साहित्य
बडीशोप- ३ वाट्या
ओवा- ३/४ वाटी
लवंग-अर्धी वाटीच्या किंचित जास्तं
वेलदोडे- अर्धी वाटीच्या किंचित जास्तं
सुके खोबरे किसलेले ( किंवा डेसीकेटेड कोकोनट)- १ वाटी
तीळ- १ वाटी
ज्येष्ठ मध पावडर- दीड वाटी
मीठ आणि साखर- चवीपुरते.
कृती
शोप, ओवा, लवंगा, वेलदोडे, किसलेले खोबरे, आणि तीळ निरनिराळे अगदी खरपूस भाजून घ्यावे. या सगळ्या गोष्टी खमंग भाजणे महत्वाचे आहे, बाकी साहित्याचं प्रमाण थोडं कमी जास्तं झालं तरी चालतं.
तीळ आणि ज्येष्ठ मध पावडर सोडून बाकी सगळ्या गोष्टी मिक्सर मधे बारीक कूटून घ्याव्या.
कूटलेल्या मिश्रणात भाजलेले तीळ आणि ज्येष्ठ मध पावडर टाकावी. चवीला किंचित साखर आणि मीठ टाकावे. यात सुपारी नसल्यामुळे लहान मुलांनी खाल्ली तरी काहीच हरकत नाही , उलट त्यांना पाचक म्हणून चांगलंच आहे.
यात रंगीत शोपेच्या गोळ्या पण टाकु शकता. मस्तं लागतात.
माहितीचा स्रोत: माझ्या सासूबाई.
कूटलेल्या मिश्रणात भाजलेले तीळ आणि ज्येष्ठ मध पावडर टाकावी. चवीला किंचित साखर आणि मीठ टाकावे. यात सुपारी नसल्यामुळे लहान मुलांनी खाल्ली तरी काहीच हरकत नाही , उलट त्यांना पाचक म्हणून चांगलंच आहे.
माहितीचा स्रोत: माझ्या सासूबाई.
वाचने
18541
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम मस्त पाक्रु१ मला हवीच
सादरीकरण एकदम खास
लवंगा दिसायला जास्तं वाटतात
ओक्के.
In reply to लवंगा दिसायला जास्तं वाटतात by पद्मावति
अरे वा! मस्त!
फोटा बहु सारु पण ए गुजराती
+१
In reply to फोटा बहु सारु पण ए गुजराती by कंजूस
+२
In reply to +१ by रमेश आठवले
एकच नंबर!!
सुपारी नसलेली...
बरीये सोपी कृती.गणपतीसाठी
मस्त कृती आणि फोटो
खूप छान सोपी पाकृ.
सर्व प्रतिसादांचे खूप मनापासून आभार.
छान लागते ही सुपारी,
छान..
+१
वाह अप्रतिम .
भावे "मनी" भावे ! ;)
In reply to वाह अप्रतिम . by प्रसाद गोडबोले
मस्त मस्त मस्त
मस्त आहे!
अरे पण यात सुपारी कुठाय?
गुलाबजाम मध्ये गुलाब असतो का?
In reply to अरे पण यात सुपारी कुठाय? by आदूबाळ
आणि शंकर पाळ्यात शंकर ?
खूप छान
मस्त
पेटंट
पद्मवति,नॉनव्हेज जेवणानंतर
मस्तं कृती सांगितलीस
अहो असं काय करता! ज्येष्ठमध
In reply to मस्तं कृती सांगितलीस by सानिकास्वप्निल
ज्येष्ठमध म्हणजे "लिकरिश" हे
In reply to अहो असं काय करता! ज्येष्ठमध by आदूबाळ
मुखवास आवडला
बकाणा
करून पाहिली!
मस्त