प्रिय मिपाकरांनो,
गेली १०-१२ वर्षे मी अजिबात टी.व्ही. वरील कार्यक्रम बघीतलेला नाही आणि ह्यामुळे माझे काही अडलेले पण नाही.
पुर्वी टी.व्ही. बघायचो ते नॅ.जि. आणि डिस्कवरी बघण्यासाठी, पण आजकाल यु-ट्युब वर नॅ.जि अणि डिस्कवरीचे बरेच भाग उपलब्ध आहेत, त्यामुळे गेली २ वर्षे आमच्याकडे टी.व्ही. बंदच आहे.
केबल नसणारे आणि टी.व्ही. असून पण तो चालू नसलेले, डोंबोलीत आमचे एकमेव घर असावे.
पण,
कधी कुणाकडे जायचा प्रसंग आला तर, त्या घरातील व्यक्ती बराच वेळ टी.व्ही. बघत असलेल्या दिसतात.
साधारण पणे अशा घरी, मी माझे काम झाले की लगेच निघतो.
कुणाकडे रात्र भर रहायचा प्रश्र्न आला की, एखादी खोली बघून, जवळ असलेले पुस्तक वाचत बसतो.
मध्यंतरी, म्हणजे ६-७ वर्षांपुर्वी, माझ्या सख्ख्या भावाकडे गेलो होतो,खूप दिवसांनी त्याच्याकडे गेलो असल्याने एक-दोन दिवस रहायचा बेत होता.संध्याकाळी ६ च्या सुमारास त्याच्याकडे गेलो.
चहा आणि अंघोळ होई पर्यंत, ७ वाजले.
आता म्हटले मस्त गप्पा मारू या.
तर तो म्हणाला थांब, आता ही फलाणा-ढेकणा मालिका सुरु आहे, ती बघतो, मग बोलू.
मालिका बघता-बघता जाहीराती लागल्या की त्या वेळांत तो इतर ठिकाणी काय-काय सुरु आहे, ते पण चाळणे चालू होतेच.
त्याचे हे खेळ चालू असतांना, माझे २ पेपर वाचून झाले आणि एक मासिक पण चाळून झाले.
साडे सात वाजता, त्याच्या बायकोने टी.व्ही.चा रिमोट आपल्या ताब्यात घेतला आणि मी माझ्या साडवाला फोन केला.त्याने घरी यायचे आमंत्रण दिले आणि मी भावाकडे जेवून त्याच्याकडे जायचे ठरवले.
साडे आठ पर्यंत जेवण झाले ते पण टी.व्ही. बघता बघता.
अध्ये-मध्ये भावाशी जुजबी बोलणे चालू होतेच.
नऊ वाजता साडू घ्यायला आला आणि मी सडवाकडे रहायला गेलो.
रात्री साडे नऊला आमची जी गप्पांची मैफिल (अपेय पान विरहित) जमली ती पहाटे पहाटे ४-५ च्या सुमारास संपली.मध्येच एकदा गाडीवर भुर्जी-पाव पण खाऊन झाला.
हे अनुभव बर्याच ठिकाणी आले, आमच्या साडू सारखी माणसे अपवादात्मक.
आता कुणाकडे रहायला जायचे असले की, आधी मी विचारतो,"तुम्ही मालिका बघता का?"
उत्तर होकारार्थी आले की, आम्ही सरळ हॉटेल शोधायला लागतो.
एखादी रूम बूक करून तिथेच नातेवाइकांना बोलावतो.निदान त्या हॉटेलमधील टी.व्ही. तरी आपल्याला बंद करता येतो.
व्यत्यय न येता, कामाची बोलणी होतात आणि त्यांना मालिका बघायची घाई असल्याने ते लगेच निघतात पण.
पुर्वी मी टी.व्ही. वर क्रिकेटचे सामने बघत असे.
मी मस्त पैकी पुस्तक वाचता-वाचता क्रिकेट बघत असायचो. एखादी विकेट पडते, मी पुस्तकातून डो़के काढतो, तर लगेच जाहीरात सुरु.हायलाईट दाखवे पर्यंत उगाच ३-४ जाहीराती बघायला लागायच्या.
मालिकेत तर दर २-३ मिनिटांनी एकमेकांची तोंडेच दाखवतात.
बातम्यां मध्ये मुळ बातमी सोडून फाफट्पसाराच जास्त असतो आणि त्या बातम्या दुसर्या दिवशी पेपर मध्ये वाचता येतातच की.
सिनेमे न बघता आपण जाहीराती बघता-बघता सिनेमा हुडकत असतो.
म्हणूनच मला हा एक प्रश्र्न पडला आहे की, आलेल्या पाहूण्यांना वेळ न देण्या इतपत तुम्ही टी.व्ही. वर नक्की काय कार्यक्रम बघता?
वर्गीकरण
वाचन संख्या
17377
प्रतिक्रिया
92
मिसळपाव
प्रतिक्रिया
हो। , असे होते खरे
इतर टेलीविजन वर काय बघतात ते
तुमचा नक्की काय फायदा होणारे?
In reply to इतर टेलीविजन वर काय बघतात ते by स्पा
तुम्ही पोकेमोन खेळता का असे
In reply to तुमचा नक्की काय फायदा होणारे? by मुक्त विहारि
समान मित्र शोध मोहिमेला शुभेच्छा
In reply to तुम्ही पोकेमोन खेळता का असे by स्पा
मिपावर येवुन हे असे
In reply to समान मित्र शोध मोहिमेला शुभेच्छा by मुक्त विहारि
अहो....
In reply to मिपावर येवुन हे असे by प्रसाद गोडबोले
मिपा म्हणजे सार्वजनीक नळ?? =)
In reply to अहो.... by मुक्त विहारि
मिपा म्हणजे सार्वजनीक नळ??
In reply to मिपा म्हणजे सार्वजनीक नळ?? =) by टवाळ कार्टा
सार्वजनीक ??
In reply to मिपा म्हणजे सार्वजनीक नळ?? =) by टवाळ कार्टा
शिव शिव शिव
In reply to सार्वजनीक ?? by कपिलमुनी
आज नळावर भजनाचं पाणी वाहतंय
In reply to सार्वजनीक ?? by कपिलमुनी
मी पूर्वी टी व्ही वर बरेच
अनुमोदन..
In reply to मी पूर्वी टी व्ही वर बरेच by आनन्दा
त्या रटाळ डायलोग्समधून कधीकधी एखादा चांगला पंच मिळून जातो....
In reply to मी पूर्वी टी व्ही वर बरेच by आनन्दा
एपिक चॅनेल
टीव्ही बंद
व्हॉट्सएप नसल्याने खूप वेळ वाचतो असे निरीक्षण नोंदवतो.
In reply to टीव्ही बंद by समीरसूर
कधी कधी येणारेच टीव्ही मध्ये इतके गुंतून पडतात,,,,
In reply to टीव्ही बंद by समीरसूर
मी फ्रेंडस सुरू केलय परत
two and a half men नाही????
In reply to मी फ्रेंडस सुरू केलय परत by रातराणी
अर्र्र ते राहून गेलं लिहायचं.
In reply to two and a half men नाही???? by टवाळ कार्टा
टक्या, coupling too...!
In reply to मी फ्रेंडस सुरू केलय परत by रातराणी
हे नाही पाहिलं. बीबीसीवरचचं द
In reply to टक्या, coupling too...! by वपाडाव
अर्रे coupling तर भन्नाट =))
In reply to टक्या, coupling too...! by वपाडाव
rules of engagement??
In reply to मी फ्रेंडस सुरू केलय परत by रातराणी
रातराणी,
In reply to मी फ्रेंडस सुरू केलय परत by रातराणी
डीडी फ्री डिश चॅनेल्स लिस्ट
मस्तच..तुमच्या सारखी माणसं
आम्ही टीव्ही वर साचलेली धूळ बघतो...पण साफ कोणी करायची
Only "times now"
मी टिव्हीवर माझा कॉम्प्यूटर
मी कॉम्प्युटर वर टिव्ही बघतो.
In reply to मी टिव्हीवर माझा कॉम्प्यूटर by सतिश गावडे
मी स्मार्ट एलईडीवर कॉम्प्यूटर
In reply to मी कॉम्प्युटर वर टिव्ही बघतो. by सूड
मी झी मराठीच्या शिर्यलांचा
रात्रीस खेळ चाले बघता काय..?
In reply to मी झी मराठीच्या शिर्यलांचा by आदूबाळ
कसला खेळ चाल्तो त्यात अजून
In reply to रात्रीस खेळ चाले बघता काय..? by असंका
बरेच प्रयत्न करूनही बूथ ना
In reply to कसला खेळ चाल्तो त्यात अजून by सूड
मध्ये फीलर सारखे एपिसोड आले
In reply to बरेच प्रयत्न करूनही बूथ ना by आदूबाळ
NO...
या विषयावर आधीच शाळेपासून निबंध लिहून झालेत
सुवर्ण कोकण चे भाग यु-ट्युब वर आहेत...शिवाय...
आठ वर्षे
मी काय बघतो... ?
गेले कित्येक दिवस टीव्ही
म्हणूनच तर..
म्हणूनच तर तुमचं-आमचं झक्क जमतं!
In reply to म्हणूनच तर.. by सुधांशुनूलकर
टीवी वरचे काही कार्यक्रम छानच
माझ्याकडे टीव्ही नाही. एक
भाटीयांकडे आहे
In reply to माझ्याकडे टीव्ही नाही. एक by अभ्या..
तो पॉन्डस डबा चालेल. ;)
In reply to भाटीयांकडे आहे by टवाळ कार्टा
मी काहीही बघु शकते. समोर चालु
आमच्या कडे tata sky आहे,
आमच्याकडे दोन टीव्ही आहेत.
TV
आम्ही दूरदर्शनवर काय पाहतो
Ohh
+1
In reply to Ohh by कपिलमुनी
पाहुणे आले तरी टीवीला चिकटून
माझ्याकडेही टी.व्ही. नाही.
मी पण!
महालोल धागा..
खरा जुना प्रश्ण आहे हा
तुम्हाला संगतीचे आणि पंगतीचे कसे निमंत्रण दिले म्हणजे स्विकारता?
In reply to खरा जुना प्रश्ण आहे हा by देशपांडे विनायक
मी फक्त एकच शो पहातो
ईथे कोणी पाहात नाहीका
In reply to मी फक्त एकच शो पहातो by नीळा
माझ्याकडेही आहेत ना
In reply to मी फक्त एकच शो पहातो by नीळा
आम्ही तर लै काय काय बघतो.
+१
In reply to आम्ही तर लै काय काय बघतो. by गणामास्तर
टिव्ही नाही
बिंगोबा????
In reply to टिव्ही नाही by श्रीरंगपंत
टीव्हीच नाही.
मिपावर मनसोक्त वेळ घालवता आला.
झी मराठी वरच्या मालिकांमुळे
काय इलाज नाय
ते लोक टीव्ही बघत बसले तर.....
In reply to काय इलाज नाय by पैसा
टीव्ही
पूर्ण लांबीचे सीरीयल , लाइव्ह बातम्या कुठे पहाता येतात?
In reply to टीव्ही by कपिलमुनी
कल्याण मध्ये आम्ही
बर्याच लोकांकडे टिव्ही नाही
मी टीव्ही वर
टीव्ही चे व्यसन आम्हाला नसले
म्यूट
८० च्या दशकातली गाणी म्युट
In reply to म्यूट by तिमा
लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा
शक्यतो आमच्याकडे
टी.व्ही.
मस्त प्रतिसाद!! आवडला!!!
In reply to टी.व्ही. by कपिलमुनी
मुन्या
In reply to मस्त प्रतिसाद!! आवडला!!! by संदीप डांगे
वा वा कपिलमुनी...अगदी मश्त
In reply to टी.व्ही. by कपिलमुनी
दिवसातला बराचसा वेळ कामात जात
जेमी'स किचन