वडा पाव रे........!!!

गोल्या's picture
गोल्या in जे न देखे रवी...
9 Jun 2015 - 6:22 pm

ती म्हणे : प्रत्येक जन्मी
हाच नवरा मिळावा
तो म्हणे : देवा ,
नविन चॉइस तरी कळावा.....!!

ती म्हणे : बरा असतो
एकच एक गडी
माहीत होऊन गेलेल्या
सार्या त्याच्या खोडी .....!!

तो म्हणे : चांगली असे
अंबाड्या ची भाजी
तरीही खावी वाटे
कधी तरी कांदाभजी ....!!

नाठाळाला वठणी वर
आणावयाचा त्रास
हरेक जन्मात वाचेल बाई
आमचा तो ख़ास....!!

ताटाखालचे मांजर मी
होणार असेल तर होवू दे
प्रत्येक जन्मात देवा
ताट तरी नविन दे ....!!

जायचे तर जा नाथा
नाजुक धागे तोडून
हात तिने जोडले
डोळे आले भरुन ....!!

इथेच मग या गोष्टीचा
सुखद अंत होतो,अन
गरीब बिचार्या पुरुषाचा
नेहमी बळी जातो .....!!!!

फ्री स्टाइलकविता

प्रतिक्रिया

अडीच दिवस या वयाच्या मानाने...
..
.
.
.
बर आहे

वरील पाकृ अंडे न घालता कशी करावी?

अंडे न घालता नुसता सूडाग्नी पेटवला तरी चालेल

नको, वडा आणि पाव दोन्ही करपतील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2015 - 6:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

"वडा पाव रे" हे शिर्षक वाचून मला तर टपरीजवळ उभा असलेला एक मित्र दुसर्‍याशी बोलत असावा असे वाटले ;) शप्पत, खरंच :)

सदस्यनाम's picture

9 Jun 2015 - 11:11 pm | सदस्यनाम

मला तर दगाबाज रे गाणे आठवले.
तेरे नैना बड़े वडापाव रे.

नीलमोहर's picture

10 Jun 2015 - 10:05 am | नीलमोहर

एग्जॅक्ट्ली !!

काळा पहाड's picture

10 Jun 2015 - 10:36 am | काळा पहाड

कांदाभजी खाउ कि वडापाव रे

आयला आमच्या शीर्षकावर एवढी चर्चा
चला एंट्री तो Hit रही.....

अत्रुप्त आत्मा's picture

9 Jun 2015 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा

सदर जिलबी टाकण्याचे वकुब पाहता, घाबरत घाबरत तांब्या फ़िरवलेला आहे. हे निदर्शनास येत आहे. असा नीर् वाळा देऊन मी माझे न मोजलेले शब्द संपवितो!

कवितेबद्दल बोला की भाऊ .. की पुणेकर म्हणून Congenital pseudoविद्वानिया चे शिकार

सतिश गावडे's picture

10 Jun 2015 - 8:32 pm | सतिश गावडे

त्यांना त्यांच्या क्षेत्रात घुसखोरी केलेली आवडत नाही. तुम्ही ती केली आहे.

विनोदाचा भाग बाजूला ठेवू या. ही मिपाकरांची नवसदस्याची स्वागत करण्याची अलिखित पद्धत आहे. तुम्ही लिहित राहा. तुम्ही रुळलात की तुम्हीही असेच खेळीमेळीने नवसदस्याचे स्वागत कराल.

प्रसाद गोडबोले's picture

11 Jun 2015 - 10:30 pm | प्रसाद गोडबोले

तसं नाही .

आपलं काय ठरलय की नवीन सदस्यांन्ना ब्रीदींग पीरीयड द्यायचा . त्यांच्यावर टीका करुन त्यांन्ना हतोस्हित करणार्‍यांवर संपादक मंडळ कारवाई करेल .

आता बघु इथे किती जणांवर कारवाई होते ते !

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2015 - 8:47 pm | अत्रुप्त आत्मा

@ कवितेबद्दल बोला की भाऊ>> तसाच बोलून दिलाय मी प्रति सादात खाऊ! ;-)

समांतर:- भावना ओं को समझो यार!

अती समांतर:- आत्मुस जिलबी प्रसारक मंडळात आपले स्वागत आहे! ;-)

गोल्या's picture

11 Jun 2015 - 8:10 am | गोल्या

थान्कू

टवाळ कार्टा's picture

11 Jun 2015 - 12:58 pm | टवाळ कार्टा

आत्मुस म्हणजे कथानायक ना???? =))

सतिश गावडे's picture

11 Jun 2015 - 6:10 pm | सतिश गावडे

उत्तर मिळाले की आपण त्याला जर अ = ब आणि ब = क तर अ = क या समीकरणात बसवू.

अत्रुप्त आत्मा's picture

11 Jun 2015 - 7:49 pm | अत्रुप्त आत्मा

@ आत्मुस म्हणजे कथानायक ना????>>> कथानायकाचे नाव आत्माराम आहे, आत्मुस नव्हे!

आत्मुस हे माझ्या पहिल्या "अत्रुप्त आत्मा" या नावातिल इथल्या लोकांनी वेगळे करून ठेवलेले निक नेम आहे.

धन्यवाद! :)

अजया's picture

10 Jun 2015 - 10:42 am | अजया

नया है वह!
लिहित रहा हो!सुरुवातीला चालतंच असं!

मदनबाण's picture

10 Jun 2015 - 11:56 am | मदनबाण

ताटाखालचे मांजर मी
होणार असेल तर होवू दे
प्रत्येक जन्मात देवा
ताट तरी नविन दे ....!!

वा... ;)

{ भिक्षा "प्रेमी" } ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Everything You Wanted To Know About Indian Army's Operation In Myanmar
From ‘insertion’ to ‘kill’ and ‘out’: How India’s elite troopers avenged militant strike in Manipur

गोल्या's picture

10 Jun 2015 - 8:34 pm | गोल्या

धन्यवाद

सस्नेह's picture

11 Jun 2015 - 1:20 pm | सस्नेह

मला वाटलं, याच जन्मात रोज नवीन ताट मागताहेत +D

गोल्या's picture

11 Jun 2015 - 6:06 pm | गोल्या

काहीही हां स्ने...!!!

सदस्यनाम's picture

11 Jun 2015 - 6:25 pm | सदस्यनाम

स्ने????????
आजच परत खुर्ची मिळालीय. बाबा जर्रा जप्पुन.

काळा पहाड's picture

11 Jun 2015 - 11:38 pm | काळा पहाड

नया हय वह.

गरजू पाटिल.'s picture

11 Jun 2015 - 6:56 pm | गरजू पाटिल.

काहीही हां श्री..!! ... हा कू-विख्यात डायलोग आठवला.....
बाकी शिर्षक अने कविता खरच वडा झाला.

गोल्या's picture

11 Jun 2015 - 10:45 pm | गोल्या

गरजू वाले बरसुल का