थंड डोक्याने...

हुप्प्या's picture
हुप्प्या in जनातलं, मनातलं
23 Jan 2016 - 8:08 am

एक अस्सल अमेरिकन कादंबरी वाचली ज्याचे नाव इन कोल्ड ब्लड अर्थात थंड डोक्याने (केलेले कृत्य). एका सत्य घटना कादंबरी रूपाने सादर करण्याचा एक नवा प्रयोग ट्रुमन कपोट ह्या लेखकाने केला. एक अत्यंत खिळवून टाकणारी, अत्यंत नाट्यपूर्ण कलाकृती त्यातून जन्माला आली. ही कादंबरी अनेक शाळात अभ्यासक्रमात सामील केलेली असते. त्यावर एक उत्तम चित्रपटही बनलेला आहे (तेच नाव). ह्या लेखकाला ह्या घटनेचे वेडच लागले होते. तो तहानभूक विसरून ह्या प्रकरणाचा अभ्यास करत होता आणि त्यातूनच इतके चांगली कलाकृती निर्माण झाली आहे.

काय घडते ह्या गोष्टीत (खरे तर काय घडले होते?) ? मुख्य घटना १९५९ साली १५ नोव्हेंबर रोजी क्यांसस राज्यात होल्कम नावाचे एक लहानसे गाव आहे तिथे झालेले चार खून. शेतीप्रधान गाव. फारशी वस्ती नाही. इतके आडवाटेला की आसपास राहाणारे सोडल्यास बाकी कुणाला फार ऐकूनही माहित नसेल. त्या गावात क्लटर नावाचे कुटुंब होते. हर्ब क्लटर हा एक सधन शेतकरी. भरपूर कष्ट करून मोठी शेती बागा बाळगणारा. लोकांना मदत करणारा, उंचापुरा, ताकदवान, धार्मिक आणि निर्व्यसनी. घरात बायको आणि दोन शाळेत जाणारी मुले, १५ वर्षाचा मुलगा आणि १६ ची मुलगी. सगळे कुटुम्ब सुस्वभावी, दुसर्यांना तत्परतेने मदत करणारे. मुले शाळेत हुशार. अभ्यासात अन्य विषयातही. बायकोची मनस्थिती ठीक नसे. पण तिच्यावर उपचार चालू होते.

१५ नोव्हेंबरच्या रविवारी सकाळी चर्चची वेळ झाली तरी क्लटर घरातले कुणीच आले नव्हते. हे पूर्वी कधीच घडले नव्हते. हे धार्मिक कुटुंब नियमितपणे रविवारच्या चर्च सर्विसला वेळेवर उपस्थित असे. लोकांना काळजी वाटू लागली. बायकोने काही केले की काय? काही काळाने शेजारपाजारचे लोक घरात जाऊन पाहू लागले. जसे ते आत गेले तसे त्याना चारही लोकांची प्रेते सापडली. भक्कम बंदोबस्ताने आणि विविध प्रकारच्या दोराच्या गाठी बांधण्यात निष्णात मारेकर्याने प्रत्येकाला बांधले होते. हर्बला भोसकून आणि नंतर गोळी घालून मारले होते. बाकी लोकांना गोळी मारून ठार केले होते. असहाय अवस्थेतल्या नि:शस्त्र लोकांना इतक्या क्रूरपणे मारलेले बघणे नक्कीच वेदनादायक होते. तशात हे सगळे कुटुंब सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणारे. होल्कम गावात आणि त्याच्या पंचक्रोशीत प्रचंड खळबळ माजली, घबराट पसरली, लोक वाट्टेल त्या अफवा पसरवू लागले. होल्कम गावात लोक कुलपे लावत नसत तिथे दुकानातली कुलपे संपू लागली! हा प्रसंग ऐकून पुण्यात १९७५-७६ मध्ये जोशी अभ्यंकर खून झाले तेव्हा तशी खळबळ उडाली होती त्याची आठवण होते.

अर्थातच त्या राज्याचे पोलिस तपासकामाला लागले. के बी आय अर्थात क्यांसास राज्याची तपास यंत्रणा नेमली गेली. अनेक कुशल, कष्टाळू अधिकारी बारकाईने तपास करू लागले. खरेतर हे सणासुदीचे दिवस. ख्रिसमस जवळ आलेला. पण तपासकामात गुंतलेले अधिकारी हे सगळे विसरून जे जे करणे शक्य आहे ते करू लागले. ह्या कुटुंबाची कुणाशी दुष्मनी होती का? मुलीच्या प्रेमप्रकरणात कुणी दुखावला होता का वगैरे शोधून झाले. कुठला आजी माजी कर्मचारी ह्यांच्यावर डूख ठेवून होता का ह्याचा तपास झाला. पण काही हाती लागत नव्हते. ३-४ आठवडे अथक मेहनत करून ती निष्फळ ठरल्यावर तपासाच्या प्रमुखाचे धैर्य खचू लागले. ह्या खुनांचे वैशिष्ट्य हे की उद्देशच काळात नव्हता. चोरी म्हणावी तर निव्वळ ४० डॉलर चोरीला गेले होते. इतक्या किरकोळ रकमेकरता इतके क्रूर कृत्य? शिवाय हर्ब क्लटरची एक सवय होती की तो आपले व्यवहार चेकने करत असे. रोख रक्कम देणे वा घेणे तो शक्यतो टाळत असे. त्याच्या खिशातही २०-३० डॉलर मुश्कीलीने सापडले असते. आणि ही त्याची सवय जवळजवळ सगळ्या गावकर्यांना माहित होती. त्यामुळे ओळखीच्या कुणी पैशासाठी असे करणे अवघड वाटत होते. नेमके आदल्या दिवशी त्याने आपला मोठ्या रकमेचा विमा उतरवला होता. त्यामुळे त्याकरता कुणी मारले का हाही तपास झाला. पण गुन्हेगारांनी जवळपास कुठले पुरावे ठेवले नव्हते. बंदुकीतून निघालेल्या पुंगळ्याही त्यांनी शोधून गोळा करून नेल्या होत्या. हे घर तसे वस्तीपासून दूर असल्यामुळे कुणी आवाज वा अन्य चाहूल काही ऐकली नव्हती.
पूर्ण राज्यभर ह्या बातमीची प्रसिद्धी होत होती. दैवयोगाने त्या राज्याच्या तुरुंगात शिक्षा भोगत असणार्या फ्लोईड वेल्स नावाच्या कैद्याने ही बातमी ऐकली. ऐकताच त्याला लगेच कळले हे कुणी केले असेल ते. पण तो थोडा बिचकत होता. आपण चुगली केली आणि चुगलीखोर म्हणून बाकी कैद्यांनी वा त्या गुन्हेगारांनी आपले बरेवाईट केले तर काय? म्हणून तो काही दिवस थांबला. सरकारने १००० डॉलरचे इनामही जाहीर केले होते. त्याचाही मोह होताच. होता होता एका मित्राने त्याला समजावले आणि त्याने गुपित फोडले.

क्रमशः

समाजसमीक्षा

प्रतिक्रिया

पुढच्या भागाची वाट पाहतो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोहब्बत बरसा दे तू... सावन आया है :- Creature 3D

कविता१९७८'s picture

23 Jan 2016 - 8:28 am | कविता१९७८

पुढचा भाग लवकर येउ द्या

बोका-ए-आझम's picture

23 Jan 2016 - 9:26 am | बोका-ए-आझम

In Cold Blood वाचलंय. त्याने Non-fictional Novel आणि True Crime हे वाङमयप्रकार रूढ केले. In Cold Blood चा लेखक Truman Capote च्या आयुष्यावर Capote हा चित्रपट आला होता त्यात मुख्य भूमिकेसाठी फिलिप सेमूर हाॅफमनला आॅस्कर मिळालेलं आहे असं वाचल्याचं अंधुक आठवतंय. रच्याकने To Kill a Mockingbird लिहिणाऱ्या हार्पर ली आणि ट्रूमन कॅपोटे हे बालमित्र होते आणि To Kill a Mockingbird मध्ये एक पात्र म्हणून कॅपोटे आहे आणि In Cold Blood साठी हार्पर ली यांनी त्याला मदत केली होती.
छान लेख. पुभाप्र.

मनीषा's picture

23 Jan 2016 - 9:27 am | मनीषा

वाचते आहे.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत ....

यशोधरा's picture

23 Jan 2016 - 10:41 am | यशोधरा

वाचते आहे..

एस's picture

23 Jan 2016 - 10:47 am | एस

पुभाप्र!

पैसा's picture

23 Jan 2016 - 11:00 am | पैसा

पुढचा भाग लवकर लिहा!

पैसा's picture

23 Jan 2016 - 11:00 am | पैसा

पुढचा भाग लवकर लिहा!

तुषार काळभोर's picture

23 Jan 2016 - 11:30 am | तुषार काळभोर

अजून एक वाट पाहायला लावणारी मालिका.

पद्मावति's picture

23 Jan 2016 - 2:11 pm | पद्मावति

वाचतेय. पु.भा.प्र.

नाखु's picture

23 Jan 2016 - 2:22 pm | नाखु

प्रतिक्षेत..

नाखु मिपा वाचक चळ(के)वळ सदस्य

उगा काहितरीच's picture

23 Jan 2016 - 2:38 pm | उगा काहितरीच

उत्कंठावर्धक... पुभाप्र...