अस्तित्वकण
बरेच ब्राम्हवृंद,
घासुन-पुसून पुरंदरेंच्या पुरस्काराला सपोर्ट करतायत...
बरेच मराठे,
चिडून-दाबून पुरंदरे या व्यकती/जातीला विरोध करतायत...
उर्वरित महाराष्ट्र
'आम्हाला काही घेणं देणं नाही'
या तिरहाईत नजरेने या दोघांच्या (टिपिकल) महाराष्ट्रीय भांडनाकडं ‘साहजिक’ पाहतोय...
"अरविंद केजरीवाल ऑनलाइन सेना" दिवसभर
"वुई वांट मोदी एज अवर पीम" ला शिव्या देण्यात गर्कय...
उभे केलेले कारखाने बंद पाडून
तिकडं उस्मानाबादेत मोठमोठे साहेब
मोठमोठे मोर्चे काढ़तायत...
इकडे शेतकरी नेहमी सारखी पावसाची वाट बघतोय,
तिकडे मोदी नेहमीसारखं परदेश दौऱ्यावऱ सेल्फ़ी काढतोय...
राहुल नितीश लालू नेमाडे आव्हाड राधे माँ भागवत राज ओवेसी केजरीवाल काटजू तेहलका आदित्यनाथ
असःच काय बाय बरळून -छाटुर मुटुर प्रसिद्धी कुठं मिळतीय का शोधतायत,
'टाइम्स ऑफ़' नेहमीसारखं प्रियंका आलियाचं मालफंक्शन कुठं झालं ते ऍरो अन सर्कल करून दाखवतय,
गोस्वामी ‘एज युज्वल’ लोकांना स्वतच्या शो मधे बोलवून बोलवून त्यांची मारतोय...
अमेजॉन स्नैपडील फ्लिपकार्ट
डिस्काउंट दिऊन दिऊन,
त्या डिस्काउंट च्या पानपान जाहिराती फासून फासून
--प्राचीन इतिहास असलेली आपली मरतुकडी वृत्तपत्रं जगवायचं काम ईमाने ईतबारे करतायत...
वरून भोसडीचं ‘वातावरणीय’ वेदर तर असंय झालंय की,
पाऊस -आपण पडावं की नाही कन्फ्यूजन मधेय,
ऊन -आपण पड़ाव का नाही कन्फ्यूजन मधेय,
ठंडी -आपण पडावी का नाही कन्फ्यूजन मधेय,
पेट्रोल डीजल- आपली कीमत वाढावी की कमी व्हावी कन्फ्यूजन मधेय,
सेन्सेक्ष सोन्या चांदी अंड्या भाज्यांचे भाव आपण वाढावे कि कमी व्हावे कन्फ्युजन मधेयत
शेतकरी -पेरावं का अजून दोन दिवस थांबावं- कन्फ्यूजन मधेय,
जमीनीतला बी --उगवावं का नाही कन्फ्यूजन मधेय...
बांधावर रामा --फास घ्यावा का नाही कन्फ्यूजन मधेय,
.
.
.
.
.
.
अन या साऱ्या माहिती विस्फोटाच्या टोलेजंग जात्यात
कशाशीही काहीही संबंध नसतानाही,
(अकरारण) भरडत चाललेला
माझा हा खड़बडीत ‘अस्तित्वकण’
रोजसारखा आजही प्रचंड अस्वस्थय..........
प्रतिक्रिया
मजा आली वाचूनअस्वस्थ राहा,
+१
उत्कृष्ट ! (काय करणार ? (हताश
खरंय,
लाईक्ड
अर्थहीन उत्तम लेख लिहिलाय .
चांगलंय
मस्तचं..
उत्तम..
मुक्तक एकदम मस्त जमलंय. अगदी
लाईक
हे भारीचं..!!:-)