आजकी ताजा खबर - ठाण्यात झाली "पोपट" पंची म्हणजेच एक ठाणे कट्टा…अगदी अचानक !!

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जनातलं, मनातलं
17 May 2015 - 4:43 pm

आपला मिपा वार्ताहर : ठाणे दि १७ मे २०१५ - श्री. मोदकरावांनी दाखवलेल्या सायकलचा आणि तदनुषंगाने तंदुरुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या महन्मंगल कार्यास आपणही थोडा हातभार लावावा (आणि आपला पृथ्वीवरचा भार जमेल तितका कमी करावा) या हेतूने मिपावरचे सध्याचे आकर्षणकेंद्रबिंदू श्री. टका यांच्या साथीने "सायकलरजनीफेरी" काल रात्री चालू होती (आमचे अहोभाग्य हो !!). आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना टकाच्या भ्रमणध्वनीवर डॉ. खरे यांचा फोन आला (तो त्यांचा फोन आहे हे मला नंतर कळले ). त्यांनी टकाला " उद्या सकाळी ७ वाजता एक छोटा कट्टा ठाण्यात आयोजित केलेला आहे … तू येऊ शकशील का?" असे विचारले असावे (मला नक्की फोनवर काय बोलणं चाललंय हे कळले नाही कारण टका इकडून जे काही बोलत होता त्या आवाजावरून पलीकडे त्याच्या कोणी नातेवाईकापासून एखाद्या विवाहोत्सुक मुलीपर्यंत कोणीही असण्याची शक्यता होती). ते म्हणणे ऐकून घेऊन टकाने " मामलेदार सुद्धा माझ्याबरोबर आहे " असे सांगितले मग मला कळले की आपल्या मिपा परीवारापैकीच कोणीतरी असावे. पलीकडे डॉक होते. त्यांनी कट्ट्याचा कार्यक्रम थोडक्यात मला सांगितला. मी तसाही अट्टल कट्टेकरी व्हायची दीक्षा घेतलेलीच असल्यामुळे नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. कार्यक्रम अगदी छोटासाच होता. श्री सर्वसाक्षी यांच्या ठाण्यातल्या घरी जमून त्यांच्या खिडकीतून समोरच हाकेच्या अंतरावर असलेले पोपट आणि इतर पक्षांचे निरीक्षण , थोडा खाऊ पिऊचा सहभाग ( रात्रकट्टेकर्यांनी नसते दृकश्राव्य चित्रपट डोळ्यांसमोर आणू नयेत हि णम्र इनंती !) आणि नेहमीप्रमाणेच असीमित गप्पा असा ढोबळ कार्यक्रम होता. अजून कोण कोण येणार आहे ते काही कळले नाही पण ते विचारायची गरज कधी नसतेच हे आता मला चांगलेच कळले आहे. फोन ठेवल्यानंतर टकाला विचारले त्यावर तो "हो… जायचंच !!! आपण सायकलच घेऊन जाऊ " असं म्हणाला. सकाळी लवकर उठायचे असल्यामुळे सायकलरजनीफेरी आटोपती घेऊ असे टका आणि मी ठरवले आणि सकाळी ६. ३० ला भेटायचे ठरवून आपापल्या घरी गेलो.

आजची सकाळ झाल्यावर उठल्या उठल्या ६. ०० वाजता ठरल्याप्रमाणे टकाला फोन केला. एकदा बेल वाजून संपली. म्हटले उचलेल नंतर…. पण कसचे काय…. ६. ३० झाले तरी त्याचा पत्ता नाही ( त्याचा भ्रमणध्वनी मात्र माझ्यावर वैतागला असणार त्याची रैवारची झोप मी मोडली म्हणून ). डॉकना "कायप्पा"वर सांगितले कि टका काहीच प्रतिसाद देत नाही ( इथे मिपावर तर त्याचे प्रतिसाद उतू जात असतात !!) मग जाणवले की बहुतेक टकाचा "टांगारु" झाला असावा. मग मीही सायकलचा कार्यक्रम रद्द केला आणि सरळ यांत्रिक वाहनस्वारी केली (ये दोस्ती हम नाही तोडेंगे…. !!) . सकाळी बरोबर ७ वाजता मी डॉकनी दिलेल्या पत्त्यावर क्याडबरी जंक्शनला पोचलो तर तिथे कोणीच नव्हते. थोड्या वेळाने माझ्या शेजारून एक काका चालत गेले. त्यांना पाहून मला वाटले कि मी आधी यांना भेटलोय पण कुठे ते आठवेना. थोड्याच वेळात एका बाईकवर डॉक, दुसर्या बाईकवर मदनबाण आणि त्याच्या मागे मगाचचे माझ्या शेजारून चालत गेलेले काका होते (तेव्हा माझी ट्यूब पेटली की ते रामदासकाका होते…. अर्रर्रर … काका, आय माय स्वारी… ).
मग आम्ही सगळेच श्री सर्वसाक्षी यांच्या घरी पोचलो. यापूर्वी मी त्यांना कधीही भेटलो नव्हतो. एक अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व !! त्यांनी मनापासून सगळ्यांचे आगत स्वागत केले. तिथे पोचल्या पोचल्या समोरच त्यांच्या सहाव्या मजल्यावरच्या घराच्या खिडकीतून समोरच दुर्मिळ असा निसर्ग, झाडे आणि किलबिलाट करणारे पोपट आणि इतर पक्षी पाहूनच मन प्रसन्न झाले( काही वर्षांनंतर हे सगळे फक्त फोटोतच पहायला मिळणार की काय असे उगाच वाटून गेले) ते पाहून सगळ्यांनी आपापले क्यामेरे सरसावले आणि खिडकीकडे धाव घेतली. तितक्यात मागाहून विमे आणि प्रास हेही येउन पोचले. मग काय… बाहेर झाडावर हिरवे पोपट आणि आता घरात मनाने हिरवे (एवरग्रीन हो… )असणारे मिपावृक्षावरचे पोपट यांचा एकदमच किलबिलाट सुरु झाला …"आणि मिपाच्या किल्लेदारांनी मजल्यावरच्या सगळ्यांना जाग आणली" !! पोपट किती ओरडतात, काय खातात याबाबत श्री सर्वसाक्षी माहिती देत होते. पोपटांच्या अनुषंगाने सुरु झालेला विषय पुढे हळूहळू फ्लेमिंगो , बुलबुल, सनबर्ड यावरून पुढे सरकत होता. दरम्यान मदनबाणने सगळ्यांना मोगरा अत्तर लावले ( आक्षी गुर्जींची आठवण झाली वो !!!). त्यानंतर पहिल्या चहाचा आणि बिस्किटांचा राउंड पार पडला. मिपाकर एकत्र बसल्यावर त्यांना कोणताही विषय वर्ज्य नसतो ह्याचा प्रत्यय नेहमीप्रमाणे आलाच ! कबुतर कावळे यावरून गप्पांची गाडी चतुष्पादांवर ( कुत्रा, कोल्हा ) वगैरेवरून पुढे जाऊ लागली. मग नागा आणि मिझोराम मध्ये कुत्रे कसे खातात , आदिवासी पाड्यात उंदीर कसे मारून खातात याचीही वर्णने झाली. तिथून ही मिपागप्पा रेल्वेगाडी वेगवेगळ्या विषयांच्या थांब्यांवर थांबून पुन्हा सुसाट धावत होती. शेतीविषयक सल्ले , ऑफिसातले चहावाले आणि चहा पिणारे यांच्या विविध कहाण्या आणि अनुभव, कामगारांचे स्वभाव, सुकाणूचक्र चालक उर्फ ड्रायव्हर यांचा माज … एकूणच मराठी माणसाची त्याच्याच मुळावर येणारी निष्क्रियता, संध्यानंदच्या बातम्या, कायप्पाचे फोरवर्ड वगैरे गप्पा झडू लागल्या. एव्हाना विमेने "किसन शिंदे येत आहे" असे जाहीर केले आणि तेवढ्यात तोही आलाच… (एक सल्लागार मंडळ सदस्य आणि एक संपादक यांच्या बरोबर पुन्हा गप्पा सुरु झाल्या मात्र ह्यावेळी गप्पांचे विषय वेगळे होते. मिपावरच्या अलीकडच्या बर्याचशा घडामोडींचे संदर्भ येऊ लागले. त्यात " मिपावर एक साचलेपण आले आहे का" असाही प्रश्न आला. त्यावर सगळ्यांचेच एकमत झाले. यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवेत असे सगळ्यांचेच म्हणणे होते. तेवढ्यात चहाचा दुसरा राउंड झाला. बोलण्या बोलण्यात "अखिलमिपाकरटोपीघालू संघटनेचे अध्यक्ष"यांचे असीमगुणगौरववर्णन सुरु झाले आणि जुने जाणते लोक त्यांचे अनुभव कथन करू लागले. अस्मादिकांसकट सगळी नवीन मंडळी ( मिपाची नवीन पिल्लं…. गोजिरवाणी गं ती … ) त्या भयकहाण्या आश्चर्य आणि कुतूहलाच्या नजरेने आ वासून ऐकू लागली. किसंद्येव, प्रास आणि रामदास काका यांच्यात विमेवरून बराच खल झाला. त्याचा प्रत्यास म्हणून किसंद्येवाने प्रास आणि विमेला शेपरेट सुरुचीमध्ये मिसळ खायला न्यायचे कबूल केले ( नंतर गेले असणार !!) मग पुढे मिपावर धागे टाकायला प्रतिसाद द्यायला समस्त मंडळींना इतका वेळ कुठून मिळतो हा एक चर्चेचा अतर्क्य विषय समोर आला. हा विषय कधीही न संपणारा असल्याने तसेच त्याचे मूळ व कुळ दोन्ही न सापडणारे असल्याने थोडक्या वेळातच त्याच्यावर पडदा पाडून( वेळ लिमिटेड होता हो !!) सगळेजण इतर विषयांकडे वळले. तिथून पुढे विविध रोग, त्यावरचे उपचार आणि स्वयंघोषित डॉक्टरांचा सुळसुळाट यावर डॉकनी त्यांचे अनुभव सांगितले. दरम्यानच्या काळात सौ सर्वसाक्षी यांनी बरीच धावपळ करून सगळ्यांसाठी पोहे केले आणि त्याच्या बशा बाहेर येऊ लागल्या. सगळेचजण मग गप्पांसकट पोह्यांचा समाचार घेऊ लागले.

भारतात रस्त्यांवरचा ड्रायव्हिंगचा अनुभव ह्यावर गप्पा पोचल्यावर हिरिरीने सर्वजण चर्चेत उतरले. मदनबाण आणि विमेने आपापले आलेले अनुभव आणि त्या अनुषंगाने मनात येणारे खुनशी विचार यावर भाष्य केले. समोरचा कितीही शहाणा असला तरी तो मूर्ख आहे , तो आपल्या रस्त्यात येणारच आणि आपल्याला त्याच्याशी न भांडता आपले मूळ विहित कार्य आणि उद्दिष्ट (जसे की बेस्टचे आहे… आपले उद्दिष्ट ३. ५ किमी प्रतिलिटर… बाकी आजूबाजूची वाहने किती का बोम्बलेनात आपल्या नावाने ) लक्षात घेऊन ड्रायव्हिंग करणे गरजेचे आहे असा निष्कर्ष निघाला. इतके सगळे गप्पाष्टक होईपर्यंत जवळपास १०. ३० झाले होते ( ९ ला कट्टा आटोपता घ्यायचा असे अगोदर ठरले होते ). सगळी मंडळी गडबडीने निघायला उठली. सौ सर्वसाक्षी यांनी सगळ्यांची ओळख करून घेतली ( बरोबरच आहे… कोण कोण येउन गेलं कळायला तरी नको का ?? वर्णनावर किती मिपाकर ओळखता येतील शंकाच असते नाहीतरी… )

सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेऊन आपापली यांत्रिक वाहने इच्छित स्थळाच्या दिशेने मार्गस्थ केली पण आजच्या रविवारच्या सकाळचा एक आगळाच गंध कायम मनात दरवळत राहील…. प्रत्यक्षातले पोपट पुढे भविष्यात दिसोत न दिसोत, मिपाकरांचा किलबिलाट कायमच होत राहणार हे नक्की !!( पुढचा कट्टा तुमचंही घर असू शकतं… चला… कामाला लागा !!)

वि. सू -- "फटू, फाटू" अशा प्रतिक्रिया देऊन भुणभूणु नका … फटू प्रतिसादात येतीलच !! ते पाहून …. जळावे,असाच लोभ असावा ही विनंती !!

राहणीमौजमजाप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाबातमीमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

आदूबाळ's picture

17 May 2015 - 5:01 pm | आदूबाळ

फटू ;)

फटूमध्ये आता पक्षी आणि मिपाप्राणी!!एक अभयारण्य वृत्तांत आवडला!!

टवाळ कार्टा's picture

17 May 2015 - 8:06 pm | टवाळ कार्टा

आज सक्काळी मी इतक्या गाढ झोपेत होतो की माझा मोबल्या अलार्म वाजवून आणी मापचे कॉल घेऊन नंतर त्याने मान टाकली

किसन शिंदे's picture

17 May 2015 - 8:41 pm | किसन शिंदे

अरेच्चा!!! कट्टा वृत्तांत आलाही.. :)

बाकी बर्‍याच दिवसांनी या सगळ्या नव्या-जून्या मिपाकरांना भेटून आनंद झाला.

सानिकास्वप्निल's picture

17 May 2015 - 8:50 pm | सानिकास्वप्निल

मिपाकरांचा किलबिलाट कायमच होत राहणार हे नक्की !!

+११
एका वेगळ्या कट्ट्याचा मस्तं वृत्तांत :)
फोटोची वाट बघत आहोत.

नूतन सावंत's picture

17 May 2015 - 9:53 pm | नूतन सावंत

मस्त वृतांत.

श्रीरंग_जोशी's picture

17 May 2015 - 9:55 pm | श्रीरंग_जोशी

नेहमीपेक्षा वेगळ्या प्रकारच्या कट्ट्याचा वृत्तांत आवडला.

बाकी मिपाचा तथाकथित साचलेपणा तसा विचार करणार्‍यांना तो साचलेपणा लखलाभ असो. मिपाकरांची नवी पिढी असल्या साचलेपणाच्या भावनांमध्ये अडकून न पडता मिपाचा प्रवाह खळाळता ठेवण्यात योगदान देत आहे व पुढेही देत राहील असा विश्वास आहे.

अन्या दातार's picture

17 May 2015 - 10:00 pm | अन्या दातार

अहो, पण इतक्या मिपाकरांचे निदान एका विषयावर तरी एकमत झाले हेही नसे थोडके. काय म्हणता?

श्रीरंग_जोशी's picture

17 May 2015 - 11:26 pm | श्रीरंग_जोशी

देवाचिया दादूलेपनाचा उबारा, न सहावेची साताही सागरा, भेण वोसरूनी राजभरा, दिधली द्वारावती!!

आमच्या दहावी कुमारभारतीच्या पहिल्या पाठातील (नरिंद्रबासा भेटी अनुसरणं) हे वाक्य आठवले.

अद्द्या's picture

17 May 2015 - 10:07 pm | अद्द्या

फोटो न्हाय . . तर कट्टा न्हाय =))

यशोधरा's picture

18 May 2015 - 11:12 am | यशोधरा

झाले तयार एकाच कट्ट्यात बाळकोबा! =))

अद्द्या's picture

19 May 2015 - 2:34 pm | अद्द्या

व्हय . . अगदी पहिल्या २ मिनिटात =]]

अत्रुप्त आत्मा's picture

17 May 2015 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा

मी सांगू का...

हा खरा कट्टा

मायला.. प्लॅन करुन हाटीलात खाण्यात मज्जा हायच,पन त्ये ऐन भुकेच्या वक्ताला येकदम शीद्द सादं ज्येवान येकदम मायींड फ्रेस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स करुण जातं णा,त्येला तोडच णसतीया बगा.

पण आजच्या रविवारच्या सकाळचा एक आगळाच गंध कायम मनात दरवळत राहील…. प्रत्यक्षातले पोपट पुढे भविष्यात दिसोत न दिसोत, मिपाकरांचा किलबिलाट कायमच होत राहणार हे नक्की !!( पुढचा कट्टा तुमचंही घर असू शकतं… चला… कामाला लागा !!)

वि. सू -- "फटू, फाटू" अशा प्रतिक्रिया देऊन भुणभूणु नका … फटू प्रतिसादात येतीलच !! ते पाहून …. जळावे,असाच लोभ असावा ही विनंती !!

>>> ह्ये बगा.. ह्ये हाय तो फ्रेस्स्स्स्स्सनेस!

डॉक साहेबांनी फोनवले आणि या कट्ट्याला हजेरी लावता आले...
साक्षी काकांच्या घरी चहा पोहे आणि जबदस्त पन्हे पिउन या कट्ट्याचा आनंद लुटला ! :)
पोपट आणि बुलबुल...

P2
P3
P1

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bahon Mein Chali Aao... :- Instant Karma

त्रिवेणी's picture

18 May 2015 - 11:07 am | त्रिवेणी

मा झा प्र ति सा द को णी उ ड व ला.

विजुभाऊ's picture

18 May 2015 - 11:17 am | विजुभाऊ

नाराज..... :(

माझीही शॅम्पेन's picture

18 May 2015 - 12:17 pm | माझीही शॅम्पेन

अरे हे काय ...
थोडी कल्पना दिली असती तर नक्कीच आलो असतो , जुन्या कट्टे- करी आम्हास विसरले की काय ?
गेला बाजार ग्रूप वर तरी आवतण्याच बाब्बो ! असो .. मजा करा !!

फोटो नाय तर कट्टा नाय, विषय संपला.

अन्या दातार's picture

18 May 2015 - 4:52 pm | अन्या दातार

साफ सहमत. येउन येउन फक्त दोनच फोटो तोही पोपट आणि बुलबुलचा. कट्टा झालाच नाही असे मानायला लै जागा आहे.

पुढचा कट्टा तुमचंही घर असू शकतं… चला… कामाला लागा !!

हे फक्त ठाणे आणि आजूबाजूच्या मध्यवर्ती विभागांसाठी होतं असं समजतो.

माम्लेदारचा पन्खा's picture

18 May 2015 - 6:05 pm | माम्लेदारचा पन्खा

बादवे, काय काय दिसतं तुमच्या घरातून? :-)

बादवे, काय काय दिसतं तुमच्या घरातून?

तुम्हाला काय काय बघायचंय?

अत्रुप्त आत्मा's picture

18 May 2015 - 6:34 pm | अत्रुप्त आत्मा

ते सर्व हे दाखवणार आहेत!

ते सर्व हे दाखवणार आहेत!

आपणांस मुद्दा कळलेला नाही

अत्रुप्त आत्मा's picture

18 May 2015 - 6:50 pm | अत्रुप्त आत्मा

बरं! :p

चालु द्या निरर्थक अत्मरंजन!!!! ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ :P :/

ही म्हणजे स्वमतांध दांभिकता झाली!!

हा शब्द समहाऊ अगदी सनावृतेची आठवण करून देणारा वाटतोय =)) "*** सनावृता" तशी स्वमतांध दांभिकता. =))

पैसा's picture

18 May 2015 - 6:57 pm | पैसा

मापं यांचं लिखाण नेहमीच आवडतं. ते फार कमी लिहितात अशी तक्रार आहे.

साचलेपण, प्रवाहीपण याबद्दल काळजी करायचं काम नीलकांतवर सोडून आपल्याला जमेल ते करावं हा माझा फंडा. ते सगळ्यांनीच करावं असा आग्रह अजिबात नाही.

बाकी फटु नसल्याने वाचकांचा पोपट करण्याची तयारी झाली आहे असे समजून फटु नाय तर कट्टा नाय. विषय संपला या सूड यांच्या निष्कर्षाला +१

माम्लेदारचा पन्खा's picture

19 May 2015 - 12:39 pm | माम्लेदारचा पन्खा

पण काहीतरी अंतःप्रेरणा आल्यशिवाय लिखाण करणे जमत नाही.... तरीही लिहितं राहायला हवं.....तुमचे प्रोत्साहन हीच माझी प्रेरणा..... नक्की सुरु करेन परत लिहिणं... धन्यवाद !!

टवाळ कार्टा's picture

19 May 2015 - 3:11 pm | टवाळ कार्टा

श्री. मोदकरावांनी दाखवलेल्या सायकलचा आणि तदनुषंगाने तंदुरुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या महन्मंगल कार्यास आपणही थोडा हातभार लावावा (आणि आपला पृथ्वीवरचा भार जमेल तितका कमी करावा) या हेतूने मिपावरचे सध्याचे आकर्षणकेंद्रबिंदू श्री. टका यांच्या साथीने "सायकलरजनीफेरी" काल रात्री चालू होती (आमचे अहोभाग्य हो !!).

काय ती अंतःप्रेरणा....ओसांडून वाहतेय नुस्ती =))

तुम्ही जरा मनावर घ्या बुवा..........

पिंपातला उंदीर's picture

18 May 2015 - 7:04 pm | पिंपातला उंदीर

@ माम्लेदारचा पन्खा , तुमची लिखाणाची शैली खरच खुप छान आहे.

माम्लेदारचा पन्खा's picture

19 May 2015 - 12:41 pm | माम्लेदारचा पन्खा

ध न्य वा द !!

प्रचेतस's picture

18 May 2015 - 7:08 pm | प्रचेतस

मस्त वृत्तांत.

सर्वसाक्षी, रामदास यांसारखे दिग्गज मिपाकर.
कट्टा भलताच रंगला असणार.

बाकी ही सुरुची मिसळ कुठली?

काय दिसतं तुमच्या घरातून?
काय ऐकू येतं ते ऐकवलं आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

18 May 2015 - 10:48 pm | अत्रुप्त आत्मा

परत येकदा वाचीलं.. आनी आम्मी ठान्यात आल्तो,तवा असाच रामदासकाकांच्या हापिसात घातल्येला धुमाकुळ आठिवला! त्या ठाने टिरिपमंदी लै मज्जा आल्ती..त्येचीच चित्र हित टाकावीशी वाटायलीत राव आता!

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 May 2015 - 12:31 am | डॉ सुहास म्हात्रे

वर्णन मस्त ! पण फटू पायजेतच पायजे !!

त्रिवेणी's picture

19 May 2015 - 10:27 am | त्रिवेणी

प ण मा झा प्र ति सा द गे ला कु ठ? कु णी उ ड व ला त्या ला?

अनुप७१८१'s picture

19 May 2015 - 12:03 pm | अनुप७१८१

सेल्फी नाहि का काढ्ला ?

सुबोध खरे's picture

19 May 2015 - 10:25 pm | सुबोध खरे

.
शिंदे सरकार आणि प्रास भाऊ
.मामलेदार
. सर्व साक्षी
.
रामदास
.
मदनबाण
.
विमे

किसन शिंदे's picture

20 May 2015 - 7:39 am | किसन शिंदे

नेहमीप्रमाणे इथेही विमेचा फोटो गंडला आहे. :)

विमे चक्क ठाण्याला आला?

अन्या दातार's picture

20 May 2015 - 5:12 pm | अन्या दातार

'मुंबईच्या' (एकेकाळच्या) सेंटरला विमे का येणार नाहीत? ;)

आपण व्यनिव्यनि किंवा व्हॉट्सअ‍ॅप-व्हॉट्सअ‍ॅप खेळताना बोलू. ;)

टवाळ कार्टा's picture

20 May 2015 - 5:43 pm | टवाळ कार्टा

म्हणजे तु अन्याबरोबर हे सगळे करतोस =))

सूड's picture

20 May 2015 - 6:02 pm | सूड

तुला का चवकश्या?

टवाळ कार्टा's picture

20 May 2015 - 6:29 pm | टवाळ कार्टा

तु जाहिरपणे लिल्हे म्ह्णून

आता उत्तर मिळणार नाही, हेही जाहीरपणे 'ल्हि'तो.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

21 May 2015 - 9:51 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

जाहिर संभाषणाबद्दल आभार आणि छुप्या कट्ट्याबद्दल णी षे ध...!! काळे झेंडे वगैरे वगैरे.

तु मात्र एकदम हिरो दिसतोय पण किस्ना ...
भेटत जा आम्हाला पण

सूड's picture

20 May 2015 - 4:15 pm | सूड

भेटत जा आम्हाला पण

कोण बोलतंय बघा!!

काळा पहाड's picture

20 May 2015 - 4:02 pm | काळा पहाड

हिरवट आजोबांचा १९७५ सालचा फोटो टाकलाय का?

सुबोध खरे's picture

19 May 2015 - 10:29 pm | सुबोध खरे

.
पोपट
.
बुलबुल

टवाळ कार्टा's picture

20 May 2015 - 5:57 pm | टवाळ कार्टा

जेपी संन्यासग्रस्त असल्या कारणाने समस्त कट्टेकर्यांना सत्कार म्हणून एक एक पोपट करून देण्यात येईल ;)

- अखिल मिपा "नाना-माई-माईंचे हे" फ्यान क्लब अध्यक्ष

टवाळ कार्टा's picture

20 May 2015 - 5:58 pm | टवाळ कार्टा

सत्कार धाग्याची पन्नाशी झाल्याबद्दल आहे...टंकायला विसर्लो :(

आदूबाळ's picture

20 May 2015 - 6:18 pm | आदूबाळ

"नाना-माई-माईंचे हे"

हा फ्रेमत्रिकोण* केव्हा तयार झाला?

*या त्रिकोणातले कधीही फ्रेममध्ये जातील म्हणून

सुबोध खरे's picture

20 May 2015 - 7:42 pm | सुबोध खरे

मित्रहो
हा कट्टा म्हणजे सर्वसाक्षी यांनी स्वच्छंद हि मालिका लिहिली तेंव्हा मी त्यांना विचारले कि असे पक्षी निरीक्षण करायला मला आवडेल त्यावर त्यांनी लगेच व्यनि करून केंव्हा येताय हे विचारले? मी १० मी चा रविवार ठरवत होतो परंतु माझे घर हलविणे हा एक मोठा कार्यक्रम चालू असल्याने तेंव्हा मला जमले नाही आणि दूरध्वनीवर १७ च्या रविवारी जमवू असे आम्ही बोललो. १६ तारखेच्या रात्री ९ पर्यंत माझ्या कडून काहीच हालचाल नाही झाली कारण मी दुविधेत होतो कि रविवारी जायचे का परंतु सर्वसाक्षी यांचा दवाखान्यात फोन आल्यावर मी ठरविले कट्टा करायचाच. यानंतर घरी जाऊन जेवेपर्यंत अजून वेळ गेला. साधारण सव्वा दहा वाजता मी त्यांना भीत भीत विचारले कि अजून काही मिपाकर आलेले चालतील का? त्यावर त्यांनी अत्यंत मोकळ्या मनाने बोलवा जितके येतात तितक्यांना असे सांगितले. मग मी मदन बाणला आणि रामदास साहेबाना फोन लावला. यानंतर ट का ला फोन लावला तो तेंव्हा मामलेदारांबरोबर होता दोघांनी होकार दिला( आणि ट का ने टांग मारली) मग मी विमेना फोन केला. त्यांनी प्रास भाऊ ना हे सर्व दूरध्वनी खणखणले तोवर रात्रीचे साडे अकरा वाजले अर्थात एवढ्या उशिरा धागा टाकून अजून कोणी येण्याची शक्यता नव्हती त्यामुळे तो प्रयत्न मी केला नाही. (पुढच्या ठाणे कट्ट्याला हि काळजी घेतली जाईलच). मग माझ्या लक्षात आले कि आपण एवढे जण सर्वसाक्षींकडे सकाळी सकाळी उपाशी जायचे म्हणजे त्यांना शिव्या खायला लागतील. म्हणून मी त्यांना म्हणालो साहेब मी नाश्त्याचे घेऊन येतो. त्यावर ते परत मोकळ्या मनाने म्हणाले कि तुम्ही फक्त या. नाश्त्याची चिंता करू नका. पण सर्वसाक्षी साहेब आणि त्यांच्या सौ ( या पण मिपा कर आहेत. (आय डी -नूतन) यांनी फार अगत्याने सर्वांच्या पोटाची काळजी घेतली.याचा वृत्तांत वर आलेला आहेच.
जाताना मी मला आदल्या दिवशी एका रुग्णाकडून आई ( आणि बाप) झाल्याच्या ख़ुशीचे ताजे आणि मोठे कंदी पेढे आले होते. त्याचा बॉक्स घेऊन गेलो. पेढे फारच छान होते त्यामुळे सकाळी खोका पाहीला तर तो अर्धाच होता. ( मी आणि माझा मुलगा दोघांनी चव म्हणून तोंडात टाकता टाकता किती पेढे खाल्ले ते कळलेच नाही.) तरीही मी तो तसाच तिकडे नेला आणि लोकांना थोडीशी चव घेता आली. प्रास आणि विमे इतक्या "उशिरा माहिती" मिळून "रविवारी पहाटे उठून" पार "दादरहून" येथे आले त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
आता पुढचा ठाणे कट्टा जंगी झाला पाहिजेच असे मी प्रस्तावीत करतो.

अनुमोदन...

हम आयेंगा.

कट्टा+बघण्यासाठी काही असे ठिकाण असले ( जसे घारापुरी झाले) की गप्पा आणि क्यामेय्रास खाद्य मिळते. तुंगारेश्वराचा विचार व्हावा. चार पाच जणांनी तरी मिनी कट्टा करावा.सप्टेंबरानंतर फलपाखरे डिसेंबरपर्यंत असतात.ओढाही असतो.
वसईपासून आठ किमी, EEXP वरच्या सातिवली पासून २ किमीवर आहे तुंगारेश्वर पायथा आणि अरण्य.ठाणे-नालासोपारा /वसई/विरार बस ने जाता येते.

सर्वसाक्षी's picture

21 May 2015 - 6:20 pm | सर्वसाक्षी

डॉ.

आपण आलात, अगदी अल्प काळात मिपाकर जमवलेत आनंद झाला. आपण, मदनबाण, प्रास, विमे, मामलेदार, किसन सगळे रविवार सकाळची झोप सोडुन आलात या साठी मी आभारी आहे. मिपाचे पोपट जमल्यावर बाहेरचे पक्षी बघण्याकडे / टिपण्याकडे थोडे दुर्लक्ष होणे स्वाभाविकच आहे. हरकत नाही, मी टिपलेले काही पक्षी इथे टाकतो.

उत्तरास जरा उशीर झाला, क्षमस्व. सध्या बंगळुरात आहे. यानंतर अधिक मोठा कट्टा करु

साक्षी

टवाळ कार्टा's picture

21 May 2015 - 6:30 pm | टवाळ कार्टा

मला नै जमले उठायला...नेक्ष्ट टैम नक्की

सुबोध खरे's picture

21 May 2015 - 9:36 pm | सुबोध खरे

सर्व साक्षी साहेब
आपण म्हणालात ते अक्षरशः सत्य आहे. आपल्या गप्पा इतक्या छान रंगल्या होत्या कि मला पक्षी सोडून तेथे यावेसे वाटले त्यामुळे पक्षांचे फोटो फारसे नाहीत. अर्थात त्याचे मला अजिबात वाईट वाटत नाहीत. फोटो माझेच असावेत असा माझा आग्रह हि नाही.

यानंतर अधिक मोठा कट्टा करु
अगदी ! अगदी ! :)
यावेळी अगदी होलसेल मधे गप्पा झाल्या...सकाळी ७ ते ९:३० वेळ कसा गेला ते समजलेच नाही !
बाकी या धाग्यावर आलो की सारखी पन्ह्याची आठवण येते आहे ! इतक्या उत्कॄष्ठ पन्ह्याचा मी बर्‍याच काळाने आस्वाद घेतला. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shake It Off... ;) :- Taylor Swift >