संस्कृती

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in जे न देखे रवी...
18 Nov 2015 - 1:57 pm

१.

पुलाच्या पलीकडे
एक जमात राहते
रानटी आहे असे
ऐकून आहे फ़क्त
मी कधी पूल ओलांडला नाही

पुलाच्या अलीकडे
माझी जमात राहते
सुसंस्कृत म्हणवते
पूल न ओलांडणे
हीच आमची संस्कृती आहे

२.

पुलापलीकडे राहते
एक विचित्र जमात
दुर्बीण लावून बघतात
असे डोकावून पाहणे म्हणजे
शुद्ध असंस्कृतपणा!

पुलाअलीकडे आम्ही राहतो
आमच्या घरांना नसतात
भिंती,खिडक्या आणि दारं.
पारदर्शक व्यवहार असणे
हीच आमची संस्कृती

३.

एका पावसाळ्यात
नदीला पूर आला
पूल वाहून गेला
गावे बुडाली.
अलीकडचे-पलीकडचे
दोघेही झाले आता
असंस्कृत!

कविता

प्रतिक्रिया

इतकी छान कविता आणि एकही प्रतिसाद नाही अजून!

कविता आवडली. माणसांमध्ये गट किंवा समूह बनवण्याची सहजप्रवृत्ती आढळून येते. तशीच ती इतर प्राण्यांमध्येही आढळते. सर्वच प्राणिमात्रांमध्ये समूहाबाहेरच्यांना सहजासहजी न स्वीकारण्याची प्रवृत्तीही दिसते. पण मानवातल्या समूहबाजीला आणखी एक पदर आहे तो म्हणजे इतर समूहांना कुठल्या न कुठल्या आधारावर आपल्यापेक्षा कमी लेखणे. ही समूहव्यवस्थेची उतरंड जगातल्या बर्‍याच संघर्षांच्या मुळाशी आहे.

ह्या कवितेचे मोठेपण ह्याच उतरंडीच्या निरर्थकतेवर सहजपणे भाष्य करण्यात दिसून येते. त्यामुळे ही कविता मला मनापासून आवडली. पुलेशु.

नाखु's picture

18 Nov 2015 - 5:26 pm | नाखु

मस्त कवीता..
पूल माणसांना जोडतोही आणि मोडतोही !!!!

नीलमोहर's picture

18 Nov 2015 - 5:28 pm | नीलमोहर

अगदी करेक्ट आणि पर्फेक्ट,
आवडली..

निवांत पोपट's picture

18 Nov 2015 - 6:45 pm | निवांत पोपट

स्वामीजी, कविता भारीय....

पैसा's picture

18 Nov 2015 - 6:55 pm | पैसा

स्वाम्या, खूप छान लिहितो आहेस हल्ली! किसीकी नजर ना लगे!

स्वामी संकेतानंद's picture

18 Nov 2015 - 6:59 pm | स्वामी संकेतानंद

नज़र बस दिल्ली(वालों/वाली) की लग सकती है!

मित्रहो's picture

18 Nov 2015 - 8:27 pm | मित्रहो

मस्त

शिव कन्या's picture

19 Nov 2015 - 5:40 pm | शिव कन्या

अर्थ पूर्ण रे संकू!

प्रीत-मोहर's picture

19 Nov 2015 - 6:13 pm | प्रीत-मोहर

Mast re swamya

अन्या दातार's picture

19 Nov 2015 - 6:30 pm | अन्या दातार

अप्रतिम कविता

एक एकटा एकटाच's picture

20 Nov 2015 - 12:49 pm | एक एकटा एकटाच

मस्त कविता

आणि

"एस" ह्यांचा प्रतिसाद आवडला

सस्नेह's picture

20 Nov 2015 - 1:20 pm | सस्नेह

अर्थपूर्ण कविता.

सुरेख कविता आणि एस यांचा प्रतिसादही.

वा! कविता आणि प्रतिसाद दोन्ही छान!

परिकथेतील राजकुमार's picture

22 Nov 2015 - 10:14 am | परिकथेतील राजकुमार

स्वाम्या साला लिहितो भारी.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Nov 2015 - 10:19 am | अत्रुप्त आत्मा

स्वामिज्जि की महान रचनाऐं

मयुरMK's picture

22 Nov 2015 - 10:25 am | मयुरMK

सोप्या शब्दात तुम्हाला जे कवितेत दाखवायचे आहे ते अचूक दाखविले आहे . विचार करायला भाग पाडनारी कविता