सोपी मसाला सुपारी

पद्मावति's picture
पद्मावति in पाककृती
11 Sep 2015 - 2:25 am

साहित्य

बडीशोप- ३ वाट्या
ओवा- ३/४ वाटी
लवंग-अर्धी वाटीच्या किंचित जास्तं
वेलदोडे- अर्धी वाटीच्या किंचित जास्तं
सुके खोबरे किसलेले ( किंवा डेसीकेटेड कोकोनट)- १ वाटी
तीळ- १ वाटी
ज्येष्ठ मध पावडर- दीड वाटी
मीठ आणि साखर- चवीपुरते.

.

कृती

शोप, ओवा, लवंगा, वेलदोडे, किसलेले खोबरे, आणि तीळ निरनिराळे अगदी खरपूस भाजून घ्यावे. या सगळ्या गोष्टी खमंग भाजणे महत्वाचे आहे, बाकी साहित्याचं प्रमाण थोडं कमी जास्तं झालं तरी चालतं.

.

तीळ आणि ज्येष्ठ मध पावडर सोडून बाकी सगळ्या गोष्टी मिक्सर मधे बारीक कूटून घ्याव्या.

.

कूटलेल्या मिश्रणात भाजलेले तीळ आणि ज्येष्ठ मध पावडर टाकावी. चवीला किंचित साखर आणि मीठ टाकावे. यात सुपारी नसल्यामुळे लहान मुलांनी खाल्ली तरी काहीच हरकत नाही , उलट त्यांना पाचक म्हणून चांगलंच आहे.

.

यात रंगीत शोपेच्या गोळ्या पण टाकु शकता. मस्तं लागतात.

.

माहितीचा स्रोत: माझ्या सासूबाई.

प्रतिक्रिया

एकदम मस्त पाक्रु१ मला हवीच होती कृती! सुपारीचे भांडे किती गोड आहे. लवंगा जरा जास्त नाही का होत?

श्रीरंग_जोशी's picture

11 Sep 2015 - 2:44 am | श्रीरंग_जोशी

सादरीकरण एकदम खास आहे.

पाकृ आवडली. घरगुती मसाला सुपारी खाऊन जमाना झालाय.

पद्मावति's picture

11 Sep 2015 - 2:46 am | पद्मावति

लवंगा दिसायला जास्तं वाटतात पण त्या खूप भाजून घेतल्या असल्यामुळे त्रास नाही होत. बाकी खोबरं, ज्येष्ठ मधामुळे सुपारी अगदी सौम्य लागते. हवं तर ज्येष्ठ मध जरा जास्तं टाकावा आणि बाकी गोष्टी सुद्धा थोड्या आपल्या चवीनुसार कमी जास्ती केल्या तरीही काहीच हरकत नाही.

रेवती's picture

11 Sep 2015 - 3:54 am | रेवती

ओक्के.

यशोधरा's picture

11 Sep 2015 - 5:33 am | यशोधरा

अरे वा! मस्त!

फोटा बहु सारु पण ए गुजराती मुखवास छे।मसाला सोपारी न केहवाय।

रमेश आठवले's picture

11 Sep 2015 - 8:00 am | रमेश आठवले

+१

एस's picture

11 Sep 2015 - 8:17 am | एस

ही मसाला सुपारी नाही. मुखवास आहे. अर्थात छान आहे हेवेसांनल.

कैलासवासी सोन्याबापु's picture

11 Sep 2015 - 8:27 am | कैलासवासी सोन्याबापु

एकच नंबर!!

मुक्त विहारि's picture

11 Sep 2015 - 8:54 am | मुक्त विहारि

मसाला सुपारी आवडली......

बरीये सोपी कृती.गणपतीसाठी करुन ठेवायचीच आहे नाहीतरी.

सौंदाळा's picture

11 Sep 2015 - 10:53 am | सौंदाळा

मस्त कृती आणि फोटो
घरी मसाला सुपारी करायचो पण ती इतक्या पटकन संपायची की आई ओरडायची.. आम्ही येता-जाता बकाणे मारायचो, सकाळी कॉलेजला जाताना, संध्याकाळी खेळायला जाताना, थोडक्यात प्रत्येक वेळी घराबाहेर पडताना आणि नाष्टा आणि दोन्ही जेवणांनंतर. यात मी, बहीण आणि आमचे बाबा पण सामील असायचे.
नंतर मग बाकी कामात हा व्याप नको म्हणुन सुपारी घरी करणे बंदच केले. आता नुसती भाजलेली बडीशेप घरी असते किंवा कधी कधी विकतची मसाला सुपारी आणतो.
आता या लेखाच्या निमित्ताने परत एकदा मसाला सुपारी करुन बघेन.

सस्नेह's picture

11 Sep 2015 - 11:07 am | सस्नेह

खूप छान सोपी पाकृ.
लवंगा सोडून इतर सर्व चालेल.

बर्याच लोकांनी प्रातिसादात सांगितल्याप्रमाणे याला खरं म्हणजे मूखवास हा शब्द हवा होता.
सुपारीची पूड ( बीटल नट) या मिश्रणामधे टाकली असती तर मग तीला सुपारी म्हणणे योग्य झाले असते.
आमच्याघरी मी मुलांना नको म्हणून सुपारी पूड टाकत नाही. जे काही असे मिश्रण बनवते त्यालाच सुपारी म्हणायची सवय आहे. दूसरं काही म्हणायचं लक्षातच नाही, त्यामुळे इथे लिहितांना सुद्धा मसाला सुपारी हेच नाव दिलं.

नीलमोहर's picture

11 Sep 2015 - 11:33 am | नीलमोहर

घरी बर्‍याचवेळेस अशी करण्यात येते,
छोट्या भाचीला फार आवडते, येता जाता खाणं चालू असतं मग लपवून ठेवावी लागते. :)

स्वाती दिनेश's picture

11 Sep 2015 - 11:57 am | स्वाती दिनेश

छानच लागते ही सुपारी नसलेली सुपारी..
स्वाती

नाखु's picture

11 Sep 2015 - 12:07 pm | नाखु

सकाळी रात्री नी दुपारी !
खावी फक्त हीच सुपारी !!

कवी :जिल्ब्त्मां चोचले.

प्रसाद गोडबोले's picture

11 Sep 2015 - 12:15 pm | प्रसाद गोडबोले

वाह अप्रतिम .

आमच्या सातार्‍याच्या सुप्रसिध्द भावे सुपारीची आठवण झाली

मदनबाण's picture

12 Sep 2015 - 5:10 am | मदनबाण

भावे "मनी" भावे ! ;)
पाकॄ जबरा... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- Raja

पियुशा's picture

11 Sep 2015 - 12:15 pm | पियुशा

मस्त मस्त मस्त

पैसा's picture

11 Sep 2015 - 7:43 pm | पैसा

मस्त आहे प्रकार! आणि सुपारी नाही त्यात!

आदूबाळ's picture

11 Sep 2015 - 9:15 pm | आदूबाळ

अरे पण यात सुपारी कुठाय?

(मर्डर सिनेमात मर्डर नव्हता तसं...)

ह. घ्या.

गुलाबजाम मध्ये गुलाब असतो का? सीताफळात सीता असते का वैगरे वैगरे... ;)

पद्मावति's picture

11 Sep 2015 - 9:21 pm | पद्मावति

आणि शंकर पाळ्यात शंकर ?

सविता००१'s picture

12 Sep 2015 - 10:58 am | सविता००१

मस्त

मधुरा देशपांडे's picture

12 Sep 2015 - 3:16 pm | मधुरा देशपांडे

मस्त. फोटो आणि सादरीकरणही छानच. माझी आई करते त्यात धनियाडाळ, बाळंतशोप आणि थोडी थंडाई घालते. बाकी अशीच पद्धत.

Sanjay Uwach's picture

12 Sep 2015 - 10:54 pm | Sanjay Uwach

पेटंट
खरच आपण या मसाला सुपारीचे "पेटंट" (reserved rights) घ्यायला हवे,फारच छान सादरीकरण

नूतन सावंत's picture

14 Sep 2015 - 9:52 am | नूतन सावंत

पद्मवति,नॉनव्हेज जेवणानंतर हवीच अशी ही सुपारी आहे करून पाहीन आता.कृतीबद्दल धन्यवाद.

सानिकास्वप्निल's picture

15 Sep 2015 - 12:14 am | सानिकास्वप्निल

मस्तं कृती सांगितलीस मुखवासाची, फोटो बघूनचं चव आली तोंडात.
सादरीकरण खूप आवडले खासकरुन ते गोडुले भांडे ;)
मला करायचीये पण ज्येष्ठ मध पावडर आता आमच्या शेफिल्डात कुठून आणू बरे?

अहो असं काय करता! ज्येष्ठमध म्हणजे "लिकरिश".

लिकरिश रूट पावडर "हॉलंड अँड बेरे" सारख्या दुकानांत मिळते. नाहीतर इथून मागवा.

सानिकास्वप्निल's picture

17 Sep 2015 - 1:27 am | सानिकास्वप्निल

ज्येष्ठमध म्हणजे "लिकरिश" हे मला माहित आहे पण ते हॉलंड अँड बेरेमध्ये मिळू शकेल हे माहित नव्हते. लवकरच आमच्या इथल्या हॉलंड अँड बेरेमध्ये शोधते :)
धन्यवाद आदूबाळ

दिपक.कुवेत's picture

16 Sep 2015 - 6:14 pm | दिपक.कुवेत

ट्राय करायला हवं

दिवाकर कुलकर्णी's picture

17 Sep 2015 - 2:28 am | दिवाकर कुलकर्णी

बकाणा नावाने एक सुपारी प्रसिध्द होती.त्याच्या जवल ही जाते.

अनन्न्या's picture

30 Sep 2015 - 4:45 pm | अनन्न्या

मला फक्त लवंग कमी लागली. बाकी मस्त झालीय, गणपतीच्या गडबडीत करायची राहून गेली, म्हणून प्रतिक्रियाही दिली नव्हती.

पदम's picture

30 Sep 2015 - 6:27 pm | पदम

कधी केली नाही. आता करेन.