प्रिय मिपाकरांनो,
गेली १०-१२ वर्षे मी अजिबात टी.व्ही. वरील कार्यक्रम बघीतलेला नाही आणि ह्यामुळे माझे काही अडलेले पण नाही.
पुर्वी टी.व्ही. बघायचो ते नॅ.जि. आणि डिस्कवरी बघण्यासाठी, पण आजकाल यु-ट्युब वर नॅ.जि अणि डिस्कवरीचे बरेच भाग उपलब्ध आहेत, त्यामुळे गेली २ वर्षे आमच्याकडे टी.व्ही. बंदच आहे.
केबल नसणारे आणि टी.व्ही. असून पण तो चालू नसलेले, डोंबोलीत आमचे एकमेव घर असावे.
पण,
कधी कुणाकडे जायचा प्रसंग आला तर, त्या घरातील व्यक्ती बराच वेळ टी.व्ही. बघत असलेल्या दिसतात.
साधारण पणे अशा घरी, मी माझे काम झाले की लगेच निघतो.
कुणाकडे रात्र भर रहायचा प्रश्र्न आला की, एखादी खोली बघून, जवळ असलेले पुस्तक वाचत बसतो.
मध्यंतरी, म्हणजे ६-७ वर्षांपुर्वी, माझ्या सख्ख्या भावाकडे गेलो होतो,खूप दिवसांनी त्याच्याकडे गेलो असल्याने एक-दोन दिवस रहायचा बेत होता.संध्याकाळी ६ च्या सुमारास त्याच्याकडे गेलो.
चहा आणि अंघोळ होई पर्यंत, ७ वाजले.
आता म्हटले मस्त गप्पा मारू या.
तर तो म्हणाला थांब, आता ही फलाणा-ढेकणा मालिका सुरु आहे, ती बघतो, मग बोलू.
मालिका बघता-बघता जाहीराती लागल्या की त्या वेळांत तो इतर ठिकाणी काय-काय सुरु आहे, ते पण चाळणे चालू होतेच.
त्याचे हे खेळ चालू असतांना, माझे २ पेपर वाचून झाले आणि एक मासिक पण चाळून झाले.
साडे सात वाजता, त्याच्या बायकोने टी.व्ही.चा रिमोट आपल्या ताब्यात घेतला आणि मी माझ्या साडवाला फोन केला.त्याने घरी यायचे आमंत्रण दिले आणि मी भावाकडे जेवून त्याच्याकडे जायचे ठरवले.
साडे आठ पर्यंत जेवण झाले ते पण टी.व्ही. बघता बघता.
अध्ये-मध्ये भावाशी जुजबी बोलणे चालू होतेच.
नऊ वाजता साडू घ्यायला आला आणि मी सडवाकडे रहायला गेलो.
रात्री साडे नऊला आमची जी गप्पांची मैफिल (अपेय पान विरहित) जमली ती पहाटे पहाटे ४-५ च्या सुमारास संपली.मध्येच एकदा गाडीवर भुर्जी-पाव पण खाऊन झाला.
हे अनुभव बर्याच ठिकाणी आले, आमच्या साडू सारखी माणसे अपवादात्मक.
आता कुणाकडे रहायला जायचे असले की, आधी मी विचारतो,"तुम्ही मालिका बघता का?"
उत्तर होकारार्थी आले की, आम्ही सरळ हॉटेल शोधायला लागतो.
एखादी रूम बूक करून तिथेच नातेवाइकांना बोलावतो.निदान त्या हॉटेलमधील टी.व्ही. तरी आपल्याला बंद करता येतो.
व्यत्यय न येता, कामाची बोलणी होतात आणि त्यांना मालिका बघायची घाई असल्याने ते लगेच निघतात पण.
पुर्वी मी टी.व्ही. वर क्रिकेटचे सामने बघत असे.
मी मस्त पैकी पुस्तक वाचता-वाचता क्रिकेट बघत असायचो. एखादी विकेट पडते, मी पुस्तकातून डो़के काढतो, तर लगेच जाहीरात सुरु.हायलाईट दाखवे पर्यंत उगाच ३-४ जाहीराती बघायला लागायच्या.
मालिकेत तर दर २-३ मिनिटांनी एकमेकांची तोंडेच दाखवतात.
बातम्यां मध्ये मुळ बातमी सोडून फाफट्पसाराच जास्त असतो आणि त्या बातम्या दुसर्या दिवशी पेपर मध्ये वाचता येतातच की.
सिनेमे न बघता आपण जाहीराती बघता-बघता सिनेमा हुडकत असतो.
म्हणूनच मला हा एक प्रश्र्न पडला आहे की, आलेल्या पाहूण्यांना वेळ न देण्या इतपत तुम्ही टी.व्ही. वर नक्की काय कार्यक्रम बघता?
वर्गीकरण
वाचने
17394
प्रतिक्रिया
92
मिसळपाव
प्रतिक्रिया
बिंगोबा????
In reply to टिव्ही नाही by श्रीरंगपंत
टीव्हीच नाही.
मिपावर मनसोक्त वेळ घालवता आला.
झी मराठी वरच्या मालिकांमुळे
काय इलाज नाय
ते लोक टीव्ही बघत बसले तर.....
In reply to काय इलाज नाय by पैसा
टीव्ही
पूर्ण लांबीचे सीरीयल , लाइव्ह बातम्या कुठे पहाता येतात?
In reply to टीव्ही by कपिलमुनी
कल्याण मध्ये आम्ही
बर्याच लोकांकडे टिव्ही नाही
मी टीव्ही वर
टीव्ही चे व्यसन आम्हाला नसले
म्यूट
८० च्या दशकातली गाणी म्युट
In reply to म्यूट by तिमा
लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा
शक्यतो आमच्याकडे
टी.व्ही.
मस्त प्रतिसाद!! आवडला!!!
In reply to टी.व्ही. by कपिलमुनी
मुन्या
In reply to मस्त प्रतिसाद!! आवडला!!! by संदीप डांगे
वा वा कपिलमुनी...अगदी मश्त
In reply to टी.व्ही. by कपिलमुनी
दिवसातला बराचसा वेळ कामात जात
जेमी'स किचन