माझे व्यायामाचे फंडे -१ ,

Sanjay Uwach's picture
Sanjay Uwach in जनातलं, मनातलं
3 Aug 2015 - 4:04 pm

शरीर माध्यम खलु धर्म साधनम ! असे एक संस्कृत मधील सुभाषित आहे. माणसाचे शरीर उत्तम आसेल तर ,त्याचे भवितव्य ही उज्वल असते य़ा वरील उक्ती प्रमाणे ,रोज थोडातरी व्यायाम करावा आसे मी रोज ठरवतो . रात्री झोपताना नित्यनियमाने गजर लावणे ,सर्व कपडे ,बूट याची योग्य व्यवस्था करून मगच झोपतो . मात्र नेमका गजर वाझला की माझे नियोजन पूर्ण पणे बदलून जाते .त्या उबदार पांघरुणात असे वाटते कि "जाऊ दे यार ! आज राहू दे ,आपण सरळ आठवड्याच्या सुरवाती पासून आपला नित्यक्रम चालू करू आठवड्याच्या सुरवातील म्हणजे सोमवारी सकाळी गजर वाजला कि वाटते ,नको सरळ आपण एक तारखे पासून व्यायाम चालू करू, एक तारखेच्या पहाटे वाटते एखाद्या सणा पासून म्हणजे पाडवा ,दसरा या सारख्या शुभ मुहूर्तावर व्यायामाची सुरवात करू या !! म्हणजे सुरु केलेला दिवस नेमका लक्षात राहील .शेवटी हा व्यायामासाठी मुहूर्त कांही केल्यास सापडेना . शेवटी मी यावर एक उपाय काढला. मी माझा मित्र सुनील यालाही या कार्यक्रमात सामील करून घेतले .तो हि माझ्या प्रमाणे व्यायाम करण्यास उत्सुक होता . आम्ही आमच्यात एक ठराव केला , जो कोणी लवकर पहाटे उठेल त्याने दुसऱ्याच्या घरी जाऊन हाक मारणे व हाक मारून ती व्यक्ती न उठल्यास त्याला रु .पन्नास इतका दंड करण्यात येईल .उठ्ल्यावर रोज कमीत कमी दोन किलोमीटर तरी धावणे व हळूहळू ठराविक दिवसाच्या अंतरानी हि धावण्याची सीमा वाढवायची असे ठरले . मी रात्रीच माझी पांढरी चड्डी ,वर छोट्या बह्याचा शर्ट,पांढरे बूट ,पांढरे पायमोझे,घाम पुसण्यास छोटा रुमाल ,याची सर्व तयारी करून मोबाइलवर आलार्म लावून लवकर झोपी गेलो .
पहाटे जसा आलार्म वाजला,मी खडबडून जागा झालो.माझे सर्व विधी आटपून ,मी बरोबर ठरल्या वेळेत तयार झालो होतो.सुनिल देखील ठरल्या वेळेत पोहचला.आज हा आमचा धावण्याचा (जॉगींगचा) पहिलाच दिवस होता.आम्ही दोघेही खूपच उत्साही व आनंदात होतो , त्यात ती पाहाट फारच नयनरम्य वाटत होती.आज आम्ही दोघांनी मिळून पहिल्या टप्यात दोन किलोमीटर अंतर धावण्या साठी ठरवले होते .त्या प्रमाणे गजाननाचे नाव घेऊन धावण्यास सुरवात केली. सुनील देखील खूप आनंदी,उत्साही वाटत होता .पण म्हणतातना "माणूस ठरवतो व देव ते बिघडवतो "थोडे पुढे गेल्यावर अचानक रस्त्यावरील एक भले मोठे श्वान पथक आमच्या मागे लागले ,त्यांना घाबरून बचावा साठी आम्ही आशी धुम ठोकली ,की विचारु नका.आमचा पळण्याचा वेग इतका वाढवला कि बघता बघता आम्ही जे दोन किलोमीटर धावण्याचे अंतर ठरवले होते, ते जवळ जवळ तीन किलोमिटरच्या वर गेले. ते श्वान पथक कांही केल्या आमची पाठ सोडेना . शेवटचा उपाय म्हणून मी रस्त्यावरील एका झाडाचा आश्रय घेउन त्या वर पटकन चढून बसलो, तर सुनील तिथेच समोर असणाऱ्या एका अंधाऱ्या घरात घुसला .त्याच्या नशिबाने त्या घराचे दार नेमके उघडे होते म्हणून बरे झाले.मी झाडावर बसून त्या कुत्र्यांच्या डोळ्यातील,आपल्या विषईचा राग पहात होतो .शेवटी त्या श्वान पथकाने झाडा खाली जमून झाडाच्या बुंध्यावर एक पाय वर करून आमचा निषेध केला व ती आम्हाला भ्याड ss भ्याड ss म्हणत निघून गेली . मला पण जलद धावल्याने धाप लागली होती .तरी मी चांगला सशक्त असल्याने याचे कांहीच वाटत नव्हते ,मला सगळ्यात काळजी सुनीलची वाटत होती. एक तर तो आशक्त होता, त्यात या आसल्या गोष्टींची त्याला फार सवय नव्हती .थोड्या वेळाने मी ते श्वान पथक गेल्याची खात्री करून, हळू हळू कानोसा घेत झाडावरून खाली उतरलो .बहुतेक ती सर्व कुत्री गेली होती .सुनिल ज्या अंधाऱ्या घरात घुसला होता त्या घरा समोर जाऊन मी "सुनीलss सुनील ss "म्हणून हाक मारली. माझ्या सुदैवाने सुनील हसत हसत बाहेर आला .त्याच्या चेहऱ्या वरील हास्य पाहून मलाही हायसे वाटले .तो त्या अंधाऱ्या घरात कुठे लपून बसला, हे विचारण्याचे त्राण, माझ्यातही उरले नव्हते. ,त्या धावपळिमूळे परत घरी चालत जाण्याचा विचार आम्हीं दोगेही करू शकत नव्हतो. शेवटी रिक्षा करून घरी परत जाण्याच निर्णय आम्ही दोघांनी घेतला व रीक्षेची वाट बघत तिथे रस्त्यावर थांबलो. इतक्यात एक ग्रहस्थ, सायकलवरून तिथे आले .त्यांच्या हातात चार कप्पी डबा होता .एकुण त्यांच्या पेहरव्यावरून ते रात्र पाळीचे काम करून घरी परत आले असावेत हे कोणीही ओळखले असते. ते गृहस्थ नेमक्या त्याच घरात घुसले ,जिथे सुनील लपला होता. माझे नशीब चांगले, की मी वेळीच सुनीला बाहेर बोलवले,नाहीतर गैरसमजातून कांहीतरी अनर्थ घडला असता. य़ा सर्व घटना मुळे मी हा पहाटे धावण्याचा व्यायाम प्रकार बंद केला .व्यायाम करणे यावर ठाम असल्याने व्यायामाचा नवीन प्रकार योग व योगासने ह्या प्रकार कडे वळलो . क्रमशः

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

3 Aug 2015 - 4:22 pm | टवाळ कार्टा

=))
साल्या अश्याच कुत्र्यांच्या गँगमुळे माझे सकाळचे जॉगिंग बंद झाले

मुक्त विहारि's picture

3 Aug 2015 - 4:53 pm | मुक्त विहारि

वाचुन बरे वाटले.

दिसामाजी काहीतरी वाचीत जावे, मिपाधर्म वाढवत न्यावे.....

द-बाहुबली's picture

3 Aug 2015 - 5:04 pm | द-बाहुबली

* आवडले. धन्यवाद.

* लेखन

उगा काहितरीच's picture

3 Aug 2015 - 5:15 pm | उगा काहितरीच

पुभाप्र

माझिया मना's picture

3 Aug 2015 - 5:42 pm | माझिया मना

असंच व्हायचे माझे पण..
आता सिरियसली फिरणे होतेय.. श्वानपथकाच्या सहकार्यामुळे..अर्थातच

वेल्लाभट's picture

3 Aug 2015 - 6:07 pm | वेल्लाभट

अरेच्चा ! डायरेक बंद?? योगावर आलात?
ई नॉय चॉलबे

मोहनराव's picture

3 Aug 2015 - 6:14 pm | मोहनराव

असं होतंच.. आपले मन हाच आपला मोठा शत्रु असतो याबाबतीत. गजर ५ मिनीटे स्नुज करत करत उठायला बेकार उशीर होतो व सर्व प्लॅन्स बारगळतात.

सत्याचे प्रयोग's picture

3 Aug 2015 - 10:54 pm | सत्याचे प्रयोग

सर्व प्रथम टाळ्या वाजवल्या पाहिजे व्यायाम चालू करण्यासाठी चांगली आयड्या वापरली.
तुमच्या सारखाच कुत्र्याचा प्रसंग माझ्या बाबतीत घडलेला होता. फक्त मी काय केलं माझ्या वर पण असच कुत्रे भुकंत आले होते अशावेळी काय करावे त्या कुत्र्याला काय पण नावाने हाक मारा उदा. टाॅमी, राज्या, टायगर इ. कुत्रे शांत शांत. माझीही तंतारली होती. पण ही युक्ती कामी आली.

जडभरत's picture

4 Aug 2015 - 8:10 am | जडभरत

मस्तंय भौ! त्या माणसाने तुमच्या मित्राला असं घरातून बाहेर येताना पाहिलं असतं तर बेक्कारच झालं असतं.