Skip to main content

बाला

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 09/11/2015 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
एका रणरणत्या दुपारी काळ्या रंगाचे कपडे घालून (जे की त्या रंगाचे उन्हात वापरू नयेत!) एक मुलगी रस्त्यावरून जाताना पाहिली आणि फक्त तिच्या त्या काळ्या कपड्यांच्या निवडीला पाहून ही पहिली कविता स्फुरली! अर्थात त्यात इतरही काही गोष्टींचा अंतर्भाव हा ओघाने आलाच! ;-) बाला मध्यान्न समयी तळपत्या उन्हात कोण ही बाला अंधाऱ्या वस्त्रांत! काय कारण त्यागूनी सदन खिजवूनी भास्करा चालली तोऱ्यात कोण ही बाला अंधाऱ्या वस्त्रांत! चकाकती कांती नाजूक बांधा प्रकाशपर्जन्यी भिजली नखशिखान्त कोण ही बाला अंधाऱ्या वस्त्रांत! भाग्यवान मी जगती दुसरे नसे कोणी प्रतिमा धरून नयनी गहिवरलो मनात कोण ही बाला अंधाऱ्या वस्त्रांत! *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- एका मस्त गुलाबी थंडी पडलेल्या आणि त्याला तसेच कॉम्प्लिमेंट करणारया सोनसळी किरणांच्या मऊ उबदार सकाळी ही दुसरी एक मुलगी रस्त्यावरून जाताना पाहिली आणि तिच्या हातात असलेल्या छत्रीला पाहून हसू आल्याने ही दुसरी कविता लिहिली गेली! इथेही मग पुन्हा छत्रीसोबत अन्य बाबी आल्याच! ;-) बाला - २ गुलाबी थंडीच्या मऊशा उन्हात कोण ही बाला छत्रीच्या छायेत! कवळून आळस गाठला कळस चालली नाजूका सावलीच्या मायेत कोण ही बाला छत्रीच्या छायेत! जगाचा विसर चालही सरसर कुठल्या तालात कुणाला माहीत! कोण ही बाला छत्रीच्या छायेत! पायघोळ झगा दावितो फुगा भासे चित्र ते जलरंगात कोण ही बाला छत्रीच्या छायेत!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3502
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

तुमच "Production unit" किती सावकाश काम करणार आहे राव! आजपर्यंत इतक्या कच्च्या मालाचा पुरवठा केलेला आहेच की... ;-)

In reply to by चांदणे संदीप

मी मात्र नेहमीच 'तो' बाला कडेच लक्ष्य देते...सर्रळ साधी ना मी...!! ;)

In reply to by स्वप्नांची राणी

मलातर बाला म्हणजे बा ला (बापाला) या टाईपचे कायतरी वाटले होते :-D