Skip to main content

मॉडर्न अभंगवाणी

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 27/05/2015 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
असावा शेजा-याचा आंग्ल पेपर । वाचावा तोचि न खर्चिता स्वधन ॥ पेपरसंगे ग्राह्य दूध वाटि एक । साखरेजोडि तेहि मागावे ॥ संगणक अभियंता होशिल तू । विठुमाझा करिल चमत्कार ॥ फक्त परीक्षेअंती निकाल । केटि न लागु द्यावी ॥ महाविद्यालये टि-शर्ट आणि जीन्स । जेतुके फाटके तेतुके स्टायलिश ॥ ओळखावे कन्यकांचे जमाव । पाहावे प्रत्येकीस सांगोपांग ॥ किकेटी असावी भल्यांची भरती । करावे कसे बुकी-फिक्सिंगचे उच्चाटन? ॥ किंतु तयांच्याच चरणी मिळे धन । ऑस्ट्रेलिया मागे मीही लावतो ॥ स्टेशनी होता बळाबळी । करावी सुंदोपसुन्दी जरूर ॥ किंतु दिसता पोलिस अस्वस्थ । व्हावे मूक मार्गस्थ, विन्या म्हणे ॥ जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपले ॥ तोचि राजकारणी ओळखावा । मतदान उपरांति विसरावा ॥ लहानपण देगा देवा । हाति लॉलिपॉपच हवा ॥ चिप्स, चॉकोलेट अन कार्टून्स । जीव सत्कारणी रमावा ॥ व्हावा सख्यासोबतींचा संग । सोमरस सुषवी मिळे ब्रह्मानंद ॥ ऎकावे विन्याचे अभंग । आनंदाचे डोही आनंद तरंग ॥ साक्षात्कार - विन्याबुवा
काव्यरस

वाचने 3900
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

In reply to by प्रचेतस

समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
दत्तगुरु हे ब्रम्हा विष्णु महेश ह्या मुळदेवतांचं प्रतिक नव्हेत काय? त्यामुळे सगळ्याला आधार तेचं.

आवडले अभंग .

@ लहानपण देगा देवा । हाति लॉलिपॉपच हवा ॥ चिप्स, चॉकोलेट अन कार्टून्स । जीव सत्कारणी रमावा ॥>> :-D ए वन! :-D

छान लिहिले आहे.. प्रत्येक ओळीत ८ अक्षरे असती तर आनखिनच मज्जा आली असती.. बाकी खुप वर्षांनी तुम्ही लिहिलेले वाचले.. छान वाटले

संध्याकाळी घ्यावा पेग l विस्की, वोडका आणिक रम l मग ऎकावे विन्याचे अभंग । आनंदाचे डोही आनंद तरंग ॥ मस्त आवडले

अतिशय छान अभंगवाणी.