वेदनेचा गाव

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
20 May 2016 - 12:21 am

किती दिवसांनी आज
वेदनेच्या गावात
भरून आलंय आभाळ
ठसठसत्या जखमांची
खपली काढायला
मग त्या ओल्या जखमा
वाहतील डोळ्यातून
फुंकर मारायला असेलच
तुझी आठवण

भर दिवसा कसा
फक्त अंधारच
उरलाय घरभर?
होत्यानव्हत्या
सगळ्याच पणत्या
नेल्यास ना सोबत?
त्या पणत्यांच्या उजेडात
उजळशीलच तू
मला दिसशीलच आणि
चमचमणार्या एका वीजेत

तुझं आपलं बरय
तुझ्यात पाऊस भिनायचा
मला मात्र टोचतात
रखरखलेल्या धरणीवरचे ओरखडे
तू भिनलेला पाऊस
खोल खोल जातो मनात
तिथं तळाशी गेल्यावर
शिल्लक काय दिसते?
मी उगाच केलेली
तुला नकोनकोशी धडपड?

कधीतरी माझ्या
वेदनेच्या गावात
माझ्यासाठी येउन जा
तू पाठवलेल्या पावसानी
माझी झालेली वाताहत
एकदा बघून जा फक्त
इथच रहा नाही म्हणणार
कारण तुझं हळवंपण
मला नाही सोसवणार

मुक्त कविताकरुणकविता

प्रतिक्रिया

वेदनेचा गाव आवडला. तरल.

जव्हेरगंज's picture

20 May 2016 - 10:11 am | जव्हेरगंज

vaa

रातराणी's picture

20 May 2016 - 11:46 am | रातराणी

धन्यवाद एस आणि जव्हेरगंज!

समीरसूर's picture

20 May 2016 - 12:13 pm | समीरसूर

एकदम क्लास! आवडले.

माझी आवडती गझल आठवली....

अब तक दिल-ए-खुशफ़हम को हैं तुझसे उम्मीदे
ये आखिरी शम्मे भी बुझाने के लिये आ
रंजीश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ...

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो...
रसम-ओ-रहे दुनिया ही निभाने के लिये आ...
रंजीश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ...

किस किसको बतायेंगे जुदाई का सबब हम
तू मुझसे खफा हैं तो जमाने के लिये आ...
रंजीश ही सही, दिल ही दुखाने के लिये आ...

रातराणी's picture

20 May 2016 - 12:21 pm | रातराणी

वा गजल अतिशय आवडली! धन्यवाद!

ही मेहदी हसनची गाजलेली गझल आहे.

रंजीश ही सही दिल ही दुखाने के लिये आ
आ फिर से मुझे छोड के जाणे के लिये आ....

गायक: मेहदी हसन (गुलाम अलींच्या आवाजातदेखील आहे)
शायर: अहमद फराज

रातराणी's picture

20 May 2016 - 11:12 pm | रातराणी

धन्यवाद नक्कीच ऐकेन. मी गझल ऐकली आवडली तरी तिचे शब्द लक्षात रहात नाहीत, तुमच्या व्यासंगाला सलाम!

चाणक्य's picture

20 May 2016 - 12:28 pm | चाणक्य

पण कासावीस करणारी रचना.

कानडाऊ योगेशु's picture

20 May 2016 - 12:50 pm | कानडाऊ योगेशु

सॉलिट्ट कविता.
कविता दोनतीनदा वाचल्यावर उलगडली.
त्याला हळवा म्हटले आहे शेवटी पण त्याच्याहुन हळवी तर तिच आहे.

मुद्दामुन खपली काढणं कारण मग त्याची आठवण येईल.
दिवसाढवळ्यातल्या अंधारात(!!) पणत्या घेऊन जाणारा तो पण तरीदेखील वीजेच्या लक्ख प्रकाशात त्याला पाहु पाहणारी ती..
पाऊस त्याच्यात भिनतो..तो तिच्यात..मग तिची कासावीस कि तो मनात इतका उतरला आहे कि त्याला तिच्या मनाचा तळ दिसला तर? (ही कल्पना अफाट आहे.आवडली.)

लिखते रहो!

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 May 2016 - 12:54 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी उगाच केलेली
तुला नकोनकोशी धडपड?

कविता वाचताना झालेली ही जाणीव फार नकोशी झाली.

जाउ दे...

ही कविता परत वाचणार नाही हे नक्की.

पैजारबुवा,

यशोधरा's picture

20 May 2016 - 12:58 pm | यशोधरा

सुरेख लिहिले आहे.

प्रचेतस's picture

20 May 2016 - 1:17 pm | प्रचेतस

खूप छान.
शब्दरचना आवडली.

चांदणे संदीप's picture

20 May 2016 - 1:18 pm | चांदणे संदीप

पण हे कवी/कवयित्री लोक्स सरळ शब्दांतल अस पावसात वगैरे बुडवून का आणतात काय माहित? ;)
सगळ कस आंबूस-शेवाळलेल होऊन जात! :P
(असंच काहीबाही अजून लिहिणार होतो...पण आवरतो!)

कविता आवडली! :)

Sandy

पण हे कवी/कवयित्री लोक्स सरळ शब्दांतल अस पावसात वगैरे बुडवून का आणतात काय माहित? ;)

हे आता एखादा तुझ्यासारखा कवीच सांगू शकतो. :)

चांदणे संदीप's picture

20 May 2016 - 1:34 pm | चांदणे संदीप

खर्रच माहिती नाही मला.... काळ्या मावशीशप्पथ! ;)

तरी आपला एक अंदाज - काव्यात (तरी*)पाऊस आणल्याशिवाय वाचक रसिक भिजतच नसावा... त्यामुळे पाऊस उसना घेत असावेत!

*तानसेनानंतर दुसर्या कुठल्याच फ़िल्डमधला मनुक्शप्राणी परतेक्ष पाऊस पडू शकलेला नाहीये! ;)

Sandy

प्रचेतस's picture

20 May 2016 - 3:42 pm | प्रचेतस

=))

समीरसूर's picture

20 May 2016 - 2:14 pm | समीरसूर

हाहाहा...पाऊस हे व्हर्सटाईल प्रतीक आहे हो. म्हटलं तर समृद्धी ('लगान'मधला पाऊस), म्हटलं तर आनंद (नभ उतरू आलं, बरसो रे मेघा मेघा...), म्हटलं तर मादकता (मंदाकिनी, किमी काटकर, शिल्पा शिरोडकर, झीनत अम्मान), म्हटलं तर दु:ख (ती गेली तेव्हा रिमझिम), म्हटलं तर विरह (लगी आज सावन की फिर वो झाडी ही), म्हटलं तर एकटेपणा (गिला गिला पानी), म्हटलं तर आकर्षण (सावन में लाग गायी आग..), म्हटलं तर अपेक्षा (अब के सावन ऐसे बरसे), म्हटलं तर मोहब्बत (आज रपट जाये तो), म्हटलं तर बालपण (सांग सांग भोलानाथ, घोडे जैसी चाल...)

पाऊस ही 'चीज'च अशी आहे, पडला तर गाणं होते,
न पडला तर रडगाणं होते...
कधी पेटलेल्या तना-मनावर गार गार पाणी होते...
तर कधी चिंब भिजलेल्या डोळ्यांतून वेदनेचं पाझरणं होते...

रमेश भिडे's picture

20 May 2016 - 1:22 pm | रमेश भिडे

त्रासदायक आहे. याहून त्रास म्हणजे ज्या पार्टीसाठी हे स्टेटमेंट असतं त्या पार्टीला याबद्दल का ही ही ठाऊक नसतं. हे इकडे झुरुन बेजार असतात आणि तिकडे शाळेचे डबे करणं वगैरे.... असो! (तो च्या बाजूने. ती मधली कॅटेगरी साधारण लगेच सावरणारातली असते)

रातराणी's picture

20 May 2016 - 11:15 pm | रातराणी

खूप खूप आभार! कधी कधी मूळ लेख किंवा कवितेपेक्षा प्रतिसाद एकाहून एक सरस असतात. असेच वाटले सर्व प्रतिसाद वाचून. साहित्य संपादकांना विनंती आहे कवितेच नाव वेदनेच्या गावात ऐवजी वेदनेचा गाव असे करता येईल का? धन्यवाद.

नीलमोहर's picture

21 May 2016 - 3:34 pm | नीलमोहर

आवडली म्हणवणार नाही.

अस्वस्थ करून सोडणारी कविता.

सस्नेह's picture

22 May 2016 - 2:39 pm | सस्नेह

काळजात खुपणारी कविता.
आणि असला ताप देणार्याचा संताप आला. :)

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 2:43 pm | बोका-ए-आझम

कविता वाचून आरती प्रभूंच्या ' कसे कसे हासायाचे ' मधली - इथे भोळ्या कळ्यांनाही आसवांचा येतो वास - ही ओळ आठवली.

भरत्_पलुसकर's picture

22 May 2016 - 2:47 pm | भरत्_पलुसकर

:(