Skip to main content

संस्कृती

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 18/11/2015 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
१. पुलाच्या पलीकडे एक जमात राहते रानटी आहे असे ऐकून आहे फ़क्त मी कधी पूल ओलांडला नाही पुलाच्या अलीकडे माझी जमात राहते सुसंस्कृत म्हणवते पूल न ओलांडणे हीच आमची संस्कृती आहे २. पुलापलीकडे राहते एक विचित्र जमात दुर्बीण लावून बघतात असे डोकावून पाहणे म्हणजे शुद्ध असंस्कृतपणा! पुलाअलीकडे आम्ही राहतो आमच्या घरांना नसतात भिंती,खिडक्या आणि दारं. पारदर्शक व्यवहार असणे हीच आमची संस्कृती ३. एका पावसाळ्यात नदीला पूर आला पूल वाहून गेला गावे बुडाली. अलीकडचे-पलीकडचे दोघेही झाले आता असंस्कृत!
लेखनविषय:

वाचने 2747
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

इतकी छान कविता आणि एकही प्रतिसाद नाही अजून! कविता आवडली. माणसांमध्ये गट किंवा समूह बनवण्याची सहजप्रवृत्ती आढळून येते. तशीच ती इतर प्राण्यांमध्येही आढळते. सर्वच प्राणिमात्रांमध्ये समूहाबाहेरच्यांना सहजासहजी न स्वीकारण्याची प्रवृत्तीही दिसते. पण मानवातल्या समूहबाजीला आणखी एक पदर आहे तो म्हणजे इतर समूहांना कुठल्या न कुठल्या आधारावर आपल्यापेक्षा कमी लेखणे. ही समूहव्यवस्थेची उतरंड जगातल्या बर्‍याच संघर्षांच्या मुळाशी आहे. ह्या कवितेचे मोठेपण ह्याच उतरंडीच्या निरर्थकतेवर सहजपणे भाष्य करण्यात दिसून येते. त्यामुळे ही कविता मला मनापासून आवडली. पुलेशु.

मस्त कवीता.. पूल माणसांना जोडतोही आणि मोडतोही !!!!

अगदी करेक्ट आणि पर्फेक्ट, आवडली..

स्वाम्या, खूप छान लिहितो आहेस हल्ली! किसीकी नजर ना लगे!

मस्त कविता आणि "एस" ह्यांचा प्रतिसाद आवडला

अर्थपूर्ण कविता.

स्वाम्या साला लिहितो भारी.

सोप्या शब्दात तुम्हाला जे कवितेत दाखवायचे आहे ते अचूक दाखविले आहे . विचार करायला भाग पाडनारी कविता