ज्ञानदेवे रचिला पाया, ............ तुका झालासे कळस!

वारकरि रशियात's picture
वारकरि रशियात in जनातलं, मनातलं
16 Sep 2008 - 11:38 am

ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!

आपल्यापैकी बर्याच जणाना आपल्या होम पेज वरचे हे दोन चरण माहित असणारच ! आणि ते एखाद्या अभन्गातून उद्ध्रुत केले आहेत हेही माहित असणारच !

फक्त कदाचित हे अवगत नसेल की हे दोन चरण त्या अभन्गात सलग (ओळीने) नसून येथे मध्यमपदलोपी समास (!) झालेला आहे. तसेच हा
अभन्ग कोणाचा हेही फार कमी जणाना अवगत असावे.
तेव्हा थोडे या सन्दर्भातः

सम्पूर्ण अभन्ग असा -

सन्त क्रुपा झाली इमारत फळा आली
ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया
नामा तयाचा किन्कर तेणे विस्तरिले आवार
जनी जनार्दन एकनाथ स्तम्भ दिला भागवत
तुका झालासे कळस भजन करा सावकाश
बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा.

या अभन्गाच्या कर्त्या साध्वी बहिणाबाई यान्चे चरित्र तसे अज्ञातच! स्त्री सन्त मालिकेतील अग्रेसर मुक्ताई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मिराबाई यान्चेसह बहिणाबाईन्चे स्थान मानावे लागेल.

गोदावरीच्या उत्तरेस घ्रुश्णेश्वराच्या पश्चिमेस बारापाड्याचे जवळ 'शेऊर' या गावी या साध्वीचा जन्म झाला. त्याच गावातील पाठक कुटुम्बात त्यान्चा विवाह झाला. घरची गरीबी, शि़क्शणाचा अभाव, तरीही समाधानी वॄत्ती. सन्तव्रुत्तीला साजेशी पाण्डुरन्गाची ओढ मनात होतीच.
अखन्ड नामस्मरण चालू असे. शेतात काम करित असतानाही हा भक्तिभाव अभन्गान्चे रूपाने त्यान्च्या मुखातून बाहेर पडे.
पूर्वीच्या जन्मात त्यान्चे हातून उच्च कोटीची साधना घडली असली पाहीजे. म्हणूनच या जन्मी कोणाचाही ताद्रूश उपदेश लाभलेला नसतानाही त्या श्रेश्ट भक्त झाल्या.

त्यान्चे वर्णन करताना (गेल्या शतकातील एक श्रेश्ट सन्त, सन्तचरित्रकार आणि 'श्री गजानन विजय'कर्ते) सन्तकवी दासगणू महाराज लिहितात ..
पहा केवढा अधिकार .. रुणि तिचा परमेश्वर ...

असे सान्गतात की त्याना त्यान्च्या पूर्वीच्या तेरा जन्मान्चे स्मरण होते. या साध्वीच्या चरित्रातील एकच प्रसन्ग ज्ञात आहे तो असा:
नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पन्ढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थन्डी वाजून ताप भरला.परन्तू पाण्डुरन्गाच्या भेटीची केवधी तळमळ ! त्यानी अन्गावरच्या फाटक्या घोन्गडीला विनन्ती केली, " ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवधी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगिन." ही घोन्गडी त्यानी एका झाडावर थेवली व त्या वारीस निघून गेल्या.
त्या सुखरूप परत येईपर्यन्त ते झाड हीव भरल्यामुळे थड्थड हालत होते. सन्त सन्कटे थोपवीतात पण (आपले) भोग चुकविण्यासाठि नव्हे.

या साध्वीची समाधी त्यान्च्या 'शेऊर' या गावी आहे.
तुकोबारायान्चे स्वप्नोपदिश्ट शिश्य निळोबाराय - त्यान्चे शिश्य शन्करस्वामी या महात्म्याचे वास्तव्य व समाधी याच गावी. हे पुण्यक्शेत्र साध्वी बहिणाबाईन्च्यामुळे अधिकच पावन झाले आहे.

संस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Sep 2008 - 2:27 pm | llपुण्याचे पेशवेll

बहीणाबाईंबद्दल इतकी उत्तम माहीती पुरवल्याबद्दल शतशः धन्यवाद.
पुण्याचे पेशवे

वारकरि रशियात's picture

16 Sep 2008 - 2:45 pm | वारकरि रशियात

बद्ध (ते ) मुक्त
आभार आणि धन्यवाद!

विसुनाना's picture

16 Sep 2008 - 2:34 pm | विसुनाना

लेख आवडला. असेच लेख अजून येऊ द्या.

वारकरि रशियात's picture

16 Sep 2008 - 2:57 pm | वारकरि रशियात

बद्ध (ते ) मुक्त
आभार आणि धन्यवाद! मी या ठिकाणी नवीन. त्यामुळे माहीत नव्हते की कश्या प्रतिक्रिया येतील.
जरूर लिहीन - वेळ होईल तसतसे.

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 2:39 pm | विसोबा खेचर

चांगली माहिती....

वारकरीबुवा, येऊ द्या अजूनही...

आपला,
(हभप) तात्या.

वारकरि रशियात's picture

16 Sep 2008 - 2:59 pm | वारकरि रशियात

बद्ध (ते ) मुक्त
आभार आणि धन्यवाद! मी या ठिकाणी (म्हणजे मि.पा. वर) नवीन.
जरूर लिहीन - वेळ होईल तसतसे.

स्वाती राजेश's picture

16 Sep 2008 - 2:58 pm | स्वाती राजेश

मस्त माहिती आहे बहिणाबाईंची.....धन्यवाद!!!!!!!!
अशीच आणखी येऊ देत.....हा धागा सुंदर सुरु केला आहे....:)

राघव's picture

16 Sep 2008 - 4:02 pm | राघव

आपल्यासाठी तर बॉ सगळीच माहिती नवीन. त्यामुळे जास्तच अप्रुप त्याचे!!
पहा केवढा अधिकार .. रुणि तिचा परमेश्वर ... वाहवा! खूप छान!
थोडे शुद्धलेखन सांभाळलेत तर आणखी मजा येईल वाचायला. शुभेच्छा! :)

(नामस्मरणप्रेमी)मुमुक्षु

वारकरि रशियात's picture

16 Sep 2008 - 4:34 pm | वारकरि रशियात

बद्ध (ते ) मुक्त
धन्यवाद! खरे म्हणजे मला मराठितून लिहिण्यात काहीच गति नाही व तन्त्रही अवगत नाही. (म्हणजे कॉम्प्युटर वर).
मलाही अशुद्धलेखनाची अजिबात आवड नाही!
पण लिहीन व शिकेन म्हणतो!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Sep 2008 - 5:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरीच जास्त माहिती कळली बहिणाबाईंबद्दल! धन्यवाद.

>> मलाही अशुद्धलेखनाची अजिबात आवड नाही!
:-)
http://www.misalpav.com/node/1312
याचा उपयोग होऊ शकेल.

अनिल हटेला's picture

16 Sep 2008 - 4:42 pm | अनिल हटेला

बहीणाबाईंबद्दल इतकी उत्तम माहीती पुरवल्याबद्दल शतशः धन्यवाद.

अशीच आणखी येऊ देत.....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

बद्ध (ते ) मुक्त
ज्ञात महात्म्यांबद्द्लची अधिक माहिती की अल्पज्ञात महात्म्यांबद्द्लची अज्ञात माहिती वाचायला आवडेल?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Sep 2008 - 5:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भागवत संप्रदायाचा इतिहास बहिणाबाईंनी अतिशय समर्पक उभा केला आहे.
बहिणाबाईंच्या माहितीबद्दल आभारी . वारकरी संताबद्दल अजून लेखन येऊ द्या !!!

बहिणी म्हणे फडकती ध्वजा ! निरुपण केले ओजा

असे पाहिजे होते असे वाटते. ( चुभुदेघे) इथेही तोच अभंग पाहता येईल.

-दिलीप बिरुटे
(वार-करी )

वारकरि रशियात's picture

16 Sep 2008 - 5:45 pm | वारकरि रशियात

बद्ध (ते ) मुक्त
पाठभेद आहेतच. तरिही बारकाईने वाचल्याबद्दल आणि अश्या विषयी अधिक आस्था असल्याबद्दल धन्यवाद.
( या जगात ब्रह्माशिवाय काहिही निर्दोष असू शकत नाही यावर विश्वास असणारा) !!!

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 5:53 pm | विसोबा खेचर

बद्ध (ते ) मुक्त

हा काय प्रकार आहे?

प्रत्येक वेळेला 'बद्धकोष्ठ' हा शब्द उगाचंच आठवतो...! :)

असो...

तात्या.

वारकरि रशियात's picture

16 Sep 2008 - 6:23 pm | वारकरि रशियात

बद्ध (ते ) मुक्त
तात्या,
मला सांगा, तुम्ही मुक्त असलात, तरी आमच्यासारख्या बद्धांकडून खेचरी मुद्रेची का अपे़क्षा करताय?

विसोबा खेचर's picture

16 Sep 2008 - 6:28 pm | विसोबा खेचर

माझा प्रश्न आपल्याला नीट कळलेला दिसत नाही!

मी केवळ आपण प्रत्येक ठिकाणी 'बद्ध ते मुक्त' असे का लिहिले आहे हा साधा प्रश्न विचारला होता. वारंवार बद्ध हा शब्द वाचल्यामुळे बद्धकोष्ठ या शब्दाची आठवण होते असेही लिहिले आहे. आता यात खेचरी मुद्रेचा संबंध कसा आला ते समजले नाही...

असो...

तात्या.

वारकरि रशियात's picture

17 Sep 2008 - 11:18 am | वारकरि रशियात

बद्ध (ते ) मुक्त

तसं न्हाइ व तात्या !

सुनील's picture

17 Sep 2008 - 12:18 pm | सुनील

साध्वी बहिणाबाईंची ओळख करून दिल्याबद्दल आभार.

खानदेशी भाषेत सुंदर रचना करणार्‍या बहिणाबाई चौधरी आणि साध्वी बहिणाबाई ह्या दोन वेगळ्या व्यक्ती असाव्यात असे वाटते. कृपया खुलासा करावा.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वारकरि रशियात's picture

17 Sep 2008 - 12:29 pm | वारकरि रशियात

मुक्तसंगः अनहंवादि

होय. या दोघी वेगळ्या व्यक्ती आहेत.

खानदेशी भाषेत (खरे तर अहिराणी भाषेत) सुंदर रचना करणार्‍या बहिणाबाई चौधरी या सोपानदेव चौधरींच्या मातोश्री.

सुनील's picture

17 Sep 2008 - 1:33 pm | सुनील

खुलाशाबद्दल धन्यवाद. परंतु मुक्तसंगः अनहंवादि म्हणजे काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वारकरि रशियात's picture

17 Sep 2008 - 3:04 pm | वारकरि रशियात

मुक्तसंगः अनहंवादि
सुनिल बुवा,
तुमचा प्रश्न म्हणजे गहन तत्वचर्चेची सुरूवात! (अगदी अथातो तत्वजिज्ञासा !) तीही केव्हातरी करु !
पण थोडक्यात -
मुक्तसंगः म्हणजे संग (अर्थात संग दोषांपासून - षड्विकारांपासून) मुक्त
अनहंवादि म्हणजे अहंकारापासून मुक्त
ही श्रीमद्भगवद्नीतेतील सात्विक कर्त्याची लक्षणे आहेत.
हा संतमहात्म्यांचा (मुक्त) सहजस्वभाव असतो,
आणि
ईतरेजनांचा (बद्ध, पामर, मुमू़क्षू ) - माझ्यासारख्याचा - आदर्श असावा अशी अपेक्षा आहे!
आता (जास्त न पकवता) थांबतो!

सुनील's picture

17 Sep 2008 - 4:13 pm | सुनील

सुनिल बुवा,
तुमचा प्रश्न म्हणजे गहन तत्वचर्चेची सुरूवात! (अगदी अथातो तत्वजिज्ञासा !)
बापरे!! होते अशी चूक कधी कधी. पुन्हा नाही करणार!!

तीही केव्हातरी करु !
ठीक ठीक.

आता (जास्त न पकवता) थांबतो!
धन्यवाद! (नाहीतरी डोक्यावरूनच चाललं होतं!)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विसोबा खेचर's picture

17 Sep 2008 - 4:34 pm | विसोबा खेचर

सुनील,

बापरे!! होते अशी चूक कधी कधी. पुन्हा नाही करणार!!

तरी तुला दहा दहा वेळा बजावून सांगत होतो की आपला वकूब नसलेल्या चर्चा ओढवून घेऊ नयेत म्हणून!

'मुक्तसंगः अनहंवादि म्हणजे काय?' हा वाघापुढे नि:शस्त्र होऊन उभं राहण्यासारखा प्रश्न विचारायचा शाणपणा तुला कुणी सांगितला होता? :)

आता भोग आपल्या कर्माची फळं! :)

आपला,
(स्थितप्रज्ञ, ब्रह्म, तत्व, गहन, षडविकार, सात्विक कर्ता, स्थितप्रज्ञ, द्वैत, अद्वैत, कृष्णद्वैपायन,अयमात्मा, इह-अमुत्र-फलयोग विराग, शमदमादी संपद इत्यादी शब्दांना चळाचळा कापणारा!)

तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.

पद्मश्री चित्रे's picture

17 Sep 2008 - 4:33 pm | पद्मश्री चित्रे

नवीन माहिती मिळाली. धन्यवाद