✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पोश्टरबॉईज

अ
अभ्या.. यांनी
Wed, 04/27/2016 - 23:34  ·  लेख
लेख
इलेक्शनचे पोस्टर्स, बॅनर्स, बॅजेस अन स्टीकर करुन करुन डोस्कं पार कामातनं गेलेलं. तीन पगाराचा ओव्हरटाइम काढला पण महिनाभर डोळ्यासमोर नाचलेले उमेदवारांचे ते मुर्दाड चेहरे हलायचे नाव घेईनात. पार सुम्म होऊन तीन दिवसाची सुट्टी मारली. पैला दिवस सरेस्तोवर मालकाचा फोन. "ये प्रेसला पटकन" "जमणार नाही. इलेक्शनचे अर्जंट काम तर नीट्ट करणार नाही" "अर्रर्र इलेक्शन आग्याद आपी. कन्नड नाटक बंदद. बर्री लगोलगो." ("अरेरे इलेक्शन संपली आता. कन्नड नाटकाचे काम आलेय. पटकन ये") अरारारारा. चला उठा राष्ट्रवीर हो. प्रेससमोर दोन ४७४७ बोलेरो लागलेल्या. आत जाताच मालकाने जावई असल्यागत माझी ओळख करुन दिली. "इदे नोडरी डिझाइनर. हेळ सावकारु येन्बेकु" ("हे बघा डिझायनर, सावकार तुम्हाला काय पाहिजे ते यांना सांगा") एक कार्यकर्ता लगेच "येन्स्वामी, आरामरी?" ("काय स्वामी, आरामात का?") करुन सलगी दाखवता झाला. "मालक ह्याना सांगा मला कन्नड येत नाही, परत तरास नको" हा व्युहाचा सुरुवातीचा भाग. "चालतयरी कलाकार, पर्वा इल्ला, स्टार्ट मारा तुमी. आमाला येतय की तुमचं मराठी तोडंतोडं" "द्या आप्पा मजकूर? "मजगूर? येनु?" ("मजगूर म्हणजे काय?") "कागद ओ. लिव्हलेला" "ते म्हणता व्हय. आद आद. तगोरी" ("आहे आहे, हे घ्या") मजकूर म्हणजे हे भल्या मोठ्या ड्रॉईंग शीटवर चार पाच फोटो चिकटवलेले. स्केचपेननी बॉर्डर वगैरे काढून पार गिचमिड काला केलेला. अर्धे कन्नड, थोडे मराठी आन उरलेसुरले इंग्लिश भाषेतल्या अक्षरांनी केलेले अ‍ॅबस्ट्रॅक्ट जणू. "हेसरु येनु?" ("नाव काय नाटकाचे?") चुकुन माझ्या तोंडातून कन्नड जातेच. हळूच सावरुन नाटकाचे नाव काय विचारतो. "ते बगा 'मांगल्य यारदु नि मडदी यारीगे" "?" "पुढे लिव्हा मत्तु कुंकुम तंद सौभाग्य" "म्हणजे?" "ते बायको कुणाची आन झोपती कुनासंगट हो" मी खुर्चीतच पडायचा बाकी. च्यायला असले नाटक. नंतरच्या तीन तासाच्या घमासान कानडी परिसंवादातून कळलेली माहीती अशी. सीमेवरच्या गावात ह्या मल्टीलॅन्ग्वल नाटकांना लै डिमांड. हा तीन तीन दिवस चालणारा प्रोग्राम असतो. हिरोईन, डान्सर, एक कॉमेडीयन आणि म्युझिक पार्टी बाहेरची असते. बाकी सगळी कास्ट गावातलीच. हिरोपेक्षा व्हिलनच्या रोलला जादा डिमांड. स्टाइल आणि डान्सरसोबत ठुमके मारायला मिळतात. हा रोल बहुधा पाटलाचा किंवा सरपंचाचा पोरगाच करतो. त्याची वर्गणी सगळ्यात जास्त असते, रोजचा सराव असतोच शिवाय हौस दांडगी. बाहेर थांबलेल्या दोन्ही बोलेरो बहुतेक त्याच्याच असतात. हिरो म्हणजे सेकंड पोस्ट. त्यालाही डिमांड असते पण जरा कमीच. पोलीस भरतीत वारंवार नापास होऊन इन्सपेक्टर व्हायची तमन्ना इथे पूर्ण करायची असते. हिरोचा मित्र हा सात्विक दिसणारा, शालेय भाषणस्पर्धेत बक्षीस मिळवणारा होतकरु तरूण असतो. बाकी हिरो हिरवीनीचे आइबाप, गावकरी, पुजारी, अशी पात्रे वर्गणी आणि वकूबानुसार गावकर्‍यांनी वाटून घेतलेली असतात. यात्रेआधीच एक महिना बाहेरच्या कलावंत मंडळींना ही सुपारी दिलेली असते. त्यांनी दिलेल्या स्क्रीप्ट (संहिता हा शुध्द शब्द ऐकायला मिळाला चक्क) नुसार तालमी चालू असतात. आम्ही सांभाळून घेऊ अशी बोली असल्याने ह्या तालमीत केवळ सपाट पाठांतर एवढेच झालेले असते. आता नाटकाची जाहीरात करणे जरुरी झालेले असते. त्यासाठी ही मंडळी आमचे सामान्य ज्ञान वाढवित असतात. एका पाकिटात मोठ्या साइजचे २०-२५ आणि पासपोर्ट साइजचे ७०-८० फोटो. मोठे फोटो गावतल्या हौशी फोटोग्राफरने पार गुळगुळीत आणि लग्न जमवायच्या हेतूनेच मेकपलेले. बारक्या फोटोत मात्र फुल्ल व्हरायटी. शाळेच्या आयकार्डापासून व्होटर्सकार्डपर्यंत सगळे नमुने. ते एका ऑपरेटरला स्कॅन करायला दिले. कन्नड मजकूर दुसर्‍या एका ऑपरेटरला टाइप करायला दिला. त्याची पाठ धरुन लगेच एक शाळामास्तर बसलाच. कानडी असो की मराठी, लेटेस्ट शाळामास्तर एका साचातले. पेपरातले वाक्यप्रचार आणि काही सरकारी शब्द इतकीच शब्दसंपदा सर घेऊन प्रुफरिडींगला बसले. आता महत्त्वाचा विषय लेआउट. पोस्टरसाईज डेमी. साधारण दीड बाय दोन फूट. वरच्या साईडला बसवेश्वर, जवळचे एखादे जागृत देवस्थान, ग्रामदैवत, नटराज आणि सिध्देश्वर मस्ट. सगळ्यांना श्री प्रसन्न करुन खाली महाराज मंडळी. ह्या मठाचे, त्या मठाचे, ब्रह्मचारी, आचार्य वगैरे सगळे भगवे वस्त्र मुकुट आणि दाढीधारी. त्यातले काही सिध्द कॅटेगरीतले. फोटोशॉपात मागची प्रभावळ करणे मस्ट. नंतर क्रम नाट्यमंडळीच्या नावाचा. त्यात भरती गायनाचार्य आणि संगीताचार्यांची. "ओ आर्टिस्ट, खानेका क्या करते?" "गडबडीत डबा नाही आणला मी." "चला निघा ओ. थोडं टिफिन मागवू हितं. अस करु चला बाहेरच. तवर आमचं नेते येतेतच ओ. आता मेन काम सुरुच करा की. थोडं सिग्रेट बिग्रेट घ्या तुमी. आपल्या कामात फ्रेश राह्यचं बगा" त्यांच्या सोबतचं पब्लिक दर १५ मिनिटाला कुठं जाउन फ्रेश होत होतं कळलं. बाहेर जाउन सोलापूरातही कामतच सापडावे ह्यांना. एका बेचव थाळीच्या बिलापोटी ह्यांच्या सरपंचानी हिरॉइन आणि डान्सर कशी बुक केली ह्याची रसभरीत स्टोरी ऐकून मी ह्या जाहिरातनाटकाचा पुढचा प्रयोग सजवायला सज्ज झालो. ............................................... (क्रमशः) . (टिप : ह्याचा पुढचा भाग तयार असलेने अगदी लगोलग येईल. टांगारुपणा केला जाणार नाही. जुन्या कथांच्या क्रमश: भागाच्या चौकश्या करु नयेत. ;) )
  • पोश्टरबॉइज -२

Book traversal links for पोश्टरबॉईज

  • पोश्टरबॉइज -२ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
नाट्य
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
33153 वाचन

💬 प्रतिसाद (80)

प्रतिक्रिया

येनरी सावकार, इदु ओदि तुंबा

बॅटमॅन
Fri, 04/29/2016 - 11:08 नवीन
येनरी सावकार, इदु ओदि तुंबा संतोषमायितु. लगुनं पोस्ट माडपा नेक्स्ट भाग.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो!!

संजय पाटिल
Fri, 04/29/2016 - 11:34 नवीन
हेच म्हणतो!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

दोन दिवस थांबल्या नंतर विचारतोय....

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 04/29/2016 - 11:25 नवीन
दुसरा भाग कुठे आहे? पैजारबुवा.
  • Log in or register to post comments

ल्यापटोपात हाय, आवरायलाय.

अभ्या..
Fri, 04/29/2016 - 11:39 नवीन
ल्यापटोपात हाय, आवरायलाय. भांग पाडला की पाठवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ल्यापटोप आवरायला लागलं असलं

वैभव जाधव
Fri, 04/29/2016 - 11:45 नवीन
ल्यापटोप आवरायला लागलं असलं तर त्वा मदत कर कि तेला! भांग कोन पाडतंय आनि? आवर म्हना चटाचट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

भांग

चौकटराजा
Fri, 04/29/2016 - 11:45 नवीन
आरं भांग आटोपली की म्हानायच का काय तुला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

भांग पाडला की पाठवतो.

अन्या दातार
Fri, 04/29/2016 - 12:44 नवीन
भांग पाडला की पाठवतो.
अजून आला नै भाग. भांग पिउन भांग पाडत बसला कि काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

गपा रे

नाखु
Fri, 04/29/2016 - 12:47 नवीन
का त्याला पिडताय भांग (घेतल्यासारखे) ! अभ्याची भांग ! प्रतिसादांची रांग !! लिखाणाला टांग,घोळ जुना जुना !!! मिपाजगत गुरू कवी यमकराज यांना समर्पीत हा काव्य तुकडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

अभ्याच्या धाग्याचं काश्मीर

सूड
Fri, 04/29/2016 - 14:26 नवीन
अभ्याच्या धाग्याचं काश्मीर होऊ नये म्हणून आणखी यमके जोडण्याचा मोह आवरत आहे. मी काय म्हणतो, नुसत्या ट ला ट र ला र लावलेल्या यमक्या प्रतिसादांचा एक धागा होऊन जाऊ दे नाखुकाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

यमकामागुनी यमका, मारितो

बॅटमॅन
Sun, 05/01/2016 - 21:09 नवीन
यमकामागुनी यमका, मारितो प्रत्येक खमका, यासीच यशाच्या गमका, समजावे जी!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

फक्त यमकांचा धागा | यमकेंचि

बॅटमॅन
Sun, 05/01/2016 - 21:12 नवीन
फक्त यमकांचा धागा | यमकेंचि पुढामागां | घोडियांची जणों पागा | मागू येथे ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

=))

प्रचेतस
Sun, 05/01/2016 - 21:46 नवीन
=)) कोण रे सारखंच यमकात बोलायलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हे भारी आहे.

तर्राट जोकर
Fri, 04/29/2016 - 12:48 नवीन
हे भारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

माझं कन्नड इथं सुरू होऊन इथंच संपतं

तुषार काळभोर
Fri, 04/29/2016 - 14:53 नवीन
प्रीती येके भूमी मेल्लिदे
  • Log in or register to post comments

शिंचं क्रमशः कशाला घातलं

बाळ सप्रे
Fri, 04/29/2016 - 18:13 नवीन
शिंचं क्रमशः कशाला घातलं म्हणतो मी.. ते सगळं एकदमच लिहून सोडायच की हो..
  • Log in or register to post comments

दुसरा भाग कधी?

मुक्त विहारि
Fri, 04/29/2016 - 19:30 नवीन
कधी?
  • Log in or register to post comments

लै भारी अभ्यादा !

चौथा कोनाडा
Sat, 04/30/2016 - 14:16 नवीन
लै भारी अभ्यादा !
..... स्केचपेननी बॉर्डर वगैरे काढून पार गिचमिड काला केलेला. अर्धे कन्नड, थोडे मराठी आन उरलेसुरले इंग्लिश भाषेतल्या अक्षरांनी केलेले अ‍ॅबस्ट्रॅक्ट जणू.
कानडी असो की मराठी, लेटेस्ट शाळामास्तर एका साचातले. पेपरातले वाक्यप्रचार आणि काही सरकारी शब्द इतकीच शब्दसंपदा सर घेऊन प्रुफरिडींगला बसले.
...... वरच्या साईडला बसवेश्वर, जवळचे एखादे जागृत देवस्थान, ग्रामदैवत, नटराज आणि सिध्देश्वर मस्ट. सगळ्यांना श्री प्रसन्न करुन खाली महाराज मंडळी. ह्या मठाचे, त्या मठाचे, ब्रह्मचारी, आचार्य वगैरे सगळे भगवे वस्त्र मुकुट आणि दाढीधारी. त्यातले काही सिध्द कॅटेगरीतले. फोटोशॉपात मागची प्रभावळ करणे मस्ट. नंतर क्रम नाट्यमंडळीच्या नावाचा. त्यात भरती गायनाचार्य आणि संगीताचार्यांची
मस्तच ! एक नंबर !! पोष्टर बॉईज सैराट-भन्नाट आवडले. अभ्यादा, पुढचा भाग लौकर युन द्या ! उत्सुकता ताणली गेलीय ! (अवांतर : धागा कन्न्डीगाज हॉयजॅक करताहेत ?)
  • Log in or register to post comments

भारी. पुढ्चा भाग यौंद्या.

नाव आडनाव
Sat, 04/30/2016 - 14:19 नवीन
भारी. पुढ्चा भाग यौंद्या.
  • Log in or register to post comments

भारी

सविता००१
Sat, 04/30/2016 - 14:30 नवीन
पुढचा भाग लौकर येउदे.
  • Log in or register to post comments

चेन्नगिदे !!

नीलमोहर
Sat, 04/30/2016 - 15:10 नवीन
मुन्दीना?
  • Log in or register to post comments

दादानु

सरल मान
Sat, 04/30/2016 - 18:16 नवीन
सैराट झालाय धागा......
  • Log in or register to post comments

अय अभ्यायययय,

बाबा योगीराज
Sat, 04/30/2016 - 18:34 नवीन
असलं कै च्या कै लिवत जॉऊ नग. मायला तू लीवलंय त्याला हसू का लोक लिवायलेत त्येला हसू कळणा झाल बग. मायला दुकानात जोरात हस्ता बी येत नै ब्ये. पब्लिक येड्यात काडतय. भावा, तू लिव दमा-दमान. भांग पाड नै तर मवाची पाड, ज्ये पाडाच आसन त्ये पाडून लिव. पण लिव भौ.
  • Log in or register to post comments

अभ्या पुढला भाग कधी

मितभाषी
Sat, 04/30/2016 - 21:34 नवीन
अभ्या पुढला भाग कधी
  • Log in or register to post comments

कोण कोणास म्हणाले...?

असंका
Sat, 04/30/2016 - 21:39 नवीन
कोण कोणास म्हणाले...?
ह्याचा पुढचा भाग तयार असलेने अगदी लगोलग येईल. टांगारुपणा केला जाणार नाही. जुन्या कथांच्या क्रमश: भागाच्या चौकश्या करु नयेत
  • Log in or register to post comments

आरारारा !! लयच बुंगाट लीवलय..

खटपट्या
Sat, 04/30/2016 - 22:52 नवीन
आरारारा !! लयच बुंगाट लीवलय... फार्फार वर्षापूर्वी डीटीपी करायचो तेव्हा लग्नघरातील लोक्स पत्रिका छापायला यायचे त्याची आठवण झाली... येवदे फुडचा भाग...
  • Log in or register to post comments

फारफार

मी-सौरभ
Sun, 05/01/2016 - 08:59 नवीन
म्हणजे बालवाडीत असताना का हो खटपट्याभाऊ? रच्याकने: पुढचा भाग डोक्यावरचे केस वाढून भांग पाडल्यावर येणारयेणार असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अभ्या झाला ना सैराट बघून मग

रातराणी
Sun, 05/01/2016 - 10:15 नवीन
अभ्या झाला ना सैराट बघून मग आता टाक बघू पुढचा भाग. :) याचा आणि येरटेलचापण.
  • Log in or register to post comments

कंपूबाजीचा निशेध असो

सुरवंट
Sun, 05/01/2016 - 21:01 नवीन
कंपूबाजीचा निशेध असो
  • Log in or register to post comments

निषेध असो, निषेध असो.

अभ्या..
Sun, 05/01/2016 - 21:06 नवीन
निषेध असो, निषेध असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरवंट

सुरवंट म्हणालं कंपूबाजीचा

वैभव जाधव
Sun, 05/01/2016 - 21:57 नवीन
सुरवंट म्हणालं कंपूबाजीचा निषेध असो अन तिकडून एक सुरवंट म्हणालं, अय्या कसं सुचतं गं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरवंट
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा