जराशी.............
तुझ्याच स्वप्नांत
जागतो हा चंद्र
आरास ह़ी चांदण्यांची
मग सजते नभाशी
हि रात्र अलगद
मोहरुन येते
जेव्हा तुझी चाहुल
लागते जराशी...............|
मदहोशल्या रात्री
झुरते रातराणी
नशा तव गंधाची
तिला वाटे हविहविशी
नाजुकशी अलवार
मदमस्त हवा
जेव्हा उठवित शहारे
दरवळते जराशी............|
फुलले रोमांच
सर्वांगावरी या
चुकतात ठोके
या श्वासांच्या लयीशी
रंगेल मिठीतल्या
तुझ्या आवेगाला
जेव्हा आठवून मनी मी
लाजते जराशी..............|
तु आलास दारी
की हे तुझे प्रतिबिंब
खेळे लपंडाव
मन तुझ्या सावलीशी
मिटल्या डोळ्यांतही
तुझाच भास आहे
जेव्हा कधी पापणी
लवते जराशी...............|
कधीतरी उत्तररात्री
पाऊस पडुनी गेला
छेडी मन वैरी, का?
वाटे तुला मी नकोशी
एकदातरी येऊन
पुस तव अधरांनी
जेव्हा सर नयनांतुन
बरसे जराशी...............|
तुझ्याच सयेत
झुरतो हा चंद्र
आरास ही चांदण्यांची
आता विरते मनाशी
हि रात्र अलगद
मालवून जाते
बाळगुन तुझी अवहेलना
उरात जराशी...............|
क्या ब्बात !
छान लिहिलीये!!
हा हा हा
धन्यवाद विशाल दा
मग ?
धन्यवाद शब्दानुज
आवडली
१+
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
मस्त रे एकट्या
छानय!
कविता आवडली
छान...
धन्यवाद
खुप छान ...
झकास! रोमॅण्टीक! सुप्पर!!!