अस्तित्व
अस्तितत्वता नसते जिथे या जगाची
दूर-दूर....अशा निवांत निश्चल एकांती
रम्य निर्मळशा सरिते काठी
शांत-शांत ... अन हिरवी जेथे वनराई
निर्झराचे वाही चम् -चम् पाणी
गाई खळखळ मंजूळ गाणी
धुंद धावतो पवनही रानोरानी
शीळ मधुर वाजवीत पानोपानी
किलबील-किलबील करोनिया नाद
रानपाखरे मना घालिती साद
राहत नाही मग मजला भान
अल्लड वासरपरि मन धावे बेभान
पाण्याचा खळखळाट ....
वार्याचा थयथयाट ...
पाखरांचा चिवचिवाट...
जिथे, तिथेच असते रूजत
माझे चिरंजीव -
अस्तित्व .
वर्गीकरण
छान आहे
mast! photo konacha aahe?
माझाच आहे फोटो
धन्यवाद एक एकटा , जव्हेरगंज
मस्तं!
थोडा चचा ,थोडा लीला धर! ;)
चचा म्हणजे हो
In reply to चचा म्हणजे हो by मयुरMK
इथे होते एक महाकवि.
In reply to इथे होते एक महाकवि. by अभ्या..
=))
In reply to इथे होते एक महाकवि. by अभ्या..
=))
In reply to इथे होते एक महाकवि. by अभ्या..
=))
In reply to इथे होते एक महाकवि. by अभ्या..
वाह अभ्या राव मस्त !!!!!!!
In reply to इथे होते एक महाकवि. by अभ्या..
@म्हणती त्यास प्रेमाने सारे
धन्यवाद प्र. बद्दल
:) यमक जुळायलाच पाहिजे आस