एका रणरणत्या दुपारी काळ्या रंगाचे कपडे घालून (जे की त्या रंगाचे उन्हात वापरू नयेत!) एक मुलगी रस्त्यावरून जाताना पाहिली आणि फक्त तिच्या त्या काळ्या कपड्यांच्या निवडीला पाहून ही पहिली कविता स्फुरली! अर्थात त्यात इतरही काही गोष्टींचा अंतर्भाव हा ओघाने आलाच! ;-)
बाला
मध्यान्न समयी
तळपत्या उन्हात
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत!
काय कारण
त्यागूनी सदन
खिजवूनी भास्करा
चालली तोऱ्यात
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत!
चकाकती कांती
नाजूक बांधा
प्रकाशपर्जन्यी
भिजली नखशिखान्त
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत!
भाग्यवान मी जगती
दुसरे नसे कोणी
प्रतिमा धरून नयनी
गहिवरलो मनात
कोण ही बाला
अंधाऱ्या वस्त्रांत!
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
एका मस्त गुलाबी थंडी पडलेल्या आणि त्याला तसेच कॉम्प्लिमेंट करणारया सोनसळी किरणांच्या मऊ उबदार सकाळी ही दुसरी एक मुलगी रस्त्यावरून जाताना पाहिली आणि तिच्या हातात असलेल्या छत्रीला पाहून हसू आल्याने ही दुसरी कविता लिहिली गेली! इथेही मग पुन्हा छत्रीसोबत अन्य बाबी आल्याच! ;-)
बाला - २
गुलाबी थंडीच्या
मऊशा उन्हात
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत!
कवळून आळस
गाठला कळस
चालली नाजूका
सावलीच्या मायेत
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत!
जगाचा विसर
चालही सरसर
कुठल्या तालात
कुणाला माहीत!
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत!
पायघोळ झगा
दावितो फुगा
भासे चित्र
ते जलरंगात
कोण ही बाला
छत्रीच्या छायेत!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3477
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरी. आवडली कविता.
____/\____
In reply to जबरी. आवडली कविता. by प्रचेतस
बालाही आवडली व निरीक्षणही
;-)
In reply to बालाही आवडली व निरीक्षणही by मांत्रिक
:) मस्तय....कच्चा माल ;)
येवुं द्या
In reply to :) मस्तय....कच्चा माल ;) by टवाळ कार्टा
म्हाणजे..
In reply to येवुं द्या by पीके
तुमच "Production unit"
In reply to :) मस्तय....कच्चा माल ;) by टवाळ कार्टा
सध्ध्या ओव्हरलोडेड आहे :)
In reply to तुमच "Production unit" by चांदणे संदीप
मस्तच
पायघोळ झगा
हा...हा…हा
In reply to पायघोळ झगा by जव्हेरगंज
म्हंजी पायाकडून हवा
In reply to पायघोळ झगा by जव्हेरगंज
आरं बाला....
कधी कधी
In reply to आरं बाला.... by स्वप्नांची राणी
मी मात्र नेहमीच 'तो' बाला
In reply to कधी कधी by चांदणे संदीप
मलातर बाला म्हणजे बा ला
In reply to मी मात्र नेहमीच 'तो' बाला by स्वप्नांची राणी
काहीही हा 'ज'
In reply to मलातर बाला म्हणजे बा ला by जव्हेरगंज
कवीचं नाव बघून मला 'कं बाला'
कं बोल्तो रं बाला!
In reply to कवीचं नाव बघून मला 'कं बाला' by सूड
अरे वाह, तुमच्याकडे 'कं' 'रं'
In reply to कं बोल्तो रं बाला! by चांदणे संदीप