भाजेलेणी कट्टा चित्रकथा थोडक्यात

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
7 Sep 2015 - 1:04 pm

भाजेलेणी कट्टा-(६ सप्टेंबर २०१५ ).

१)नादखुळा यांच्या रथाजवळ-

डावीकडून -सौ• मुवि,सुधांशु नूलकर,वरद आणि बाबा नादखुळा,मुवि आणि आपले नम्र सुहास्यवदन प्रचेतस.फोटोत नसलेले कॅमर्यामागे कंजूस,काही अगत्याच्या कामावर बाहेर गेलेले धन्या उर्फ सगा.

२) एक पुरावा म्हणून -

३)शिल्पांचं काय आहे---
प्रचेतस मुविंना सांगताहेत-

४)२०१५ मध्ये सुधांशु नूलकर भाजे चैत्यगृहास भेट देऊन गेले होते.

५)चैत्यगृहातील स्तूप.

६)आमच्या पुण्यात अssस्स आहे हे चैत्यगृहात समजावताना नादखुळा.मान्यवर प्रचेतस आणि जीवाचे कान करून ऐकणारे मिपाकर.

७)यावर्षी लेण्यांपेक्षा ढगांचा फोटो महत्त्वाचा ठरला.

८)इंद्रायणी नदी.
लेण्यातल्या शेवटच्या शिल्पातल्या ऐरावतावरून आलेल्या इंद्राच्या शिल्पावरून तर या नदीचे नाव इंद्रायणी पडले असेल कदाचित.( अधिक माहितीसाठी
काथ्याकूट
इंद्रध्वज आणि शक्रोत्सव; थोडी माहिती, थोडे प्रश्न
वगैरे काथ्याकूट धागा पहा.)

यावेळीही एका दगडात दोन कट्टे करण्याचा योग आला.शनिवार -रविवारी मळवली स्टेशन पाहून दीड किमीवरच्या एमटीडीसी येथे आमच्या शाळेतल्या १९७१-SSC बॅचमधल्या मुलामुलींचा मेळावा होता.२३ जण आले होते.तो रविवारी सकाळी नऊला संपला. तिथून लगेच इथे भाजेला येताना दिसलेली इंद्राणी / इंद्रायणी नदी तिचा फोटो काढला.

प्रतिक्रिया

आनंदराव's picture

7 Sep 2015 - 1:54 pm | आनंदराव

झक्कास !

नूतन सावंत's picture

7 Sep 2015 - 2:15 pm | नूतन सावंत

फोटो दिसत नाहीत

नाखु's picture

7 Sep 2015 - 2:17 pm | नाखु

मला वाट्लं नी एकटाच काय न दिसणारा

सूड's picture

7 Sep 2015 - 2:33 pm | सूड

+१

नूतन सावंत's picture

7 Sep 2015 - 2:15 pm | नूतन सावंत

दिसले

पद्मावति's picture

7 Sep 2015 - 5:47 pm | पद्मावति

मस्तं. वृतांत, फोटो दोन्हीही आवडले.

१० वाजता मी, धन्या, नाखु व चि. नाखु मळवली स्टेशनवर येऊन पोहोचलो. तितक्यात तेथे कंजूसकाका आलेच. नूलकर काका डेक्कन एक्सप्रेसने येत असल्याने लोणावळ्याहून १०:१० ची लोकल पकडून मळवळीला उतरले. मुवि व सौ. मुवि अगोदरच भाजे गावात पारावार बसून आमची वाट पाहात होतेच. भाजे गावात पोहोचताच थोड्याफार गप्पा मारून भाजे लेणीच्या मार्गाला लागलो. कंजूस काकांची किल्ले भ्रमंती आणि नूलकर काकांचे कीटक विश्व हा त्यांच्यासोबत राहून प्रत्यक्ष अनुभव घेण्याचाच विषय आहे. विविध पतंग, फ़ुलपाखरं, स्वत:भोवती थुंकीसदृश फ़ेसाळ आवरण करणारा थुंकी किडा त्यांनी तेथें प्रत्यक्ष दाखवला. अफाट विश्व आहे हे कीटकांचे.

बाकी भाजेला सुर्यगुंफ़ेत बसून भारताच्या प्राचीन इतिहासावर भरपूर गप्पा रंगल्या. एकंदरीत जाम मजा आली. धमाल नुसती.

द-बाहुबली's picture

7 Sep 2015 - 6:21 pm | द-बाहुबली

फटू बघुन कल्पना येतेय. अशेच कत्टे करा आणी धमाल व्रुतांतही लिवा. पुढील कट्याला मनःपुर्वक शुभेच्चा.

क्या बात है!

चौकटराजा's picture

7 Sep 2015 - 8:12 pm | चौकटराजा

यावेळीही एका दगडात दोन कट्टे करण्याचा योग आला. आता उमगले . कंजूस काकाना डोंबिवली ते मळवली तिकीटासाठी एकच दगड मोजावा लागला. ( पयशे वाचले ) धन्य ! धन्य आहे कंजूसपणाची !

सगा हे दगड रसिक नसल्याने अशी लेण्याबिण्याच्या जागी " तातडीच्जी " कामे निघणारच !

मला प्रचेतस साहेबांचा फोन " येता काय काका ....? " असा आला होता. पण मी बायकोच्या मालकीचे घरात माप ओलांंडत असतानाच तो फोन आला. मग काय करणार .....?

ते प्रचेतस यांचे हास्य अशासाठी आहे की ते भाजे येथे एकटे दिसत असले तरी त्यांच्या बरोबर डेटिंगला " दर्पण सुंदरी" आली आहे.( ती मनात आहे त्यांच्या ! ) .

मस्त झालेला दिसतोय कट्टा.आम्ही मिसलाच:(

सतिश गावडे's picture

7 Sep 2015 - 9:13 pm | सतिश गावडे

लेणी वगैरे विषयात रस नसल्याने मी या कट्ट्याला नाखुकाकांच्या रथाचा सारथी म्हणून हजेरी लावली.

कट्टेकरी लेणी आणि शिल्पे पाहत असताना मी निसर्ग न्याहाळत होतो. मजा आल़ी.

***कट्टेकरी लेणी आणि शिल्पे पाहत असताना मी निसर्ग न्याहाळत होतो. मजा आल़ी.****
प्रामाणिक आत्मकथन काळजाला भिडलेच्च.
विहारातील कट्टयाला यांनीच न्याय दिला डोळे उघडे ठेवून.

अत्रुप्त आत्मा's picture

7 Sep 2015 - 11:25 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह्व्वा! शेवटचा फोटो अतीशय सुखावून गेला. :)

बोका-ए-आझम's picture

8 Sep 2015 - 12:30 am | बोका-ए-आझम

खादाडीचे फटू न टाकल्याबद्दल णिशेध!

विशाल कुलकर्णी's picture

8 Sep 2015 - 11:37 am | विशाल कुलकर्णी

मस्त ट्रिप !
पाऊस असता तर अजुन मस्त झाली असती. कुठे उलथलाय की बाबा? :(

आमची २०१२ ची भाजेभेट

चौथा कोनाडा's picture

8 Sep 2015 - 12:05 pm | चौथा कोनाडा

व्वा, वाह !
मस्त कट्टा, छान फोटो !

सत्याचे प्रयोग's picture

8 Sep 2015 - 12:54 pm | सत्याचे प्रयोग

वर्णन त्रोटक वाटलंय पण फोटो १ दम झक्क्कास

स्लाईडशो म्हणून चित्रकथा लिहिले.भाजेलेण्याविषयी इतरत्र बरीच माहिती आली आहेच .कट्ट्याला मिपाकरांची अखंड बडबड सुरूच होती ती "आमच्याकडे अssस्स असतं, शिल्पांचं काय ss आहे -----" या वाक्यांत उरकली.

आणखी फोटो नूलकर टाकणार आहेतच.कट्टा दीड वाजता आटपला.पुणेकरांनी त्यांच्या नेहमीच्या खादाडीच्या हॅाटेलकडे रथ हाकलला ।मळवली स्टेशनवर कचोरी,लाडू वगैरे आणलेले पदार्थ खाल्ले. मुवि पत्नीसह,नूलकर आणि मी लोकलने लोणावळ्याला गेलो.मुवि बसने डोंबिवलीला गेले.आमचे कोयनाचे रेजर्वेशन असल्याने नूलकर आणि मी लोणावळ्याच्या राइवुड पार्क या बागेत बसून गप्पा मारत बसलो.छान गार जागा आहे.पाणी आणि टॅाइलटही आहे.मुंबईची काही गोविंदा पथकेही दहिहंडी उरकून तिकडे उकडत असल्याने इकडे बसने आली होती.पाच वाजता लोणावळा चिक्की खरेदी करून कोयनाने परतलो.

रेवती's picture

8 Sep 2015 - 4:42 pm | रेवती

वृत्तांत आवडला.

किणकिनाट's picture

8 Sep 2015 - 9:39 pm | किणकिनाट

झकास झालेला दिसतोय कट्टा. बाकी श्री. कंजूस असताना डोंगर, दर्या, झाडे आणि प्रचेतस यांच्या साथीने लेण्या आणि मूर्त्या, आणि कट्टेसम्राट मु.विं. च्या बरोबरीने सर्व कट्टेकरी पण खुलत असतील नाही ?

पैसा's picture

9 Sep 2015 - 12:33 pm | पैसा

फटु आवडले. खादाडीचे फटु न टाकल्याबद्दल धन्यवाद! नाखु यांचेकडे रथ आहे याची नोंद घेणेत आली आहे.

दिपक.कुवेत's picture

16 Sep 2015 - 6:39 pm | दिपक.कुवेत

छान झालेला दिसतोय कट्टा. फोटो आवडले.