Skip to main content

अस्तित्व

लेखक मयुरMK यांनी शुक्रवार, 25/12/2015 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
. अस्तितत्वता नसते जिथे या जगाची दूर-दूर....अशा निवांत निश्चल एकांती रम्य निर्मळशा सरिते काठी शांत-शांत ... अन हिरवी जेथे वनराई निर्झराचे वाही चम् -चम् पाणी गाई खळखळ मंजूळ गाणी धुंद धावतो पवनही रानोरानी शीळ मधुर वाजवीत पानोपानी किलबील-किलबील करोनिया नाद रानपाखरे मना घालिती साद राहत नाही मग मजला भान अल्लड वासरपरि मन धावे बेभान पाण्याचा खळखळाट .... वार्याचा थयथयाट ... पाखरांचा चिवचिवाट... जिथे, तिथेच असते रूजत माझे चिरंजीव - अस्तित्व .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3095
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

In reply to by मयुरMK

इथे होते एक महाकवि. आमचे भास अन आमचे भारवि . नाव त्याचे चतुर चाणक्य प्रत्येक कविता त्याची अशक्य . म्हणती त्यास प्रेमाने सारे चच्या जणू वनडेमधला आपला सच्या . जाचास कंटाळून त्याने नाव घेतले लीलाधर नवा मंत्र शिकविला आम्हा साय लीला धर . अता येते दाटून अठवण बुवाच्या त्या भावाची त्याच्या सुलभ कवितांची अन बदललेल्या नावाची. . (यमक जुळलेले आहे. कुठलाही फाऊल चलणार नै)