मॉडर्न अभंगवाणी

विनीत संखे's picture
विनीत संखे in जे न देखे रवी...
27 May 2015 - 5:50 pm

असावा शेजा-याचा आंग्ल पेपर । वाचावा तोचि न खर्चिता स्वधन ॥
पेपरसंगे ग्राह्य दूध वाटि एक । साखरेजोडि तेहि मागावे ॥

संगणक अभियंता होशिल तू । विठुमाझा करिल चमत्कार ॥
फक्त परीक्षेअंती निकाल । केटि न लागु द्यावी ॥

महाविद्यालये टि-शर्ट आणि जीन्स । जेतुके फाटके तेतुके स्टायलिश ॥
ओळखावे कन्यकांचे जमाव । पाहावे प्रत्येकीस सांगोपांग ॥

किकेटी असावी भल्यांची भरती । करावे कसे बुकी-फिक्सिंगचे उच्चाटन? ॥
किंतु तयांच्याच चरणी मिळे धन । ऑस्ट्रेलिया मागे मीही लावतो ॥

स्टेशनी होता बळाबळी । करावी सुंदोपसुन्दी जरूर ॥
किंतु दिसता पोलिस अस्वस्थ । व्हावे मूक मार्गस्थ, विन्या म्हणे ॥

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपले ॥
तोचि राजकारणी ओळखावा । मतदान उपरांति विसरावा ॥

लहानपण देगा देवा । हाति लॉलिपॉपच हवा ॥
चिप्स, चॉकोलेट अन कार्टून्स । जीव सत्कारणी रमावा ॥

व्हावा सख्यासोबतींचा संग । सोमरस सुषवी मिळे ब्रह्मानंद ॥
ऎकावे विन्याचे अभंग । आनंदाचे डोही आनंद तरंग ॥

साक्षात्कार - विन्याबुवा

अभंगविडंबनविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

28 May 2015 - 11:40 am | प्रसाद गोडबोले

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||

|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

रामायणात दत्तगुरु कुठून आले?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Jun 2015 - 8:07 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

समर्थ दत्तगुरु मूळ आधार |

दत्तगुरु हे ब्रम्हा विष्णु महेश ह्या मुळदेवतांचं प्रतिक नव्हेत काय? त्यामुळे सगळ्याला आधार तेचं.

बबन ताम्बे's picture

29 May 2015 - 11:31 am | बबन ताम्बे

आवडले अभंग .

विनीत संखे's picture

29 May 2015 - 12:24 pm | विनीत संखे

धन्यवाद बबनराव

अत्रुप्त आत्मा's picture

29 May 2015 - 12:33 pm | अत्रुप्त आत्मा

@ लहानपण देगा देवा । हाति लॉलिपॉपच हवा ॥
चिप्स, चॉकोलेट अन कार्टून्स । जीव सत्कारणी रमावा ॥>> :-D ए वन! :-D

गणेशा's picture

29 May 2015 - 12:45 pm | गणेशा

छान लिहिले आहे..
प्रत्येक ओळीत ८ अक्षरे असती तर आनखिनच मज्जा आली असती..

बाकी खुप वर्षांनी तुम्ही लिहिलेले वाचले.. छान वाटले

विनीत संखे's picture

29 May 2015 - 1:10 pm | विनीत संखे

धन्यवाद गणेशा ... हो खुप वर्षांनी लिहिलंय... अजून एक नविन लेख लिहिलाय .... http://www.misalpav.com/node/31426

विवेकपटाईत's picture

1 Jun 2015 - 7:55 pm | विवेकपटाईत

संध्याकाळी घ्यावा पेग l विस्की, वोडका आणिक रम l
मग ऎकावे विन्याचे अभंग । आनंदाचे डोही आनंद तरंग ॥
मस्त आवडले

पथिक's picture

1 Jun 2015 - 8:27 pm | पथिक

मस्तच!

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपले ॥
तोचि राजकारणी ओळखावा ।

एकदम भारी! =)

सभ्य माणुस's picture

1 Jun 2015 - 9:16 pm | सभ्य माणुस

अतिशय छान अभंगवाणी.