले कित्येक दिवस टीव्ही बघितलेला नाही. जेव्हा बघतोच तेव्हा सर्वात जास्त रद्दी चित्रपट बघत बसतो असे बायकोचे मत आहे :)

सुधांशुनूलकर's picture

29 Jul 2016 - 4:02 pm | सुधांशुनूलकर

तुमचं-आमचं सगळं अगदी सेम असतं,
म्हणूनच तर तुमचं-आमचं झक्क जमतं!

मुक्त विहारि's picture

28 Jul 2016 - 12:46 pm | मुक्त विहारि

+ १

टीवी वरचे काही कार्यक्रम छानच असतात फक्त live बघू नये. मी नेहमी रेकॉर्ड करून नंतर जाहिराती फॉर्वर्ड करून कार्यक्रम पाहते. आपल्या सोइीने मग टीवी पाहता येतो. एका तासात तीन टीवी शोज उरकता येतात. मी ये है मोहब्बातें, तारक मेहेता आणि बडी दूर से आए है पाहते.

माझ्याकडे टीव्ही नाही. एक घेतला त्याचा मॉनिटर करून ऑफिसात ठेवला. घ्यावा अशी तमन्ना पण नाहीये.

टवाळ कार्टा's picture

27 Jul 2016 - 7:19 pm | टवाळ कार्टा

भाटीयांकडे आहे

अभ्या..'s picture

27 Jul 2016 - 9:41 pm | अभ्या..

तो पॉन्डस डबा चालेल. ;)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

27 Jul 2016 - 7:31 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मी काहीही बघु शकते. समोर चालु असेल ते.नसले तरी फरक पड्त नाही. हे सर्व उपकरणाना लागु होते.मला काहीही चालते.समोरचा ज्या विषयावर बोलू शकतो त्यावर बोलायला मला काही अडचण नाही.सो सिरियल प्रेमींशी बोलण्यापुरते जुजबी ज्ञान आहे.

साधा मुलगा's picture

27 Jul 2016 - 9:39 pm | साधा मुलगा

आमच्या कडे tata sky आहे, त्यावर आम्ही a la carte वापरून फक्त मराठी आणि इंग्लिश चॅनल पाहतो.
८ वाजता everybody loves raymond मग friends किव्वा two & half men वगैरे मग आई मराठी लावते नन्तर रात्री उशिरा वेळ मिळाला तर जिम्मी किंमेल बघतो. हिंदी वाहिन्या आणि हिंदी वृत्तवाहिन्या घेतलेल्या नाहीत आणि चुकून सुद्धा बघत नाही. मराठी वृत्तवाहिन्या जर काही महत्वाची बातमी असेल किव्वा स्पोर्ट्स विषयी असेल तर बघतो.
हल्ली आईने चॅनल बदलू दिला तर कबड्डी पण चालू असते मध्ये मध्ये.
teenager होतो तेव्हा M , V किव्वा तत्सम गाणी वाले चॅनल बघायचो. तेव्हा roadie आत्मीयतेने पाहायचो आता तिथे पोरापोरींच्या लफद्याची मालिका असतात. अरे कुठे नेवून ठेवला M tv माझा!
बाकी GOT चा एपिसोड सोमवारी झकत online बघावा लागतो नाहीतर व्हात्साप्प आणि फेसबुक वर स्पोईलर येतात.
आई वडील भरपूर मराठी मालिका बघतात.

खटपट्या's picture

27 Jul 2016 - 10:21 pm | खटपट्या

आमच्याकडे दोन टीव्ही आहेत. एकावार सकाळपासून संध्याकाळ पर्यंत बातम्या (वडील होते तेव्हा) आणि दुसर्‍यावर सतत पोगो आणि तत्सम. त्यामुळे....:(

सुंड्या's picture

27 Jul 2016 - 10:23 pm | सुंड्या

माझेही १०-१२ वर्षांपासून 'मूर्ख डब्बा' पाहणे बंद आहे. मुख्य कारणे- प्रत्येक कार्यक्रमात ते रसभंग करणारे ब्रेक्स आणि कमी होत जाणारी कार्यक्रमांची गुणवत्ता, तो 'सेटोप बॉक्स' प्रकार त्याचे वेगवेगळे रिचार्ज आणि टीवी-सेटोप बॉक्सच्या रिमोटस मधली सर्कस. वाढत्या लॅपटॉप-नेटच्या वापराने टीवी नावाची वस्तू अडगळीत. चुकून एखद्यावेळेस टीवी बघण्याची वेळ ओढावते तेव्हा फक्त- Nat.Geo., डिस्कव्हरी, डिस्कव्हरी सायन्स, हिस्टरी टीव्ही 18 इत्यादी सारख्या वाहिन्या बघण्याचा प्रयत्न करतो. बाकी इंडिअन मूर्ख डब्ब्या बद्दल माझे मत .

सत्याचे प्रयोग's picture

27 Jul 2016 - 10:53 pm | सत्याचे प्रयोग

आम्ही दूरदर्शनवर काय पाहतो हे आसपास कोण आहे त्यावर अवलंबून असते .
म्हणजे एकटा असेल तर आस्था, धर्मात्मा इ. एकटा असल्याने धार्मिक कार्यक्रम विनाअडथळा ऐकता पाहता येतात. तर सौ. घरात असल्यावर सास बहू तर बच्चे कंपनी असल्यावर कार्टून. मला दूरदर्शनच्या बाबतीत एकांत मिळतच नाही त्यामुळे आस्था धर्मात्मा वाट्याला येत नाहीत
बादवे दूरदर्शनचे कार्यक्रम नेटवर नंतर पाहणे म्हणजे आजचे वर्तमानपत्र उद्या वाचण्यासारखे वाटते.

कपिलमुनी's picture

27 Jul 2016 - 10:56 pm | कपिलमुनी

Nowadays Not watching TV is coool thing yaa

साहेब..'s picture

28 Jul 2016 - 4:33 pm | साहेब..

+1

संदीप डांगे's picture

27 Jul 2016 - 11:37 pm | संदीप डांगे

पाहुणे आले तरी टीवीला चिकटून बसणारे बघितले की वाटतं 'दे आर हॅन्ग्ड् टिल डेथ'

माझ्याकडेही टी.व्ही. नाही. नेटफ्लिक्स, हुलु इत्यादी काही नाही. त्यामुळे पाहुणे आल्यावर आम्ही त्यांच्याशी गप्पाच मारतो. :)

अधूनमधून वेळ असला तर क्वचित यू-ट्युबवर काहीतरी पाहण्यात येते. तुम्ही लिहिलं आहे तसंच, टी.व्ही. न पाहिल्यामुळे काही अडलेलं नाहिये.

साती's picture

28 Jul 2016 - 7:49 am | साती

मी पण कित्येक वर्षांत टिव्ही फारसा पाहिलेला नाही.
सासरी किंवा माहेरी गेल्यास येता जाता मालिका दिसतात्,तेवढ्याच.
तुम्ही लिहिल्याप्रमाणे उत्तमोत्तम माहितीपर डिव्हीडीज, मुलांसाठी चांगले कार्टून्स यांच्या सिडीज आणून ठेवल्यात आणि कधीतरी मुलांना तासभर ते लावून देते.
मुलांच्या उन्हाळी सुट्टीत मात्र टाटास्काय सर्विस चालू करून घेऊन किड्स पॅक घालते. त्यावेळी आमच्या गावातल्या टळटळीत उन्हात मुलांनी फिरण्यापेक्षा टिव्ही पाहिलेला बरा.
अश्या टिव्ही चालू असण्याच्या काही महिन्यांत नवरा केव्हातरी रात्रीच्या न्यूज बघतो आणि मी कुकरी शोज.
मला नापतोल सारखे वेगवेगळे प्रॉडक्टस विकणारे कार्यक्रम त्यातल्या विचित्र बडबडीमुळे फार मजेशीर वाटतात.

त्यामुळे एकही वस्तू विकत घेत नसले तरी हे प्रमोशनल कार्यक्रम क्वचित बघते.

ब़जरबट्टू's picture

28 Jul 2016 - 10:35 am | ब़जरबट्टू

दिवसभर कामाच्या वेळात मिपाकर पडीक असलेल्या टवाळांकरून टीव्हीमुळे वेळ वाया जातो हे वाचून अंमळ मजा आली..
बाकी असले धागे काढून व त्याला प्रतिसाद देऊन तुम्ही काय करता ?

देशपांडे विनायक's picture

28 Jul 2016 - 11:30 am | देशपांडे विनायक

खरा जुना प्रश्ण आहे हा

@ म्हणूनच मला हा एक प्रश्र्न पडला आहे की, आलेल्या पाहूण्यांना वेळ न देण्या इतपत तुम्ही टी.व्ही. वर नक्की काय कार्यक्रम बघता?
मला वाटत तुम्हाला पाहुण्यांना वेळ न देण्याबद्दल बोलावयाचे आहे
टी व्ही पाहणारे बहुमतात आहेत आणि पाहुण्यांना वेळ न देणारेही
त्यामुळे तुमच खरं दुखणं '' पाहुण्यांना वेळ न देणारे लोक '' याचा राग तुम्ही टी व्ही वर
काढत आहात असं माझ मत झाले आहे
@ समान शीले समान व्यसने मैत्री होतेच होते, असा आमचा स्वानुभव आहे.
माणूस संगतीला आणि पंगतीला असला म्हणजे समजतो असाही अनुभव तुम्ही
घेतला असेलच
तुम्हाला संगतीचे आणि पंगतीचे कसे निमंत्रण दिले म्हणजे स्विकारता ?

व्यनि केलात तरी पण चालते.

नीळा's picture

28 Jul 2016 - 12:34 pm | नीळा

मी फक्त एकच शो पहातो
तारक मेहता
अजीबात डोक्याला ताप नाय
कधी कधी सेलेब्रेटीज येऊन स्वतःचीच जाहीरात करून काव आणतात पण मजा येते
ईथे कोणी पाहात नाहीका ऊल्टाचष्मा?

पद्मावति's picture

28 Jul 2016 - 3:52 pm | पद्मावति

ईथे कोणी पाहात नाहीका ऊल्टाचष्मा?

..मैं हूं ना !!!
मलाही खूप आवडतं. फील गुड सीरियल आहे. डोक्याला ताप नाही. त्या सर्व गोकुलधाम वासियांची आपसातली केमिस्ट्री मस्तं आहे.

इशा१२३'s picture

28 Jul 2016 - 5:17 pm | इशा१२३

माझ्याकडेही आहेत ना तारकमेहताला प्रेक्षक.दोन्ही मूल आवडीने बघतात वेळ मिळाला की.बाकी मला आणि नवर्याला ट्रेव्हल एक्स पी पहायला आवडते.बाकी बघायला फार काहि वेळ नसतो.

गणामास्तर's picture

28 Jul 2016 - 12:45 pm | गणामास्तर

आम्ही तर लै काय काय बघतो. झाडून सगळ्या क्रिकेट च्या मॅच, झालचं तर विम्बल्डन आणि कधी कधी फुटबॉल चे सामने. सध्या AXN वर शेरलॉक चा रिपीट टेलिकास्ट चालू आहे तो पण बघतोय. मधेच प्रिसन ब्रेक पण बघतो.
एपिक चॅनल वरचे 'राजा,रसोई और अन्य कहानियाँ', देवदत्त पटनायकांचे 'देवलोक' आणि इतर काही
कार्यक्रम सुद्धा बघतो.
travel xp चॅनल वरती strictly street म्हणून एक कार्यक्रम लागतो त्यात भारतातील वेगवेगळया ठिकाणचे खायचे भारी भारी पदार्थ दाखवतात ते बघतो. टोरंट वरून उतरवलेल्या मालिका, सिनेमे सुद्धा आम्ही पेन ड्राइव्ह मध्ये टाकून टीव्ही वरचं पाहतो. अजून जमेल तशी भर घालतो काय काय पाहतो याची.
आणि हो , हे सगळं आम्ही घरात कुणी पाहुणे आलेले असताना करत नाही.

संदीप डांगे's picture

28 Jul 2016 - 6:24 pm | संदीप डांगे

+१

श्रीरंगपंत's picture

28 Jul 2016 - 3:46 pm | श्रीरंगपंत

टिव्हीवर दिसणारे चांगले कार्यक्रम हे युट्युब वर अथवा दुसऱ्या ठिकाणी पण दिसतात त्यामुळे टिव्हीची गरज भासली नाही. टिव्ही नसल्यामुळे घरी आलेल्या नातेवाइकांबरोबर अथवा पाहुण्यांबरोबर यथेच्छ गप्पा मारता येतात आणि घरच्यांबरोबर दिवस / संध्याकाळ अगदी मजेत घालवता येते हा सगळ्यात मोठा फायदा. तसेच घरी असताना वाचन अथवा घराच्या इतर बारीक सारीक कामांना व्यवस्थित वेळ देता येतो.

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2016 - 4:56 pm | टवाळ कार्टा

बिंगोबा????

ज्ञानव's picture

28 Jul 2016 - 4:16 pm | ज्ञानव

आमच्याकडे टीव्हीच नाही. पण यु ट्यूबवर आणि इतर काही संकेत स्थळांवर दर्जेदार इंग्रजी सिनेमा, लघुपट दर शुक्रवारी पाहतो. चैन आहे एकदम. टीव्ही नसण्याचे अनेक फायदे होतात.

दुर्गविहारी's picture

28 Jul 2016 - 5:03 pm | दुर्गविहारी

माझ्याकडे गेली सव्वा वर्षे टि. व्ही. नाही. त्यामुळे काहीहि अड्ले नाही. उलट अनेक उत्तम चित्रपट बघुन झाले. वाचायची राहिलेली बरीच पुस्तके वाचुन झाली. मुख्य म्ह्णजे मिपावर मनसोक्त वेळ घालवता आला. आता मात्र येत्या १५ अ‍ॅगस्टला एल.ई.डि घेणार आहे.

झी मराठी वरच्या मालिकांमुळे टीव्ही बघण्याचा कॉन्फिडन्स निघून गेलाय. आणि त्यात रविवारी हे एक तासाचा विशेष भाग दाखवून अजूनच खच्चीकरण करतात.

पैसा's picture

28 Jul 2016 - 6:06 pm | पैसा

काय इलाज नाय. जाहिरातींच्या अधेमधे प्रोग्राम्स असतात. कोणतीही शिर्यल तुम्ही दोन महिने गॅपनंतर पाहिली तरी फरक पडत नाही. मला भरपूर वेळ क्वचित मिळतो तेव्हा किंवा आई आली की मी झी मराठीच्या शिर्यली बघते. नंतर मायबोलीवर जाऊन त्यांची पिसे काढायला लै मज्जा येते.

आमच्याकडे कोणी आले तर फक्त क्रिकेट किंवा फूटबॉल मॅच असेल तर टीव्ही चालू रहातो. एरवी नाही. आपण कोणाकडे गेलो आणि ते लोक टीव्ही बघत बसले तर वाईट वाटून न घेता मी मोबाईलव्रून मिपा किंवा व्हॉट्स अ‍ॅप वर टाईमपास करते. दुसरे काय करणार!

मुक्त विहारि's picture

28 Jul 2016 - 6:34 pm | मुक्त विहारि

....वाईट वाटून न घेता मी मोबाईलव्रून मिपा किंवा व्हॉट्स अ‍ॅप वर टाईमपास करते."

ह्या आयडिया बद्दल धन्यवाद.

कपिलमुनी's picture

28 Jul 2016 - 6:12 pm | कपिलमुनी

स्मार्ट टीव्ही ( नेट कनेशन सहीत) तर पूर्ण लांबीचे सीरीयल , लाइव्ह बातम्या कुठे पहाता येतात?

सिरियल आणि बातम्या मी अजिबात पहात नसल्याने आणि पुढील आयुष्यात पण ह्यांच्या नादी न लागायचे ठरवल्याने, आपला पास.

१९४७चा काश्मीर प्रश्न अद्यापही पहिल्या पानावर स्थान मिळवून आहे आणि एकमेकांची तोंडॅ दाखवत असलेल्या मालिकांमधीअ तेच तेच चेहरे बघण्यापेक्षा आणि त्यातच आपला वेळ घालवण्यापेक्षा, मित्रांच्या बरोबर गप्पांचा फड रंगवणे, मला जास्त आवडते.

शिवाजी नाठे's picture

28 Jul 2016 - 7:08 pm | शिवाजी नाठे

टी.व्ही. व केबल दोन्ही नसलेले, कल्याण मध्ये आमचे एकमेव घर. घरी येणाऱ्या सर्वना प्रश्न पडतो टि .वी . कुठे आहे ?

बर्‍याच लोकांकडे टिव्ही नाही हे बघुन आपण फार काही वेगळे नाही ही सुखद जाणिव झाली.

मुवि तुम्ही म्हणता तसं सिरियल आणि बातम्या आम्ही पण अजिबात पहात नाही. आणि एकंदरीत असं लक्षात आलयं कि त्यामुळे आपलं काही आडतं नाही. गेले दोन महिने नेटफ्लिक्सपण बंद करुन टाकल्यामुळे अजुनच जस्त वेळ हातात मिळाला आहे. आजकाल रोज निवांत पुस्तकं वाचायला भर्पुर वेळ मिळतो.

पोरीला पण टिव्ही किंवा कंप्युटरवर काही बघायची सवय नसल्यामुळे मुलांचा स्क्रिन टाईम कसा कमी करावा वगैरे गोष्टींवर चर्चा आणि चिंतन करावे लागत नाही हा पण एक फायदा आहे. =)

मनिमौ's picture

29 Jul 2016 - 6:53 am | मनिमौ

बर्याच गोष्टी बघते.त्यात मुख्य कार्यक्रम म्हणजे travel xp चॅनल.राॅकी आणी मयुर चा शो. बाकी मुलीमुळे छोटा भीम चालु असताना. पण रोजचा टीव्ही पहायचा वेळ एक तासापेक्षा जास्त नाही. सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे म्युझिक चॅनल लाऊन गाण्यांचा तालावर कामे करणे.

संत घोडेकर's picture

29 Jul 2016 - 8:45 am | संत घोडेकर

टीव्ही चे व्यसन आम्हाला नसले तरी घरातील जेष्ठ नागरिकांचे मालिका बघितल्यावाचून पान हालत नाही. तरी डिस्कवरी सारखे इतर माहितीप्रद कार्यक्रम आवर्जून पाहिले जातात.

तिमा's picture

29 Jul 2016 - 10:19 am | तिमा

टीव्ही बघताना मी कायम म्यूट करुनच बघतो. त्यामुळे खालील फायदे होतात.
१. बातम्या वाचून समजतात.
२. चर्चांमधले अँकर अंगावर येऊ शकत नाहीत.
३. इंग्रजी चित्रपटांत सब टायटल्स असल्यामुळे ते आवाजाशिवायच समजतात.
४. सिरियल्स डम्ब असल्यामुळे नुसते ओव्हरअ‍ॅक्टिंग बघूनच स्टोरी समजते, बॅकग्राऊंड म्युझिकचा त्रास होत नाही.
५. म्यूट अवस्थेत जाहिरातीही एनजॉय करता येतात.
६. घरांतील इतरांना त्रास होत नाही.
७. पाहुणे आले तर त्याक्षणी टीव्ही बंद करता येतो.
अपवादः फक्त जुनी गाणी दिसली तरच हळु आवाजात ऐकतो.

८० च्या दशकातली गाणी म्युट करुन बघण्यातली मजा वेगळीच आहे. काही गाणी बघताना तर ह.ह.पु.वा.

गुंड्या's picture

29 Jul 2016 - 11:29 am | गुंड्या

लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्ही ही चॅनल्स आवर्जून बघतो. विशेषकरून राज्यसभेतल्या चर्चा.

अनिरुद्ध.वैद्य's picture

29 Jul 2016 - 1:49 pm | अनिरुद्ध.वैद्य

टीव्ही बंदच असतो. आम्ही उगाच व्हिडीयोकॉन डीटुएचवाल्यांना पोसतोय असे बर्‍याचदा वाटत राहते. पण क्वचीत वीकेंण्डी वापरण्यात येतो.

कपिलमुनी's picture

29 Jul 2016 - 3:25 pm | कपिलमुनी

टी.व्ही. पहाणे आणि वाहिन्यावरील कार्यक्रम पहाणे यात बर्‍याच जणांचा घोळ झाला आहे.
मी टी.व्ही. पहातो. लॅपटॉप किंवा मोबाईलच्या छोट्या स्क्रीनवर चित्रपट , खेळ , मालिका यांचा आनंद घेता येत नाही.
३२" ,४०" किंवा मोठ्या टीव्हीवर गेम ऑफ थ्रोन्स सारखी मालिका किंवा अवतार(James Cameron) सरखे चित्रपट पाहणे हा आनंददायक अनुभव असतो . मोठ्या स्क्रीन वर बरेच डिटेलिंग दिसतात. ग्राफिक्स असलेले मालिका, चित्रपट बघताना मजा येते. आजकालच्या स्मार्ट टीव्हीमुळे यूट्यूब चे व्हिडीओ सुद्धा टीव्हीवर बघु शकतो. सहकुटूंब एखादी डॉक्युमेंटरी पहाता येता , मित्र, भाउ- बहिणी एकत्र जमून मॅच बघत त्यावर चर्चा करता येते , लहान मुले असतील तर ई लर्निंगचे व्हिडीओ लवून हसत खेळत अभ्यास करता येतो .
घरी कोणी वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांच्या आवडीची जुनी गाणी , चित्रपट पहाता येतात.

अर्थात शाळेच्या निबंधाप्रमाणे टीव्ही शाप कि वरदान अशा दोन्ही बाजू लिहिता येतील.
आलेल्या पाहूण्यांना वेळ न देण , जेवत टीव्ही पहाणे , गप्पा सोडून फक्त टीव्हीच पहाणे , टीव्हीमधल्या मालिकांवर चर्चा करत रहाणे हे वर्ज्य आहे , पण हे टाळूनसुद्धा टीव्हीचा भरपूर आनंद घेता येतो.

बाकी कशावाचून कुणाचा काही अडत नाही ,हजारो लोकांचा पुस्तकावाचून अडत नाही , लाखो लोकांचा इंटरनेट वाचून अडलेले नाही. ज्यचा त्याचा चॉईस

संदीप डांगे's picture

29 Jul 2016 - 3:47 pm | संदीप डांगे

मस्त प्रतिसाद!! आवडला!!!

नाखु's picture

29 Jul 2016 - 4:00 pm | नाखु

बाकी कशावाचून कुणाचा काही अडत नाही ,हजारो लोकांचा पुस्तकावाचून अडत नाही , लाखो लोकांचा इंटरनेट वाचून अडलेले नाही. ज्यचा त्याचा चॉईस

शाळेतल्या सारखेच नांव राखलेस हो,असाच लिहायचा निबंधातही असे आम्चे "हे" सांगत होते काल गुरुजी भावजींना..

पुन्हा मिसामा
"

वा वा कपिलमुनी...अगदी मश्त लिहिलंयत!!
एकच नंबर...!!

(ते पहिलं वाक्य जरा बौन्सर गेलं खरं... )

दिवसातला बराचसा वेळ कामात जात असल्यामुळे टि.व्ही वरील कार्यक्रम पाहायला मिळत नाहीत, अर्थात त्यावाचून काही अडत नाही हे ही तितकेच खरे.

तेजस आठवले's picture

1 Aug 2016 - 3:56 pm | तेजस आठवले

जेमी ऑलिव्हर नामक माणसाचे जेमी'स 30 मिनिट मिल्स आणि जेमी At होम हे शो बघायला आवडतात. तो सतत काम करत असतो आणि सतत बडबडत असतो. 30 मिनिट्स मिल्स मध्ये तो ज्या वेगाने फटाफट पदार्थ बनवतो ते बघून मस्त वाटते आणि अगदी ते ही सलाड डेझर्ट सकट. बऱ्याचदा पापड भाजून तोंडी लावायला असतात हे पण भारी वाटते. त्याची बडबड प्रचंड आवडते.
रॉकी अँड मयूर चा एक शो लागतो, तो पण चांगला वाटतो.