मला अतिशय आवडलेले इंग्रजी सिनेमे भाग १, Wait until Dark....

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
27 May 2016 - 6:37 pm

डिस्क्लेमर : मला ज्या अनेक गोष्टी अजिबात जमत नाहीत, त्यापैकी चित्रपट, कविता, नाटक ह्यांचे परीक्षण लिहिणे.कदाचित माझे हे चित्रपट परीक्षण, तुम्हाला आवडणार नाही आणि ते आवडलेच पाहिजे, हा माझा अट्टाहास पण नाही.माझ्या फालतू चित्रपट-परीक्षणाचा राग तुम्ही ह्या सिनेमांवर काढू नये, ही नम्र विनंती.

=============================================
कुठलाही सिनेमा लागला की पहायचाच असतो, हा पौंगडावस्थेतला एक गूण.मग तो इंग्रजी असो किंवा हिंदी.

त्या काळात मग हीरा-मोती. रानी और लाल परी, बगदाद का चोर असे पण सिनेमे बघीतले जातात.पुढे मात्र सिनेमे बघायची आवड मंदावते आणि काही वेगळे सिनेमे बघायची ओढ लागते.ही ओढ लागयला एखादा सिनेमा किंवा एखादा मित्र पण कारणीभूत होतो.

असेच एकदा कधीतरी कटिंग आणि विडीचा आस्वाद घेता-घेता एक जण म्हणाला, "अरे, कालच मॉर्निंगला टिळकमध्ये वेट अंटिल डार्क बघीतला.मस्त सिनेमा आहे."

आमच्या त्या ग्रूपचे एक वैशिष्ट्य म्हणजे, सिनेमा बघीतला आणि आवडला (किंवा आवडला नाही) इतपतच.मुद्दाम स्टोरी सांगणे आणि उत्कंठा वाढवणे, हा प्रकार कुणीच करत न्हवते.

पौगंडावस्थेतला अज्जुन एक गूण म्हणजे, मित्रांनी सांगीतलेले सगळे पटते आणि आचरणात पण आणले जाते.बापापेक्षा मित्रांना अक्कल जास्त असते, असे समजण्याची अवस्था.

बापाने हा सिनेमा सुचवला असता, (हे पण अशक्यच.बापाचा एकच सल्ला असायचा, अभ्यास करा.) तर नक्कीच नसता बघीतला.

असो, तर मित्राने सांगीतल्या प्रमाणे हा सिनेमा बघीतला आणि मग मात्र त्याची पारायणेच केली.कधी कंटाळा आला म्हणून तर कधी दिवस फारच आनंदात गेला म्हणून. कधी झोप येत नाही म्हणून तर कधी मुद्दामहून.

मिपावर मात्र असे एका वाक्यात हा सिनेमा जरूर बघा. असे सांगता येत नसल्याने थोडी ओळख करून द्यायचा प्रयत्न करतो.

================================

कॅनडा देशातल्या, माँट्रियाल नामक शहरा मधील एक घर.एक म्हातारा माणूस, एका बाहूलीमध्ये.हेरॉइनच्या पिशव्या भरत असतो आणि लिसा (सामंथा जोन्स) नावाची एक तरूणी, त्याचे हे काम पुर्ण व्हायची वाट बघत असते.

त्याचे काम पूर्ण होताच, लिसा ती बाहूली घेवुन ते घर सोडते.आता ती त्या बाहूलीला घेवून न्युयॉर्क, अमेरिका, इथे जाणार असते.प्र्वासाच्या सुरुवातीलाच तिची एका माणसाबरोबर तोंड-ओळख होते.

न्युयॉर्कला उतरातच तिची नजर एका व्यक्ती वर पडते आणि ती थोडी बावचळते.ती व्यक्ती आता आपल्याला सोडणार नाही, हे ओळखून, लिसा ती बाहूली, प्रवासात तोंड-ओळख झालेल्या माणसाच्या हातात सोपवते.लिसा बाहेर पडताच, तिचे अपहरण होते.

आता मात्र मी इथे थांबतो.कारण पुढील सगळा सिनेमा हा बाहूलीच्या शोधावरच आहे आणि कथा सांगत असतांना कदाचित पूर्ण कथाच सांगायचा दोष पण होवू शकतो.

===================================

आता मला हा सिनेमा का आवडला?

१. मुळात सिनेमा, हे कथेचे माध्यम आणि ती कथा योग्य तर्‍हेने समाजापाशी पोहचवायला मदत करतात ते कलाकार आणि त्या कलाकारांना गुणांना न्याय देणार दिग्दर्शक आणि दिग्दर्शिका.हा सिनेमा बघतांना आपण फार हळू-हळू कथेत गुंतत जातो आणि काही वेळाने तर आजूबाजूला काय सुरु आहे, हे पण विसरून जातो.सिनेमा संपल्यावर लक्षात राहतो तो फक्त एक अविस्मरणिय अनुभव.

२. टेलीफोनचा अप्रतिम वापर.

३. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय.

४. ह्या सिनेमातून मला मिळालेली शिकवण. "योग्य ठिकाणी, योग्य वस्तू, नियमितपणे असेल तर, वेळ वाया जात नाही.वस्तूंच्या जागा बदलणे, म्हणजे वेळेचा अपव्यय."

हे ठिकाणआस्वाद

प्रतिक्रिया

म्स्त ओळख काकुस
बघेन नक्की

वेट अनटील डार्क भारी. ऑड्री हेपबर्न लैच भारी.

दिग्दर्शक टेरेन्स यंग.

त्याची आणि माझी प्रथम ओळख झाली ती, थंडरबॉल ह्या बाँडपटामुळे.

असो,

सध्या तरी टेरेन्स यंग बाबत इतपतच.त्याचे अजून बरेच सिनेमे बघायचे बाकी आहेत.पुढे-मागे कदाचित ह्याच्या सिनेमांबाबत लिहीनही.

बोका-ए-आझम's picture

28 May 2016 - 6:27 pm | बोका-ए-आझम

साब्रिना साठी (ज्यावरुन आपल्याकडे ये दिल्लगी काढला होता) टेरेन्स यंग सहाय्यक होता. त्याच वेळी आपण स्वतंत्र दिग्दर्शक झालो की आॅड्रीला नायिका म्हणून घेऊन चित्रपट काढायचा हे त्याने ठरवलं होतं. तिनेही आपण काम करु असं वचन दिलं होतं. दोघांनीही वेट अंटिल डार्क मध्ये ते पूर्ण केलं.

सखी's picture

27 May 2016 - 7:36 pm | सखी

वेट अनटील डार्क भारी. ऑड्री हेपबर्न लैच भारी. +11
इथे थोडी ओळख/(spoiler alert) आहे. कितीही वेळा हा सिनेमा पाहीला तरी प्रत्येकवेळेस काहीतरी नवं सापडतं.

प्रचेतस's picture

27 May 2016 - 7:06 pm | प्रचेतस

सिनेमा पाहिला नाही पण आता नक्की बघेन.
परवाच आल्फ़्रेड हिचकॉकचा ' द बर्ड्स' पाहिला. काय वातावरणनिर्मिती केलीय पठ्ठ्याने.

त्याने दिग्दर्शित केलेया सगळ्या सिनेमांत मला आवडलेला सिनेमा म्हणजे "रियर विंडो."

एका खिडकीभोवती सगळे कथानक फिरते.

प्रचेतस's picture

27 May 2016 - 7:26 pm | प्रचेतस

रियर विंडो जबरदस्तच होता.
हिचकॉकची बातच न्यारी.

सुंड्या's picture

28 May 2016 - 1:34 am | सुंड्या

हीचकॉक तर एकदम बेस्ट....टीवी सिरीज download केलीये....त्यातला The Glass Eye नावाचा एपिसोड म्हणजे अतिजबरदस्त.....मुवि भाऊसाहेब Wait until dark यादीत समाविष्ट केलेला आहे आणि Nebraska हा चित्रपट पाहावा हे सुचवितो.

अमेरिकन त्रिशंकू's picture

27 May 2016 - 8:38 pm | अमेरिकन त्रिशंकू

वेट अंटिल डार्क मस्तच आहे. पण हिचकॉकचा सगळ्यात आवडता पिक्चर आहे "डायल एम फॉर मर्डर".
त्यावरून डिंपल, राज बब्बर आणि सुरेश ओबेरॉयचा "ऐतबार" काढला होता.
https://en.wikipedia.org/wiki/Aitbaar

ऐतबारमधलं "किसी नजरको तेरा इंतजार और भी है" हे आशा आणि भूपेन्द्रचं गाणंपण छान आहे. बाप्पि लाहिरीचं म्युझिक आहे हे खरं वाटत नाही एवढं छान आहे.

चतुरंग's picture

27 May 2016 - 9:09 pm | चतुरंग

हे गाणं छानच आहे आणि त्याचं कारण बप्पी त्यावेळी पंचमच्या सहायक भूमिकेच्या अमलाखालून बाहेर आलेला नसावा. त्यामुळे त्या गाण्यात कितीतरी वेळा पंचमदांची चाल आहे की काय असा भास होतो..
नंतर मग बप्पीनं त्याचं स्वतःचं दुकान उघडलं आणि मग पुढची त्याची वाट'चाल' सर्वज्ञात आहे! ;)

(ढप्पी लहरी)रंगा

चतुरंग's picture

27 May 2016 - 9:09 pm | चतुरंग

हे गाणं छानच आहे आणि त्याचं कारण बप्पी त्यावेळी पंचमच्या सहायक भूमिकेच्या अमलाखालून बाहेर आलेला नसावा. त्यामुळे त्या गाण्यात कितीतरी वेळा पंचमदांची चाल आहे की काय असा भास होतो..
नंतर मग बप्पीनं त्याचं स्वतःचं दुकान उघडलं आणि मग पुढची त्याची वाट'चाल' सर्वज्ञात आहे! ;)

(ढप्पी लहरी)रंगा

हा चित्रपट नक्की बघण्याच्या यादीत टाकला आहे.

(अवांतर : मला आवडलेला एक इंग्रजी चित्रपट आहे 'टु किल अ मॉकिंगबर्ड.)

भंकस बाबा's picture

28 May 2016 - 6:37 am | भंकस बाबा

वेट अंटिल डार्क 13/14 वर्षाचा असताना बघितला होता, क्लायमॅक्स एकदम जबरदस्त,
निर्जीव डोळे कसे असतील याचे उत्तम दर्शन घडवले आहे हेपबर्नने!

खतरा आहे सिनेमा. अखंड पावणेदोन तास नजर हटवू शकलो नाही! (जवळपास) संपूर्ण सिनेमा हा एका अपार्टमेंट्मध्ये घडतो. कुठलेही अतिरेकी चमत्कृतीपूर्ण संगीत, वेडेवाकडे लाईट्स, भीषण खुनाखुनी, रक्तपात असले काहीही न करता केवळ उत्तम पटकथा, नेटके,अर्थपूर्ण आणि कथेला पुढे नेणारे संवाद, अत्यंत संयत अभिनय आणि कमालीचे कल्पक आणि सशक्त दिग्दर्शन याने काय होऊ शकते हे बघायचे असेल तर हा सिनेमा चुकवू नका.
ऑड्री हेपबर्न तशीही माझी अत्यंत आवडती नटी आहे (रोमन हॉलिडे फेम! :)) आणि या सिनेमात तर तिने केवळ उच्च काम केलंय. मुद्राभिनय, देहबोली, संवादफेक आणि भूमिकेची अचाट समज या जोरावर तिने सिनेमा खाऊन टाकलाय.
या सिनेमासाठी ती ऑस्करला नॉमिनी झाली होती (पण ऑस्कर का मिळू शकले नाही हे समजत नाही..)
हिचकॉक आणि फक्त हिचकॉकच हे करुन घेउ शकतो! __/\__

माझ्या अंदाजाने ह्या सिनेमाचा दिग्दर्शक "टेरेन्स यंग" आहे.

चतुरंग's picture

28 May 2016 - 12:03 pm | चतुरंग

टेरेन्स यंग आहे. अफलातून केलंय दिग्दर्शन हिचकॉकची आठवण होईल असे! :)

मुक्त विहारि's picture

28 May 2016 - 12:06 pm | मुक्त विहारि

हिचकॉकचे हेच वैशिष्ट्य आहे की, एखादा सुंदर रहस्यपट बघीतला तरी, मनांत नांव मात्र "हिचकॉकचेच" येते.

शिव कन्या's picture

28 May 2016 - 11:32 am | शिव कन्या

बघणार.
चांगली ओळख करुन दिलीत!
धन्यवाद !

बाबा योगिराज's picture

28 May 2016 - 1:19 pm | बाबा योगिराज

चांगलीच ओळख करून दिलीत.
सिनेमा बघावाच लागणार.

मुक्त विहारि's picture

28 May 2016 - 2:15 pm | मुक्त विहारि

सुरुवातीला आपण पण बाहूलीला शोधायचा प्रयत्न करत असतो आणि एका विवक्षित क्षणी आपण त्या बाहूलीला पार विसरून जातो.

मोजकेच ५ कलाकार आणि एक बाल कलाकार, पण कथा अशा काही भिंगरी सारखी फिरते की बस्स...

आयला,

प्रतिसाद देता-देता कथाच सांगायला लागलो की.... आता थांबायला हवे....

पद्मावति's picture

28 May 2016 - 2:35 pm | पद्मावति

मस्तं ओळख.

बोका-ए-आझम's picture

28 May 2016 - 6:24 pm | बोका-ए-आझम

मधली आॅड्री हेपबर्न भारी आहेच पण अॅलन आर्किनसुद्धा जबरदस्त आहे.
बाकी हिचकाॅकचं नाव आलं आणि सायको बद्दल कोणी बोललं नाही, म्हणजे मिपाबद्दल बोलायचं आणि रामदासकाकांबद्दल नाही असला प्रकार आहे. सायको हा हिचकाॅकचा माझ्या मते तरी सर्वोकृष्ट आहे. मग बाकीचे - व्हर्टिगो, रिअर विंडो, बर्ड्स, नाॅर्थ बाय नाॅर्थवेस्ट, डायल एम फाॅर मर्डर वगैरे.

महामाया's picture

28 May 2016 - 10:16 pm | महामाया

खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर रात्री इंग्रजी चित्रपट येत असत।

त्यांत वेट अंटिल डार्क बघितला होता, तसंच स्पेल बाउंड, दि लाल्ट एंपरर पाहिले होते।

आड्रीचा रोमन हॉलिडे, माय फेयर लेडी देखील आवडले होते ।