जनुका रेषा - एक स्वैर प्रकट चिंतन
एक रेषा असते जी जनुकांनी बद्ध असते. त्या किमान बंधनांपलीकडे तीने मला अमर्याद स्वातंत्र्य दिलेल असतं. पण या स्वातंत्र्यावरही बंधन येत असतात. काही मी माझी घालून घेतलेली असतात, काही काळ आणि परीस्थितीने येणारी असतात, काही कुटूंबातील, समाजातील, संस्कृतीतील, राज्य आणि धर्म संस्थेतील घटकांनी कधी कळत, कधी नकळत घातलेली असतात. कुटूंब, समाजातील, संस्कृतीतील, राज्य आणि धर्म संस्थेतील असलेल्या बंधनांच्या रेषांची वर्तुळ; कधी स्विकारून, कधी अलिप्त राहून, कधी विरोध दर्शवून, कधी बदलून, बंधनांच्या परिघांच कोंडाळ घडवण्यात, बदलण्यात, टिकवण्यात, एक व्यक्ती म्हणून माझा सहभाग असतोच असतो.
या मी सहभागी असलेल्या लक्ष्मण रेषा; मी अथवा माझ्यावतीने सातत्याने विवीध गोष्टींना नाकारत असतात. मी या भ्रमात असतो की मी दुसर्यांना नाकारतो आहे; पण वस्तुस्थिती असते की प्रत्येक होकारा प्रमाणेच दिलेला प्रत्येक नकार मी स्वतःला दिलेला असतो. दिलेला प्रत्येक होकार दिलेला प्रत्येक नकार माझ्या भोवतीचा परीघ ठरवत असत. हे दिलेले सर्व होकार नकार सर्व माहिती घेऊन दिले जातात का ? विवेक वापरून दिले जातात का ? हा माहितीचा अधिकार, होकाराचा आणि नकाराचा अधिकार, मी, माझ्या स्वतःच्या मनाने वापरत असतो का ? की, हे माझ्या मनाचे मूलभूत अधिकारच मी इतर कुणाच्या स्वाधीन करून बसलो आहे? माझ्या भोवतीची रेषा स्वतः आखण्याच सामर्थ्य स्वतःत आणण्याचा माझा कीमान प्रयास असतो का ? मी स्वतः आखलेल्या परीघाच स्वतः समर्थन करतो का ? किंवा मी घातलेल्या रेषांनी इतरांच्या रेषांचे उल्लंघन तर होत नाही आहे ना ? मी दिलेल्या, माझ्यावतीने दिल्या गेलेल्या होकारांनी अथवा नकारांनी; माझे, माझ्या आप्तांचे, माझ्या समुहाचे, समाजाचे, देशाचे हित साधले जात आहे, जाणार आहे हे मी तपासत असतो का ?
एखाद्या व्यक्तीने रेषेच्या बाहेर पाऊल टाकल की, त्या व्यक्तीला त्याच्या स्वतःच्या मर्जी शिवाय माझ्या रेषेत मी जबरदस्तीने ओढून तर घेत नाहीए ना ? कुणीही याव रबरी बॉल समजून टप्पा मारून जाव अस तर होत नाहीना ? माझ्या वर्तुळात कुणी एक जनुका असते, ती माझ्या वर्तुळा बाहेर पहाते तर मी तयार केलेला समुह जनुकेला लगेचच अमानुषतेने प्रताडीत तर करत नाहीना ? काचे प्रमाणे तीला खळ्ळकन फोडून मोकळा होत नाही ना ? प्रत्येक जनुकेला स्वत:च्या वर्तुळाची परिघाची व्याख्या करण्याचा अधिकार आहे, त्या अधिकारावर मी माझ्या व्याख्यांच ओझ तर लादत नाही आहे ना ? जनुकाचे जनक कोण होते, हे विचारून मी जनुकाला तीच्या संधी नाकारत नाही ना ? किंवा जनुकाच्या परिघावरून तिच्या निर्मीत जनांच्या संधी मी नाकारत नाही ना ?
मी, माझ कुटूंब, माझा समाज वस्तुस्थितींना नाकारत नाही ना ? अथवा साप साप म्हणून भुईला झोडपत नाही ना ?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
का जाणे. पण हल्ली हेच प्रश्न
प्रतिसादा करीता धन्यवाद
हम्म... वैचारिक म्युटेशन?
वैचारिक म्युटेशन? हम्म... विचार करतो आहे
ऑप्शन सी...!
बरोबर
गृहीतक
हम्म..
या लेखाच्या निमीत्ताने मराठी