तुझे नाव

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
2 Jul 2016 - 10:43 am

तुझे नाव
नी केवळ भितीने गारठून जायला होते
पानांवरून ओघळून गेलेला प्रत्येक थेंब
डागांची लांबच रांग दुखण्याचीही थांबलेली
अन तुझी आठवण म्हणजे स्मरण शब्दातील
रण, सरण आणि मरण
जसा सडलेल्या समुद्राने त्याच्या उदरातून
ओकलेल्या सड्याचा
किनार्‍यावर पसरलेला ऊग्र वास

ज्या मोत्यांच्या आशेने तुम्ही
एक एक शिंपले उघडत जाता
त्यातून ओघळणारे रक्ताचे थेंब
आणि जखमींचे आणि मृतांचे आर्त स्वर
तुझ्या नावाने एक एक उचलत माळ
कवट्यांची पुढच्या बळीच्या गळ्यात घालण्यासाठी
आणि तुझ्या नावाच्या दहशती खाली
दातखीळ बसल्यावर
उच्चारून दाखवायचे 'बेहद खुबसूरत',
एकच जल्लोश तुझ्या नावाचा
घ्यायचा शेवटचा श्वास
आणि हुतात्म्यांच्या रांगेत
कवट्यांच्या माळेत रहायचे
एक अदृश्य आठवण होऊन
...
तुझे नाव
नी केवळ भितीने गारठून जायला होते
....

(भारताबाहेर कुठल्याशा देशातला दहशतवादी हिंसाचार आज सकाळी वृत्तपत्रीय मथळ्यात वाचला, व्यक्त होण्यासाठी मिपावर प्रकाशित या काव्याचे विडंबन केले त्यासाठी मिपा कवी मिसळलेला काव्यप्रेमी आणि चाणाक्य यांना क्षमस्व)

गरम पाण्याचे कुंडफ्री स्टाइलकरुणकविताविडंबन