पोश्टरबॉईज

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
27 Apr 2016 - 11:34 pm

इलेक्शनचे पोस्टर्स, बॅनर्स, बॅजेस अन स्टीकर करुन करुन डोस्कं पार कामातनं गेलेलं. तीन पगाराचा ओव्हरटाइम काढला पण महिनाभर डोळ्यासमोर नाचलेले उमेदवारांचे ते मुर्दाड चेहरे हलायचे नाव घेईनात. पार सुम्म होऊन तीन दिवसाची सुट्टी मारली. पैला दिवस सरेस्तोवर मालकाचा फोन. "ये प्रेसला पटकन"
"जमणार नाही. इलेक्शनचे अर्जंट काम तर नीट्ट करणार नाही"
"अर्रर्र इलेक्शन आग्याद आपी. कन्नड नाटक बंदद. बर्री लगोलगो."
("अरेरे इलेक्शन संपली आता. कन्नड नाटकाचे काम आलेय. पटकन ये")
अरारारारा. चला उठा राष्ट्रवीर हो.
प्रेससमोर दोन ४७४७ बोलेरो लागलेल्या.
आत जाताच मालकाने जावई असल्यागत माझी ओळख करुन दिली. "इदे नोडरी डिझाइनर. हेळ सावकारु येन्बेकु"
("हे बघा डिझायनर, सावकार तुम्हाला काय पाहिजे ते यांना सांगा")
एक कार्यकर्ता लगेच "येन्स्वामी, आरामरी?" ("काय स्वामी, आरामात का?") करुन सलगी दाखवता झाला.
"मालक ह्याना सांगा मला कन्नड येत नाही, परत तरास नको" हा व्युहाचा सुरुवातीचा भाग.
"चालतयरी कलाकार, पर्वा इल्ला, स्टार्ट मारा तुमी. आमाला येतय की तुमचं मराठी तोडंतोडं"
"द्या आप्पा मजकूर?
"मजगूर? येनु?" ("मजगूर म्हणजे काय?")
"कागद ओ. लिव्हलेला"
"ते म्हणता व्हय. आद आद. तगोरी" ("आहे आहे, हे घ्या")
मजकूर म्हणजे हे भल्या मोठ्या ड्रॉईंग शीटवर चार पाच फोटो चिकटवलेले. स्केचपेननी बॉर्डर वगैरे काढून पार गिचमिड काला केलेला. अर्धे कन्नड, थोडे मराठी आन उरलेसुरले इंग्लिश भाषेतल्या अक्षरांनी केलेले अ‍ॅबस्ट्रॅक्ट जणू.
"हेसरु येनु?" ("नाव काय नाटकाचे?") चुकुन माझ्या तोंडातून कन्नड जातेच. हळूच सावरुन नाटकाचे नाव काय विचारतो.
"ते बगा 'मांगल्य यारदु नि मडदी यारीगे"
"?"
"पुढे लिव्हा मत्तु कुंकुम तंद सौभाग्य"
"म्हणजे?"
"ते बायको कुणाची आन झोपती कुनासंगट हो"
मी खुर्चीतच पडायचा बाकी. च्यायला असले नाटक.
नंतरच्या तीन तासाच्या घमासान कानडी परिसंवादातून कळलेली माहीती अशी. सीमेवरच्या गावात ह्या मल्टीलॅन्ग्वल नाटकांना लै डिमांड. हा तीन तीन दिवस चालणारा प्रोग्राम असतो. हिरोईन, डान्सर, एक कॉमेडीयन आणि म्युझिक पार्टी बाहेरची असते. बाकी सगळी कास्ट गावातलीच. हिरोपेक्षा व्हिलनच्या रोलला जादा डिमांड. स्टाइल आणि डान्सरसोबत ठुमके मारायला मिळतात. हा रोल बहुधा पाटलाचा किंवा सरपंचाचा पोरगाच करतो. त्याची वर्गणी सगळ्यात जास्त असते, रोजचा सराव असतोच शिवाय हौस दांडगी. बाहेर थांबलेल्या दोन्ही बोलेरो बहुतेक त्याच्याच असतात. हिरो म्हणजे सेकंड पोस्ट. त्यालाही डिमांड असते पण जरा कमीच. पोलीस भरतीत वारंवार नापास होऊन इन्सपेक्टर व्हायची तमन्ना इथे पूर्ण करायची असते. हिरोचा मित्र हा सात्विक दिसणारा, शालेय भाषणस्पर्धेत बक्षीस मिळवणारा होतकरु तरूण असतो. बाकी हिरो हिरवीनीचे आइबाप, गावकरी, पुजारी, अशी पात्रे वर्गणी आणि वकूबानुसार गावकर्‍यांनी वाटून घेतलेली असतात. यात्रेआधीच एक महिना बाहेरच्या कलावंत मंडळींना ही सुपारी दिलेली असते. त्यांनी दिलेल्या स्क्रीप्ट (संहिता हा शुध्द शब्द ऐकायला मिळाला चक्क) नुसार तालमी चालू असतात. आम्ही सांभाळून घेऊ अशी बोली असल्याने ह्या तालमीत केवळ सपाट पाठांतर एवढेच झालेले असते. आता नाटकाची जाहीरात करणे जरुरी झालेले असते. त्यासाठी ही मंडळी आमचे सामान्य ज्ञान वाढवित असतात.
एका पाकिटात मोठ्या साइजचे २०-२५ आणि पासपोर्ट साइजचे ७०-८० फोटो. मोठे फोटो गावतल्या हौशी फोटोग्राफरने पार गुळगुळीत आणि लग्न जमवायच्या हेतूनेच मेकपलेले. बारक्या फोटोत मात्र फुल्ल व्हरायटी. शाळेच्या आयकार्डापासून व्होटर्सकार्डपर्यंत सगळे नमुने. ते एका ऑपरेटरला स्कॅन करायला दिले. कन्नड मजकूर दुसर्‍या एका ऑपरेटरला टाइप करायला दिला. त्याची पाठ धरुन लगेच एक शाळामास्तर बसलाच. कानडी असो की मराठी, लेटेस्ट शाळामास्तर एका साचातले. पेपरातले वाक्यप्रचार आणि काही सरकारी शब्द इतकीच शब्दसंपदा सर घेऊन प्रुफरिडींगला बसले.
आता महत्त्वाचा विषय लेआउट.
पोस्टरसाईज डेमी. साधारण दीड बाय दोन फूट. वरच्या साईडला बसवेश्वर, जवळचे एखादे जागृत देवस्थान, ग्रामदैवत, नटराज आणि सिध्देश्वर मस्ट. सगळ्यांना श्री प्रसन्न करुन खाली महाराज मंडळी. ह्या मठाचे, त्या मठाचे, ब्रह्मचारी, आचार्य वगैरे सगळे भगवे वस्त्र मुकुट आणि दाढीधारी. त्यातले काही सिध्द कॅटेगरीतले. फोटोशॉपात मागची प्रभावळ करणे मस्ट. नंतर क्रम नाट्यमंडळीच्या नावाचा. त्यात भरती गायनाचार्य आणि संगीताचार्यांची.
"ओ आर्टिस्ट, खानेका क्या करते?"
"गडबडीत डबा नाही आणला मी."
"चला निघा ओ. थोडं टिफिन मागवू हितं. अस करु चला बाहेरच. तवर आमचं नेते येतेतच ओ. आता मेन काम सुरुच करा की. थोडं सिग्रेट बिग्रेट घ्या तुमी. आपल्या कामात फ्रेश राह्यचं बगा"
त्यांच्या सोबतचं पब्लिक दर १५ मिनिटाला कुठं जाउन फ्रेश होत होतं कळलं.
बाहेर जाउन सोलापूरातही कामतच सापडावे ह्यांना. एका बेचव थाळीच्या बिलापोटी ह्यांच्या सरपंचानी हिरॉइन आणि डान्सर कशी बुक केली ह्याची रसभरीत स्टोरी ऐकून मी ह्या जाहिरातनाटकाचा पुढचा प्रयोग सजवायला सज्ज झालो.
...............................................
(क्रमशः)
.
(टिप : ह्याचा पुढचा भाग तयार असलेने अगदी लगोलग येईल. टांगारुपणा केला जाणार नाही. जुन्या कथांच्या क्रमश: भागाच्या चौकश्या करु नयेत. ;) )

नाट्यअनुभव

प्रतिक्रिया

भारी! क्रमशः कशाला घातलं रे ते!

रेवती's picture

27 Apr 2016 - 11:40 pm | रेवती

वाचतिये.
वर्णन छान झालय. डोळ्यासमोर आला प्रसंग!

स्रुजा's picture

28 Apr 2016 - 12:12 am | स्रुजा

+ १, चांगला जमलाय हा भाग !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2016 - 10:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

असेच म्हणतो. लेखनशैली छान.
पुभाप्र.

-दिलीप बिरुटे

कानडाऊ योगेशु's picture

27 Apr 2016 - 11:42 pm | कानडाऊ योगेशु

एकदम जोरदार सुरवात मालक.!
बाकी मी ही सोलापूरचाच!

वैभव जाधव's picture

27 Apr 2016 - 11:44 pm | वैभव जाधव

हान्न!

अब्या त्या एअरटेल चं फुडं काय झालं बे?
अभिषेक,जीत,लाश ;)

संजय पाटिल's picture

28 Apr 2016 - 10:41 am | संजय पाटिल

हेच म्हणतो!!!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Apr 2016 - 11:57 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाव्वाव्वाव्वा आप्पा ! व्वा!!! ठाका, ठाका फुड्डल्ला भाग लौकर!

किसन शिंदे's picture

28 Apr 2016 - 1:02 am | किसन शिंदे

ललित लेखन लय भारी करतो राव अभ्या तू.. ते 'दादा'वाल्या बोलेरो झटकन नजरेसमोर आल्या.

संदीप डांगे's picture

28 Apr 2016 - 1:13 am | संदीप डांगे

अभ्या.. मिपाचा नागराज मंजुळे आहे असे मी इथे घोषित करतो.

यक लंबर. येउदेत, भौत तरसाता है तू.

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 8:20 pm | विजय पुरोहित

नाही ओ डांगेअण्णा...
अभ्या मिपाचा आकाश ठोसर हाय (सैराटचा हीरो)

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 8:28 pm | विजय पुरोहित

अभ्याची येंट्री हीरोसारखीच आस्तीया.

आमची आर्चि लै जिगरीची. तिच्या जीवावर तर हे समद.

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 9:03 pm | विजय पुरोहित

हे ज्जिगर अभ्याभौ...
साल्या कुठनं एवढं वाचन केलंस रे माणसांचं...
जळजळ वाटते रे साल्या...

बाकी तुला अने तुज्या हिरविणीला लै लै लै लै शुभेच्छा....

मिपा आणि इतर मराठी आंतरजाल लेखन याच कारणासाठी वाचायला आवडत, वेग-वेगळ्या क्षेत्रात काम
करणाऱ्या करणाऱ्या लोकांचे अनुभव वाचायला मिळतात. थोडसं one stop shop सारखं
पुभाप्र.

आदूबाळ's picture

28 Apr 2016 - 3:11 am | आदूबाळ

कुठाय ते पुढचं?

उगा काहितरीच's picture

28 Apr 2016 - 6:43 am | उगा काहितरीच

तेवढं भाषांतर करा कुणीतरी ...

स्पा's picture

28 Apr 2016 - 7:01 am | स्पा

लोल, लय भारी रे, कन्नड ऎकायला जाम गोड वाट्टे

बोका-ए-आझम's picture

28 Apr 2016 - 8:39 am | बोका-ए-आझम

हिरोपेक्षा व्हिलनच्या रोलला जादा डिमांड. स्टाइल आणि डान्सरसोबत ठुमके मारायला मिळतात. हा रोल बहुधा पाटलाचा किंवा सरपंचाचा पोरगाच करतो. त्याची वर्गणी सगळ्यात जास्त असते, रोजचा सराव असतोच शिवाय हौस दांडगी.

हे भारी आहे. पण मग शेवटी हीरोकडून मार खाऊन घेतो का? का तसलं काही नसतं?

सिरुसेरि's picture

28 Apr 2016 - 8:40 am | सिरुसेरि

सोलापुरमध्ये हिन्दी , मराठी , कानडी , तेलुगु अशा अनेक भाषा कानावर पडतात . एकाच चौकात अमिताभ , अशोक सराफ , महेश बाबु , गणेश यांच्या चित्रपटांची पोश्टरं लावलेली असतात . यापुर्वी सोलापुर म्हणले की हास्यसम्राट प्रा. दिपक देशपांडे आणी त्यांच्या गोष्टीतला "पारो , पारो , येन्न चेस्तनाडु पारो" म्हणत पारोला शोधणारा तेलगु देवदास आठवत असे . आता त्यामध्ये या लेखाची भर पडली .
एक शंका - बाकी ते सोलापुर फेमस "बेणं" , "कडु" राहुन गेलं का ?

सतिश गावडे's picture

28 Apr 2016 - 9:28 am | सतिश गावडे

यापुर्वी सोलापुर म्हणले की हास्यसम्राट प्रा. दिपक देशपांडे आणी त्यांच्या गोष्टीतला "पारो , पारो , येन्न चेस्तनाडु पारो" म्हणत पारोला शोधणारा तेलगु देवदास आठवत असे .

हा देशपांडेंचा मास्टरपीस आहे.

नान वच्चिन्ड पारो.. =))

चौकटराजा's picture

28 Apr 2016 - 8:46 am | चौकटराजा

महिनाभर डोळ्यासमोर नाचलेले उमेदवारांचे ते मुर्दाड चेहरे हलायचे नाव घेईनात. आन्त तेजा खालची ती माठ पिलावळीची रांग ती बी लय खतरनाक आसतीया !

भारी लेख. बादवे 'येर्टेल' कधी पूर्ण करताय?

सतिश गावडे's picture

28 Apr 2016 - 9:29 am | सतिश गावडे

तुमचं पोश्टरबॉईज आमाला लई आवडलं बगा.

संवाद लै म्हणजे लैच भारी. मजा आली.

सस्नेह's picture

29 Apr 2016 - 4:08 pm | सस्नेह

मुंद भाग जल्दी हाक.

चांदणे संदीप's picture

28 Apr 2016 - 11:04 am | चांदणे संदीप

जुन्या कथांच्या क्रमश: भागाच्या चौकश्या करु नयेत.

तरी लोक्स सुधारत नै! नै का? दादानु पुढल्या येळेला "सुधरोमायसीन" च्या ट्याबलेट पण लेखासोबत घेऊन या!

Sandy

टवाळ कार्टा's picture

28 Apr 2016 - 11:47 am | टवाळ कार्टा

खि खि खि....जब्राट

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 12:18 pm | विजय पुरोहित

मस्तच...
ग्रामीण भागातील एका अनवट कलाप्रकाराची मस्त ओळख करुन दिलेली आहे.

त्यातले काही सिध्द कॅटेगरीतले. यासारखे काही पंचेस अतिशय आवडल्या गेले आहेत.

एकंदरीत बटाट्याची चाळ आठवली... या गावात पण साधारण तसंच वातावरण असत असेल...

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Apr 2016 - 12:56 pm | कैलासवासी सोन्याबापु

हान तिच्येयला धुरळा!! भावा अमेजिंग स्किल आहे हे माणसे निरीक्षायचे तुझ्याकडे त्याची अशीच उत्तरोत्तर वृद्धी व्हावी! जियो!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

28 Apr 2016 - 1:19 pm | भाग्यश्री कुलकर्णी

लय भारी.फुडं?

सूड's picture

28 Apr 2016 - 2:32 pm | सूड

पुभाप्र

एक एकटा एकटाच's picture

28 Apr 2016 - 8:25 pm | एक एकटा एकटाच

अभ्या भाषेच्या अडचणीमुळे लेख समजला नाही

तरी तुझ्या इतर लेखांप्रमाणे हां ही उत्तम झाला असणार हयात शंकाच नाही.

आणि वरील प्रतिसादही ह्याला दुजोरा देताहेत

माझ्याकडून तुला पुढील लिखाणास शुभेच्छा

अरे दिलंय ना भाषांतर, नीट पहा जरा. श्रीरंगाने दुपारचं करून दिलाय उपदते.

अरे दिलंय ना भाषांतर, नीट पहा जरा. श्रीरंगाने दुपारचं करून दिलाय उपदते.

एक एकटा एकटाच's picture

28 Apr 2016 - 9:12 pm | एक एकटा एकटाच

सॉरी दादा

वर लक्ष दिलं नाही

आता वाचलं

मस्त मस्त मस्त

+१..सकाळी उगीचच न कळल्यासारखी वाटली होती. आत्ता परत वाचल्यावर भयंकर हसायला येत होतं..

धन्यवाद.

रातराणी's picture

28 Apr 2016 - 9:01 pm | रातराणी

छान तरी किती वेळा म्हणायचं. जळफळाट झाला आहे.

जव्हेरगंज's picture

28 Apr 2016 - 9:18 pm | जव्हेरगंज

ಬಹಳ ಸಂತೋಷವನ್ನು ನಾನು ಇಷ್ಟ

ಅಭಿಜಿತ್ ಅದನ್ನು ಇರಿಸಿಕೊಳ್ಳಲು

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 9:22 pm | विजय पुरोहित

बहळ संतोषवन्नु नानु इष्टा...
अभीजीत् अदन्नु इरिसिकोळ्ळलु...
बरोबर?

जव्हेरगंज's picture

28 Apr 2016 - 9:48 pm | जव्हेरगंज

ಸರಿಯಾದ ಶ್ರೀ ವಿಜಯ್

ಸಂತೋಷವನ್ನು ನೀವು ಕನ್ನಡ ಜ್ಞಾನ ಕರೆಯಲ್ಪಡುವ

ಆದರೆ ನಾನು ಹಾಗೆ

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 10:07 pm | विजय पुरोहित

सरीयाद श्री विजय्
संतोषवन्नु नीवु कन्नड ज्ञान करेयल्वाडुव...
अदरे नानु हागे...

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 10:09 pm | विजय पुरोहित

जव्हेर्या मेल्या माका कन्नड फक्त वाचता येता मा...
समजत नाय बाकी...

भीमाईचा पिपळ्या.'s picture

29 Apr 2016 - 7:05 am | भीमाईचा पिपळ्या.

अदरे नानु हागे...

मिपा हागणदारी मुक्त झाले आहे. हे नानु हागे काय.
ननगे कन्नड बुर्गेदील्ला.

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 9:22 pm | विजय पुरोहित

बहळ संतोषवन्नु नानु इष्टा...
अभीजीत् अदन्नु इरिसिकोळ्ळलु...
बरोबर?

मुक्त विहारि's picture

29 Apr 2016 - 8:08 am | मुक्त विहारि

पुभाप्र.

ऋषिकेश's picture

29 Apr 2016 - 9:39 am | ऋषिकेश

दनका! लै झ्याक!

चौकटराजा's picture

29 Apr 2016 - 9:40 am | चौकटराजा

अभ्या म्हाराज उत्त्म कलाकार तर आहेतच पण एक चांगली जीवनद्रुष्टी असलेले साहित्ययात्री आहेत. काही दिवसानी अभ्या म्हाराजाचे या जगतावरचे पुस्तक ही निघू शकते.

नाखु's picture

29 Apr 2016 - 10:04 am | नाखु

(टिप : ह्याचा पुढचा भाग तयार असलेने अगदी लगोलग येईल. टांगारुपणा केला जाणार नाही. जुन्या कथांच्या क्रमश: भागाच्या चौकश्या करु नयेत. ;) )

आणि धागा डोक्यावर घेतलाय...

कथा बुंगाट वाचक झिंगाट

झिंगाटलेला नाखु

सुधांशुनूलकर's picture

29 Apr 2016 - 7:25 pm | सुधांशुनूलकर

लय भारी बुंगाट

पोश्टर-ब्यानरांचा आणि ब्यानरम्यानचा फ्यान
सुधांशुनूलकर

येनरी सावकार, इदु ओदि तुंबा संतोषमायितु. लगुनं पोस्ट माडपा नेक्स्ट भाग.

संजय पाटिल's picture

29 Apr 2016 - 11:34 am | संजय पाटिल

हेच म्हणतो!!

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Apr 2016 - 11:25 am | ज्ञानोबाचे पैजार

दुसरा भाग कुठे आहे?

पैजारबुवा.

अभ्या..'s picture

29 Apr 2016 - 11:39 am | अभ्या..

ल्यापटोपात हाय, आवरायलाय. भांग पाडला की पाठवतो.

वैभव जाधव's picture

29 Apr 2016 - 11:45 am | वैभव जाधव

ल्यापटोप आवरायला लागलं असलं तर त्वा मदत कर कि तेला! भांग कोन पाडतंय आनि? आवर म्हना चटाचट

चौकटराजा's picture

29 Apr 2016 - 11:45 am | चौकटराजा

आरं भांग आटोपली की म्हानायच का काय तुला ?

अन्या दातार's picture

29 Apr 2016 - 12:44 pm | अन्या दातार

भांग पाडला की पाठवतो.

अजून आला नै भाग. भांग पिउन भांग पाडत बसला कि काय?

नाखु's picture

29 Apr 2016 - 12:47 pm | नाखु

का त्याला पिडताय भांग (घेतल्यासारखे) !

अभ्याची भांग !
प्रतिसादांची रांग !!
लिखाणाला टांग,घोळ जुना जुना !!!

मिपाजगत गुरू कवी यमकराज यांना समर्पीत हा काव्य तुकडा

अभ्याच्या धाग्याचं काश्मीर होऊ नये म्हणून आणखी यमके जोडण्याचा मोह आवरत आहे. मी काय म्हणतो, नुसत्या ट ला ट र ला र लावलेल्या यमक्या प्रतिसादांचा एक धागा होऊन जाऊ दे नाखुकाका.

बॅटमॅन's picture

1 May 2016 - 9:09 pm | बॅटमॅन

यमकामागुनी यमका, मारितो प्रत्येक खमका, यासीच यशाच्या गमका, समजावे जी!!!!

फक्त यमकांचा धागा | यमकेंचि पुढामागां | घोडियांची जणों पागा | मागू येथे ||

प्रचेतस's picture

1 May 2016 - 9:46 pm | प्रचेतस

=))

कोण रे सारखंच यमकात बोलायलंय?

तर्राट जोकर's picture

29 Apr 2016 - 12:48 pm | तर्राट जोकर

हे भारी आहे.

प्रीती येके भूमी मेल्लिदे

बाळ सप्रे's picture

29 Apr 2016 - 6:13 pm | बाळ सप्रे

शिंचं क्रमशः कशाला घातलं म्हणतो मी.. ते सगळं एकदमच लिहून सोडायच की हो..

मुक्त विहारि's picture

29 Apr 2016 - 7:30 pm | मुक्त विहारि

कधी?

चौथा कोनाडा's picture

30 Apr 2016 - 2:16 pm | चौथा कोनाडा

लै भारी अभ्यादा !

..... स्केचपेननी बॉर्डर वगैरे काढून पार गिचमिड काला केलेला. अर्धे कन्नड, थोडे मराठी आन उरलेसुरले इंग्लिश भाषेतल्या अक्षरांनी केलेले अ‍ॅबस्ट्रॅक्ट जणू.

कानडी असो की मराठी, लेटेस्ट शाळामास्तर एका साचातले. पेपरातले वाक्यप्रचार आणि काही सरकारी शब्द इतकीच शब्दसंपदा सर घेऊन प्रुफरिडींगला बसले.

...... वरच्या साईडला बसवेश्वर, जवळचे एखादे जागृत देवस्थान, ग्रामदैवत, नटराज आणि सिध्देश्वर मस्ट. सगळ्यांना श्री प्रसन्न करुन खाली महाराज मंडळी. ह्या मठाचे, त्या मठाचे, ब्रह्मचारी, आचार्य वगैरे सगळे भगवे वस्त्र मुकुट आणि दाढीधारी. त्यातले काही सिध्द कॅटेगरीतले. फोटोशॉपात मागची प्रभावळ करणे मस्ट. नंतर क्रम नाट्यमंडळीच्या नावाचा. त्यात भरती गायनाचार्य आणि संगीताचार्यांची

मस्तच ! एक नंबर !! पोष्टर बॉईज सैराट-भन्नाट आवडले.

अभ्यादा, पुढचा भाग लौकर युन द्या ! उत्सुकता ताणली गेलीय !

(अवांतर : धागा कन्न्डीगाज हॉयजॅक करताहेत ?)

नाव आडनाव's picture

30 Apr 2016 - 2:19 pm | नाव आडनाव

भारी.
पुढ्चा भाग यौंद्या.

सविता००१'s picture

30 Apr 2016 - 2:30 pm | सविता००१

पुढचा भाग लौकर येउदे.

नीलमोहर's picture

30 Apr 2016 - 3:10 pm | नीलमोहर

मुन्दीना?

सरल मान's picture

30 Apr 2016 - 6:16 pm | सरल मान

सैराट झालाय धागा......

बाबा योगीराज's picture

30 Apr 2016 - 6:34 pm | बाबा योगीराज

असलं कै च्या कै लिवत जॉऊ नग. मायला तू लीवलंय त्याला हसू का लोक लिवायलेत त्येला हसू कळणा झाल बग.

मायला दुकानात जोरात हस्ता बी येत नै ब्ये. पब्लिक येड्यात काडतय.

भावा, तू लिव दमा-दमान. भांग पाड नै तर मवाची पाड, ज्ये पाडाच आसन त्ये पाडून लिव.
पण लिव भौ.

मितभाषी's picture

30 Apr 2016 - 9:34 pm | मितभाषी

अभ्या पुढला भाग कधी

असंका's picture

30 Apr 2016 - 9:39 pm | असंका

कोण कोणास म्हणाले...?

ह्याचा पुढचा भाग तयार असलेने अगदी लगोलग येईल. टांगारुपणा केला जाणार नाही. जुन्या कथांच्या क्रमश: भागाच्या चौकश्या करु नयेत

खटपट्या's picture

30 Apr 2016 - 10:52 pm | खटपट्या

आरारारा !! लयच बुंगाट लीवलय... फार्फार वर्षापूर्वी डीटीपी करायचो तेव्हा लग्नघरातील लोक्स पत्रिका छापायला यायचे त्याची आठवण झाली...

येवदे फुडचा भाग...

मी-सौरभ's picture

1 May 2016 - 8:59 am | मी-सौरभ

म्हणजे बालवाडीत असताना का हो खटपट्याभाऊ?

रच्याकने: पुढचा भाग डोक्यावरचे केस वाढून भांग पाडल्यावर येणारयेणार असे दिसते.

रातराणी's picture

1 May 2016 - 10:15 am | रातराणी

अभ्या झाला ना सैराट बघून मग आता टाक बघू पुढचा भाग. :) याचा आणि येरटेलचापण.

सुरवंट's picture

1 May 2016 - 9:01 pm | सुरवंट

कंपूबाजीचा निशेध असो

अभ्या..'s picture

1 May 2016 - 9:06 pm | अभ्या..

निषेध असो, निषेध असो.

वैभव जाधव's picture

1 May 2016 - 9:57 pm | वैभव जाधव

सुरवंट म्हणालं कंपूबाजीचा निषेध असो
अन तिकडून एक सुरवंट म्हणालं, अय्या कसं सुचतं गं?