काटा वजनाचा -१
डॉक्टर आम्ही काहीही केले तरी आमचे वजन कमीच होत नाही.
पण आम्ही काही खातच नाही.
आम्ही इतके जिम मध्ये घाम गाळतो पण वजन काही हलत नाही.
वजनाचा काटाच बरोबर नाही
वजनाचा काटा पाहिला कि अंगावर काटा येतो
वजनाचा तक्ता चूक आहे किंवा
एवढं कमी वजन असणं कसं शक्य आहे ?
आम्ही हवा खाल्ली तरी जाडे होतो.
आम्ही तुपाचा वास जरी घेतला तरी तरी आमचे वजन वाढते.
आता फक्त उपास करणे बाकी आहे.
जरा तरी खात्या पित्या घरचे दिसायला नको का?
आता कशी तब्येत छान दिसते आहे पूर्वी तर लोक मला पाप्याचे पितर म्हणत असत.
माझे वजन बरोबर आहे फक्त उंचीच थोडी कमी आहे.
बाळंतपणात "जरा" जास्त खाल्लं तर वजन इतकं वाढलं ते आता काही केल्या कमी होत नाही.
दोन मुलं झाली आता काय ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घ्यायचा आहे का ?
मी संतती नियमनाच्या गोळ्या घेतल्या त्यामुळे वजन वाढलं
मेनो पॉज नंतर वजन वाढतंच
पायाचं हाड मोडलं होतं त्यामुळे दीड महिना घरी बसलो होतो त्यामुळे वजन वाढलं
हि वाक्ये वेगवेगळ्या रागात लयीत आणी स्वरात ऐकायला येतात.
यातील सर्वात प्रामाणिक वाक्य म्हणजे डॉक्टर वजन कमी करायला हवं आहे हे कळत आहे पण ते वळत नाही. समोर इतके रुचकर पदार्थ येतात आणि मग मोह आवरत नाही.
खरं तर प्रत्येक वजनदार माणसाची हीच स्थिती आहे.
बहुसंख्य "वजनदार" लोकाना आपले वजन फार जास्त आहे आणी आपण ते कमी करावे असे वाटत नाही. यामुळे जवळ जवळ सर्वच वजनदार लोक आपण प्रत्यक्ष खात असलेल्या अन्नापेक्षा कमी अन्न खातो असा दावा करीत असतात. हे denial (नाकबूल) आहे. https://en.wikipedia.org/wiki/Denial
वस्तुस्थिती काय आहे ते पाहू या
आज जगात ९२ कोटी लोक भुकेलेले आहेत तर १५० कोटी लोक जाडे/ वजनदार आहेत.
जगभरात कुपोषणापेक्षा अतिपोषणामुळे तिप्पट लोक मृत्यू पावतात.
लठ्ठपणा हा रोग आता जागतिक स्तरावर मोठा प्रश्न बनला आहे. आणी यात फक्त श्रीमंत देशच नव्हे तर गरीब देश हि सापडले आहेत.
अगदी रस्त्यावर किंवा झोपड्यात राहणारे लोकही भरगच्च आणी पोट सुटलेले दिसतात.
दिल्ली किंवा मुंबईत उच्चभ्रू शाळांत ७० % मुले हि अतिवजनाची शिकार बनलेली आढळली आहेत.
वजनदार लोकांचे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी कमी होते आणी लठ्ठ व्यक्तींचे आयुष्य १० वर्षांनी कमी होते.
जगातील १/३ लोक "वजनदार"( OVERWEIGHT) आहेत आणी १/१० लोक लठ्ठ (OBESE) आहेत.
शरीर वस्तुमान निर्देशांक (BODY MASS INDEX-BMI) हे आपले वजन मोजण्याचे जास्त चांगले परिमाण आहे.
यात माणसाचे वस्तुमान भागिले उंचीचा वर्ग (WT / HT x Ht). यात वस्तुमान( वजन) किलोग्राम मध्ये आणी उंची मीटर्स मध्ये मोजलेली हवी.
यात स्वस्थ माणूस -- BMI १९ ते २५ हवा
वजनदार माणूस BMI २५ ते ३०
आणी लठ्ठ BMI ३० पेक्षा जास्त.
याहून सोपे परिमाण म्हणजे आपल्या उंचीच्या तुलनेत आपले पोट (कंबर नव्हे) ५० टक्क्यापेक्षा कमी हवे. उदा. १७२ सेमी (पाच फुट आठ इंच) माणसाचे पोट ८६ सेमी (३३.८५ इंच) पेक्षा कमी हवे. हे पोट मोजण्याचे ठिकाण म्हणजे सरळ उभे राहिल्यावर पोटाचा जास्तीतजास्त घेर मोजणे.
उदा. १७२ सेमी (पाच फुट आठ इंच) माणसाचे वजन ५७ किलो ते ७४ किलो मध्ये असायला हवे. म्हणजे सरासरी वजन ६५ ते ६६ किलो वजनाच्या माणसाला ८-९ किलो जास्त वजनाची मुभा असते.( बहुसंख्य लोकांची हि तक्रार असते कि वजनाचा पल्ला(RANGE) फार कमी आहे. किंवा वजनाच्या तक्त्यात दाखवलेले प्रमाण वजन फारच कमी आहे.
http://halls.md/body-mass-index/av.htm
यात हा BMI मापक आहे. असा कोणताही मापक जालावऋण आपल्याला पाहता येईल
हि लेखमाला म्हणजे कोणताही स्वयंभू विचार नाही तर सध्या उपलब्ध असलेल्या वैद्यकीय माहितीचे सोप्या शब्दात भाषांतर करण्याचा प्रयत्न आहे. यात विविध वैद्यकीय पुस्तकांचा आधार घेतलेला आहे.उदा.harrison's principles of internal medicine.
तेंव्हा विदा किंवा दुवा उपलब्ध आहे पण लगेच मिळेल असे नाही( शोधावा लागेल).
रच्याकने-- बर्याच लोकांना वरीलपैकी एखादे विधान आपल्याबद्दलच लिहिले गेले असावे असे वाटू शकते
क्रमशः
- काटा वजनाचा -२
- काटा वजनाचा -३
- काटा वजनाचा --४
- काटा वजनाचा --५
- काटा वजनाचा --६
- काटा वजनाचा --७
- वजनाचा काटा -८
- वजनाचा काटा --भाग ९
Book traversal links for काटा वजनाचा -१
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वॉव
मनोबा
वाचते आहे.
झक्कास. जिव्हाळ्याचा विषय
आमचे वजन कमी जास्त होत असते....
तर जीभेसाठी जगत असल्याने, थोडाफार भार पोटावर येतो.
+११११११११११११११११११
अति जिव्हाळ्याचा विषय,
वजन वाढवू इच्छीणार्यांना मी
नाही हो डॉक्टर,
इतर लोक आमच्या बारीक असण्यावर
हे डॉक्टर आहेत की सनसनीखेज पत्रकार?
लोल
उपयुक्त
पहिली सगळी वाक्य म्हणण्याचे
बारीक माणसाला सल्ला -- थांबू
कुंडलीत सप्तमात गुरू असेल तर
#पहिली सगळी वाक्य म्हणण्याचे
https://en.m.wikipedia.org
याहून सोपे परिमाण म्हणजे
कॅलरीज कॅलरीज कॅलरीज... असे
गवसणी
हा.हा.हा... :) होय खरयं !
फारच छान लेख. लेख वाचून घरी
झकास आहे लेख.
झकास आहे लेख.
यथोचित लेख !
हो उंची मीटर मध्येच हवी.इंच
सॉरी कसलं ?
ही उपयोगी लेखमाला होईल हे
काटा
वाचते आहे.पुभाप्र.
आईग्ग! सगळ्यांच्या चिंतेचा
वजन
मेलो तरी बेहेत्तर
हा हा हा!
मापात हौ भौ आपण.
हो क्का ?
अगलतगल ग्राऊंडवर घेऊन जाणारे
बापच
उपयुक्त माहिती
मागील जन्मी केलेली सत्कर्मे
कुणी मला म्हटलं की बाबारे असा
डॉक्टरसाहेबांचा आणखी एक
माझा अनुभव
- साखरेचे सेवन अगदी अपवादात्मक परिस्थितीत करणे.
- बेकरी प्रॉडक्टस व तळलेले पदार्थही महिन्या दोन महिन्यांतून एखादे वेळेस खाणे.
- घरी अॅरोबिक्स व्यायाम करणे व हापिसात जमेल तेव्हा जिन्याने वर जाणे.
पहिल्या २० आठवड्यानंतर कॉलेस्टेरॉल तपासले तर १०% कमी झाले होते अन वजनही १० पाउंडांनी कमी झाले होते. गेल्या आठवड्यात पुन्हा वार्षिक चाचण्या केल्या. कोलेस्टेरॉल गेल्या वर्षी पेक्षा २० टक्के कमी झाले आहे. वजन जे कमी झाले होते ते कायम राहिले. अजुनही कोलेस्टेरॉल नॉर्मल मर्यादेपेक्षा थोडेसे अधिक आहे पण डॉक्टरांच्या मते ती काळजीची बाब नाही. वजन कमी झाल्याने मला अधिक एनर्जेटिक वाटू लागले अन हापिसातले वा घरातले काम करण्याचा स्टॅमिना वाढला. या विषयाला हात लावण्यासाठी डॉ. खरे यांना धन्यवाद. पुढच्या भागाची उत्सुकता आहे.Triglycerides
http://timesofindia
साजूक तूप खाण्यातून अजिबात वर्ज्य केले आहे का?
साजूक तूप
हा प्रतिसाद रामपुरींसाठी होता