Skip to main content

महत्वाची सूचना

लेखक सरपंच यांनी सोमवार, 04/04/2016 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व सदस्यांना सूचना. मिसळपावचे धोरण सर्व सदस्यांनी पुन्हा एकदा नजरेखालून घालावे ही विनंती. यात उल्लेख केलेल्या बाबींव्यतिरिक्त आणखी एक बाब स्पष्टपणे सांगू इच्छितो, की गेल्या काही दिवसांत सदस्यांनी एकमेकांना असांसदीय भाषेचा वापर करून त्रास देण्याचे प्रकार वाढलेले नजरेस आले आहेत. मिसळपाव हे आपले सर्वांचे आणि सर्वांसाठी असले तरी वादाच्या भरात किंवा केवळ भडकवण्याची हेतूने असे वैयक्तिक अपमानास्पद लिखाण करणारे सदस्य संस्थळाचे वातावरण बिघडवतात तसेच अन्य वाचकांमधे संस्थळाची वाईट प्रतिमा उभी करतात. कृपया हे प्रकार टाळावेत आणि संस्थळावरील आपला वावर सभ्यतेच्या मर्यादांमधे बसतो आहे ना हे प्रत्येकाने पहावे. तसेच आपला तोल किंवा भान सुटते आहे का याकडे लक्ष द्यावे. असे घडत असल्यास त्याला दुसरा कोणी जबाबदार आहे वगैरे सबबी न देता प्रगल्भतेने वागून आपला संस्थळावरील वावर सर्वांनाच किमान सुसह्य होईल हे प्रत्येकाने पहावे. कोणत्याही कारणाने वैयक्तिक मतभेद झाल्यास तक्रार करण्यासाठी संपादक मंडळ आणि सरपंच हे दोन आयडी उपलब्ध आहेत त्यांना संपर्क करावा. धाग्यावर स्कोर सेटलिंग करण्याचा प्रयत्न करू नये. जे सदस्य याचा विचार न करता दुसर्‍या कोणाला अपमानास्पद अशा प्रकारचे धागे, प्रतिसाद यांचे लिखाण करतील, किंवा संपादकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून दंगा माजवतील/अन्य सदस्यांना किंवा व्यक्तींना उद्देशून असांसदीय भाषा वापरतील अशांचे सदस्यत्व आणखी कोणत्याही सूचनेशिवाय त्वरित स्थगित केले जाऊ शकते याची नोंद सर्वांनी कृपया घ्यावी. अशी अप्रिय वेळ येऊ न देण्याची जबाबदारी प्रत्येक सद्स्यावर राहील. कृपया सहकार्य करावे. धन्यवाद.

वाचने 46823
प्रतिक्रिया 133

प्रतिक्रिया

नोन्द घेतल्या गेली आहे

ओके! काही डिक्लेअर्ड डु आयडी केवळ ट्रोलिंग करायला येतात. चिथावणारे मुद्दे काढतात. त्यांना चाप बसायला मिपा संपादक मंडळ काय करण्याचा विचार करत आहे?

In reply to by पिलीयन रायडर

एका सदस्याने वापरलेल्या अश्लाघ्य भाषेबद्दल दिनांक ७ मार्च २०१६ या दिवशी संपादक मंडळाच्या सदस्यांना व्यनि केलेला आहे. त्यावर अजूनही काही कारवाई झालेली नाही. काही उत्तम लेखन आणि प्रतिसाद देणाऱ्या आयडींनी जेव्हा इथे वाचनमात्र राहायचं ठरवलं तेव्हा त्यांच्या वागणुकीचं आश्चर्य वाटलं होतं पण आता ही घोषणा वाचल्यावर त्यांचा निर्णय बरोबर होता हे लक्षात आलेलं आहे.

In reply to by पिलीयन रायडर

मुळात असे आयडी उडाल्यावरही परत येतात आणि "मीच तो" असे जाहिरही करतात...नवीन आयडीने परत आल्यावर उडालेल्या आयडीने केलेली घाण नवीन आयडीच्या अकाउंटमध्ये धरत नाहीत का?

In reply to by टवाळ कार्टा

अगदी अगदी.. एक्दम वॅलिड पाँईंट..! आणि हे एक दोन नव्हे कित्येक वेळेस परत येतात तरी त्यांना "संधी" दिली जाते. हे तर अगदीच हाईट वाटतं. म्हणजे लखोबा लोखंडे मारामारी केली म्हणून तडीपार केला गेला. तो जॉर्ज फर्नांडिस म्हणून परत आला तर चालेल. अगदी तो स्वतः "मीच तो लखोबा लोखंडे" असे सांगत असेल तरी चालेल फक्त त्याने "लखोबा लोखंडे" हे नाव वापरायला बंदी. इथे आम्हाला एक आयडी मिळवायला झालेले कष्ट आठवले की हे लखोबा (अथवा लखूबाई) कित्ती कष्टातून जात असतील आणि येत असेल याचे मात्र आश्चर्य वाटते.. :)

In reply to by अस्वस्थामा

हेच सांगायला आले होते. उदा:- नानासाहेब केंजळे म्हणुन अनेक स्त्री आयडींच्या खव मध्ये दंगा करुन अक्षरशः स्वतःला उडवुन घेतलं आणि १० व्या मिनिटाला गरिब चिमणा ह्या नावाने मला व्यनि केला "हं तर काय म्हणत होतात तुम्ही?" ह्या आशयाचा. जणु काही चहा पिऊन आलो, चला गप्पा कंटिन्यु करुया. अजुनही हा आयडी मुद्दाम प्रक्षोभक विधाने करत फिरत असतो. दंगा करण्याचा, चर्चा भरकटवण्याचा हेतु स्पष्ट दिसतो. माझ्याकडे असलेले पुरावे / व्यनि / सापडल्यास स्क्रिनशॉट मी देते. कारवाई होणार का? हे असले आयडी मिपा नांदतं ठेवायला एका अर्थी मदतच करत असतात हे मान्य आहे. पण अशाने एकंदरीतच मिपावर चर्चाच नको असे माझे तरी मत होत आहे. मी गेले काही दिवस आपोआपच वामा मोड मध्ये जातेय. असं अनेकांच होत असेल कारण खुप लोक लिहीताना दिसत नाहीत आजकाल. एकम्दरीत मिपाला माझा कायमच सपोर्ट असला आणि उगाच "गेले ते दिन गेले" सुर आळवायला मला आवडत नसलं तरी ज्या वेगाने डु आयडी येतात त्यावर मी कायमच प्रश्न विचारला आहे आणि आजतागायत उत्तर मिळालेलं नाही. ह्या धाग्यावर फारशा कधी न दिसणार्‍या आयडींना जुन्या आयडींवर चिखल फेकताना पाहुन आश्चर्य वाटत आहे.

In reply to by पिलीयन रायडर

अगदी मनातलं बोललात. एकंदरीत त्या धाग्यावरील गरीब चिमणा यांचे प्रतिसाद वाचून काय बोलावे हेच कळेना म्हणून काहीच प्रतिसाद न देता फक्त वामो ओन केला.

असांसदीय भाषा म्हणजे नक्की काय हे स्पष्ट केल्यास तिचा वापर टाळणे सोप्पे जाईल असे सुचवु इछितो, विशेष करुन खालील उल्लेख असांसदीय आहेत का असे विचारायचे आहे : १.हस्तमध्ये दुग्ध कलश घट्ट पकड २.पुचुपुचु दुगध्दओढनाथाय नम्: ३.मतिमंद बिनडोक आत्मकुंथणाचा विजय असो! ४.एष धर्म: टनाटन: ५. ** शेपुट घालणे मतभेद असणे हे प्रगल्भ समाजाचे लक्षण आहे मात्र ज्याचे मत पटत नाही त्याची वरील शब्दात टीका करणे सांसदीय आहे काय ? सांसदीय असांसदीय शब्दांच्या व्याख्या ते वापरणार्‍या आय डी नुसार बदलतात काय ?

In reply to by प्रसाद गोडबोले

सांसदीय असांसदीय शब्दांच्या व्याख्या ते वापरणार्‍या आय डी नुसार बदलतात काय ?
हे मान्य. आमचे साधे साधे प्रतिसादही उडवले जातात; पण काही मोजक्या आयडींचे अत्यंत वाह्यात व अश्लील प्रतिसाद तसेच ठेवले जातात.

In reply to by अमृता_जोशी

आणि प्रगो सर यांनी जे प्रतिसाद वरती दिलेले आहेत ते एका आत्म्याशी संबंधित आयडीचे आहेत. हा आयडी मिपा वरील जुना जाणता आयडी आहे. त्यांच्याकडून आजकाल असेच प्रतिसाद येतात धाग्यांवर. आपल्याला समोरच्याचा मुद्दा पटत नसेल तर चर्चेने आणि प्रतिवादाने तो सोडवला जातो. असे प्रतिसाद देऊन या आयडीच्या आत्म्यास कोणता आनंद मिळतो कोणास ठाऊक. असो या आयडी वर आता संपादक मंडळ काय कारवाई करते हे पाहण्यास मी उत्सुक आहे.

एक गरीब सभासद इस्लाम ची झाहिरात करायला येतो त्यांच्याकडेही बघावं,हे काय पीस चॅनेल आहे काय.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तुम्हीही तुम्हाला आवडत्या धर्माची जाहिरात करा की...सर्वधर्मसहभाव अस्लाच पाहिजे

शेपूट घातलेले कितीतरी डुआयडी इथेतिथे घाण करत सुटतात. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाल्यास आनंद वाटेल. (वाटल्यास त्यांचा IP Address ही ब्लॉक करुन टाका किंवा ब्लॅक लिस्ट मध्ये टाका )

काही स्वच्छता आवश्यक आहे. निवेदनातील भापो. काही सदस्यांना सुचना द्यायचीही आवश्यकता नाही. आभार. -दिलीप बिरुटे

जाणीवपूर्वक जिथेतिथे सुधारणावादाची धिंड काढणारे, आणि मुद्द्यात सरळ प्रतिवाद न करता आल्यावर त्याला सुधारणावादाचा बुरखा, स्वमतांध दाम्भीकता असे कुजकट धोरणी शब्द वापरणे,आणि ठरवून प्रयत्नपूर्वक संघटितपणे आगी लावत फिरणे हे वर्तन संसदीय आहे काय!? हे हि कळावे.. अशी विंनती

In reply to by अत्रुप्त आत्मा

http://www.misalpav.com/user/9160 हाच का सुधारणावाद? एका हिंदु देवतेबद्दल चित्रगुप्त यांनी काढलेले टुकार फालतू उद्गार आणि आपण त्यावर केलेले ख्या ख्या? देवतांना अशा घृणास्पद भाषा वापरणार असाल तर याहून वाईट ऐकायची तयारी ठेवावी सुधारणावादाच्या खाली नंगा नाच करणार्यांनी...

In reply to by अत्रुप्त आत्मा

आणि जिथे तिथे हिंदू धर्माला टनाटनि धर्म म्हणून टार्गेट करणारे आणि प्रत्युत्तर आल्यास अडाणी, अंधश्रद्ध,मागास,बुरसटलेले असे कुजकट धोरणी शब्द वापरणे,आणि ठरवून प्रयत्नपूर्वक संघटितपणे आगी लावत फिरणे हे वर्तन संसदीय आहे काय!? हे हि कळावे.. अशी विंनती

In reply to by अत्रुप्त आत्मा

संपादित सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी / ताशेरे / हल्ले टाळावेत.

In reply to by अत्रुप्त आत्मा

संघा'ची भूमिका स्पष्ट केल्याबद्दल धन्य वाद. :)
संघाची भुमीका ?? काय संबंध ? एकांतप्रेमी संघाचे प्रवक्ते आहेत काय ? उगाचच संघावर चिखलफेक होय ? माझा सरपंचांना हाही प्रश्न आहे की एका व्यक्तीवर केलेली टीका संपादित होते मग एका समुहावर केलेली टीका का संपादित होत नाही ? येथे संघाचा काडीमात्र संबंध नसताना त्यांच्यावर चाललेली चिखलफेक सांसदीय आहे काय ?

In reply to by प्रसाद गोडबोले

हे फ़क्त संघापुरतेच की कुठल्याही संस्थेवर चिखलफेक होऊ नये (साधक बाधक चर्चा भाग अलाहिदा) असे म्हणाल आपण? हे जाणून घ्यायला आवडेल!

In reply to by नाना स्कॉच

+१
हे फ़क्त संघापुरतेच की कुठल्याही संस्थेवर चिखलफेक होऊ नये (साधक बाधक चर्चा भाग अलाहिदा) असे म्हणाल आपण?
नानांना अगदी अनुमोदन ! कोणत्याच समुहावर मग तो संघ असो कि मिम , आर्य सनातन वैदिक धर्म असो की इस्लाम, आस्तिक असो वा नास्तिक , सामुहिकरित्या चिखलफेक योग्य नाही ! इथे काही आयडी वारंवार संघ , सनातन धर्म , आस्तिक लोकांच्या श्रध्दांवर टीका करत असतत त्यांना कधी समज दिली जाते ते पाहु आता !!

In reply to by प्रसाद गोडबोले

अत्यंत आभारी आहे! आपल्याइतकी maturity विरळ लोक दाखवतात!! नाहीतर आजवरच्या अनुभवात (वाचनमात्र असताना पासुनचा अनुभव) वेगळे बोलतो, संघाला बोल लावल्यावर विद्ध होणारी मंडळी स्वतः मात्र खुशाल अमुक एक नेत्यांचे नावच एक शिवी आहे म्हणत असत , असो it was a pleasure interacting with you sir.

स्पष्ट सूचना आवडली. पण एक निरीक्षण असं आहे की काही ठरावीक सदस्यांनी वारंवार असभ्य भाषा वापरली तरी त्यांच्यावर काही कारवाई झाल्याचं दिसत नाही. सर्व आयडींना जोवर एक नियम लावला जात नाही, तोवर हे असचं चालू राहणार असं खेदपूर्वक नमूद करते.

In reply to by आतिवास

इंटोलारंस चा उघड पुरस्कार करणारे महाभाग इथेच प्रतिसाद देत असताना आपला आवाज कोणी शहाणपणाचा मानेल यावर माझा विश्वास नाही.... तरीही सहमत आहे

धन्यवाद, माझ्या आयडीच्या बाबतीत आलेल्या वैयक्तिक प्रतिसादांवर योग्य ती कारवाई केली गेली आहे, हेही नमूद करु इच्छितो. फक्त एखाद्या आयडीच्या साध्यात साध्या प्रतिसादावर काही मंडळी 'हीन प्रतिसाद' म्हणून रीघ लावतात आणि 'पुचुपुचूदुग्धओढनाथाय' सारखा प्रतिसाद तितकाच कानाडोळा करुन दुर्लक्षिला जातो. वर 'कोणी लिहीलंय पेक्षा काय लिहीलंय त्याला महत्त्व दिलं जातं' असं छातीठोकपणे सांगितलं जातं. असो, विषय निघाला आहे म्हणून लिहीलं. अन्यथा छान चाल्लंय. कळावे.

In reply to by सूड

@पुचुपुचूदुग्धओढनाथाय >> यात हीन काय आहे??? लहान बालक भाम्डयातुन दुग्धप्राशन करताना जी लीला करते तीच हस्तमध्येदुग्धकलशघट्ट पकड पुचुपुचु दुगध्दओढनाथाय नम्: यातून गमतीने अधोरेखित केलेली आहे. हे तर आमचे अत्यन्त खेळीमेळीने केलेले चिडवा चिडवीचे संदर्भ आहेत. त्यांना इथे मुद्दाम सँघटीतपणे का बरे ओढून आणले जात आहे?

In reply to by अत्रुप्त आत्मा

मग आमची "लय जोरात पिकल्यात आंबं" का म्हणून उडवली असेल ब्वॉ! एका बागायती शेतकऱ्याची गाथा होती ती ! ('आपला तो बाळ्या, दुसऱ्याचं ते कारटं' हे असले प्रकार येथे चालूच असतात हे खेदाने म्हणावेच लागेल )

In reply to by टवाळ कार्टा

आपण सगळं काही याच आयडीने करतो. कविता वाचलेली दिसत नाही तुम्ही! तुम्हाला दुसरीच कविता कुण्या तिसऱ्यानं पाठवली असेल! आपण डुआय च्या भानगडीत कधी पडलो नाय ब्वॉ! बाकी तुमच्या कुठल्या आयडीला कविता पोहोचली म्हणायची?

In reply to by जव्हेरगंज

तुम्ची कवीता मला पाठवाल का? बहुतेक मी वाचली नव्हती :) आणि मला ज्या आयडीने ती कवीता पाठवलेली ती कवीता बहुतेक तुम्च्या कवीतेचे विडंबन असावे...आयमायस्वारीबर्का :)

In reply to by टवाळ कार्टा

ती कवीता बहुतेक तुम्च्या कवीतेचे विडंबन असावे.
आधि मला ते विडंबन पाथवा. मग मी पथव्तो.

In reply to by टवाळ कार्टा

ती क्विता पाठवलीये
ते तर मझ्याच कवितेच विदम्बन आहे. बाकि याचे महान विदम्बन्कार कोन अस्तिल याचा विचार कर्तोय.

In reply to by अत्रुप्त आत्मा

लहान बालक भाम्डयातुन दुग्धप्राशन करताना जी लीला करते तीच
अरेच्चा!! फारच निरागस आहे हे!! काय मग बुवा तुम्ही आज हस्तमध्येदुग्धकलश घट्टपकड करुन पुचुपुचुदुग्ध ओढलेत की नाही?

In reply to by अत्रुप्त आत्मा

खरं तर यापेक्षा फार चांगली कामं पुढ्यात आहेत. तुम्ही सार्वजनिक मुद्दा मांडला होतात. उत्तर देखील इथेच दिलंत तर बरं होईल.

एवढा मोठा गोतावळा संभाळने फार अवघड काम आहे, त्यात आणखी पिंडे पिंडे मतभिन्नता असनारच, पन म्हणुन सभ्यतेच्या मर्यादा सोडुन बोलने न पटनारेच आहे, मिसळपावचे काही आयडी आमच्या सारख्या सामान्य/फुकटवाचक आयडींसाठी स्टार पेक्षा कमी नाहीत, इथले खेळकर वातावरण टिकवण्याची जबाबदारी मात्र संस्थळ मालकांची नसुन इथे वावरनारांची, नवनवे वाचायला / प्रकाशित करायला किंवा धमाल करायला येनारांची आहे, थोडक्यात काय तर आपल्याला फुकटात बरच काही भेटलय थोड्यांचा नालायकपना न सगळ्यांची माती व्हायची येवढे बोलुन मि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मिसळपाव

In reply to by भीमराव

येवढे बोलुन मि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मिसळपाव
ओ, पन तुमी "भारत माता की जय" का म्हनला नाय ओ ?

In reply to by भीमराव

बरोबर आहे बाबुदा. पण काये ना की याच भूमीवर राहून, इथेच व्यवसाय, नोकर्या, भटजीगिरी करणारे काहीजण पुन्हा आंतरजालावर हिंदु धर्म, देवीदेवता, श्रद्धास्थाने यांचेविषयी अश्लाघ्य, घृणास्पद, निंदाजनक गर्दभ लाथा झाडत फिरतात. तेव्हा असल्या मर्कटमानवांच्या लीलांचा बंदोबस्त करावाच लागतो हो.

In reply to by भीमराव

संपूर्ण प्रतिसादाला अनुमोदन! मिपा फुकट आहे हे यानिमित्ताने अधोरेखित करतो. पैसे देऊन मेगाबायटी प्रतिसाद किंवा एकूणच हमरीतुमरी, स्कोर सेटलिंग, कंपूबाजी हे काही सदस्य करतील का? असा प्रश्न पडतो. करून टाका वार्षिक सभासद फी, होऊन जाऊदे! ई लोवे मिपा! :) Sandy

In reply to by एस

गेल्या वेळेप्रमाणेच हाही बाण अचूक वर्मी लागला की! =)) बादवे, मला अशा आयडींमागील व्यक्तींबद्दल कधीकधी कणव वाटते. बिचारे मानसिकदृष्ट्या अस्थिर असतात. त्यामागे बहुतेक वेळेस शोषणाचा, पीडनाचा इतिहास असतो. त्यातून येणारी असुरक्षिततेची भावना हे लोक टाळू शकत नाहीत. शिवाय आपल्या कृत्यांची जबाबदारी घेण्याइतपत धैर्यही यांच्या छातीत नसते. मग या सगळ्या कुचंबणेतून डुआयडी घेऊन प्रच्छन्न शिवीगाळ करणे, प्रक्षोभक प्रतिसाद देणे, चिखलफेक करणे असे प्रकार यांच्या हातून घडतात. या असुरक्षिततेच्या व आत्मविश्वासाच्या अभावाच्या मुळाशी सामाजिक अस्वीकृतीची जाणीव यांच्या मनात असते व ती भयानकपणे यांना त्रास देत असते. तेव्हा आपणही यांच्या प्रतिसादांच्या पातळीवर खाली चिखलात उतरून प्रत्युत्तर देऊ पाहणे हे एका अर्थाने त्यांच्या ह्या मानसिकतेला खतपाणी घालणेच ठरेल.

वैयक्तिक अपमानास्पद लिखाण करणारे सदस्य संस्थळाचे वातावरण बिघडवतात वैयक्तिक आणि अपमानास्पद याची एकच आणि निर्विवाद व्याख्या सर्वांसाठी जाहीर व्हावी. कोणत्याही कारणाने वैयक्तिक मतभेद झाल्यास तक्रार करण्यासाठी संपादक मंडळ आणि सरपंच हे दोन आयडी उपलब्ध आहेत त्यांना संपर्क करावा अशा तक्रारींची दखल घेतली जात नाही असा अनुभव आहे. परिणामी संबधित प्रतिसाद धोरणात बसतो आणि त्यात कोणताही व्यक्तिगत रोख किंवा अपमान नाही असा अर्थ निघतो. मग त्यावर तशाच स्वरुपाचे प्रतिसाद देण्याशिवाय पर्याय राहात नाही. एकदा असा सिलसिला सुरु झाला की वातावरण बिघडत जाते. हे दुष्टचक्र थांबवायचं असेल तर पहिल्यांदा `व्यक्तिगत रोख आणि अपमान' यांची स्पष्ट व्याख्या हवी आणि त्यानुसार कोणत्याही सदस्यानं तक्रार केल्यास त्याला संमंकडून किमान उत्तर (स्पष्टीकरण नाही) तरी दिलं जावं. मूळात तक्रार निवारणाची प्रक्रिया जितकी जलद तितकी व्यक्तिगत आणि अवमानकारक प्रतिसाद आणि लेखन संपुष्टात येण्याची शक्यता जास्त.

In reply to by विवेक ठाकूर

हा हा वरती स्वतःला इन्स्पेक्टर प्रध्युम्न समजणारे काही स भुक्कड फारच थयथयाट करून राहीलेत हो!

In reply to by एकांतप्रेमी

कोण आयडी कसा आहे आणि काय करतोयं यावर नाही. माझा गैरसमज झाला असेल तर माफ करा.

In reply to by विवेक ठाकूर

हे दुष्टचक्र थांबवायचं असेल तर पहिल्यांदा `व्यक्तिगत रोख आणि अपमान' यांची स्पष्ट व्याख्या हवी आणि त्यानुसार कोणत्याही सदस्यानं तक्रार केल्यास त्याला संमंकडून किमान उत्तर (स्पष्टीकरण नाही) तरी दिलं जावं. मूळात तक्रार निवारणाची प्रक्रिया जितकी जलद तितकी व्यक्तिगत आणि अवमानकारक प्रतिसाद आणि लेखन संपुष्टात येण्याची शक्यता जास्त.
हे पटलं साहेब! पण कसं आहे ना , संपादक संपादक म्हणवणारे जे व्यक्ती आहेत ते पण तुमच्या माझ्यासारखे मिपाकर आहेत. त्यांनाही स्वतःच्या पोटापाण्यासाठी काहीतरी कामधंदा करावाच लागत असेल ना! त्यामुळे कधी कधी उशीर होणे , किंवा छोटया छोट्या गोष्टी दुर्लक्ष होणे साहजिकच आहे. त्यामुळे मला असं प्रामाणिकपणे वाटते की आपण सर्वांनीच थोडी परिपक्वता दाखवावी. वाद होणारच नाही असं नाही. पण तरी आपली बाजू मांडताना आपल्या स्वतःचा तोल तर जात नाही ना हे प्रत्येकाने पहायला हवे. अर्थात हे फक्त तुम्हाला उद्देशून नाहीऐ. माझ्यासगट सर्वच मिपाकरांना उद्देशून आहे. मिपा आपले सर्वांचे आहे तर ते चांगले ठेवणेही आपल्या सर्वांचेच काम आहे ना.

In reply to by उगा काहितरीच

पण तक्रार निवारण जलद व्हायला पाहिजे. म्हणजे व्यक्तिगत रोख असलेले किंवा अवमानकारक प्रतिसाद ताबडतोप डिलीट व्हावेत अशी अपेक्षा आहे. त्यामुळे संबधित सदस्यांना लगेच समज मिळेल आणि त्यावर प्रतिसादांच्या फैरी झडणारच नाहीत. तस्मात, वातावरण बिघडण्याची शक्यता संपेल. अर्थात त्यासाठी : वैयक्तिक आणि अपमानास्पद याची एकच आणि निर्विवाद व्याख्या सर्वांसाठी जाहीर व्हावी हे खरं !

व्यक्तिलक्ष्य तर्कदोषाचे सर्वाधिक प्रमाण असते, अनफॉर्च्युनेटली या धाग्यावरही व्यक्तिलक्ष्य तर्कदोषाचे प्रदर्शन पहावयास मिळते आहे. व्यक्तिगत आरोप व्यक्तिलक्ष्य तर्कदोष ("व्यक्तिगत आरोप " अथवा "व्यक्तिगत हल्ला") सहसा विरोधकांचा युक्तीवाद अग्राह्य ठरावा या उद्देशाने विरोधकाच्या दाव्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातो; यात विरोधकाच्या युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या कृती अथवा विरोधकाच्या चारीत्र्यातील खऱ्या (पण सदहुर युक्तिवादाशी संबंधीत नसलेल्या) उणीवांकडे लक्ष वेधणे याचा आंतर्भाव केला जातो. एखाद्या व्यक्तिच्या समर्थ युक्तिवादाची तुलना त्या व्यक्तिच्या चारीत्र्यविषयक इतर गुणांशी, अथवा संबंध नसलेल्या कृतीशी करणे हा एक तर्कदोष असतो. युक्तीवादच अस्तीत्वात नसेल तर केवळ verbal abuse , however,व्यक्तिलक्ष्य तर्कदोष अथवा कोणत्याही प्रकारचा तर्कदोष म्हणवला जाऊ शकत नाही.[३] उदाहरणे " महापौरपदाच्या उमेदवाराचा विभागीकरण विषयक प्रस्ताव हास्यास्पद आहे. २००३ मध्ये त्यांच्यावर करचुकवेगिरीचे आरोप झाले होते." " तू एवढा काय दिडशहाणा लागून गेला आहेस की इश्वराचे अस्तीत्वसुद्धा नाकारू शकतोस ? तुझे शालेय शिक्षण सुद्धा अजून पूर्ण झालेले नाही." "डॉ.स्मीथ एवढे नावाजलेले हृदयरोग तज्ञ आहेत, तरीही त्यांना जुगार खेळण्याच्या कारणावरून अटक का केली गेली?" "तुमचे फॅशन बद्दलचे मत अवैध आहे ;कारण तुम्हाला साधी नवे बूट घेणे देखील परवडत नाही." "सरकारच्या आर्थीक स्थितीवर मत मांडावयास मोहन आहे तरी कोण? त्याला स्वत:ला साधी नौकरी सुद्धा नाही!"

In reply to by माहितगार

.................. संपादित सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी / ताशेरे / हल्ले टाळावेत.