इलेक्शनचे पोस्टर्स, बॅनर्स, बॅजेस अन स्टीकर करुन करुन डोस्कं पार कामातनं गेलेलं. तीन पगाराचा ओव्हरटाइम काढला पण महिनाभर डोळ्यासमोर नाचलेले उमेदवारांचे ते मुर्दाड चेहरे हलायचे नाव घेईनात. पार सुम्म होऊन तीन दिवसाची सुट्टी मारली. पैला दिवस सरेस्तोवर मालकाचा फोन. "ये प्रेसला पटकन"
"जमणार नाही. इलेक्शनचे अर्जंट काम तर नीट्ट करणार नाही"
"अर्रर्र इलेक्शन आग्याद आपी. कन्नड नाटक बंदद. बर्री लगोलगो."
("अरेरे इलेक्शन संपली आता. कन्नड नाटकाचे काम आलेय. पटकन ये")
अरारारारा. चला उठा राष्ट्रवीर हो.
प्रेससमोर दोन ४७४७ बोलेरो लागलेल्या.
आत जाताच मालकाने जावई असल्यागत माझी ओळख करुन दिली. "इदे नोडरी डिझाइनर. हेळ सावकारु येन्बेकु"
("हे बघा डिझायनर, सावकार तुम्हाला काय पाहिजे ते यांना सांगा")
एक कार्यकर्ता लगेच "येन्स्वामी, आरामरी?" ("काय स्वामी, आरामात का?") करुन सलगी दाखवता झाला.
"मालक ह्याना सांगा मला कन्नड येत नाही, परत तरास नको" हा व्युहाचा सुरुवातीचा भाग.
"चालतयरी कलाकार, पर्वा इल्ला, स्टार्ट मारा तुमी. आमाला येतय की तुमचं मराठी तोडंतोडं"
"द्या आप्पा मजकूर?
"मजगूर? येनु?" ("मजगूर म्हणजे काय?")
"कागद ओ. लिव्हलेला"
"ते म्हणता व्हय. आद आद. तगोरी" ("आहे आहे, हे घ्या")
मजकूर म्हणजे हे भल्या मोठ्या ड्रॉईंग शीटवर चार पाच फोटो चिकटवलेले. स्केचपेननी बॉर्डर वगैरे काढून पार गिचमिड काला केलेला. अर्धे कन्नड, थोडे मराठी आन उरलेसुरले इंग्लिश भाषेतल्या अक्षरांनी केलेले अॅबस्ट्रॅक्ट जणू.
"हेसरु येनु?" ("नाव काय नाटकाचे?") चुकुन माझ्या तोंडातून कन्नड जातेच. हळूच सावरुन नाटकाचे नाव काय विचारतो.
"ते बगा 'मांगल्य यारदु नि मडदी यारीगे"
"?"
"पुढे लिव्हा मत्तु कुंकुम तंद सौभाग्य"
"म्हणजे?"
"ते बायको कुणाची आन झोपती कुनासंगट हो"
मी खुर्चीतच पडायचा बाकी. च्यायला असले नाटक.
नंतरच्या तीन तासाच्या घमासान कानडी परिसंवादातून कळलेली माहीती अशी. सीमेवरच्या गावात ह्या मल्टीलॅन्ग्वल नाटकांना लै डिमांड. हा तीन तीन दिवस चालणारा प्रोग्राम असतो. हिरोईन, डान्सर, एक कॉमेडीयन आणि म्युझिक पार्टी बाहेरची असते. बाकी सगळी कास्ट गावातलीच. हिरोपेक्षा व्हिलनच्या रोलला जादा डिमांड. स्टाइल आणि डान्सरसोबत ठुमके मारायला मिळतात. हा रोल बहुधा पाटलाचा किंवा सरपंचाचा पोरगाच करतो. त्याची वर्गणी सगळ्यात जास्त असते, रोजचा सराव असतोच शिवाय हौस दांडगी. बाहेर थांबलेल्या दोन्ही बोलेरो बहुतेक त्याच्याच असतात. हिरो म्हणजे सेकंड पोस्ट. त्यालाही डिमांड असते पण जरा कमीच. पोलीस भरतीत वारंवार नापास होऊन इन्सपेक्टर व्हायची तमन्ना इथे पूर्ण करायची असते. हिरोचा मित्र हा सात्विक दिसणारा, शालेय भाषणस्पर्धेत बक्षीस मिळवणारा होतकरु तरूण असतो. बाकी हिरो हिरवीनीचे आइबाप, गावकरी, पुजारी, अशी पात्रे वर्गणी आणि वकूबानुसार गावकर्यांनी वाटून घेतलेली असतात. यात्रेआधीच एक महिना बाहेरच्या कलावंत मंडळींना ही सुपारी दिलेली असते. त्यांनी दिलेल्या स्क्रीप्ट (संहिता हा शुध्द शब्द ऐकायला मिळाला चक्क) नुसार तालमी चालू असतात. आम्ही सांभाळून घेऊ अशी बोली असल्याने ह्या तालमीत केवळ सपाट पाठांतर एवढेच झालेले असते. आता नाटकाची जाहीरात करणे जरुरी झालेले असते. त्यासाठी ही मंडळी आमचे सामान्य ज्ञान वाढवित असतात.
एका पाकिटात मोठ्या साइजचे २०-२५ आणि पासपोर्ट साइजचे ७०-८० फोटो. मोठे फोटो गावतल्या हौशी फोटोग्राफरने पार गुळगुळीत आणि लग्न जमवायच्या हेतूनेच मेकपलेले. बारक्या फोटोत मात्र फुल्ल व्हरायटी. शाळेच्या आयकार्डापासून व्होटर्सकार्डपर्यंत सगळे नमुने. ते एका ऑपरेटरला स्कॅन करायला दिले. कन्नड मजकूर दुसर्या एका ऑपरेटरला टाइप करायला दिला. त्याची पाठ धरुन लगेच एक शाळामास्तर बसलाच. कानडी असो की मराठी, लेटेस्ट शाळामास्तर एका साचातले. पेपरातले वाक्यप्रचार आणि काही सरकारी शब्द इतकीच शब्दसंपदा सर घेऊन प्रुफरिडींगला बसले.
आता महत्त्वाचा विषय लेआउट.
पोस्टरसाईज डेमी. साधारण दीड बाय दोन फूट. वरच्या साईडला बसवेश्वर, जवळचे एखादे जागृत देवस्थान, ग्रामदैवत, नटराज आणि सिध्देश्वर मस्ट. सगळ्यांना श्री प्रसन्न करुन खाली महाराज मंडळी. ह्या मठाचे, त्या मठाचे, ब्रह्मचारी, आचार्य वगैरे सगळे भगवे वस्त्र मुकुट आणि दाढीधारी. त्यातले काही सिध्द कॅटेगरीतले. फोटोशॉपात मागची प्रभावळ करणे मस्ट. नंतर क्रम नाट्यमंडळीच्या नावाचा. त्यात भरती गायनाचार्य आणि संगीताचार्यांची.
"ओ आर्टिस्ट, खानेका क्या करते?"
"गडबडीत डबा नाही आणला मी."
"चला निघा ओ. थोडं टिफिन मागवू हितं. अस करु चला बाहेरच. तवर आमचं नेते येतेतच ओ. आता मेन काम सुरुच करा की. थोडं सिग्रेट बिग्रेट घ्या तुमी. आपल्या कामात फ्रेश राह्यचं बगा"
त्यांच्या सोबतचं पब्लिक दर १५ मिनिटाला कुठं जाउन फ्रेश होत होतं कळलं.
बाहेर जाउन सोलापूरातही कामतच सापडावे ह्यांना. एका बेचव थाळीच्या बिलापोटी ह्यांच्या सरपंचानी हिरॉइन आणि डान्सर कशी बुक केली ह्याची रसभरीत स्टोरी ऐकून मी ह्या जाहिरातनाटकाचा पुढचा प्रयोग सजवायला सज्ज झालो.
...............................................
(क्रमशः)
.
(टिप : ह्याचा पुढचा भाग तयार असलेने अगदी लगोलग येईल. टांगारुपणा केला जाणार नाही. जुन्या कथांच्या क्रमश: भागाच्या चौकश्या करु नयेत. ;) )
वाचने
33201
प्रतिक्रिया
80
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारी! क्रमशः कशाला घातलं रे
वाचतिये.
+ १, चांगला जमलाय हा भाग !
In reply to वाचतिये. by रेवती
+२
In reply to वाचतिये. by रेवती
एकदम जोरदार सुरवात मालक.!
हान्न!
हेच म्हणतो!!!
In reply to हान्न! by वैभव जाधव
व्वाव्वाव्वाव्वा आप्पा !
ललित लेखन लय भारी करतो राव
अभ्या.. मिपाचा नागराज मंजुळे
नाही ओ डांगेअण्णा...
In reply to अभ्या.. मिपाचा नागराज मंजुळे by संदीप डांगे
अभ्याची येंट्री हीरोसारखीच
In reply to नाही ओ डांगेअण्णा... by विजय पुरोहित
आमची आर्चि लै जिगरीची. तिच्या
In reply to अभ्याची येंट्री हीरोसारखीच by विजय पुरोहित
हे ज्जिगर अभ्याभौ...
In reply to आमची आर्चि लै जिगरीची. तिच्या by अभ्या..
मिपा आणि इतर मराठी आंतरजाल
कुठाय ते पुढचं?
तेवढं भाषांतर करा कुणीतरी ...
लोल, लय भारी रे, कन्नड
जबरदस्त!
छान लेख . पुरेपुर सोलापुर .
आहा...
In reply to छान लेख . पुरेपुर सोलापुर . by सिरुसेरि
हे राह्यलंच बे
भारी लेख. बादवे 'येर्टेल' कधी
तुमचं पोश्टरबॉईज आमाला लई
संवाद लै म्हणजे लैच भारी. मजा
छलो री अप्पा !
मस्तच!
खि खि खि....जब्राट
मस्तच...
हान तिच्येयला धुरळा!! भावा
लय भारी.फुडं?
पुभाप्र
अभ्या भाषेच्या अडचणीमुळे लेख
अरे दिलंय ना भाषांतर, नीट पहा
In reply to अभ्या भाषेच्या अडचणीमुळे लेख by एक एकटा एकटाच
अरे दिलंय ना भाषांतर, नीट पहा
In reply to अभ्या भाषेच्या अडचणीमुळे लेख by एक एकटा एकटाच
सॉरी दादा
In reply to अरे दिलंय ना भाषांतर, नीट पहा by अभ्या..
+१..सकाळी उगीचच न कळल्यासारखी
In reply to सॉरी दादा by एक एकटा एकटाच
छान तरी किती वेळा म्हणायचं.
ಬಹಳ ಸಂತೋಷವನ್ನು ನಾನು ಇಷ್ಟ
बहळ संतोषवन्नु नानु इष्टा...
In reply to ಬಹಳ ಸಂತೋಷವನ್ನು ನಾನು ಇಷ್ಟ by जव्हेरगंज
ಸರಿಯಾದ ಶ್ರೀ ವಿಜಯ್
In reply to बहळ संतोषवन्नु नानु इष्टा... by विजय पुरोहित
सरीयाद श्री विजय्
In reply to ಸರಿಯಾದ ಶ್ರೀ ವಿಜಯ್ by जव्हेरगंज
जव्हेर्या मेल्या माका कन्नड
In reply to सरीयाद श्री विजय् by विजय पुरोहित
अदरे नानु हागे...
In reply to सरीयाद श्री विजय् by विजय पुरोहित
बहळ संतोषवन्नु नानु इष्टा...
In reply to ಬಹಳ ಸಂತೋಷವನ್ನು ನಾನು ಇಷ್ಟ by जव्हेरगंज
सुरुवात तर जोरदार...
दनका! लै झ्याक!
जाहिरात क्षेत्र व साहित्य
धमकी फाट्यावर
धागा डोक्यावर
घेतलाय... कथा बुंगाट वाचक झिंगाट झिंगाटलेला नाखु+१११११११
In reply to धमकी फाट्यावर by नाखु
येनरी सावकार, इदु ओदि तुंबा
हेच म्हणतो!!
In reply to येनरी सावकार, इदु ओदि तुंबा by बॅटमॅन
दोन दिवस थांबल्या नंतर विचारतोय....
ल्यापटोपात हाय, आवरायलाय.
In reply to दोन दिवस थांबल्या नंतर विचारतोय.... by ज्ञानोबाचे पैजार
ल्यापटोप आवरायला लागलं असलं
In reply to ल्यापटोपात हाय, आवरायलाय. by अभ्या..
भांग
In reply to ल्यापटोपात हाय, आवरायलाय. by अभ्या..
भांग पाडला की पाठवतो.
In reply to ल्यापटोपात हाय, आवरायलाय. by अभ्या..
गपा रे
In reply to भांग पाडला की पाठवतो. by अन्या दातार
अभ्याच्या धाग्याचं काश्मीर
In reply to गपा रे by नाखु
यमकामागुनी यमका, मारितो
In reply to अभ्याच्या धाग्याचं काश्मीर by सूड
फक्त यमकांचा धागा | यमकेंचि
In reply to अभ्याच्या धाग्याचं काश्मीर by सूड
=))
In reply to फक्त यमकांचा धागा | यमकेंचि by बॅटमॅन
हे भारी आहे.
In reply to भांग पाडला की पाठवतो. by अन्या दातार
माझं कन्नड इथं सुरू होऊन इथंच संपतं
शिंचं क्रमशः कशाला घातलं
दुसरा भाग कधी?
लै भारी अभ्यादा !
भारी. पुढ्चा भाग यौंद्या.
भारी
चेन्नगिदे !!