देव अन माणूस

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जनातलं, मनातलं
16 Jan 2016 - 9:20 pm

(महत्वाची सूचना - 'देवांची घऱ' म्हणजे - मंदीर , मशिदी , चर्च अन अजून धर्मानुसार वेगवेगळे )

मानवी मन हे खूप घाबरट आहे . त्याला कशाची ना कशाची भीती असतेच . नोकरी , धंदा , घर , संसार ह्या पैकी कशाच्या ना कश्याच्या काळजीने मन कायम चिंतेत असते . - ह्या मानसिक भीतीला घालवण्यासाठी 'देवांचा' आधार आहे . देव ही संकल्पना प्रत्येक धर्मात आहे . हिंदूत ती कृष्ण / शिव , ख्रीशानामध्ये virgin मेरी / येशु , मुस्लिम मध्ये मोहम्मद , बौद्ध मध्ये बुद्ध आणी असच पुढे !
प्रश्न हा आहे की - जर हिंदू म्हणत असेल सुर्य / चंद्र 'ब्रम्हा' ने तयार केले , ख्रिशन म्हणत असेल ते 'येशू' ने तयार केले , मुस्लीम म्हणत असेल ते 'अल्ला' ने तयार केले तर आपल्या सुर्यमालेत कमीत कमी ५-६ सुर्य , ५-६ चंद्र असायला हवेत , नाही का ? प्रत्येक धर्माला समर्पित वेगळा चंद्र अन वेगळा सुर्य असायला हवेत … . . जर प्रत्येक धर्मातील देवांनी माणूस तयार केला तर सर्वाना दोन हात , दोन पाय , दोन डोळे असेच का ? सगळ्यांची operating system सारखीच का ? धर्मानुसार operating system (operating system - physically ) वेगळी का नाही ? प्रत्येक धर्मानुसार माणसाच्या रक्ताचा रंग वेगवेगळा का नाही ? म्हणजेच कुठेतरी 'main reference' च चुकीचा आहे
धार्मिक दंगलीच महत्वाच कारण म्हणजे हिंदू कुराण , बायबल वाचत नाही / मुस्लिम गीता , बायबल वाचत नाही अन ख्रिशन गीता ,कुराण वाचत नाही - एकमेकांचे धर्मग्रंथ वाचले तर दंगली घडणारच नाहीत . बरंच साम्य सापडेल एकमेकांत … अजून एक हे धर्मग्रंथ लिहिले कुणी ? खुद्द देवाने ? नाही - ते लिहिलेत माणसाने (महात्मा / देवदूत ) … मग ह्याची काय खात्री की जे देवाला सांगायचे आहे ते जसेच्या तसे धर्मग्रंथात उतरेले ? ह्या देवदुतानी 'भेसळ' केली नसेल कशावरून ?

आत्ता मुद्यावर येतो :

१. कोणताही धर्म माणुसकीच्या भल्यासाठी जन्माला आलाय . आपल्याकडील मंदिर , चर्च , मशिदी ह्याच्याकडचा सारा पैसा माणुसकीचा नाही का ?
२. आज शेतकरी एवढ्या आत्महत्या करतायेत , आर्थिक अडचणीमुळे कितीतरी लोकं आत्महत्या करतायेत त्यांची जबाबदारी 'देवांच्या घरांची' नाही का ? (माहितेय , ते त्यांच्या कर्माने मारतील वा धर्मासंस्था म्हणजे काय काय सरकार आहेत काय ? )
३. बर ज्या भागात हा पैसा जमा होतो, ज्या गावात अशी मोठमोठ्या 'देवांची घरे 'आहेत त्यांची जबाबदारी नाही का कि जमा झालेला पैसा लोककल्याणासाठी वापरावा ? त्यांच्या आर्थिक अडचणी सोडवाव्या ? गरजूंना घरे द्यावी ? तेथील रस्ते , परीसर स्वछ ठेवावा ? अशा 'देवांच्या घराबाहेर' भिकारी असण म्हणजे देवांचा अपमान नाही का ? अन जर नसेल तर मग देवांच्या घरावरून 'धंदा' सुरु आहे का ?
४. जर देव ही 'अज्ञात शक्ती' असेल तर त्या शक्तीला दान - धर्माची गरज काय ? जर ह्या देवांनी (GOD - मग तो कोणत्याही धर्माचा असो ) ही सृष्ट्री निर्माण केली , त्याला ह्या सोन्या-चांदी ची , देणगी ची गरज काय ?i mean जर स्वतः शिवा कडे राहायला घर नव्हते , अंगावर कपडे नव्हते त्यांना दुधाची , सोन्याच्या मुकुटांची ची गरज काय ? येशू अन बुद्ध - जे स्वत रानावनात भटकत होते त्यांना पैश्याच्या देणगीची गरज काय ? विचार केल्यानंतर असे तात्पर्य निघते की - देवाला 'दान ' करण्याचा उद्देश म्हणजे पैश्याचा उपयोग लोकांसाठी ह्यावा असा असावा .i mean ज्याच्याकडे पैसा आहे , ऐपत आहे ते सोन्या - चांदीचे मुकुट किंवा लाखो ने देणगी द्यावी अन तो पैसा गरिबांच्या कामाला यावा . [पैश्यांची समान (?)वाटणी ]
५. जर 'India First 'असेल तर सगळ्या धर्मांनी एक common बँक account काढायला नको का ? पारदर्शिक …इथं भ्रष्टाचार नको … (after all हा देवांचा पैसा आहे) अन त्याचा उपयोग लोकांसाठी करावा … एवढा पैसा निघेल कि भारत जगातला एक श्रीमंत देश म्हणून उभारेल … त्याच दिवशी जेव्हा हे घडेल - (कदाचीत इथं मी जास्त आशावादी असेल - पण मोदी ला माझे १५ लाख कधी मिळतील हे विचारण्यापेक्षा हा उपाय बरा )

मी असं नाही म्हणत कि धर्म नसावा - तो असावाच , साधा क्रिकेट चा खेळही नियमांशिवाय खेळता येत नाही तर मग 'समाजाचा खेळ' धर्माच्या नियमांशिवाय कसा चालणार ? आणी मी हे ही म्हणत नाही की देव नाही - तो आहे पण सगळ्यांच्या भल्यासाठी …… अन त्याला माणसाकडून एकमेकांना मदत करण्यापेक्षा दुसरी कोणतीच अपेक्षा नसावी ….

(थोडं जड जाण्याची शक्यता आहे , सोसलं तर घ्या )

(sorry for typing error)

धोरणविचार

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

17 Jan 2016 - 1:37 pm | उगा काहितरीच

हमममम! पटन्याजोगं आहे साहेब. पण प्रश्न असा आहे की , "त्यांना पटेल का?" आणि गोम अशी आहे की सगळेच असा विचार करतात. जाऊ द्या . जो जे वांछील तो ते लाहो...

अविनाश लोंढे.'s picture

17 Jan 2016 - 5:59 pm | अविनाश लोंढे.

हो ना 'त्यांना' पटायला हवं (अन पटणार नाही ह्याचीही खात्री आहे) पण सगळेच असा विचार करत असतील तर एखाद्या दिवशी हे ही होईल (?)

तुषार काळभोर's picture

17 Jan 2016 - 5:38 pm | तुषार काळभोर

अ‍ॅज ए सामान्य पब्लिक, मी काय म्हन्तो..
अ‍ॅज ए भक्त, आपण डोनेशन का द्यावं.. आय मीन, अ‍ॅज ए देवस्थान त्यांनी त्यांना मिळालेल्या डोनेशनचं काय करायचं, हे अ‍ॅज ए मिपाकर, आय मीन अ‍ॅज अ मराठी मानुस, आपल्याला काय करायचंय?
आय मीन, आसं करायचं का? अ‍ॅज ए जागरुक नागरिक, आपणच एक अवेकन्ड-अ‍ॅज अ जागरुक-देवस्थान जर बनवलं, आय मीन येष्टॅब्लिश केलं, तर अ‍ॅज ए नेटिझन, आय मीन आपण स्वतः अ‍ॅज ए देवस्थान म्हणून पैसे, आय मीन डोनेशन, गोळा करून ते, आय मीन गरीबांना वाटले तर, अ‍ॅज ए धागाकर्ता, आय मीन ओपी (वर्जिनल पोष्टर) तुमाला कसं वाटतं?

अविनाश लोंढे.'s picture

17 Jan 2016 - 5:51 pm | अविनाश लोंढे.

'अ‍ॅज ए' इतक्या वेळा वापरून तुमच्या सगळ्या भावना (मारायच्या) पोहचल्या ;) … तुमची कल्पना चांगली आहे 'जागरूक देवस्थानाच' एक Model तयार होईल ……

हे सगळे बोलायला ठीक आहे.. पण असे बरेच लोक आहेत ज्यांना आपण बोलू शकतो.. देवळांना मिळणारा पैसा डोळ्यावर येतो.. लोक बोलतात इतकेच. पण तसे पाहिलेत तर देवळांना मिळणारा पैसा देखील कॉर्पस फंड - म्हणजे बर्‍याच वेळेस काही विशिष्ट कारणास्तव दिलेला असतो. प्रत्येक न्यास जेव्हा स्थापन होतो, तेव्हा त्याचा स्वतःचा काहीतरी अजेंडा असतो, त्यामुळे त्या न्यासाचा पैसा काहीतरी वेगळ्या कारणासाठी वापरणे म्हणजे एक प्रकारे गैरव्यवहार आहे.

तुम्हाला जर वाटत असेल की सामाजिक कामांसाठी पैसा खर्च केला जावा तर तुम्ही अश्या संस्थांना देणगी द्या. लोकांना अश्या ठिकाणी पैसे द्यायला प्रवृत्त करा. उगीच देवळे सॉफ्ट टारगेट आहेत म्हणून त्यांना लक्ष करू नका.

अविनाश लोंढे.'s picture

23 Jan 2016 - 11:51 pm | अविनाश लोंढे.

त्यामुळे त्या न्यासाचा पैसा काहीतरी वेगळ्या कारणासाठी वापरणे म्हणजे एक प्रकारे गैरव्यवहार आहे.

- काहीतरी वेगळ्या कारणांसाठी - लोककल्याणासाठी… हे वेगऴ कारण कसं असू शकत ?

का नाही? मी तुम्हाला पुस्तक घ्यायला पैसे दिले, आणि तुम्ही ते भिकार्‍याला दिलेत. ते मला मान्य होईल का?

कृ. हे केवळ उदाहरण म्हणून घ्या.. भिकार्‍यांशी तुलना करण्याचा माझा हेतू नाही.

अविनाश लोंढे.'s picture

24 Jan 2016 - 12:10 am | अविनाश लोंढे.

भिकाऱ्याला जरी दिले तरी , (आपल्याकडे तरी , कारण भिक मागणे अजून तरी गुन्हा नाही ) ते काहीतरी चांगल्या कामासाठी आले नाही का ? (Direct Implementation)

(इथं 'हेतू' चा कोण एवढा विचार करत नाय ;)

नाही तसे नाही होत. जर भिकार्‍याला द्यायचे असते तर मी स्वतःच दिले असते. तुम्हाला कशाला द्यायला पाहिजेत?

अविनाश लोंढे.'s picture

24 Jan 2016 - 12:18 am | अविनाश लोंढे.

नाही तसं होत नाही !लोक देवाला घाबरतात ,भिकाऱ्याला नाही ...