सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
.
कधी राग,कधी अनुराग,
कधी प्रेम, कधी आग
कधी हो, कधी नाही
कधी घरी विचारते,कधी माहीत नाही,
तू तर रोज सखे भेटतीस,
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
.
कधी मधाळ हास्य,कधी भृकुटी भंग
कधी भांड भांड भांडतेस,
तर कधी गळ्यात पाडून रडते
कधी स्वत:च खरं करतेस,
तर कधी माझ चुकलं म्हणतेस,
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
.
कधी अल्लड, पोरसवदा मुलीच वागणं
तर कधी प्रौढे सारखं बोलणं
कधी फोन कट करणं ,
तर कधी,सारखं मिस कॉल देणं
कधी म्हणते, तोंड बघणार नाही,
तर कधी,तुला भेटल्या शिवाय करमत नाही
कधी तू खूप चांगला,तर कधी, खूप वाईट्ट
सुंदरी काय आहे तुझ्या मनांत?
का अशी वागतेस तू कोड्यांत?
सांगा ना, काय असेल तिच्या मनांत?
.
हे कोड कधी उलगडेल का?
रमणी च मन कधी कळेल का?
सुंदरीला मटण आणि बीयर
काय अकुकाका ऑं...जिलब्या
हो का ?
अहो त्याही जिलब्या, ह्याही
काका लिहित राहा.
सुंद्री कंफ्युज्ड आहे असे