वेदनेचा गाव
किती दिवसांनी आज
वेदनेच्या गावात
भरून आलंय आभाळ
ठसठसत्या जखमांची
खपली काढायला
मग त्या ओल्या जखमा
वाहतील डोळ्यातून
फुंकर मारायला असेलच
तुझी आठवण
भर दिवसा कसा
फक्त अंधारच
उरलाय घरभर?
होत्यानव्हत्या
सगळ्याच पणत्या
नेल्यास ना सोबत?
त्या पणत्यांच्या उजेडात
उजळशीलच तू
मला दिसशीलच आणि
चमचमणार्या एका वीजेत
तुझं आपलं बरय
तुझ्यात पाऊस भिनायचा
मला मात्र टोचतात
रखरखलेल्या धरणीवरचे ओरखडे
तू भिनलेला पाऊस
खोल खोल जातो मनात
तिथं तळाशी गेल्यावर
शिल्लक काय दिसते?
मी उगाच केलेली
तुला नकोनकोशी धडपड?
कधीतरी माझ्या
वेदनेच्या गावात
माझ्यासाठी येउन जा
तू पाठवलेल्या पावसानी
माझी झालेली वाताहत
एकदा बघून जा फक्त
इथच रहा नाही म्हणणार
कारण तुझं हळवंपण
मला नाही सोसवणार
वेदनेचा गाव आवडला. तरल.
व्वा!!!
धन्यवाद एस आणि जव्हेरगंज!
एकदम क्लास! आवडले.
वा गजल अतिशय आवडली! धन्यवाद!
ही मेहदी हसनची गाजलेली गझल आहे
धन्यवाद नक्कीच ऐकेन. मी गझल
छान
सॉलिट्ट कविता.
कविता आवडली... असे तरी कसे म्हणू?
सुरेख लिहिले आहे.
खूप छान. शब्दरचना आवडली.
मस्तच!
पण हे कवी/कवयित्री लोक्स सरळ
ओ नाय्या..
=))
पाऊस ही 'चीज'च अशी आहे...
त्रासदायक आहे. याहून त्रास
खूप खूप आभार! कधी कधी मूळ लेख
....
अस्वस्थ करून सोडणारी कविता.
काळजात खुपणारी कविता.
कविता छानच आहे.
:(