बाला

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
9 Nov 2015 - 9:25 pm

एका रणरणत्या दुपारी काळ्या रंगाचे कपडे घालून (जे की त्या रंगाचे उन्हात वापरू नयेत!) एक मुलगी रस्त्यावरून जाताना पाहिली आणि फक्त तिच्या त्या काळ्या कपड्यांच्या निवडीला पाहून ही पहिली कविता स्फुरली! अर्थात त्यात इतरही काही गोष्टींचा अंतर्भाव हा ओघाने आलाच! ;-)

बाला

मध्यान्न समयी
तळपत्या उन्हात
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत!

काय कारण
त्यागूनी सदन
खिजवूनी भास्करा
चालली तोऱ्यात
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत!

चकाकती कांती
नाजूक बांधा
प्रकाशपर्जन्यी
भिजली नखशिखान्त
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत!

भाग्यवान मी जगती
दुसरे नसे कोणी
प्रतिमा धरून नयनी
गहिवरलो मनात
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत!

*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-

एका मस्त गुलाबी थंडी पडलेल्या आणि त्याला तसेच कॉम्प्लिमेंट करणारया सोनसळी किरणांच्या मऊ उबदार सकाळी ही दुसरी एक मुलगी रस्त्यावरून जाताना पाहिली आणि तिच्या हातात असलेल्या छत्रीला पाहून हसू आल्याने ही दुसरी कविता लिहिली गेली! इथेही मग पुन्हा छत्रीसोबत अन्य बाबी आल्याच! ;-)

बाला - २

गुलाबी थंडीच्या
मऊशा उन्हात
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत!

कवळून आळस
गाठला कळस
चालली नाजूका
सावलीच्या मायेत
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत!

जगाचा विसर
चालही सरसर
कुठल्या तालात
कुणाला माहीत!
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत!

पायघोळ झगा
दावितो फुगा
भासे चित्र
ते जलरंगात
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत!

भावकवितामौजमजा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

9 Nov 2015 - 9:35 pm | प्रचेतस

जबरी.
आवडली कविता.

चांदणे संदीप's picture

9 Nov 2015 - 9:45 pm | चांदणे संदीप

____/\____

मांत्रिक's picture

9 Nov 2015 - 9:40 pm | मांत्रिक

बालाही आवडली व निरीक्षणही आवडले...
ढिंच्याक ढिच्याक...

चांदणे संदीप's picture

9 Nov 2015 - 9:46 pm | चांदणे संदीप

ढिंच्याक ढिच्याक...

\o/ \o/ \o/

टवाळ कार्टा's picture

9 Nov 2015 - 9:54 pm | टवाळ कार्टा

:)
मस्तय....कच्चा माल ;)

पीके's picture

9 Nov 2015 - 9:59 pm | पीके

टका...आपलं पक्का माल....

पीके's picture

9 Nov 2015 - 10:01 pm | पीके

विंन्डबन म्हनतय म्या..

चांदणे संदीप's picture

9 Nov 2015 - 10:40 pm | चांदणे संदीप

तुमच "Production unit" किती सावकाश काम करणार आहे राव!
आजपर्यंत इतक्या कच्च्या मालाचा पुरवठा केलेला आहेच की...
;-)

टवाळ कार्टा's picture

9 Nov 2015 - 11:10 pm | टवाळ कार्टा

सध्ध्या ओव्हरलोडेड आहे :)

एक एकटा एकटाच's picture

9 Nov 2015 - 11:07 pm | एक एकटा एकटाच

मस्तच

जव्हेरगंज's picture

9 Nov 2015 - 11:12 pm | जव्हेरगंज

पायघोळ झगा
दावितो फुगा>>> हा नक्की काय प्रकार असावा याचा विचार करतोय

smile

चांदणे संदीप's picture

10 Nov 2015 - 12:13 am | चांदणे संदीप

प्रतिसाद द्यायची नवीन श्टाइल आवडली जव्हेरगंजभौ!!

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 9:12 am | टवाळ कार्टा

म्हंजी पायाकडून हवा घुस्ल्यावर झगा फुलतो =))

स्वप्नांची राणी's picture

10 Nov 2015 - 12:26 am | स्वप्नांची राणी

ती बाला काय...मला वाटलेलं तो बाला... तो हो आरं बाला, आग्र्यांचा..

चांदणे संदीप's picture

10 Nov 2015 - 1:02 am | चांदणे संदीप

कधी कधी त्या बालेकडेपण लक्ष देतो... ;-)

स्वप्नांची राणी's picture

10 Nov 2015 - 2:31 am | स्वप्नांची राणी

मी मात्र नेहमीच 'तो' बाला कडेच लक्ष्य देते...सर्रळ साधी ना मी...!! ;)

जव्हेरगंज's picture

10 Nov 2015 - 9:53 am | जव्हेरगंज

मलातर बाला म्हणजे बा ला (बापाला) या टाईपचे कायतरी वाटले होते

:-D

चांदणे संदीप's picture

10 Nov 2015 - 10:01 am | चांदणे संदीप

काहीही हा 'ज''
:-D

कवीचं नाव बघून मला 'कं बाला' वाटला.

चांदणे संदीप's picture

10 Nov 2015 - 9:20 pm | चांदणे संदीप

:D :D

अरे वाह, तुमच्याकडे 'कं' 'रं' बोलतो, मग 'रं' काय बोलतो?