जराशी.............

एक एकटा एकटाच's picture
एक एकटा एकटाच in जे न देखे रवी...
15 Nov 2015 - 4:01 pm

तुझ्याच स्वप्नांत
जागतो हा चंद्र
आरास ह़ी चांदण्यांची
मग सजते नभाशी

हि रात्र अलगद
मोहरुन येते
जेव्हा तुझी चाहुल
लागते जराशी...............|

मदहोशल्या रात्री
झुरते रातराणी
नशा तव गंधाची
तिला वाटे हविहविशी

नाजुकशी अलवार
मदमस्त हवा
जेव्हा उठवित शहारे
दरवळते जराशी............|

फुलले रोमांच
सर्वांगावरी या
चुकतात ठोके
या श्वासांच्या लयीशी

रंगेल मिठीतल्या
तुझ्या आवेगाला
जेव्हा आठवून मनी मी
लाजते जराशी..............|

तु आलास दारी
की हे तुझे प्रतिबिंब
खेळे लपंडाव
मन तुझ्या सावलीशी

मिटल्या डोळ्यांतही
तुझाच भास आहे
जेव्हा कधी पापणी
लवते जराशी...............|

कधीतरी उत्तररात्री
पाऊस पडुनी गेला
छेडी मन वैरी, का?
वाटे तुला मी नकोशी

एकदातरी येऊन
पुस तव अधरांनी
जेव्हा सर नयनांतुन
बरसे जराशी...............|

तुझ्याच सयेत
झुरतो हा चंद्र
आरास ही चांदण्यांची
आता विरते मनाशी

हि रात्र अलगद
मालवून जाते
बाळगुन तुझी अवहेलना
उरात जराशी...............|

कविता

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

15 Nov 2015 - 5:08 pm | विशाल कुलकर्णी

क्या ब्बात !

अवांतर : माफ़ कर मित्रा, पण लांबली बरीच.

शब्दबम्बाळ's picture

15 Nov 2015 - 5:25 pm | शब्दबम्बाळ

आवेग भावनांचा,
कसा हा थोपवावा....
घ्या चालवून तुम्ही जरी
लांबली जराशी... :)

एक एकटा एकटाच's picture

15 Nov 2015 - 7:14 pm | एक एकटा एकटाच

मस्त प्रतिसाद

एक एकटा एकटाच's picture

15 Nov 2015 - 7:13 pm | एक एकटा एकटाच

हो झालीय खरी

बहुतेक एका ओळीत दोनच शब्द लिहिल्यामुळे लांबी जास्त वाटतेय.

तरी पुढल्या वेळेस नक्की तुझ्या सुचनेचा विचार करीन

:-)

शब्दानुज's picture

15 Nov 2015 - 5:21 pm | शब्दानुज

लांबली तर लांबली.
आमच येड आमच्याशी बोलत नाही अस म्हणावं का डायरेक्ट?
असो.
प्रेयसीच्या या संवादात पुल्लिंगी चंद्र कसा आला? ( 'तो' चंद्र ना? )
बाकी आवडली.

एक एकटा एकटाच's picture

15 Nov 2015 - 7:21 pm | एक एकटा एकटाच

नायिकेच्या भावनेशी "चंद्र" रूपक म्हणुन वापरला होता.

पैसा's picture

15 Nov 2015 - 5:33 pm | पैसा

कविता आवडली.

बाबा योगिराज's picture

15 Nov 2015 - 6:16 pm | बाबा योगिराज

वा वा वा. एक एकटे भौ मस्तच ना.

एक एकटा एकटाच's picture

15 Nov 2015 - 7:22 pm | एक एकटा एकटाच

सगळ्यांचे मनपुर्वक आभार

आरोह's picture

15 Nov 2015 - 8:26 pm | आरोह

छान कविता

रातराणी's picture

17 Nov 2015 - 1:26 am | रातराणी

छानय!

मित्रहो's picture

17 Nov 2015 - 12:25 pm | मित्रहो

कविता आवडली

मदनबाण's picture

17 Nov 2015 - 4:52 pm | मदनबाण

छान...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- हाय रे हाय तेरा घुंगटा... :- ढोंगी

एक एकटा एकटाच's picture

20 Nov 2015 - 5:52 pm | एक एकटा एकटाच

सगळ्यांचे मनपुर्वक आभार

माहीराज's picture

21 Nov 2015 - 9:14 pm | माहीराज

खुप छान ...

मांत्रिक's picture

21 Nov 2015 - 9:46 pm | मांत्रिक

झकास! रोमॅण्टीक! सुप्पर!!!