रिअॅलिटी शो म्हणजे भंपकगिरी
इंडियाज गॉट टॅलेंट आणि सारेगामा या दोन कार्यक्रमांची अंतिम फेरी (त्यांच्या भाषेत ग्रँड फिनाले) पाहण्याचा योग आला. तसेही या कार्यक्रमांचे अनेक भाग मी पाहिले होतेच. पण अंतिम निकालाने घोर निराशा केली.
झालं काय, की
इंडियाज गॉट टॅलेंट शोमध्ये पपया व अंकिता (ही दोघेही गरीब घरातील आहेत हा भाग अलाहिदा) यांचे अप्रतिम सादरीकरण झाले. त्यांच्या स्पर्धेत सुलतान हा बासरीवादक होता. त्याचे बासरीवादनही अप्रतिमच. त्यात दुमत नाही. पण पपया व अंकिता यांच्या नृत्यात इतके स्टंट होते, की ते अभावानेच कोणी केले असतील. बासरीवादन आणि त्यांच्या नृत्यातल्या नजाकत दोन्हीही सुरेखच. पण भारतातलं टॅलेंट शोधायचं तर त्याला काही तरी निकष लावायलाच हवे. बासरीवादनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण सगळीकडेच आहे. पण अंकिता-पपयाच्या नृत्यातला अशी नजाकता कोणाकडून सहजपणे शिकायला मिळणार नाही. ही त्यांनीच विकसित केलेली शैली होती. म्हणजे कोरिओग्राफर त्यांना कोणीही नव्हता. खरं तर या स्पर्धेचे ते विजेते असायला हवे होते, असं मला व्यक्तिशः वाटतं...
दुसरा शो म्हणजे सारेगामा. अर्थातच गायन ही स्पर्धा. सर्वाेत्तम गायकाची ही शोधपरीक्षा. बंगालचा कुशल, उत्तर प्रदेशचा सचिन, पंजाबचा (ठाम नाही) प्रीतज्योत अशा काही निवडक स्पर्धकांमध्ये प्रीतज्योत आणि सचिन यांची गायकी अप्रतिम होती.या दोघांच्या तुलनेत कुशलचा आवाज अजिबात भावला नाही. इथे विजेतेपद प्रीतज्योत आणि सचिन यांच्यापैकीच कोणाला तरी मिळेल, असं वाटत होतं. पण विजेतेपद कुशलला मिळालं आणि धक्काच बसला..
हे निकाल पाहिल्यानंतर माझा तर दोन्ही रिअॅलिटी शोवरील विश्वासच उडाला. अर्थात, माझं वैयक्तिक मत आहे. मी फक्त मत शेअरलं. तुम्हाला काय वाटतं
मला तर बुवा ही भंपकगिरीच वाटते
वर्गीकरण
वाचने
6237
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
कशाला बघता मग?
In reply to कशाला बघता मग? by अजया
चूक झाली... माफ करा
हे शोज पाहत नाही. त्यामुळे
In reply to हे शोज पाहत नाही. त्यामुळे by मोहनराव
चला तुम्ही सुटलात तर...
सहमत
In reply to सहमत by धर्मराजमुटके
हा हा हा
रिअॅलिटी शो???????????
In reply to रिअॅलिटी शो??????????? by मुक्त विहारि
हा हा हा
अच्छा हे अजुन सुरु आहे का
In reply to अच्छा हे अजुन सुरु आहे का by राजाभाउ
हा हा हा
तुम्हाला जो स्पर्धक जिंकायला हवा होता
In reply to तुम्हाला जो स्पर्धक जिंकायला हवा होता by बोका-ए-आझम
सहमत आहे.
In reply to तुम्हाला जो स्पर्धक जिंकायला हवा होता by बोका-ए-आझम
तो जिंकला नाही म्हणून
बघतच नाही
In reply to बघतच नाही by स्वच्छंदी_मनोज
छान
आम्ही
मी काय म्हन्तो.. हे असले
In reply to मी काय म्हन्तो.. हे असले by मोदक
संदर्भ दिल्य़ाबद्दल धन्यवाद...
बिग बॉस मधे फार कचाकचा
In reply to बिग बॉस मधे फार कचाकचा by पद्मावति
बिग बॉस अजिबात न आवडलेला प्रकार...
तद्दन भिकारचोट
In reply to तद्दन भिकारचोट by सुंड्या
अगदी बरोबर
टी.व्ही. नसल्यामुळे रियालिटी
बरं झालं असलं काही बघत नाही.