अमेरिकेत स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाला ३८,००० जणांची उपस्थिती !

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
15 Aug 2015 - 7:56 pm

अमेरिकेतल्या न्यु जर्सी राज्यातील एडिसन नावाच्या शहरातील भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाला ३८,००० जणांनी उपस्थिती नोंदवली !

या संचलनात २० चित्ररथ, डझनावारी जथे, ११० सभासद असलेल्या वाद्यवृंदाने आणि शंभराहून जास्त संघटनांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाला अनेक नामांकीत व्यक्तींची उपस्थिती होती.

समारंभाची काही क्षणचित्रे...

.

.

======

संदर्भः

१. http://timesofindia.indiatimes.com/nri/us-canada-news/38000-attend-US-pa...

२. http://www.allhdpictures.com/india-independence-day-parade-new-jersey.html

समाजजीवनमानअभिनंदनप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

आमच्या गावाच्या बातमी साठी धन्यवाद. परंतु फोटो चुकीचे आहॆत. ते मागच्या वर्षीच्या न्यु यॉर्क च्या परेडचे आहेत.
बरेच वर्ष एडिसन व इजलीन या शेजाशेजारील गावात वेगवेगळी परेड होत होती ती आता एकत्र होत आहे. यामुळे एकत्रित लोकांचा प्रतिसाद प्रचंड होता. मराठी ढोल-ताशा पथक आणि मल्लखांब प्रत्यीक्षिके ही मराठमोळी आकर्षणे असतात.
उद्या न्यू यॉर्क मध्ये परेड आहे आणि तिथे अजुन गर्दी असेल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Aug 2015 - 11:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

फोटो संदर्भात दिलेल्या ताज्या (२०१५ मधल्या) बातमीमधून घेतले आहेत. म्या गरीब भारतात र्‍हातो... मले काय मालूम त्येनं गेल्या सालचे फोटो दिलते त्ये ? :( तरीही, आय माय स्वारी !

कोणत्याही परिस्थितीत, ३८००० लोकांची परेड भारतातही दिल्ली सोडून इतर ठिकाणी क्वचितच होत असेल, यामुळेच या बातमीने लक्ष वेधून घेतले.

गवि's picture

15 Aug 2015 - 10:09 pm | गवि

..भारतात अन्य देशीय रहिवाशांनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाला अशी मोठी गर्दी करुन देशभक्ती (अन्य देशाप्रती) दाखवत सोहळा केला तर कितपत स्वीकारला जाईल?
..उपस्थितांपैकी कितींनी अमेरिकन नागरिकत्व घेतले असावे?

राघवेंद्र's picture

15 Aug 2015 - 10:35 pm | राघवेंद्र

मित्रा, या गोष्टी भारतीय अमेरिकन नागरिकांमुळे शक्य होतात. या परेड मध्ये सुरुवातीला स्थानिक नगराध्यक्ष व सिनेट मेम्बर चे भाषणे होतात.

..हेच..त्यांची सर्वसमावेशकता कौतुकास्पद आहे.

पण ति सार्वत्रीक नाहि. आणि ति अजुन पुरेशी ( किंवा अजीबातच ) डिफाइन झाली नाहि. या सामावशतेमागे स्विकाराची निकोप प्रेरणा नाहि. विवीध संस्थांच्या आपापल्या जबाबदार्‍या पार पाडण्याच्या क्षमता, दुर्दैवी परिस्थीतीतुन सुदैवाने सतत पुढचं बघायची लागलेली गरज व पुढे तिच सवय, अशा काहि स्तंभांवर हि समावेशता स्थिरावली आहे. आज तरि तिला आव्हान नाहि. पण डोलारा जितका मोठा त्याच्या भव्यतेच्या मानाने पाया मजबूत नाहि हे नक्की.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Aug 2015 - 1:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्वसमावेशकता नेहमीच सापेक्ष असते...

१. जर्सीच्या वरील भागात १२-१५% भारतीय वंशाचे लोक (मतदार असू शकणारे :) ) आहेत.

२. अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम राज्यांत काही शाळांत (अ) मुलींनी कपाळावर गंध/बिंदी लावू नये असे नियम आहेत, (आ) योग ही एक हिंदू प्रणाली असल्याने शाळेत त्याचे वर्ग घेण्यास बंदी असावी असे खटले कोर्टापर्यंत गेलेले आहेत.

३. ब्रिटनच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत (अ) कॅमरन दांपत्त्याने कपाळावर लाल टिळा लावून आणि व्दीपप्रज्वलन करून सभा घेतल्या होत्या व (आ) बॉलीवूडची गाणी वापरून बनवलेल्या जाहिराती वापरल्या होत्या... आणि या सगळ्याचा निवडणूकीच्या निकालावर टोरी पक्षासाठी सकारात्मक प्रभाव पडला होता.

४. गेली काही दशके या दोन देशांत, हळू हळू, भारतीय वंशाचे लोक राजकारणात आणि लोकमानसात ठसा उमटवू लागले आहेत...
(अ) कीथ वाझ (१९८७ पासून सलग आमदार, २००६ पासून प्रिव्हि काऊंसिल सभासद, २००७ पासून होम अफेअर्स कमिटी चेअरमन, इ) आणि बॉबी जिंदाल (लुसिनिया राज्यपाल, कॉग्रेसमन, पुढच्या अमेरिकन राष्ट्रपती निवडणूकीतले संभाव्य उमेदवार, इ) ही दोन राजकारणातली महत्वाची उदाहरणे आहेत.
(आ) मोठ्या उद्योगधंद्यातले धुरीण; डॉक्टर; वकील; अकाऊंटंटस आणि छोट्या व मध्यम उद्योगांतली उदाहरणे तर असंख्य आहेत.

वरच्या आणि इतरही बर्‍याच गोष्टी अमेरिकेत आणि युकेमध्ये भारतीय वंशाच्या लोकांच्या वाढत्या मृदुप्रभावाची (सॉफ्ट पॉवर) लक्षणे आहेत... अनाक्रमक, मैत्रीपूर्ण आणि मुख्य म्हणजे स्थानिक अर्थ आणि/किंवा राजकीय व्यवस्थेला फायदेशीर प्रभावाला कोठेच फारसा विरोध होत नाही... अर्थातच, काही खास "सन्माननिय अपवाद" असलेले देश वगळूनच.

======

तसा भारतही फार कमी सर्वसमावेशक नाही असे नाही...

१. मुंबईत व्यापारात काम करणारा मराठीचा अभिमान असणारा मराठी माणूस गुजराती भाषेचा मुक्त वापर करतो... यात त्याला आणि इतर मराठी माणसांनाही काही जगावेगळे आहे असे वाटत नाही.

२. परदेशी वंशाची व्यक्ती सद्या सर्वात जुन्या भारतीय राजकीय पक्षाच्या सर्वोच्च पदी विराजमान आहे.

========

अवांतर : विलगतावादाचे पुरस्कर्ते असलेल्या तथाकथित नेत्यांना आमंत्रण देऊन पाकिस्तानी वकिलातीला आपण दिल्लीत भारताच्या संविधानाविरोधी मते मांडू देतोच की नाही ? यापेक्षा अधिक सर्वसमावेशक देश या पृथ्वीतलावर कोणता आहे ! :) ;) :(

विकास's picture

16 Aug 2015 - 5:49 pm | विकास

भारतात अन्य देशीय इतक्या संख्येने रहाणारे नाहीत. तरी देखील एक पाकीस्तान सोडल्यास इतर कुणाचेही सोहळे स्विकारले जातील या बद्दल खात्री आहे. आपल्याकडे असे धर्मांच्या बाबतीत गेली दोन सहस्त्रके झाले आहेच.

अमेरीकन नागरीकत्व घेतलेले अनेक असतीलच पण तसेच न घेतलेले देखील असतील. त्याशिवाय अमेरीकन्स पण असतात ज्यांचे वंशाने अथवा इतर कुठल्याही कारणने भारताशी नाते नसते. यात देशभक्ती /देशप्रेम इतकेच असते असे नाही.

..नेपाळी लोक कधी असे सोहळा करताना दिसले नाहीत.भीती असेल का? .की राष्ट्रप्रेमच कमी..?

विकास's picture

17 Aug 2015 - 12:13 am | विकास

पद्धती वेगळ्या असतात आणि त्याचे महत्व वेगळे वाटलेले असू शकते. नेपाळवर भारताइतके पारतंत्र्य कधी नव्हते आणि भारताला अनुभवायला आलेले शेकडो वर्षांचे पारतंत्र्य (पक्षी: बाह्य आक्रमणे) देखील अनुभवावे लागले नसावे. कम्युनिस्ट वाढे पर्यंत नेपाळला राजा होता अगदी ब्रिटीशांशी लढावे लागलेल्या काहीशाच काळामधे देखील. त्यामुळेच एकंदरीतच नेपाळमधे त्यांचा स्वातंत्र्योत्सव कसा पाळला जातो हे माहीत नाही.

अजून एक गोष्ट - नेपाळ्यांची भारतातील संख्या कितीही असली तरी ती बहुतांशी मर्यादीत गोष्टींच्या संदर्भातच अधिक आहे... एक म्हणजे गुरखा (राखणदार - घराची आणि देशाची देखील) आणि दुसरी दुर्दैवी मुली/स्त्रीयांची ज्यांना पळवून आणले जाते त्यांची..

त्यातही अजून एक भाग म्हणजे नेपाळ आणि भारत हे वेगळे देश असले तरी ते एकमेकांना अलग समजत नाहीत. भारत ही त्यांची पुण्यभू आहेच. म्हणूनच त्यांचे बोधवाक्य हे "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी" हे आहे. (जरूई त्यात जननी म्हणजे भारतमाताअसा अर्थ नसला/नसावा तरी) वसुंधरा राजे (माधवराव शिंद्यांची आई) या नेपाळी होत्या. मनिषा कोईराला माहीत आहेतच. अजूनही असे असतील पण मर्यादीत. परीणामी त्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा होत नसेल, पण त्यांना भिती वाटत असेल असे वाटत नाही. तुम्हाला असे का वाटले की त्यांना भिती वाटत असेल? कधी काही ऐकले/पाहीले आहे का?

या संदर्भात, पुर्वांचल प्रदेशातील - विशेष करून अरूणाचल प्रदेशींना जेंव्हा उर्वरीत भारतातील लोकं नेपाळी समजतात तेंव्हा त्यांना राग येतो. (अपमानास्पद/ऑफेन्सिव्ह वाटते).

प्यारे१'s picture

17 Aug 2015 - 1:48 am | प्यारे१

अनुनासिक आवाज :- कोण येणार कोणंय तुमच्या या असल्या देशात कायमचं रहायला???????

सीरियसली :- भारतात कायदेशीररित्या येऊन राहण्याची काही गरज आहे?

मुख्यत्वे भारतात कामासाठी येणारे आणि प्रदीर्घ काळ राहणारे लोक म्हणजे नेपाळी आणि बांग्लादेशी. यात नेपाळी लोक आपल्यासारखे सण साजरे करणारे असावेत किंवा त्यांना इथंच कुणी म्हटल्याप्रमाणं स्वत:चा वॉइस नसावा.

राहिले बांग्लादेशी. या देशातले लोक वेगळेपणानं ओळखण्याची ना कुणाला राजकीयदृष्टया गरज आहे ना धार्मिक शिकवणीमुळं कुणाला त्याबद्दल मातृ पितृभूमि म्हणून वाटणारं प्रेम.... जन्माला येताना जुळं जन्मावं नि एक बरं नई दुसरं पांगळं जन्मावं, त्यातही त्याला काही विकार जडावा असा देश आहे तो....

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

15 Aug 2015 - 11:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बरे वाटले रे सुहास बघून. भारतात परतण्यास त्यांच्यातले किती जण उत्सुक आहेत? आमचा न्युजर्सीचा शिरिषच्या केबीनमध्ये कलाम्,शिवाजी,विवेकानंदांचे फोटो आहेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Aug 2015 - 12:03 am | डॉ सुहास म्हात्रे

वा, वा !

सुस्वागतम् माईसाहेब ! बराच काळ तुमची अनुपस्थिती पाहून काळजी वाटत होती ;)

तुमच्या 'ह्यां'चे मत दिसले नाही त्यामुळे तुमच्या प्रतिसादातला सगळा पंच निघून गेला की वो ! सगळे बरे आहे ना तिकडचे ? =)) =))

द-बाहुबली's picture

16 Aug 2015 - 1:29 pm | द-बाहुबली

चित्रे मात्र रद्द्ड दिसत आहेत. कुठे क्लिक करायचे नक्कि ?

विकास's picture

16 Aug 2015 - 6:24 pm | विकास

भारतीय स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम अमेरीकेत अनेक ठिकाणी होतात. त्यातील न्यूयॉर्क आणि न्यूजर्सीत मोठ्याप्रमाणावर होतात कारण भारतीयांची लोकसंख्या.... एडीसन न्यू जर्सीत "अमेरीकन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला," ही कदाचीत बातमी ठरू शकेल. ;)

बॉस्टनला देखील दोन ठिकाणि कार्यक्रम होतात. तेच इतरत्र. यात अमेरीकेशी प्रतारणा नसते आणि अमेरीकन्सना तसे वाटत देखील नाही. प्रजासत्ताक दिन पण साजरा होतो पण तेंव्हा कडाक्याची थंडी असल्याने कुठल्यातरी शाळेत/हॉळमधेच कार्यक्रम करावा लागतो.

भारतीयांच्या बाहेर माहीत असलेले तीन प्रमुख भारतीय सण म्हणजे - स्वातंत्र्यदिन, दिवाळी आणि होळी....

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Aug 2015 - 11:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

आता यावेळी न्युयॉर्क आणि न्यु जर्सीतील संचलनांचे प्रक्षेपण टाईम्स नाऊ वर चालले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Aug 2015 - 11:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

न्युयॉर्कच्या परेडला १,२०,००० लोकांची उपस्थिती असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे !

पिलीयन रायडर's picture

17 Aug 2015 - 10:06 am | पिलीयन रायडर

आज न्युयॉर्क इथली परेड पाहिली. फार मजा आली. सगळ्यात सुरवातीला जी परडे आली ती पाहुन हसुन मुरकुंडी वळली माझी तरी. ज्यांचे ग्रीनकार्ड बॅकलॉग मध्ये अडकले आहेत असे लोक ह्या रॅलीमध्ये होते. आणि what do we want?? Green Card..!!! अशा आरोळ्या देत चालले होते!!!

बाकी फोटो टाकते नंतर.

पिलीयन रायडर's picture

17 Aug 2015 - 10:09 am | पिलीयन रायडर

1

Stuck in Greencard Backlog?

मला खरंच माहिती नाहीये फारशी ग्रीनकार्ड बद्दल, पण मला मजा वाटली हे खरं!!

ची मागणी ? त्यांना कळत होते ना ते काय करत आहे ते?

पिलीयन रायडर's picture

17 Aug 2015 - 6:45 pm | पिलीयन रायडर

हं तेच.. म्हणजे ग्रीनकार्ड मागा, त्याबद्दल काही म्हणणे नाही. पण कधी?
भारताचा स्वतंत्र्यदिन त्यांना फक्त आपली मागणी मांडण्याची संधी वाटली ह्याचं वाईट वाटलं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Aug 2015 - 12:00 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्वसमावेशकता, मादाम, सर्वसमावेशकता !!! =))

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त न्युयॉर्कमधिल एंपायर स्टेट इमारतीवर तिरंगी रोषणाई केली गेली...

.

.

.

याशिवाय, काही दिवसापूर्वी, त्याच इमारतीवर कालीमातेचे चलत्चित्र असलेली रोषणाई केली गेली. त्यातली काही क्षणचित्रे...

.

.

.

फटु इथे टाकल्याबद्द्ल धन्यवाद!

अर्धवटराव's picture

18 Aug 2015 - 2:14 am | अर्धवटराव

हे जरा अतीच झालं असं वाटतय. सॅम काकंचं कोणतं एव्हढं धबाड आहे भारतात? हिरव्या पत्राची भीक मागणार्‍या ( दुर्दैवाने असं लिहावं लागतय) देशी मंडळींची अशी काय मोठी लॉबी आहे ? किंवा असा काय दोस्ताना उतू चाललाय त्यांचा भारताशी ?
मला शिवाजी टर्मीनलवर कुणाही देशाच्या स्वातंत्र दिनानिमीत्त त्यांच्या ध्वजाची रोषणाई वगैरे आवडणार नाहि. साला आमची ( प्र.पु.आ.) मनोवृत्तीच कोती...

थॉर माणूस's picture

18 Aug 2015 - 2:50 pm | थॉर माणूस

ही रोशणाई अमेरीकन इव्हेंट शिवाय फक्त भारतासाठीच करतात असं काही नाही हो.

हे घ्या...

इद-उल-फित्र
test

ऑस्ट्रेलिया डे
test

मेक्सिकन इंडीपेंडन्स डे
test

कॅरीबिअन वीक
test

चायनिज न्यू इअर
test

अजून बरेच आहेत... मागणी तसा पुरवठा तत्वावर रोशणाई करत असावेत बहुतेक.

अर्धवटराव's picture

18 Aug 2015 - 6:45 pm | अर्धवटराव

:)

विकास's picture

18 Aug 2015 - 4:48 pm | विकास

एम्पायर स्टेट वर काली देवता दाखवण्यामागचे कारण रोचक आहे...

Artist Andrew Jones designed the portrait of the goddess to make the point that Mother Nature now more than ever needs a fierce avatar to fight the dangers of pollution and extinction, Firstpost.com reported.

थॉर माणूस's picture

18 Aug 2015 - 5:23 pm | थॉर माणूस

अजून जरा गुगलल्यावर या विषयीदेखील सापडलं...
Racing Extinction नावाच्या डॉक्युमेंटरीचं प्रमोशन म्हणून एक प्रोजेक्शन प्रोजेक्ट केला होता त्यांनी. सगळ्या लुप्त होत असलेल्या प्रजातींची चित्रे इमारतीवर प्रोजेक्ट करण्यात आली होती. आणि आपण हे वेळीच थांबवले नाही तर आधी शांत असलेली निसर्गदेवता उग्र रूप धारण करेल ज्याचे परीणाम आपल्याला भोगावे लागतील असा काहीसा संदेश होता यात.

प्रोजेक्शन चा व्हिडीओ...

पद्मावति's picture

18 Aug 2015 - 3:21 pm | पद्मावति

खूपच छान वाटलं तिरंगी रोषणाई आणि ती सुद्धा अमेरिकेत बघून.कालिमाता पण छान.

प्यारे१'s picture

18 Aug 2015 - 2:13 am | प्यारे१

हे असं रोषणाई वगैरे करून भारतीय समाजमनाची दखल घेण्याची पावलं म्हणजे अमेरिकेचं खरं भारतप्रेम आहे की राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अपरिहार्यता???
राजकीय- भारतीय वंशाचे मतदार,
सामाजिक- वाढलेला भारतीय समाज आणि अनुषंगानं होणारे व्यवहार
आर्थिक- स्वत: प्रचंड आर्थिक तुटीच्या बोजाखाली असताना भारत हीच मुख्य बाजारपेठ असणं

90 च्यानंतर मला वाटतं हे सगळा वाढीस लागत लागत आता अगदी नजरेत भरण्यासारखं सुरु आहे.

सूड's picture

18 Aug 2015 - 4:41 pm | सूड

गुजरात टाईम्स दिसलं, महाराष्ट्र टाईम्स नाही तर गेला बाजार लोकसत्ता, सकाळ तरी दिसायला हवं होतं !!