एक प्रेम कहाणी....

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
25 Oct 2015 - 12:39 am

एक प्रेम कहाणी...........
ती असेल ८-९ वर्षाची...
बागेत खेळताना तिचे लक्ष त्याच्या कडे गेले ..तो पण असेल १२-१३ वर्षाचा..
तो पण तिच्या कडे अधून मधून बघत होता....
तिन्र त्याच्या नकळत त्याचा फोटो काढला......
व त्याने पण...
बाबांच्या बदली मुळे तिने शहर बदलले...काळ पुढे सरकत गेला व ति हा प्रसंग विसरली.....
पुढे तिचे लग्न झाले...व संसाराला लागली...
एकदा पर्स आवरत असताना तिला जुना फोटो सापडला...
पती जवळच उभा होता ..
त्याने विचारले "कोण आहे हा छोटा मुलगा?"
ति हसली अन म्हणाली "माझे पहिले प्रेम..पहिला क्रश".....
असे म्हणताचे त्याने खिशांतून पाकीट काढले...
त्यात एका छोट्या मुलीचा फोटो होता..
तो दाखवत तो म्हणाला..हे बघ माझे पहिले प्रेम...मला ति खूप आवडली होती..बागेत यायची खेळायला..
आपला बालपणीचा फोटो बघताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले...
आवेगाने ति उठली व त्याला घट्ट मिठी मारली........
परमेश्वर पण असे सुखद चमत्कार करत असतो

कथा

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

25 Oct 2015 - 12:43 am | बाबा योगिराज

धन्य.
मी पैला.

मध्यस्थ कोण होते हो लग्न जुळवणारे?

आनंद कांबीकर's picture

25 Oct 2015 - 12:54 am | आनंद कांबीकर

.....

काका, होसुमीयाघ या श्रीरियलला तुमच्यासारख्या पटकथालेखकाची नितांत गरज आहे. निखिल साने यांच्याशी त्वरित संपर्क साधावा.

अत्रे's picture

25 Oct 2015 - 10:50 am | अत्रे

असे नकळत फोटो काढणे बेकायदेशीर आहे.

अजया's picture

25 Oct 2015 - 10:59 am | अजया

बरोबर =))

टवाळ कार्टा's picture

25 Oct 2015 - 2:25 pm | टवाळ कार्टा

गोग्गोड

किसन शिंदे's picture

25 Oct 2015 - 2:28 pm | किसन शिंदे

वाटसापवर ज्या फॉरव्र्डेद पोस्ट येतात तशी काहीशी वाटलॉ कथा.:D

जव्हेरगंज's picture

25 Oct 2015 - 2:51 pm | जव्हेरगंज

त्याने विचारले "कोण आहे हा छोटा मुलगा?">>>>>>>>>>> ईथुन पुढच्या कथेला साष्टांग :-D

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

25 Oct 2015 - 9:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नसेल आठवत त्याला लहानपणचा चेहेरा =))

बाकी ११-१२ वर्षांच्या पोरांच्या हातामधे कॅमेरे, कॅमेरा फोन देणारे आईबाप थोर. तसचं पर्स आवरताना असा शब्दप्रयोग वाचला. वर्षानुवर्ष पर्स नं आवरणार्‍या त्या जगन्मातेमनमोहिनीला पण सा-ष टांग णमस्कार.

कानडा's picture

26 Oct 2015 - 12:59 pm | कानडा

बाकी ११-१२ वर्षांच्या पोरांच्या हातामधे कॅमेरे, कॅमेरा फोन देणारे आईबाप थोर.

अहो एका महाभाग मित्राच्या २.५ वर्षाच्या मुलाकडे स्वतःचा मोटो-जी (३-जी ईंटरनेट सहीत) आहे. त्या मानाने ११-१२ वर्षांची पोरे म्हणजे म्हातारी झालीत.
---
कानडा

द-बाहुबली's picture

25 Oct 2015 - 6:52 pm | द-बाहुबली

परमेश्वर पण असे सुखद चमत्कार करत असतो जे हास्यास्पद पध्दतीने लेखणीतुन चितारले जातात...

आदूबाळ's picture

25 Oct 2015 - 7:28 pm | आदूबाळ

ऑस्करचं काय? कमीत कमी सुवर्णमयूर तरी?

चेन्नयला पाठवा. नंदी मिळेल

द-बाहुबली's picture

25 Oct 2015 - 7:44 pm | द-बाहुबली

कोणाला समजले नसेल तर नम्रपणे नमुद करतो ऑस्कर हा शब्द मी उपहासाने वापरला होता... कोणीही उठतो कारुण्य चितारतो अन पुरस्कार मिळवुन जातो हा उपहास "ऑस्कर"देण्यामागे होता.- जय हिंद.

चांदणे संदीप's picture

27 Oct 2015 - 11:05 am | चांदणे संदीप

आसा नाय करायचा हां! एकदा दिलान पुना कारून नाय घेयाचा!
ते कांबीकरांक काय वाटन?
(कृ.ह.घ्या!)

अभय म्हात्रे's picture

26 Oct 2015 - 12:25 pm | अभय म्हात्रे

अप्रतिम कथा.

नाखु's picture

26 Oct 2015 - 1:01 pm | नाखु

प्रमुख वर्तमान पात्रीय पोच :

"एक मराठी मनाचा हुंकार " दै सामना
"अशी ताटातूट युती सरकारातच होते हे दुदैवी आणि संताप जनक आहे : राणे संचालीत "प्रहार"
"यात भाजपा वाल्यांचा हात आहे असं साहेबांना वाटतय" = तांबी लागलेला सक्काळ
"वियोगातही पुन्हा भेटले एक अजब गजब काहानी " == पटापटा मटा
"पहा अच्छे दिन आलेत की नाही" = दै तरूण भारत
"असं कॉन्ग्रेसच्या राज्यातच घडलं असावं युती त्याचं श्रेय लाटतेय" = दै लोकमत मध्ये प्रूथ्वी बाबा
"भेटायचच होतं तर आधी ताटातूट का?" दै लोकसत्ता
"ते भेटलेना तुम्ही तुमची कामं करा" दै पुढारी

सात भिकार लेखानंतर एक चांगला लेख दै मिपा