Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by साहित्य संपादक on Wed, 03/02/2016 - 01:10
लेखनविषय (Tags)
कविता
विडंबन
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
आस्वाद
प्रतिभा
अरे होली के दिन, दिल खिल जाते है रंगो मे रंग मिल जाते है... अरे होली खेले रघुवीरा अवध में होली खेले रघुवीरा... आज ना छोडेंगे बस हमजोली; खेलेंगे हम होली...
काही नाही; होळी, रंगपंचमीचे वेध लागलेत. होळी जवळ आली की असंच होतं; हो की नाही? कुणाच्या नावाने बोंबा मारायच्या; कुणाला रंगवायचं, असे बेत मनात शिजायला लागतात. तसं, आपलं मिपा सदोदित रंगलेलंच असतं वेगवेगळ्या रंगांत; पण होळी, रंगपंचमी म्हणजे स्पेशलच. याच स्पेशल रंगपंचमीच्या निमित्ताने एक स्पेशल स्पर्धा घ्यायची ठरलेली आहे. रंगपंचमीत जशी रंगांची उधळण असते तसेच रंग कवितांच्या विश्वातही असतात. अनेक रंग, अनेक ढंग यांनी हे कवितांचं जग बहरलेलं आहे. त्यापैकी एक रंग असा आहे की जो बोंबा मारत येतो; आणि तो ज्या रंगात म्हणून मिसळेल त्या रंगाला खुलवून टाकतो; आणि एक वेगळाच रंग तयार होतो. विडंबन. रंगीबेरंगी काव्यविश्वातला हा अतरंग. याच रंगात आपण आपलं मिपा रंगवायचंय. मराठी विडंबनविश्व ज्यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही अशा आचार्य अत्र्यांचं, किंवा केशव कुमारांचं प्रथम स्मरण करुयात. मिपा विडंबन स्पर्धा तर विडंबनहौशींनो सज्ज व्हा. विडंबनहौशी नसाल तरीही सज्ज व्हा. स्पर्धेचे नियम खालीलप्रमाणे असतील. १. विडंबन कुठल्याही मराठी कवितेचं/गाण्याचं करता येईल. म्हणजेच, कच्चा माल तुम्ही आपापल्या पसंतीचा निवडायचाय. पण अट अशी आहे की विडंबनातून तयार होणारं नवकाव्य हे खाली दिलेल्या तीन पैकी एका रंगात रंगलेलं असायला हवं, म्हणजेच ते खालीलपैकी एका विषयावरचं काव्य व्हायला हवं. २. प्रत्येक स्पर्धक प्रत्येक विषयाची एक अशा एकूण तीन प्रवेशिका विडंबन स्पर्धेसाठी देऊ शकतो. ३. विडंबनाची भाषा मराठीच असायला हवी. ४. मूळ काव्याच्या चौकटीला कमीत कमी धक्का लावून विडंबन केलं जावं. म्हणजेच, वृत्त, मात्रा, गण इत्यादींचे नियम पाळून केल्या गेलेल्या विडंबनाला जास्त मार्क असतील. ५. विडंबनाची भाषा अश्लील नसावी. ६. विडंबनाला समर्पक शीर्षक देणे आवश्यक आहे. ७. कोपरखळ्या, टोमणे चालतील, परंतु व्यक्तिगत टीका, ताशेरे असलेली काव्य ग्राह्य धरली जाणार नाहीत. ८. विडंबन मिपावर पूर्वप्रकाशित नसावे. प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीस व्यनितून किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवायच्या आहेत. प्रवेशिका पाठवताना मूळ काव्य, कवी व इतर उपलब्ध तपशिलासकट पाठवायच्या आहेत. विजेता निवडण्याकरता मतदान पद्धत अवलंबली जाईल. तीन विषयांच्या कवितांचे तीन स्वतंत्र धागे काढले जातील व त्यावर ग्राह्य प्रवेशिका प्रकाशित होतील. मिपाकरांनी तीन क्रमांक निवडणे अपेक्षित आहे. (उदाहरणार्थ - क्रमांक १ - विडंबन क्र य, क्रमांक २ - विडंबन क्र क्ष, या प्रमाणे). मतांची मोजणी करून अंतिम विजेत्याची निवड होईल. आज दिनांक २ मार्च पासून १७ मार्च पर्यंत प्रवेशिका पाठवण्यासाठीची मुदत असेल. १८ ते २४ मार्च पर्यंत मतदानासाठी वेळ असेल. २८ मार्च रंगपंचमीच्या दिवशी स्पर्धेचे विजेते जाहीर केले जातील. मग तयार आहात रंगांची उधळण करायला? विडंबन करायचे विषय खालीलप्रमाणे
  • प्रेम
  • राजकारण
  • फजिती
चला तर.... मुरलेले मिपाकर एव्हाना सरसावले असतीलच. पण नवमिपाकरांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमच्याकडून आग्रहाचं निमंत्रण आहे.
'विडंबनी नव्या दिसोत नव रंग हे लोकहो उडून कल्ला मिळोत बहुरंग मिपास हो' किती भिजवू नि रंगवू कुणाला रंगपंचमीचा सण आला रंगपंचमीचा सण आला फुगे फुगवू चला पिचकारी भरा आला आला हा बकरा आला
चला चला, येऊदेत एक से एक काव्य!
  • Log in or register to post comments
  • 21402 views

प्रतिक्रिया

Submitted by बाजीप्रभू on Wed, 03/02/2016 - 06:34

Permalink

आमीबी

कुनी 'ट' ला 'ट' आनि 'फ' ला 'फ' जुळिवनार, अनं पब्लिक त्ये आतून आलंय म्हननार, आमास्नी नाय कवा आतून आल्यागत वाटनार, तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार!!
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 03/02/2016 - 06:52

Permalink

हे तत्तर तत्तर तत्तर

हे तत्तर तत्तर तत्तर... भारीच है! आता फूल्ल्ल टू धिंगाणा! एखाद्या गोष्टीला 'अधिकृत' कसे करावे, हे मिपाकडून शिकले पाहिजे! Sandy
  • Log in or register to post comments

Submitted by एक एकटा एकटाच on Wed, 03/02/2016 - 07:13

Permalink

हा हा हा अब आएगा मजा

हा हा हा अब आएगा मजा
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामी संकेतानंद on Wed, 03/02/2016 - 08:17

Permalink

आयला! सुचायला पाहिजे विडंबन!

आयला! सुचायला पाहिजे विडंबन! जुने पण कुठेही(फेसबुक वगळता) प्रकाशित न झालेले चालतील का?
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Wed, 03/02/2016 - 13:28

In reply to आयला! सुचायला पाहिजे विडंबन! by स्वामी संकेतानंद

Permalink

तुम्ही तर यात अव्वल आहात.

तुम्ही तर यात अव्वल आहात. शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 03/02/2016 - 08:24

Permalink

धमाल स्पर्धा होईल ही

धमाल स्पर्धा होईल ही.विडंबनकारांना पायघड्या घालुन आमंत्रण! फेका फुगे मारा बोंब!
  • Log in or register to post comments

Submitted by मितान on Wed, 03/02/2016 - 08:29

Permalink

मजा येणार !!!!

मजा येणार !!!!
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/02/2016 - 08:34

Permalink

मिपा-टव्वाळा, चेष्टपंथेची

मिपा-टव्वाळा, चेष्टपंथेची जावे तरी हास्य हो पाविजे ते स्वभावे कपाळीस आठ्यांस सोडून द्यावे जनीं दंत ते सर्व दावीत जावे जय जय रघुवीर समर्थ!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Wed, 03/02/2016 - 09:28

In reply to मिपा-टव्वाळा, चेष्टपंथेची by राजेश घासकडवी

Permalink

जय जय रघुवीर समर्थ!

जय जय मिपावीर समर्थ.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/02/2016 - 10:31

In reply to जय जय रघुवीर समर्थ! by मुक्त विहारि

Permalink

हे छाणच आहे हो, पण त्या

हे छाणच आहे हो, पण त्या शिंच्या लघुगुरू मात्रांमध्ये बसत नै ना! आता ही एंट्री नसली म्हणून काय झालं, सगळं कसं पद्धतशीरप्रमाणे व्हायला पायजेल नाय का?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 03/02/2016 - 17:41

In reply to मिपा-टव्वाळा, चेष्टपंथेची by राजेश घासकडवी

Permalink

ही दुरुस्ती करा पैल्या लैनीत.

टवाळा मिपाते तुवां चेष्टिजावे बाकी सर्व लघुगुरू बरोबर आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 03/02/2016 - 09:40

Permalink

आमचे एक मित्र ह्या स्पर्धेत

आमचे एक मित्र ह्या स्पर्धेत मनापासून भाग घेतील असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 03/02/2016 - 10:01

In reply to आमचे एक मित्र ह्या स्पर्धेत by प्रचेतस

Permalink

डंडुकात्मा-फटकहत्ती!

डंडुकात्मा-फटकहत्ती! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 03/02/2016 - 10:09

In reply to डंडुकात्मा-फटकहत्ती! by अत्रुप्त आत्मा

Permalink

?

हे मित्र तुमच्या चांगल्याच परिचयाचे दिसतात ! कोण हो, कोण ?
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on Wed, 03/02/2016 - 10:24

In reply to ? by सस्नेह

Permalink

;) ;)

पूछते है वोह कि गालिब कौन है कोई बतलाओ के हम बतलाये क्या
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 03/02/2016 - 19:45

In reply to आमचे एक मित्र ह्या स्पर्धेत by प्रचेतस

Permalink

त्यांना परवानगी मिळेल का पण?

त्यांना परवानगी मिळेल का पण? हल्ली ते रोज होम-हवनही होममिनिष्टरांच्या परवानगीशिवाय करत नाहित असं नाखुकाका म्हणाले बॉ परवा. खखोदेजा.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Wed, 03/02/2016 - 10:47

Permalink

कलियुग आले हो घोर कलियुग, असल्या विषयावरही स्पर्धा व्हाव्या?

मला विडंबने वाचायला आवडत नाही आणि करायला तर त्याहूनही आवडत नाही. प्रत्येक कवितेच्या निर्मिती मागे एक प्रचंड मोठा इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र असते. काहीच भाग्यवान कवी असे असतात ज्यांना कळ आल्या आल्या कविता होते. त्यातले सुध्दा फार थोडे कवी सुखसारक वटीच्या बाटल्याच्या बाटल्या रिचवल्या सारख्या कविता पाडत असतात. पण हे भाग्य सर्व कविंच्या नशिबी असतेच असे नाही. कवितेची असहाय्य कळ येउनही कविता न होणार्या कवीची आवस्था एखाद्या अडलेल्या बाई सारखी असते. बराच वेळ जोर लावल्यावर देखिल कविता होत नसली तरी सुध्दा हे कवी लोक चिकाटी सोडत नाहीत, कुंथुन कुंथुन तो शेवटी ते एकदाची कविता पाडतातच. मग आपले ते डाउनलोडवलेले पुण्यसंचित विनय पूर्वक रसिकांच्या चरणी सादर करतात. हि सर्व प्रक्रियाच मोठी कष्टदायक आहे. आणि आपण त्यावर विडंबनाचे पाणी ओतायचे? छे छे त्या कोमल कवी मनाला काय वाटत असेल? नाही नाही माझ्या हातुन हे असले पातक कदापि घडणार नाही. हे परमेश्वरा या असल्या स्पर्धा भरवणार्यांना आणि त्या स्पर्धांमध्ये भाग घेणार्या पाषाण हृदयी विडंबकांना तू सद्बुद्धी दे. एक मिपाकर म्हणुन.... जाऊ दे...... समस्त कविवृंदा तर्फे मिपा च्या सा. सं मंडळाचा जाहीर णिशेढ. आणि इथुन पुढे जो पर्यंत सासं मंडळाचे संपूर्ण मण:परिवर्तन होत नाही तो पर्यंत मी दुपारच्या चहा बरोबर आठ ऐवजी केवळ सात बिस्कीटे खाउन प्राणांतिक उपोषण करणार आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/02/2016 - 11:02

In reply to कलियुग आले हो घोर कलियुग, असल्या विषयावरही स्पर्धा व्हाव्या? by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

कवितेची असहाय्य कळ येउनही

कवितेची असहाय्य कळ येउनही कविता न होणार्या कवीची आवस्था एखाद्या अडलेल्या बाई सारखी असते.
अडला हरी गाढवाचे पाय धरी अडला कवी बाटलीला ओठ लावी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 03/02/2016 - 11:26

In reply to कलियुग आले हो घोर कलियुग, असल्या विषयावरही स्पर्धा व्हाव्या? by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

अगगागा. पैजारबुवा म्हणजे अशा

अगगागा. पैजारबुवा म्हणजे अशा कवींचे कर्दनकाळच जणू.
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Wed, 03/02/2016 - 11:32

In reply to कलियुग आले हो घोर कलियुग, असल्या विषयावरही स्पर्धा व्हाव्या? by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

का, पैजारबुवा ?

विडंबनारिष्टचं ब्यारल संपलं वाट्टं ? :D
  • Log in or register to post comments

Submitted by शब्दबम्बाळ on Wed, 03/02/2016 - 11:35

In reply to कलियुग आले हो घोर कलियुग, असल्या विषयावरही स्पर्धा व्हाव्या? by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

हाहाहा

पण, तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे, तुझे गीत गाण्यासाठी मिसळ खाऊ दे... हे एकदम वर्जिनल म्हणायचं का? ;) म्हणजे विडम्बनाचे पाणी ओतण्याऐवजी तर्री ओतावी!! :)
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Wed, 03/02/2016 - 10:59

Permalink

=))

ऐसी कुंथण्याची कळा येऊ द्यावी मिपाबाळां कवींचा तो कळवळा सोडून द्यावा
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 03/02/2016 - 11:24

In reply to =)) by अजया

Permalink

=)) =))

=)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 03/02/2016 - 11:27

Permalink

;) सासं अवघड हो हे

फुगे फुगवू चला पिचकारी भरा आला आला हा बकरा आला
;) सासं अवघड हो हे
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 03/02/2016 - 11:28

In reply to ;) सासं अवघड हो हे by माहितगार

Permalink

ह. घ्या. हे लिहायचे राहीलेच :

ह. घ्या. हे लिहायचे राहीलेच :)
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 03/02/2016 - 11:31

In reply to ;) सासं अवघड हो हे by माहितगार

Permalink

हे प्रा डॉ रचीत आहे का ?

हे प्रा डॉ रचीत आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 03/02/2016 - 11:32

In reply to हे प्रा डॉ रचीत आहे का ? by माहितगार

Permalink

प्रा डॉ तुम्ही नसाल तर क्षमा

प्रा डॉ तुम्ही नसाल तर क्षमा करा हं
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 03/02/2016 - 11:38

In reply to प्रा डॉ तुम्ही नसाल तर क्षमा by माहितगार

Permalink

हा तुमचा आपुलाचि संवाद आपणासि

हा तुमचा आपुलाचि संवाद आपणासि वाचून मला एकदम कोणाचंतरी फोनवर बोलणं एका बाजूने ऐकल्याचा भास झाला. "हो हो, नक्की. मी स्वतःच जाईन ना" .... "नाही, काहीच टेन्शन नाही. गेली दहा वर्षं करतो आहे मी हे." .... "आता गावचं पाणी ते शेवटी गावचं पाणीच ना. तुम्हीसुद्धा काय बोलता राव." .... वगैरे वगैरे...
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Wed, 03/02/2016 - 13:21

In reply to हा तुमचा आपुलाचि संवाद आपणासि by राजेश घासकडवी

Permalink

:) :) प्रतिक्रीया द्यावी की

:) :) प्रतिक्रीया द्यावी की नाही, दिली तर काय द्यावी अशा मनस्थितीत होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on Wed, 03/02/2016 - 13:23

In reply to :) :) प्रतिक्रीया द्यावी की by माहितगार

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by सुमीत भातखंडे on Wed, 03/02/2016 - 13:26

Permalink

जबरा जबरा जबरा!

मस्त स्पर्धा! (एकाहून एक विडंबनांच्या प्रतिक्षेत) सुमीत भातखंडे
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Wed, 03/02/2016 - 13:35

Permalink

लई भारी आयड्या !

लई भारी आयड्या ! आता सर्व आयड्या / डुआयड्या बाहू सरसावून कीबोर्डातून पिचकार्‍या मारायला तयार झाल्या असतील. मज्जाच मजा येणार ! =))
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 03/02/2016 - 14:28

Permalink

भारी...

यमक्या कवींचा पसारा, न साहावे संपादकसागरा.. तेणे वैतागोनि क्षणभरा, विडंबनस्पर्धा योजिलीसे...
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामी संकेतानंद on Wed, 03/02/2016 - 14:52

In reply to भारी... by सूड

Permalink

वाह!!

वाह!!
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on गुरुवार, 03/03/2016 - 22:00

In reply to भारी... by सूड

Permalink

कसलंच...

देवाचिये दादुलेपणाचा उभारा, न साहवेची साता सागरा भेण वोसरोनी राजभरा, दिधली द्वारावती
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 03/03/2016 - 22:54

In reply to कसलंच... by सतिश गावडे

Permalink

पर्फेक्ट!! =))

पर्फेक्ट!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by एस on Wed, 03/02/2016 - 15:05

Permalink

दमामिंनाही आवताण धाडा.

दमामिंनाही आवताण धाडा.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Wed, 03/02/2016 - 17:34

Permalink

कॉलिंग

केसु गुर्जी, रंगाशेट, खोडसाळ अँड सो ऑन..
  • Log in or register to post comments

Submitted by गौरी लेले on Wed, 03/02/2016 - 17:59

Permalink

खुपच छान !

खुपच छान ! मिसळपाववरील असल्या अभिनव उपक्रमांमुळेच मिपा अखिल मराठी साहित्य संकेत स्थळां मध्ये शोभुन दिसते ! मराठी भाषा टिकवण्यात मिसळपावाचे अमुल्य योगदान आहे ! स्पर्धेला शुभेछा :)
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Wed, 03/02/2016 - 19:38

Permalink

तांबीय काव्य नको हे राहिलं.

तांबीय काव्य नको हे राहिलं.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 03/02/2016 - 19:44

In reply to तांबीय काव्य नको हे राहिलं. by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

त्यासाठी 'परसाकडल्या कविता'

त्यासाठी 'परसाकडल्या कविता' असं वेगळं सदर सुरु करावं असा प्रस्ताव ठेवतो. =))
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 03/03/2016 - 10:04

In reply to त्यासाठी 'परसाकडल्या कविता' by सूड

Permalink

अगागागागा!

काय खरं नाही भौ!
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 03/03/2016 - 09:47

Permalink

चांगलय..

चांगलय.. आता होळीच्या प्रतिक्षेत ..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देर्देकर on गुरुवार, 03/03/2016 - 11:06

Permalink

कवीता थेट इथेच प्रसिध्द

कवीता थेट इथेच प्रसिध्द करायची आहे कि संपादकांना धाडायची आहे की आणि मग ते ती प्रसिध्द करणार?
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 03/03/2016 - 11:11

Permalink

प्रवेशिका साहित्य संपादक या

प्रवेशिका साहित्य संपादक या आयडीस व्यनितून किंवा sahityasampadak.mipa@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवायच्या आहेत. प्रवेशिका पाठवताना मूळ काव्य, कवी व इतर उपलब्ध तपशिलासकट पाठवायच्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्राची अश्विनी on गुरुवार, 03/03/2016 - 11:32

Permalink

विडंबनकाराचे नाव न लिहिता

विडंबनकाराचे नाव न लिहिता विडंबने प्रसिद्ध करावीत असे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वामी संकेतानंद on गुरुवार, 03/03/2016 - 21:13

In reply to विडंबनकाराचे नाव न लिहिता by प्राची अश्विनी

Permalink

+1

+1
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on गुरुवार, 03/03/2016 - 21:54

In reply to +1 by स्वामी संकेतानंद

Permalink

विडंबनकाराचे नाव नसेल

विडंबनकाराचे नाव नसेल.प्रवेशिका दिसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by जव्हेरगंज on गुरुवार, 03/03/2016 - 20:05

Permalink

ल य भा री !

ल य भा री !
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on गुरुवार, 03/03/2016 - 22:02

Permalink

:)

म्हणजे आता मिपावर दंगा करायला ऑफिशियली परवानगी, लेखकाचे नाव देऊ नये याच्याशी सहमत, प्रत्येक एन्ट्रीला क्रंमाक वगैरे देता येईल. कितीही नाही म्हटले तरी, काय लिहिले पेक्षा कोणी लिहिले याला महत्व.. वगैरे वगैरे :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com